Рет қаралды 189,271
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज चौथा स्मृती दिन आहे. यानिमित्तानं बीड जिल्ह्यातील परळी इथल्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भावूक झाले.
यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या सोबतचे अनेक किस्से त्यांनी उपस्थितींना ऐकवले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे, महादेव जानकर, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.