No video

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादक माफियां विरोधात पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे उपोषण आंदोलन

  Рет қаралды 80

SANGHARSHNAYAK  MEDIA

SANGHARSHNAYAK MEDIA

Күн бұрын

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादक माफीयांवर कारवाईच्या मागणीसाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे उपोषण आंदोलन
इचलकरंजी : भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादक माफियांना नियंत्रीत करण्या साठी शासनाने विशेष मंत्रालयाची स्थापना करावी या .मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना च्या वतीने मंगळवार दिनांक 7/11/2023 रोजी सकाळी 11.00 वाजले पासुन प्रांताधिकारी कार्यालय इचलकरंजी येथे बेमुदत उपोषण जिल्हाध्यक्ष जयसिंग कांबळे व इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्रिंबक दातार यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सुरुवात करण्यात आली
व्हे पावडर ,रिफाईन्ड पाल्म तेल , पाल्म करनेल तेल व ग्लिसरीन मोनो स्टिरट यांचा वापर करून भेसळयुक्त खवा चक्का व पनीर उत्पादक माफिया हे हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी औद्योगीक वसाहत , भादोले , नंरदे ,हालोंडी . इचलकरंजी व शिरोळ तालुक्यातील अकिवाट . मजरेवाडी .हेरवाड , सै . टाकळी खिद्रापूर अ .लाट ,आलास .गणेशवाडी कवठेगुंलद नृसिंहवाडी . यड्राव ,टाकवडेआदी गांवात भेसळयुक्त खवा .चकका व पनिर उत्पादन मोठ्या प्रमाणात करित असुन मुंबई ,पुणे , गोवा , हैदराबाद आदी मोठ्या शहरात व शेजारील इतर राज्यात वितरण केले जाते याकडे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्रालयाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अश्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांवर कडक निर्बंध घालण्यात येऊन यांना नियंत्रीत करण्यासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करावी या मागणी यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 सकाळी 11.00 वाजले पासुन इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण आंदोलन करित आहे
भेसळयुक्त दुग्धजन पदार्थामुळे मानवी शरीरावर हृदय किडनी व यकृत निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे दुधातील भेसळी मुळे शरीर वाढीसाठी आवश्यक असणारे लायसीन व अमोनिया आम्ल शरीरात उपलब्ध होत नाही परिणामी लहान मुलांच्या शरीर वाढीवर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदयविकारासारखे आजार जडत आहेत कॅन्सर रुग्णांची सुद्धा वाढ होत आहे
खवा चक्का व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी महाराष्ट राज्यात किती लिटर दूध व दुध पावडर वापरण्यात येते याची आकेडीवारी शासनाने जाहीर करून या व्यवसायातील माफियांना नियंत्रित करण्यासाठी शासनाने विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी कृत्रिम दुध भेसळ व भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादनात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र व प्राणीशास्त्र (हार्मोनियम ) विभागातून उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचां तसेच अन्न औषध प्रशासनातील काही अधिकारी यांची मिलीभगत आहे याची ही चौकशी झाली पाहिजे संबधीत भेसळयुक्त दुग्धजन पदार्थ उत्पादक माफिया हे व्यवसाय करत असताना अनाधिकृत जळावू लाकुड वापरतात . दुध गरम करण्यासाठी जो बॉयलर आहे त्याची ही रितसर बाष्पके विभागाकडून परवानगी घेतलेली नाही तसेच बॉयलर मधुन निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होते या करिता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कडून त्यांनी परवानगी घेतलेली नाही त्यामुळे संबंधित आस्थापना ची नोंदणी मान्यता व परवाणगी ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे या आंदोलनात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले हुसेन मुजावर अर्जुन भिसे मुन्ना शेख समिर विजापुरे दगडू कांबळे तानाजी शिंदे दिनकर थोरात सिद्धार्थ गायकवाड जयसिंग तराळ कुमार कांबळे मच्छिंद्र कांबळे मुकेश घाटगे श्रीकांत मोरे प्रविण काबळे पैगंबर मुजावर कुमार कांबळे रेंदाळ जब्बार शेख आदी सहभाग होते

Пікірлер
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 9 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН