ब्रेकफास्ट, लंच किंवा डीनर, कधीही बनवा असा पदार्थ टोमॅटो आम्लेट | Tomato omelet | लीनाज सुगरणकट्टा

  Рет қаралды 24,884

Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta

4 ай бұрын

#टोमॅटोआमलेट #नाश्ता #पोटभरीचापदार्थ #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
टोमॅटो आम्लेट
२वाट्या चणाडाळीचे पीठ
पाव वाटी तांदळाचे पीठ
२ टोमॅटो
१ बारीक चिरलेला कांदा
१ तिखट हिरवी मिरची
अर्धा इंच आले
बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा हळद
दीड चमचा तिखट
१ चमचा साखर
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरेपूड
१ चमचा ओवा
चवीनुसार मीठ.
मिक्सरच्या छोट्या भांड्यात एक टोमॅटो, हिरवी मिरची, आले वाटून घ्यावे.
एक टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
आता एका बाऊलमध्ये वरील सर्व जिन्नस घालावे. त्यात केलेली टोमॅटो मिरची आल्याची पेस्ट घालावी. ओवा घालताना तो थोडा हाताने चोळून मग घालावा.
मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून परत एकदा फिरवून घ्या. यामुळे मिक्सरच्या ब्लेडच्या खाली लागलेले मिश्रणपण पाण्यामुळे स्वच्छ होते.
आता हे पाणी पण बाऊलमध्ये घाला. आणि जसे पाणी लागेल तेवढे वापरून डोसा बॅटर एवढे पातळ करा.
तवा मध्यम आचेवर गरम करून घ्या.
डावाने तव्यावर गोलाकार पद्धतीने हे बॅटर घाला. हे बॅटर डोशासारखे खूप पसरवायचे नाही.
कडेने तेल किंवा तूप सोडा. (नॉनस्टिक तव्यावर गरज नाही.)
कडेने होत आला की पलटवून दुसरी बाजू पण भाजून घ्या.
हा गरमागरम खूप छान लागतो. बरोबर टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी.. काहीही द्या.
टोमॅटो आम्लेट सॅण्डविच पण छान लागते.
दोन ब्रेडचे स्लाईस घ्या. दोन्हीला आधी बटर लावा. मग एकाला सॉस आणि दुसऱ्याला हिरवी चटणी लावा. मधे हे टोमॅटो आम्लेट कापून ठेवा. आणि मस्त टोमॅटो आम्लेट सॅण्डविच करून खा.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

Пікірлер: 37
@aminkhanpathan3005
@aminkhanpathan3005 4 күн бұрын
Chhan aahe
@nandasawant3422
@nandasawant3422 3 ай бұрын
अतिशय सुरेख
@prasadjayade6006
@prasadjayade6006 4 ай бұрын
खूपच सुंदर
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 4 ай бұрын
मस्त आहे ऑम्लेट छानच आहे
@truptikapse3730
@truptikapse3730 4 ай бұрын
Khup ch chan
@laxmandesai9829
@laxmandesai9829 4 ай бұрын
खुप छान
@madhaviscooking-cs2lo
@madhaviscooking-cs2lo 4 ай бұрын
मस्त!!!👌👌👌
@anjalipatil4135
@anjalipatil4135 4 ай бұрын
Khup chan
@pranalipathare7116
@pranalipathare7116 4 ай бұрын
Yummy testy crispy 😋👌👌👍😊 thanks for sharing
@gufu6976
@gufu6976 4 ай бұрын
Nice video astat mla tumchi smjaun sagne kuoch awadte nice resipi
@truptikapse3730
@truptikapse3730 4 ай бұрын
Khup khup
@sandhyadingankar9927
@sandhyadingankar9927 4 ай бұрын
एकदम यमी…..😋
@varshanimbkar605
@varshanimbkar605 4 ай бұрын
Tasty..😋😋
@4in1kkkk78
@4in1kkkk78 4 ай бұрын
माझी आई खूप छान बनवीत असे
@truptikapse3730
@truptikapse3730 4 ай бұрын
Kanda pan chan lagto yat
@archanachavan9841
@archanachavan9841 4 ай бұрын
Chhan zale aahe
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 4 ай бұрын
Khup chhan jhalay, tai goda masala recipe dakhava na
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 3 ай бұрын
मस्तच तयार झाल्यावर त्यावर थोड आमूल बटर घालायचे एकदम यम्मी. 🎉🎉
@shubhadakandalgaonkar6641
@shubhadakandalgaonkar6641 4 ай бұрын
छान रेसिपी..भांड्याचा खूप आवाज नी कापण्यासाठी बोर्ड वापरावा म्हणजे ताटाला किंवा स्टील भांड्याना चरे पडणार नाही. व आवाजही येणार नाही.
@MrutyukammitraShreerati
@MrutyukammitraShreerati 3 ай бұрын
❤❤❤ तोंडाक् पाणी इला...🥰 शुभेच्छा आसंत तुमका ❤❤❤ 🥰🥰
@VK1008
@VK1008 4 ай бұрын
👌व्वा व्वा, खूपच छान! नक्की करून पाहणार. 🙏
@anuradhapatil4304
@anuradhapatil4304 4 ай бұрын
Tandala cha pitha cha peksha ravaghalate
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 4 ай бұрын
Tomato omlet khoop juni recipe aahe, kahitari navin dakhva mhanje tumchn channel pahavese vatel. Thank you.
@vidyakulkarni5161
@vidyakulkarni5161 3 ай бұрын
Yummy,😋
@madhavivaidya1345
@madhavivaidya1345 4 ай бұрын
तुम्ही याच्यात कांदा नाही घातला तो पण छान लागतो
@vinayakulkarni5477
@vinayakulkarni5477 4 ай бұрын
घातला आहे. नीट बघा.
@leenasugran68
@leenasugran68 4 ай бұрын
घातला आहे
@mohinijadhav7442
@mohinijadhav7442 3 ай бұрын
Onion घातला आहे🙈😃
@truptikapse3730
@truptikapse3730 4 ай бұрын
Mi ghalte
@laxmandesai9829
@laxmandesai9829 4 ай бұрын
कैरीचा चटणी करतानाच मिरची. हिरवी चालेल काय असे. मी. तुम्हास विचार ले होते. का. नाहीत सांगत
@leenasugran68
@leenasugran68 4 ай бұрын
मी कालच रिप्लाय दिला आहे, प्लीज चेक करा.
@shailamulye6876
@shailamulye6876 4 ай бұрын
तुम्ही description मध्ये बेसन तांदुळ पीठ घालायचे लिहिलेच नाही
@leenasugran68
@leenasugran68 4 ай бұрын
मी 'वरील सर्व जिन्नस घालावे' असे लिहिले आहे. त्यामुळे वेगवेगळी नावे लिहिली नाहीत.
@user-hx3dc5vp1q
@user-hx3dc5vp1q 3 ай бұрын
आहे कि लिहिलेलं
@Furkan07-z4y
@Furkan07-z4y 3 ай бұрын
मी केला होता अट्टाहास पण ते pan la ciktun बसले
@leenasugran68
@leenasugran68 3 ай бұрын
तवा व्यवस्थित तापू द्यायचा ,मग आच मध्यम करायची आणि मगच हे तव्यावर घालावे. नाहीतर ते तव्याला चिकटते.
@pratibhadanait7873
@pratibhadanait7873 4 ай бұрын
खुप छान
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 53 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 169 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
easy and quick Tomato omelette 🍅सोप्प्या पद्धतीने टोमॅटो ऑम्लेट🍅😋
7:42
Andaz Aapla Aapla by Sonali🥘🍲अंदाज आपला आपला
Рет қаралды 7 М.
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 53 МЛН