अस्सल पारंपारीक पद्धतीने उडदाचं घुटं | Udadache ghute | Urad Dal Ghute Recipe |

  Рет қаралды 867,401

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

अस्सल पारंपारीक पद्धतीने उडदाचं घुटं | Udadache ghute | Urad Dal Ghute Recipe | #Banairecipes
#uraddalcurry
#उडीद
#घुटं
#dhangarijivan #siduhake #banai
#Banairecipe

Пікірлер: 803
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
भेगडलेली जमीन त्यावर संसार मांडला माऊली तुला सलाम तक्रार नाही तेव्हडाच ऊत्साह हसरा चेहरा डोक्यावर पदर सलाम ताई
@prasadchate6806
@prasadchate6806 Жыл бұрын
उघड्यावरच जगणं कष्टाने, एकमेकांच्या साथीने आणि विश्वासाने किती अर्थपूर्ण जगत आहेत ही साधी माणसे. शिक्षण नसून सुद्धा कौशल्याने you tube channel काढून लोकप्रिय झालात. खूप खूप कौतुक तुमचं. ईश्वर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात सदैव तुमच्या सोबत राहो हिच मनोकामना!
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 8 ай бұрын
U tube वरील हे एकमेव चॅनल असेल ज्याला ट्रोल नाही की निगेटीव्ह काॅमेंट नाही. व्हिडिओ सुरू केला की संपूच नाही असे वाटते. सिद्धू दादा ,अर्चना,सागर बाळ,किसन आणि ग्रेट बाणाईताई सर्व प्रेमळ आहेत.❤❤❤
@jyotisangamnerkar9679
@jyotisangamnerkar9679 Жыл бұрын
खरी सुगरण आहे माऊली,डोक्यावर चा पदर सावरत सावरत छान स्वयपांक करते,पाट्या वरचे वाट न मिक्सर पेक्षा खुप आरोग्य दायी आहे
@sgkantak1853
@sgkantak1853 Жыл бұрын
किती दुश्कर् जीवन जगता तुम्ही. ताई सगळे जेवण पत्यावर् वाटून बनव्तात् ते हि हसत मुख राहून. आणि आमच्या शहरातल्या बाया मिक्सर ग्रैन्देर् असून सुद्धा जेवण बनवाय्ला किरकिर करतात. तुमच्या कडे गॅस नाही फॅन नाही पंखा एसी नाही तरी जेमतेम सन्सारात् किती सुखान् राहता....असेच राहा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सर्ख्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
@ashokrupnawar5572
@ashokrupnawar5572 Жыл бұрын
गावातील भावकी पासून दूर माणसं राग , लोभ, मत्सर, द्वेष या पासून दुर रानात राहणे आनंद दारी आपण केले हितपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनेक अडचणी येतात ऊन वारा पाऊस वादळं स्थानिकांनी दिलेला त्रास अनेक अडचणी येतात परंतु हे लोक आनंदाने प्रेमाने आपुलकीने राहतात वाईट प्रसंग या भावाने नाही सांगितलं धन्यवाद आपले दुःख मनात गिळून दुसऱ्या लोकांना आनंद देणे सोपे नाही धन्यवाद हाके पाहुणे बाणाई ताईसाहेब मनापासून आभार असेच प्रेम राहू द्या
@geetabhosale6311
@geetabhosale6311 Жыл бұрын
आजच्या परिस्थितीला असं जीवन जगणं खूप कठीण आहे आणि इतके कष्ट करता तरी पण तुमच्या चेहऱ्यावर हास्य असतं हे फार महत्वाचं आहे खरच तुम्ही खूप ग्रेट आहात बानाई तर खूप छान आहे बिचारी ती एक सुगरण आहे, दादा अशी बायको मिळायला भाग्य लागतं ओ खूप कष्टाळू आहे बाणाई,
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
किती सुंदर जीवनाचा आनंद घेता तुम्ही सलाम तुम्हाला .आणि बानाई तर सुगरण आहे एकच नंबर.
@kambleshubhangi2167
@kambleshubhangi2167 Жыл бұрын
ताई सुंदर बोलता आणि सुंदर स्वयंपाक, खरं आहे भावा जीवन सुंदर आहे ते तुमच्या सारखं जगावं 👌👌👍👍
@supriyaphadnis5775
@supriyaphadnis5775 Жыл бұрын
सौ.बाणाई..आशीर्वाद. कोंडयाचा मांडा करून सौसार काय असतो,ते तुझे व्हिडीओ बघून समजते.इतके कष्ट करून हसत खेळत रहातेस.छान जेवण करतेस.शाब्बास बाणाई. अग मी 70 वर्षांची आजी आहे.पण तूज्याकडे माहेरपणाला यावेसे वाटते ग लेकी. इतके चविष्ट दिसते जेवण कि न खाताच पोट भरल्याचा ढेकर येतो.रानोमाळी नवऱ्याच्या मागे फिरून हसत खेळत सन्सार करणाऱ्या बाणाईला या म्हातारीचा नमस्कार
@swatisuhas2744
@swatisuhas2744 Жыл бұрын
ह्या ताईंच्या हातात साक्षात अन्नपूर्णा वास करते आहे. भाकरीचे पापुद्रे कित्ती सुरेख !! ताईंना साष्टांग दंडवत !!👌💐
@meerabegampure6541
@meerabegampure6541 7 ай бұрын
देव तुम्हा सर्वांना सुखी,आनंदी,सुरक्षित ठेवो.. 🙏❤️
@aaratisawant6699
@aaratisawant6699 7 ай бұрын
बानाई छान उडदाचे घुंटे बनवलेस आणि त्याबरोबर माहिती ही छान दिलीस की शनिवार, अमावस्या ,पौर्णिमाअसेल त्यावेळी उडदाचे काही पदाथ॔ बनवायचे नाही असे अशाच तुझ्या टिप पण देत जा कारण सगळ्यानांच या गोष्टी माहित नसतात आणि ही जमिन किती भेंगा आहेत खरच तुला मानले पाहिजे आमच्या सर्वाच खुप प्रेम आहे तुझ्याबरोबर❤❤❤❤❤❤❤
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
खुपच सुंदर स्वयंपाक,, संपूर्ण हाके परिवारास गुढीपाडव्याच्या खूप सार्‍या शुभेच्छा
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 7 ай бұрын
बाळ किती निष्पाप, गोड आहे। बाणाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, प्रेमळ माऊली आहे। तुमचं जीवन तुम्ही किती आनंदाने जगत आहात! सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 😊
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी केलय घुट सांगू नको कुट 😃👌👌👍पण आम्हाला समजल की घुट केलय 😃😃👌👍 घुट, भाकरी लय भारी लागत. 😋😋👌👌👍 घुट असल की सुक्या भाजीची पण गरज पण लागत नाही. 👌👌👍
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
बाणाई खूप समजदार आहे सुगरण आहे तुम्हाला छान साथ देत आहे हॅपी गुढीपाडवा🎉❤
@ganeshhirve3701
@ganeshhirve3701 Жыл бұрын
मस्त
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 Жыл бұрын
तुमचे कष्ट व जीवन बघून खुपच वाईट वाटतेय पण त्यातही तुम्ही आनंद शोधता हे महत्वाचे आहे. हे भारी आहे. देव तुमचे रकशन करोत ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. 👌👌👍🏻👍🏻🙏🙏🌹🌹
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 4 ай бұрын
ही आमची मराठी गरीब साधी माणसं. ह्यांना आरक्षण हवे. त्यांची मुलं शिकून मोठी व्हावीत. खूप छान ताई मनापासून स्वैपाक करतेय..किती positive couple ❤️ पिल्लू किती छान..
@vandanaghodekar3338
@vandanaghodekar3338 Жыл бұрын
👌🏻👌🏻उडदाचा घुट एकदम मस्त 🌷🌷दादा तुमचे आयुष्य खरेच कष्टाचे आहे 🌷पण मुलांना चांगले शिकवा 🌷म्हणजे तुमचे कष्टाचे सार्थक होईल 💐💐🙏🏻बाजरीची भाकरी आईची आठवण आली 🙏🏻
@sulbhaparkar5043
@sulbhaparkar5043 7 ай бұрын
लय भारी घुटं हाय.ताईचं सगळया सुचना पाळुन बनवलं पाहीजे.कुठे सजवलेलं स्वैपाकघर आणि त तुम्ही स्वैपाक करीत असलेली जागा.जेवण तर तुमच्या चुलीवरंचंच बेस्ट हाय कि.बोलता बोलता ,बनवता बनवता करून दाखवलंत.खूप मस्त. घुटं कधी बनवायचं नाही हेही सांगितलंत.अशा काही सुचना तुम्ही सुद्धा पाळता.माझ्या माहेरी अमावस्येला आणि शनिवारी चटणी नाही बनवायचे ते मला आठवलं. पुढच्या रेसिपिसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤.
@tukaramdipake3091
@tukaramdipake3091 7 ай бұрын
छान!अतिशय,सुंदर ,नैसर्गिक आनंदी जीवन,उडदाच घुटं,आणि सांगू नका कुठं,समर्पक !सुखी व आनंदी कुटुंब!
@samicajadhao1635
@samicajadhao1635 6 ай бұрын
खूपच छान पारंपारिक जेवण पध्दती आहे,देव तुम्हा सर्वजणाना आनंदी ठेवो
@dkborkarkkborkar9273
@dkborkarkkborkar9273 Жыл бұрын
सर्व जिंदगी पेक्षाही जिंदगी लय लय भारी एकदम
@veenawadia5222
@veenawadia5222 8 ай бұрын
कष्टातसुध्दा आनंदी जीवन पाहून फार आनंद झाला
@nihu1086
@nihu1086 Жыл бұрын
मला आवडले हे वाक्य जीवन हे सुंदर आहे आहे त्यात आनंद घ्या. पण असे शेतात उघड्यावरच तेही बिळ बघून तुम्ही गादी म्हणल्यावर खूप छान वाटले की आहे त्यात समाधान मानून जगता.पण तुमच्या जीवनात खूप संघर्ष आहे. घुट आवडले गादीवर वहिनी बाई.👌👌
@priyakurne9464
@priyakurne9464 Жыл бұрын
आजही मुळशी तालुक्या उडदाच्या दाळीच गुठ खालं जात,खुप छान लागत,माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या,वावरात आईसोबत काम करायला गेल्यावर अश्याप्रकारचं गुठ भात दुपारी वावरात सगळे मिळून खायचे.खुप मज्जा यायची.😊😊😊😊😊😊😊😊☺☺☺☺☺
@ratnabadgujar8861
@ratnabadgujar8861 Жыл бұрын
काय ते लज्जतदार मेजवानी आम्ही शहरात राहणार्‍या लोकांना नाही नशिबी ....बाणाई सुगरणच आहे ....उडीद डाळ बाजरीची भाकरी व्वा व्वा मस्तच आहे बेत तोंडाला पाणी सुटलं
@letssing9990
@letssing9990 Жыл бұрын
आपल्या कष्टाच खाणयात वेगळीच मजा असते.सुखाने खावा ,आनंदात रहा...हिच अपेक्षा.
@sunitashinde2834
@sunitashinde2834 4 ай бұрын
खरंच लय भारी channel. पांढऱ्या लोकरीचे जेन सहसा मीलत नाही.
@varshabhosale3017
@varshabhosale3017 5 ай бұрын
बाणाई ताई मी तुमच्या पद्धतीने काळे उडीद बनविले आणि खरच अप्रतिम झाले ,आम्हाला काळे उडीद चिकटपणामुळे आवडत नव्हते पण तुमच्या पद्धतीने बनविल्यावर घरात मुलांनी सुद्धा आवडीने खाल्ले .धन्यवाद ताई एवढ्या पौष्टिक पदार्थाची स्वादिष्ट पद्धत दाखवल्याबद्दल 🙏🙏🙏
@shyamalakulkarni3261
@shyamalakulkarni3261 7 ай бұрын
खरे नै सर्गिक जीवन तुम्ही जगता सुगरण माउलीला प्रणाम
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 5 ай бұрын
आम्ही उडदाची घुट बनवतो खुप टेष्टी लागले बाजरीच्या भाकरीसोबत..
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 9 ай бұрын
कष्टात आयुष्य आहे तुमच ! बाणाई सारख्या सुगरणी मुळे ते सुसह्य होतय.
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 Жыл бұрын
सुंदर स्वयंपाक चुलीवरची भाकरी पाहुन तोंडाला पाणी सुटले
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 8 ай бұрын
मला खूप छान वाटत तुमचे जेवण खाऊ वाटत आम्ही मोठ्या सइटईत राहतो आम्हाला हे बघून खूप छान वाटत ओ बाणाई ताई सलाम ❤
@ashatodkar3506
@ashatodkar3506 7 ай бұрын
ओम शांंती🙏 बानू ताई व दादा तुमच्या कुंटुबाची राहणीमान व जीवन विषयी चे विचार खरचं खूप छान व सतय आहे त मुंलाना शिक्षण दया 😊🥰🙏
@sadanandsaravankar3082
@sadanandsaravankar3082 8 ай бұрын
देव तुम्हा उभयतांना सुखी व आनंदी ठेवो
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
❤ खुप छान रेसिपी आहे वैनी नवीन नवीन पद्धत शिकायला मिळते
@artcraft542
@artcraft542 Жыл бұрын
तूमची मित्रा कमालच आहे कसे काय व्हिडीओ बनवायला कसे का असेना तुमचे प्रयत्न जोरात आहेत एकदम धनगरी जीवन कसे असते धन्यवाद
@vibhadhole7127
@vibhadhole7127 4 ай бұрын
Banaila bghun khup prasanna vatte
@shinduparab9878
@shinduparab9878 8 ай бұрын
बानी ताई खुप सुगरण आहात. हसत हसत आणि सहज सर्व स्वयंपाक केला. भाकरी खुप छान आहे त्या परिस्थितीत आनंदी रहाता खरेच. तुमच्या सर्व कुटुंबास खुप आशिर्वाद.😊😮
@manglalamkhade6703
@manglalamkhade6703 7 ай бұрын
बानाई ताई खुप छान उडदाची डाळ,वरण म्हणतात मस्त जेवण केले तुम्ही खूप सुगरण आहात मी पण तुमच्या कडुन शीकत असते सर्व भाज्या छान करताय तुम्ही असेच आनंदी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@drtlectures7622
@drtlectures7622 Жыл бұрын
तुमचे बोल खुप महत्वाचे आहेत येईल त्या परिस्थितीत माणसाने तोंड दिले पाहिजे आणि जीवनाचा आनंद घेतला पाहिजे हे आपल्याकडे बघुन समजते.
@sunandasuryavanshi5334
@sunandasuryavanshi5334 7 ай бұрын
❤ लक्ष्मी आहे बानाई खरच... खुप सुंदर स्वयंपाक करते किती आनंदात..... छोट्या ना.... पाट्या वर वाटण....मी तर...बचत... राहते.... जवळपास असती....तर. नक्की च... जेवायला आलो असतो खूप सुंदर तोंडाला पाणी सुटले घुट पाहून....‌😋😋😋
@beenadhavle8431
@beenadhavle8431 Жыл бұрын
एकच नंबर रेसिपी मीही अशीच बनवते उडदाची आमटी
@savantmagdum7191
@savantmagdum7191 6 ай бұрын
चवीष्ट व पौष्टिक आहार आहे. आमच्या नशिबी असले जेवण कधी मिळणार देव जाणे.
@shilpapatwardhan6479
@shilpapatwardhan6479 Жыл бұрын
बाणाई बाई खूपच सुगरण आहात तुम्ही, आणि हसत करता सगळा स्वयंपाक त्यामुळं तो जास्तच चवदार लागत असेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🏼
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 9 ай бұрын
अरे वा घुट्याचा वास आला बर का.... मस्त रेसिपीज असतात तुझ्या बाणाई ...
@shubhangimokashi6295
@shubhangimokashi6295 9 ай бұрын
फारच सुंदर तुमचे कौटुंबिक जीवन! सर्वांना एकमेका बद्दल केवढा जिव्हाळा आणि आदर आहे! तुम्ही केलेला स्वयंपाक किती आवडीने आणि कौतुकाने जेवत आहात. खूप भाग्यवान आहात.
@sarojbisure1335
@sarojbisure1335 Ай бұрын
भाऊ अगदी खर आहे.जीवन आनंद यात्रा आहे.आपण सगळेच यात्री आहोत.जीवनात एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांसाठी असण महत्त्वपूर्ण आहे.
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 5 ай бұрын
लयच भारी❤ बानाई तुमचे करावे तवडे कौवतुक कमीच आहे स्त्री जातीला सलाम
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
खूप छान झाले घुटं. बानाई सुगरण आहे. 👌👌
@shilapalve1752
@shilapalve1752 Жыл бұрын
दादा वहीनीला कुकर घेऊन दया रेसीपी खूप छान बनवली
@Travellife892
@Travellife892 Жыл бұрын
बाणाई ताई सारखी भारतात दुसरी महिला सध्याच्या काळात कुठे च नाही भेटणार
@varshakakade-io2qb
@varshakakade-io2qb Ай бұрын
Kiti swachta Ani Sundar pane kelay sarv
@pramoddeshpande3513
@pramoddeshpande3513 Жыл бұрын
अतिशय छान. मस्त. सर्दी,पडशाने नाक गळत असेल बेजार झाला असाल तर हे झणझणीत घुटं व गरम भाकरी खावी. आजार कुठं गेला कळणार पण नाही. घुट्याचा हा एक उपयोग आहे.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 ай бұрын
सुगरण बानाई 👌👌🌹🌹
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 8 ай бұрын
मधुरा पेक्षा भारी 👌👌👌👌
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 3 ай бұрын
सागर चा घोडा छान आहे नेहमी प्रमाणे घुट एक नंबर
@monikapawar9924
@monikapawar9924 11 ай бұрын
एवढ्या खडतर जीवनामध्ये सुद्धा तुम्ही खूप खुश राहता खूप छान 👌ताई खूप जुनी रेसिपी आहे घुट 👌.
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 Жыл бұрын
खरच पारंपारिक घुट माऊलीच्या कपाळी मस्त ठळक आडव कुंकू पाहून मन भारावून गेल, चंद्रकोरी सारखीच ह्या आडव्या कुंका ची सुध्दा नवतरूणींनी सुरवात करावी कपाळावर उठून दिसेल
@nirmalas.401
@nirmalas.401 3 ай бұрын
बानाई साक्षात अन्नपुर्णा आहे. गॅस,मिक्सर, भरपूर भांडी असली कोणतीच सुविधा नसताना डोक्यावर चा पदर अन होठावरील स्मित सांभाळून किती सुंदर स्वयंपाक करते.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
खरोखर रानाची लेकरे आहात तुम्ही.ह्या ताईंच्या हातचे जेवण खरच सुग्रास वाटतेय.मी सर्व एपिसोड बघतो धनगरी जीवन चे.खुपच्छान रेसिपी आहे.
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
दादा वहिनी व किसन भाऊ व बारकी वहिनी तसेच तुमचा लाडका बारक्या उर्फ सागर यांस पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@sarojbacchuwar7252
@sarojbacchuwar7252 8 ай бұрын
खूप छान पण कष्टाचे जीवन आहे तुमचे.तरी तुम्ही आनंदात असता.खूप कौतुक वाटते. तुमचे छोटेसे बाळ खाली जमिनीवर झोपतो. त्याची खूप काळजी वाटते. ताई नी घुट ची रेसिपी छान सांगीतली.
@anilshikare8254
@anilshikare8254 4 ай бұрын
खूपच छान... जेवढ्या गरजा कमी तेवढं आनंदी जगता येत हे तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर वाटत
@ajitshah6258
@ajitshah6258 Жыл бұрын
Wa! Wa! Urlacher ghute , siddhu hakeji chan! Chan. ❤👌👌👌👌👍👍👍
@vikasbangar8979
@vikasbangar8979 Жыл бұрын
आम्ही चणाडाळ आणि काळी उडद डाळ एकत्र करून बनवतो खूप मस्त लागते
@ITSDMSTLE
@ITSDMSTLE 3 ай бұрын
very nice recipe, God bless you with happiness
@ashayadav2446
@ashayadav2446 Жыл бұрын
कोणत्याहीपरीस्धितीत समाधान शोधता आणि एकोप्यान राहता.....हेच तुमच्या आनंदाच रहस्य असाव...असेच आनंदी व खुश रहासगळे...बाणाई ऊत्तम सुगरण आहे.
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
मस्त झाला आहे स्वयंपाक. आरावर भाजलेली भाकर खूप भारी लागते. चव खूप भारी लागते.
@rajdande8495
@rajdande8495 Жыл бұрын
खुप चवदार केलीय ताई भाजी मी सुद्धा अशीच करते पण चुलीवरच जेवन फारच चवदार👍👍
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 10 ай бұрын
सुंदर विडीओ प्रथम धन्यवाद माय माउली ला ना घर ना टीव्ही पण समाधानी कुटुंब पाहुण मण भरले सुंदर आशी गुटयाची रेसिपी व बाजरी ची भाकरी पाहुण मण भरले कुठलेही ज्ञान घ्यायचे म्हटले की अवघड नाही आणि ह्या विडीओ मधुन सिद्ध होते धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
@sunitahushare4784
@sunitahushare4784 Жыл бұрын
गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा बानाईताई अर्चना किसन दादा आणि गोड बाळ सागर तुम्हां सर्वांना पण गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ShrinathBhavishya-zf6ky
@ShrinathBhavishya-zf6ky 9 ай бұрын
O,k khub chhan
@santoshmore7526
@santoshmore7526 Жыл бұрын
सुंदर,,समाधानी,,जीवन जगताय भाऊ ,,,, कष्टाची भाकरी किती गोड,,, गुढी पाडवा शुभेच्छा💐💐💐
@Jayashreepawar1717
@Jayashreepawar1717 3 ай бұрын
As vat lagech jav jewan karyala etak sundar banavata tumhi khup chan
@Rashiofficial-777
@Rashiofficial-777 9 ай бұрын
स्वच्छता अप्रतिम❤😊
@surekhanalawade7334
@surekhanalawade7334 7 ай бұрын
Kup kup chan chullivarcha स्वयंपाक
@sushamgamre2435
@sushamgamre2435 Жыл бұрын
भाकरी किती छान बनवते बाणांई
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
आनंदी जीवन कसे जगावे ते तुमच्या कडे बघून शिकावे धन्य आहात
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 Жыл бұрын
👌बाणाई खऱ्या सुगरण आहेत. एवढया कष्टात सुद्धा हसत रहाता. एकमेकांना जीव लावता... भारी आहात तुम्ही सगळे. घुटं एकच नं.
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Udadaache ghute resipi khup chhan jhali video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍🙏
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 7 ай бұрын
नमस्कार भाऊ व सौ .बाणांनी वहिनी. भाकर घुट जेन पाहिलं की मी लहान पणी मामाच्या गावाला जायची ती आठवण झाली. तो सांजवेळी चुली वरचा वास. खुप छान. तुमच्या सर्वांच खुप कौतुक. परमेश्वराने दिलेला वावर रूपी घर ही झकास.‌समाधानी भरलेलं तुमचं कुटंब असंच आनंदी राहो ही त्या परमेश्वरा चरणी प्रार्थना. वहिनीची भाकर आम्हाला अशीच डोळ्यांनी तरी खायला मिळतो.‌घुट खरंच सुंदर. असं वाटतं पितळीत घेऊन प्यावं. खुप खुप धन्यवाद 🙏
@sanjalisawant2080
@sanjalisawant2080 11 ай бұрын
खूप छान hats off to your family 🙏
@anitabahurupe283
@anitabahurupe283 9 ай бұрын
खूप छान यात थोडी मुठभर हरबरा डाळ घातली उडीद डाळी बरोबर तर खूप छान लागते
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबालाछान स्वयंपाक केला वहिनीने
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
उडदाच घुट मस्त बनवलं आहे. आम्ही पण नेहमी असच बनवतो. खूप छान लागतं.
@nakulmaharshi2634
@nakulmaharshi2634 8 ай бұрын
वा हे जे वाटून भाजी केली ना वा 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@jyotivora9952
@jyotivora9952 10 ай бұрын
Banaitai....khoopach chaan recipe❤
@Sunsi624
@Sunsi624 Жыл бұрын
रानावनात राहाताय भाऊ.‌..बाळा ची व परिवाराची..काळजी घ्या..बाकी तर रक्षण करायला खंडोबा आहे.. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला..
@krishnaraomahalankar7341
@krishnaraomahalankar7341 Жыл бұрын
खूप सुंदर आहे धनगरी जीवन. 👌👍🙏🚩 जयहरिश्रीविठ्ठल. 🌹💐 श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर जि.लातूर. 😊 आमच्या गावात पण फुले,टोपे,बैकरे धनगर समाज आहे पण ते शेती करतात. मेंढपाळ नाहीत. 🐏🐑🐐
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
तुम्हा सर्व परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@umadudhgaonkar618
@umadudhgaonkar618 Жыл бұрын
खूप खूप खूप छान.. हेच खरं आनंददायी जीवन ं.. जीवनाचा खरा आनंद तुम्हीघेत आणि देत आहात.. दादा.. असेच आनंदी रहा सगळे जण..!!
@mugdhakandalgaonkar2164
@mugdhakandalgaonkar2164 4 ай бұрын
लवकरात लवकर बाणाईला मोठ स्वयंपाक घर मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना .
@user-lc2bw1bv4b
@user-lc2bw1bv4b 8 ай бұрын
Khupach chhan Jevan banvte banutai ❤
@rohiniaher6798
@rohiniaher6798 7 ай бұрын
सागर खूप छान जेवण करत आहे असे शहरातील मुलांना दाखवून द्यायला हवे खूप गोड मुलगा आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏🙏
@desai86
@desai86 Жыл бұрын
Aajch me tumcha pahila video pahila 👌 Banai chi bhasha aani chulivarcha swaynpak mastch 👏👍 happy gudhi padwa
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН