No video

हे देश नावाचं घर | शितल साठे | संविधान गीत | He Desh Navache Ghar | Sheetal Sathe

  Рет қаралды 64,988

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

SONG : He Desh Navache Ghar
Production : Navayan Mahajalsa
Presents : Jalsa Studio
Production Head : Sachin Mali
Lyrics : Sheetal Sathe
Singer : Sheetal Sathe
Music : Marathi Folk Music
Music Arrangements : Aniket Mohite
Rhythem & Indian Percussions :
Rohan Pawar
Yash Kamble
Hamaraj Sonkamble
Aniket Mohite
Melody : Kumar Shahare
Chorus :
Saidas Dhumal
Kushal Shinde
Sachin Mali
Yash Kamble
Aniket Mohite
Recording Studio
Jalsa Recording Studio, Pune
Mix / Master
Gautam Kumar
Video & Edit : Satish Sathe
Gracias : Kiran Shinde
Jalsa Studio Production Team
Krushna Kamble
Abhang Shital Sachin
Kushal Shinde
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZfaq Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
sheetal sathe | संविधान गीत | sheetal sathe new song | desh navache ghar | गोंधळ पोवाडा गीत | katha | katha kathan | vinodi katha | gramin katha | guru gorakhnath ki katha | गोंधळ गीत | Babasaheb Deshmukh| Powada| mahesh kothare | Vitthal Umap lokgeet | प्रल्हाद शिंदे | navnath darshan | desh nawacha ghar | लोकप्रिय मराठी लोकगीत | shastra marathi | ,maharashtrachi hasya jatra | Anna bhau Sathe | navayan Mahajalsa | Jalsa Studio | Jalsa फोल Music Academy
LYRICS : DESH NAVACHA GHAR
हे देश नावाचं घर न आपण भाऊ बहीण सुंदर
न राहू सुखा समाधानान जगू बंधू भावानं..
माझ्या देशाची किर्ती न्यारी
डंका वाजे जगाच्या दारी.....
नदी नाले डोंगर कपारी
झाड झुडप खोल ही दरी...
झाडी जंगल हिरवळ
तीही बाजूनी समिंदर
समृद्धीचा दरवळ
निसर्गाची किरपा भरपूर..
जम्मू ते कन्याकुमारी
सीमा दिसती नकाशावरी..
असं या भूमीच वर्णन.. ऐकावं लक्ष देऊन...!! 1!!
आमची निरनिराळी गावं
खानपान अनिक पेहराव
कोसा कोसा वरती बदलतोया
भाषेचा ठेहराव....
मातीचा रंग निराळा..
लाल.. तांबडा.. अन काळा...
तरी मायभुमिचा या मातीचा
प्रत्येकास जिव्हाळा...
ही माया जपून उरी.. पोटाशी कवटाळून धरी..
करावा माणसाचा सन्मान.. जगू बंधुभावान.....!! 2 !!
जर सारे देशबांधव
कस गांवा बाहेर गावं
हा देश जर तुझा माझा
कसा जातीचा भेदभाव
जर आम्ही भारताची लोक...
नसू बंधुभावान एक..
जर आम्ही भारताची लोक
नसू कर्तव्याशी नेक...
असं कस आम्ही नागरीक..
राष्ट्र कसं बनावं.. सांगून गेले जोतीराव..
बनते एकमय लोकांन.. घडाव संविधानान.. !! 3 !!
गेले इंग्रज सोडून
जाता जाता गेले फोडून
दंगलीच पेटवून रान आम्ही
आपसात घेतल झोडून...
असा गुलामितला देश
केला स्वतंत्र लढून..
या हो बलिदानाची आब राखून
सांगते हात जोडून..
जे जे करती इथ निवास न या भूमीवर घेती श्वास
असा गौरवशाली इतिहास जपावा स्वाभिमानान...!! 4 !!
देशात दुसरा एक देश
जातीचा पांघरून वेश
जगतो कुंपण बांधून
त्याच्या हाती गुलामी फास..
जातीचा देश भेसूर
बाईच अडवून दार
कोंडून मारतो फार
हा असा जातीचा जीना
उतरता चढता येईना..
जातीच्या नुसार काम
दर्ज्याच्या नुसार दाम
शिवाशिविचा विटाळ
दलितांच्या माथी कीटाळ
जात घेऊनच जन्मते
आई बाच्या पोटी बाळ...
फडकू द्या असा तिरंगा
नको कुणीच उपाशी नंगा
नको जाती धर्मात दंगा
तहजीब यमुना गंगा...
जात मेली घराघरात.. तर जन्माला येईल भारत न
तोडा जातीच बंधन..न जगू संविधानान....!! 4 !!
गीतकार : शितल साठे

Пікірлер: 169
@7430
@7430 7 ай бұрын
शाहिरी कलेचा प्रबोधनासाठी इतका प्रभावी वापर अलिकडे होत नसतानाही सचीन शितल तुम्हा दोघांच्या आत्मिय निष्ठेला कुठल्या शब्दात बसवावे हेच कळेना..सलामच....एकुण तुमच्या टिमच्या रचनेत ही वरकडीच...
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
मित्र हो! हे संविधान गीत तुम्ही शेअर करायला हवं. तसेच लाईक आणि कमेंट करून आपण आपल्या सूचना आमच्या पर्यंत पाठवू शकता. आपल्या सूचनांचा विचार आम्ही पुढील गाण्यात नक्कीच करणार आहोत. ✅ हे प्रबोधन पुढे नेण्याची जबाबदारी आपण ही उचलावी आणि जास्तीत जास्त Share करायला विसरू नये हीच विनंती 🤝 दोस्ती जिंदाबाद! 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@Digambarabramhane4
@Digambarabramhane4 6 ай бұрын
खूप छान गायलं संविधान
@kalidaskamble6992
@kalidaskamble6992 5 ай бұрын
जय भीम ताईसाहेब 🙏
@amithate9768
@amithate9768 7 ай бұрын
अप्रतिम ! कसे सुचतात शब्द ? सचिन दादा आणी शीतल ताईची लाजवाब कलाकारी सर्वच गाणी अंगात ऊर्जा प्रदान करणारी सर्व कलाकारांना मानाचा जय भीम
@sukhdeoaher5788
@sukhdeoaher5788 3 күн бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण.खुप खुप सुंदर अंगावर शहारे आणणार गीत सचिन भाऊ आणि शितल साठे ताई आपणास मनापासून नमस्कार.
@rajumore1758
@rajumore1758 5 ай бұрын
हे गीत मला Live ऐकायची भाग्य लाभलं शिवाजी पार्क शितल ताई सचिन दादा सलाम तुमच्या कार्याला...💐
@PralhadBorkhade
@PralhadBorkhade 19 күн бұрын
शीतल साठे मानाचा मुजरा, बसपा कार्यकर्ता साथ है जयभिम, अन्नाभाऊ अमर है
@dhammasalve8014
@dhammasalve8014 7 ай бұрын
सचिन माळी साहेब व शीतल ताई तुमचे हा पोवाडा ऐकून अंगला सहारे आले राव तुमचे गीताला सत सत प्रणाम जयभिम सर
@ckthelegend3054
@ckthelegend3054 7 ай бұрын
लोककला ही अशी जिवंत ठेवायची असते🙏🏻👏 सलाम तुम्हा वर तुमच्या कार्याला🙇🏻‍♂️😌❤️
@mggaikwad75
@mggaikwad75 7 ай бұрын
ताई कमाल शाहिरी पहाडी आवाजात धमाल सादरीकरण NO.1 एकच नंबर🙏🙏जयभीम🙏🙏
@vishnukamble8248
@vishnukamble8248 7 ай бұрын
शितल ताई आणि सचिन जय भीम, गीत जलसा प्रबोधनातून आपण करत असलेले समाज कार्य अति बहुमोल आहे. या संविधान गीताच्या माध्यमातून सर्व भारतीयांना एकीचा संदेश देऊन, संविधानातील राष्ट्रीय व मानवी मूल्ये असणारी, स्वातंत्र्य ,समता ,बंधुता व न्याय ही समाज मनात रुजवत आहात त्याबद्दल आपणास अनेक धन्यवाद. जय भीम जय भारत.
@dineshhiwale9319
@dineshhiwale9319 6 ай бұрын
आपली कला आणि कार्याला नतमस्तक ताई....🔥🔥🔥🔥🔥
@Vanchitavaj22
@Vanchitavaj22 7 ай бұрын
शीतल ताई आणि सचिन दादा....आपण चळवळीला नेक्स्ट लेव्हल वरती घेऊन जाण्याचे खूप महत्त्वाचे काम करत आहेत. आवडले गणे खूप....होऊ दे viral
@rahulsonavane5408
@rahulsonavane5408 7 ай бұрын
मला असं वाटत हे गाण प्रत्येक भाषेत गायले पाहिजे कारण अत्यंत गरज आहे.अशा विचाराची आपल्या देशाला. कारण देश ज्या दिशेने जात आहे.🙏🙏🙏
@wearebecausehewasjayshivray
@wearebecausehewasjayshivray 7 ай бұрын
अंगावर शहारे आणणारे एक एक शब्द आणि पहाडी आवाजाची ती रचना, शब्दच कमी पडत आहेत तुमची स्तुती करायला, धन्यवाद संपूर्ण टीम ला असं सुंदर गीत दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏
@ambadasjarare3097
@ambadasjarare3097 7 ай бұрын
जय भारत जय संविधान हृदय स्पर्श गीत
@sushmashinkar2535
@sushmashinkar2535 7 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण, खूप खूप सुंदर अंगावर शहरा आणणार गीत.❤❤
@SiddharthJadhav-iq8yb
@SiddharthJadhav-iq8yb 7 ай бұрын
खुप सुंदर गित आहे ताई मन प्रसन्न झाले जय भीम जय संविधान 💙💙💙💙💙🙏
@akshayshashikantnirmlakamb2490
@akshayshashikantnirmlakamb2490 7 ай бұрын
सत्याग्रह,समाजवाद,संविधान,बंधुता. 🇮🇳 बहुजन हिताय बहुजन सुखाय. ♥️ डॉ . बाबासाहेब आंबेडकर. 🫀
@Madhav_Waghmare_official
@Madhav_Waghmare_official 6 ай бұрын
तुमच्या शाहीरीतून खूप इतिहास माहिती होत आहे ताई धन्यवाद जयभीम !जय लहू ' .!जय शिवराय !
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 8 ай бұрын
अत्यंत हृदय स्पर्शी गीत आहे. ताई आवाज ऐकू मन भरून गेलेले आहे धन्यवाद तुम्हा सर्वांना जयभीम नमो बुद्धाय🌹🌹🙏
@babawalke6414
@babawalke6414 7 ай бұрын
Shital tai khup chhan gayala he geet jaibhim
@eknathzine2395
@eknathzine2395 7 ай бұрын
सचिन दादा आणि ताई ला जय भिम जय संविधान 💙💙💙🙏🙏
@gangadharyadav7662
@gangadharyadav7662 7 ай бұрын
खूप सुंदर दोघांचाही आवाज आहे. अभिनंदन शितलताई आणि सचिन दादा.
@dineshhiwale9319
@dineshhiwale9319 6 ай бұрын
तुफान ताई....जय भीम आहे आपल्या कार्याला....❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥💙💙💙
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 7 ай бұрын
छय अण्णा भाऊ साठे भारतरत्न दयावा और ज्ञानपीठ मराठी भाषेतील फकिरा कांदबरीला पुरस्कार प्रदान करावा हि विनंती भारत सरकारला
@ranjandev2579
@ranjandev2579 7 ай бұрын
आपली ताई, ग्रेट ताई!! संपूर्ण टीम अभिनंदनीय 👍
@user-ms6je3uq8b
@user-ms6je3uq8b 7 ай бұрын
शीतल ताई सचिन भाऊ अभिनंदन तुम्ही प्रबोधन करता आहेत त्याचा सार्थ अभिमान वाटतो कारण देशात अशे ध्येय वेडे माणसं आहेत तोपर्यंत समाजाला कळेल असे मला वाटते ❤
@mangeshmisal131
@mangeshmisal131 7 ай бұрын
खूप अप्रतिम गान गायल आहे ताईने🎉
@SureshKadam
@SureshKadam 8 ай бұрын
बंधूंनो जास्तीत जास्त शेअर करा.... अप्रतिम शब्दरचना, त्याच दिमतीचे गायन संगीत आणि प्रबोधन!!!!
@anandmsawant5749
@anandmsawant5749 6 ай бұрын
अप्रतिम गायकी अप्रतिम रचना अप्रतिम सादरीकरण एक एक शब्द काळजात जाऊन भिडणारा अंगावर शहारे आणणारा आवाज खूपच छान सचिन सर आणि शीतल ताई तुमच्या कार्याला सलाम सप्रेम जय भीम 🙏🙏
@vaibhavathawale2353
@vaibhavathawale2353 7 ай бұрын
एक दिवस असा येईल की ताईला या देशात ताईच्या आवाजाला न्याय भेटेल
@ckamble4831
@ckamble4831 7 ай бұрын
शितल ताई व सचिव भाऊ आपला प्रबोधनाचा शाहीरी जलसा अतिशय ऋदयद्रावक, मर्मभेदी व काळाची गरज असणारा आहे.
@shivshahirdilipsawant4824
@shivshahirdilipsawant4824 7 ай бұрын
खुप छान शाहीर शितल साठे शाहीर सचिन माळी अनेक रगं देशाच्या विविधतेची अगं भाषा निसर्ग आणि नवीन सगित ऐकायला मिळाले शुभेच्छूक शिवशाहीर दिलीप सावंत
@anilpradhanlavnikar.
@anilpradhanlavnikar. 7 ай бұрын
खरचं सचिन दादा आणि शीतल ताई तुम्ही किती महान काम करताय या जलासा गाऊन आणि गाणं म्हणुन मेलेला माणूस पण माणुसकीने जगायला जिवंत होईल येवढं खळखळ आणि माणुसकीने वागायला शिकेल .इतकं प्रभावी लिखाण आहे. आणि आवाज तर काळजात घर करतो. आज क्षणा क्षणाला लोक जाती जातीत फूट पाडण्याचे वक्तव्य करतात अशा काळात तुम्ही जे देश जोडण्याचे विचार पेरत आहात हे खूप लोकांना एक होण्याचे संदेश या गाण्यातून देत आहात अगदी अडाणी मसालाही प्रभावी करतो आहे हे शब्द आहेत वा अप्रतिम टीम आहे सगळे मनापासून देशहिताचे काम करतायत हेच खरी राष्ट्र सेवा आहे राष्ट्र भक्ती आहे...तुमच्या या कामाला माझा मनापासून मुजरा. सल्युट 🙏
@dayanandlandge4525
@dayanandlandge4525 7 ай бұрын
शीतल ताई आणि सचिन माळी नवयान जालसा सहकारी यांना जय भिम
@user-jy3xx2if6w
@user-jy3xx2if6w 7 ай бұрын
खुप छान लिखाण व गोड आवाजमण तृप्त झाल ताई खुप गोड
@amoljadhav1623
@amoljadhav1623 8 ай бұрын
अप्रतिम गीत शीतल ताई आणि नवयान संपूर्ण टीम
@theimaginationpublication6322
@theimaginationpublication6322 6 ай бұрын
जलसा स्टुडिओ आणि नवयान जलसा काम अतिशय व्यवस्थित चालू आहे.
@yashrajyt3728
@yashrajyt3728 7 ай бұрын
फारच सुरेख👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shankarkamble8016
@shankarkamble8016 7 ай бұрын
अतिशय अप्रतिम सुंदर वाक्यरचना शितलताई आपणास क्रांतिकारी जय भीम
@deepaksuradkar8103
@deepaksuradkar8103 26 күн бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान
@deepaksuradkar8103
@deepaksuradkar8103 26 күн бұрын
आपल्या शहिरीला क्रांती कारी निळा सलाम 🎉🎉🎉
@rejeshsakpal3213
@rejeshsakpal3213 7 ай бұрын
सुंदर आवाज सुंदर शब्द रचना जयभीम ❤
@asmitamane1883
@asmitamane1883 6 ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय तुमच्या गाण्याच्या शब्दा शब्दात अर्थ आणि प्रबोधन असते म्हणून तुमची गाणी खुप आवडतात मला
@rajaratandhole214
@rajaratandhole214 5 ай бұрын
अप्रतिम शितल ताई सचिन भाऊ सप्रेम जय भीम तुमच्या सर्व नवयान टिम ला .
@iams312
@iams312 7 ай бұрын
💙जय भीम जय भारत जय संविधान💙
@user-pc2tk5xi3q
@user-pc2tk5xi3q 7 ай бұрын
अत्यंत गीत छान, तसेच व्हिडिओ लयभारी आणि लाईट खतरनाक सेटअप🎉👌💐सम्यक जीवन फिल्म्स & म्युझिक,रेकॉर्डिंग स्टुडिओ आटपाडी
@bhaskarbulakhe5297
@bhaskarbulakhe5297 3 ай бұрын
खूपच उत्कृष्ट व विचारगर्भ आणि माणूस असलेल्या माणसाला विचार करायला लावणारे उत्तम संगीत साज असलेले गीत!
@kambledilip2757
@kambledilip2757 4 ай бұрын
सलाम तुमच्या गायकीला ताईला व सचिन दादाला जय भीम
@vickykamble4316
@vickykamble4316 7 ай бұрын
अप्रतिम गीत ताई...शुभेच्छा.
@baliramkamble1432
@baliramkamble1432 6 ай бұрын
शीतल ताई तुमला जय भीम. महाराष्ट्रातील बहुजनांना जागृत करीत आहेत. त्या बद्दल तुमचे उपकार आहेत. धन्यवाद 🙏
@parkashgoyal
@parkashgoyal 7 ай бұрын
खूप सुंदर गीत ✊️✊️✊️✊️✊️
@user-dt5me2gp4s
@user-dt5me2gp4s 5 ай бұрын
जय भीम जय संविधान शाहीर सचिन माळी, शीतल ताई 🙏🙏🙏🙏
@loveyoubluebird358
@loveyoubluebird358 13 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला.. जय भीम..!💙🙏🇮🇳
@sachinmane6874
@sachinmane6874 19 күн бұрын
खुप सुंदर आवाज, खुप छान गीत
@shamlalramteke6723
@shamlalramteke6723 7 ай бұрын
शितल सचिन जोडी खरच आपण भाग्यशाली आहात.
@narendrashirsath1929
@narendrashirsath1929 4 ай бұрын
खरंच संपूर्ण देशाच वर्णन केले आहें या गीता तुन ताई तुम्ही........ खूप 👌👌👌👌👌 आता एक आजून vba वर नवीन गीत येऊद्या लवकर. लोकसभा दानाणून टाकू
@milindjal2642
@milindjal2642 8 ай бұрын
जगावं संविधानानं ❤
@dr.gautamgaikwad5815
@dr.gautamgaikwad5815 7 ай бұрын
अप्रतिम लेखन उत्कृष्ठ संगित संयोजन अन् हृदयस्पर्शी सादरीकरण
@laxmilahaneswarlaxmi8013
@laxmilahaneswarlaxmi8013 7 ай бұрын
अप्रतिम ताई.........👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@user-bl5zx7tv8m
@user-bl5zx7tv8m 5 ай бұрын
शाहिरीतुन छान प्रबोधन!
@bhavnagaikwad270
@bhavnagaikwad270 7 ай бұрын
Khup khup chan gann .....
@VaibhavKasture-qd6ul
@VaibhavKasture-qd6ul 7 ай бұрын
Salute for navyan jalsa jaybhim jayjyoti
@bhushanhiwarale4077
@bhushanhiwarale4077 10 күн бұрын
Khup chan
@parmeshwarsanap4264
@parmeshwarsanap4264 16 күн бұрын
खूपच सुंदर गीत 🚩
@prathameshgaykar7016
@prathameshgaykar7016 16 күн бұрын
अप्रतिम
@swatiadode4708
@swatiadode4708 8 ай бұрын
ताई खूप अप्रतिम गीत लिहिले आणि गायले आहे आपण संपूर्ण टीम चे अभिनंदन
@jayashreerankhambe3644
@jayashreerankhambe3644 6 ай бұрын
Khupach sundar Shital aani Sachin.👌👌 Angavar shahare aale aikun aikatach rahav vatatay👌🙏tumache he kary asech satat chapu raho... Salam tumchya karyas🫡aani khup khup karyas shubhechha 💐🌹 ya tumachya gondhalatun bharatiyani khup kahi ghenyasarkh aahe... Pan .......... Jaybhim 🙏
@RatanPawar-ll5dw
@RatanPawar-ll5dw 5 ай бұрын
Jai bhim jai savidhan Jai OBC jai joti jai karanti Jai lahuji jai babasaheb ambedkar jai chatrapati shivaji maharaj
@sushilsawant5611
@sushilsawant5611 7 ай бұрын
Jay bhim ❤
@pckanade
@pckanade 7 ай бұрын
Great 👍 keep it up.
@sanjaybhagat8902
@sanjaybhagat8902 7 ай бұрын
अभिनंदन शीतल जी
@shankarkhalsode701
@shankarkhalsode701 22 күн бұрын
खूपच प्रभावशाली 🙋‍♂️
@panditghodesir4145
@panditghodesir4145 7 ай бұрын
अतिशय प्रबोधनपर गित! सोडावी जात घरा घरात तेंव्हा होईल भारत.!! संविधानाशिवाय पर्याय नाही. अप्रतिम गीत, संगीत, संयोजन आणि सादरीकरण.!!
@RajendraMhaske-ed1uq
@RajendraMhaske-ed1uq 7 ай бұрын
क्रांतीचा सन्मानाचा जय भीम सर्वांना
@nileshhingole2567
@nileshhingole2567 7 ай бұрын
वा वा वा वा........❤ अप्रतिम
@senapatibhosale3437
@senapatibhosale3437 5 ай бұрын
दादा ताई सलाम
@sagarjogdand6761
@sagarjogdand6761 Ай бұрын
अप्रतिम गित आहे
@bharatshinde3633
@bharatshinde3633 7 ай бұрын
अप्रतिम...जयभिम नमोबुध्दाय
@santoshhirave5855
@santoshhirave5855 7 ай бұрын
शीतल ताई जय भीम, ❤❤❤❤
@milindbharde4942
@milindbharde4942 7 ай бұрын
👌🙏🤝
@bhaskarbulakhe5297
@bhaskarbulakhe5297 4 ай бұрын
वा! खूपच छान आहे.
@amitgopale11
@amitgopale11 7 ай бұрын
देशभक्ती चे गीत.. या देशातील प्रत्येक जण देशप्रेमी आहे जो प्रामाणिक काम करतो. देश लुटणारे तर खरे देश द्रोही आहेत... सामान्य नागरिक जास्त देशप्रेमी आहेत. पैसेवाले तर देशाला चुना लावून देश सोडत आहेत. काहीं देशद्रोही लोक देश विकत आहेत. जणू देश यांच्या बापाचा आहे.... जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤❤❤😮😮😮😮😮
@surajovhal4557
@surajovhal4557 7 ай бұрын
खुप छान शितल ताई...❤️🙏🏻
@angelingle3940
@angelingle3940 5 ай бұрын
Tumchya team chya dware ji jan jagruti hot Aahe ti na bhuto na bhavishyati asi Aahe hya peksha mahan karya kay asu shakate. Tumhala sarv bahujan Aashene pahatat.tumhi hya addbhut kaletun samaj manat chaityanna nirman karit tar Aahatch sobat pratekachya hrudhyat gharhi. Abhar tumha sarva timache.hi kalachi garaj tumhich herali navhe dev tumchya kadun samajachi garaj ti kay olkhun ti bhagavit asava ase vatate. Sarva bahujan samaj tumchya pathisi Aahe. Thanks to All of you ! Jay shivaray jay bhim jay jyoti jay malhar jay Jay lahu !
@gautamkharat1857
@gautamkharat1857 7 ай бұрын
Salute madam
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 7 ай бұрын
Mi tumchi sagli git aikli khupch chhan ahe vastav madtat tumi
@yashvantkamble7448
@yashvantkamble7448 4 ай бұрын
Khup cghan tai
@ashokagane2643
@ashokagane2643 5 ай бұрын
Jay Bhim Hats of Both You and Sachin
@jaypramodpawar6978
@jaypramodpawar6978 7 ай бұрын
जयभीम ताई
@hanumantsoudagar4407
@hanumantsoudagar4407 6 ай бұрын
अप्रतिम मांडणी
@swapnilkamble4955
@swapnilkamble4955 4 ай бұрын
Jai bhim jai savidhan🙏🙏🙏
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 7 ай бұрын
जय भगवान जय भीम जय ओबीसी ताई खुप छान कौतुकास्पद ताईसाहेब
@SidRajbhoj
@SidRajbhoj 8 ай бұрын
Jay bhim
@shreejayjagtap4274
@shreejayjagtap4274 7 ай бұрын
Khup Chan
@shobhahire2145
@shobhahire2145 7 ай бұрын
खूप छान ताई 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏼
@madhusudansawant2748
@madhusudansawant2748 8 ай бұрын
जय भीम❤
@rckopare
@rckopare 7 ай бұрын
Super
@Ima_logo
@Ima_logo 7 ай бұрын
अप्रतीम❤❤❤ Jay bhim
@trendingstatuskatta2815
@trendingstatuskatta2815 7 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@rahulbhingardeo411
@rahulbhingardeo411 7 ай бұрын
Khupach sundar geet... taichya awajat jadu ahe tumchi gani khup bhavpurn astat....👌👌👍👍
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 14 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 13 МЛН
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 3,5 МЛН
Desh Nawacha Ghar
7:16
Sheetal Sathe - Topic
Рет қаралды 12 М.
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН