हिरवळीचे खत - धैंचा खत 7 टन एकरी फक्त ४५००/- पावसाळ्यातही शक्य...

  Рет қаралды 13,075

आधुनिक शेतीचा गोडवा

आधुनिक शेतीचा गोडवा

Жыл бұрын

आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनलवर आपले सहर्ष स्वागत आहे.
शेतकरी मित्रांनो या भागात आपण हिरवळीच्या खताविषयी म्हणजे धैंच्या या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत....
एकरी बियाणे :-
धैंच्या या पिकाचे ज्यावेळी आपण हिरवळीचे खत म्हणून घेणार असतो त्यावेळी एकरी २१ ते २५ किलो बियाणे वापरले पाहिजेत.
पाणी :-
या पिकासाठी फक्त तीन पाणी देणे आवश्यक आहे. जास्त पाण्याची गरज नाही.
खत व्यवस्थापन:-
या पिकासाठी खत देण्याची गरज नाही परंतु चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी एकरी २० किलो १०:२६:० वापरल्यास फायदेशीर ठरते.
काढणी:-
या पिकाचे ४५ ते ५० दिवस म्हणजे शेंग कोवळी असताना नांगराच्या मदतीने मातीआड करावा.
एकरी उत्पादन:-
धैंच्या या हिरवळीच्या पिकातुन आपणास एकरी ८ ते ९ टन खत तयार होते.
हिरवळीचे खते माहिती असावी
हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.
हिरवळीच्या खताचे फायदे :-
•ही जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .
•फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते .
•मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .
•मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते
•मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.
•सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते.
या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .
हिरवळीच्या खतांचे प्रकार
हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .
१) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.
२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .
हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -
१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .
२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .
४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल .
हिरवळीच्या खतांची पिके :
धैचा - तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ िकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात .
या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते .
अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चायनल नक्की सबस्क्राइब करा.
Tag,dhaynchya,ताग,धैंच्या,हिरवळ,खत,नांगरट,पाडवा,योग्य वेळ,एकरी,बियाणे,hektri,
Marathi,
#धैंचा #ताग #आधुनिकशेतीचागोडवा #हिरवळीचेखत

Пікірлер: 31
@DKOrganic
@DKOrganic 2 ай бұрын
दादाची गोष्ट आवडली रासायनिक मधून सेंद्रिय कडे जावा आपण 10 वर्षापासून सेंद्रिय शेती करतो आपण सल म आणि उडीद या दोन्हीचे हिरवळीचे खत करतो
@sharadgawande83
@sharadgawande83 Жыл бұрын
नमस्कार मंडळी मी सुद्धा केळी पिकात धैंचाची लागवड केली आहे 5/6फुट वाढला आणि कापुन टाकला
@adhuniksheticagodva
@adhuniksheticagodva Жыл бұрын
खुपच छान सर....धन्यवाद...
@vitthalthorat5086
@vitthalthorat5086 Жыл бұрын
Good information for Farmers
@sunilshinde4085
@sunilshinde4085 26 күн бұрын
बी कोठे मिळेल, संपर्क दया
@dattasangle979
@dattasangle979 10 күн бұрын
बियाणे कुठे मिळेल संपर्क द्या
@ravindrakulkarni8087
@ravindrakulkarni8087 4 ай бұрын
April madhhe ghalta ete ka
@gopalkopnar1116
@gopalkopnar1116 2 ай бұрын
Bhau yach beej pahije mla kuthe milel.
@rohitpatil960
@rohitpatil960 4 ай бұрын
Dhencha Varun zaminivar takun dhencha ugavato ka
@anandsinghchouhan3959
@anandsinghchouhan3959 4 ай бұрын
Seeds dhencha ke milenge??
@adityawaghmare8324
@adityawaghmare8324 Жыл бұрын
शेळी खाते का सर धेंचा ला??
@wikipatil2688
@wikipatil2688 4 ай бұрын
दादा मि ढैंचा लावलो गूडघ्या पर्यंतच वाढ झाली आहे 😢😢😢😢
@sunilshinde4085
@sunilshinde4085 26 күн бұрын
बी कोठे मिळेल
@ganeshkurhe3131
@ganeshkurhe3131 Жыл бұрын
मी पण धै़ंचा करतो
@ubfarming3476
@ubfarming3476 Жыл бұрын
nice video sir 👍👍
@adhuniksheticagodva
@adhuniksheticagodva Жыл бұрын
Thanks ub
@Krishna_wagh
@Krishna_wagh 11 ай бұрын
सरी मध्ये बियाणे बुजवटा कसा करावा लागतो..?
@rajendrabhakare2653
@rajendrabhakare2653 17 күн бұрын
45 दिवसानंतर rotar मारले तर चालेल काय
@rajendrabhakare2653
@rajendrabhakare2653 17 күн бұрын
4 दिवसा नंतर रोटर मारले तर चालते का
@Mr1tejas
@Mr1tejas 2 ай бұрын
धेंचा बीज कुठे मिळेल
@ramphadatare6943
@ramphadatare6943 Жыл бұрын
Sir,biyane kuthe available hoil,sataryat kuthe milate ka
@adhuniksheticagodva
@adhuniksheticagodva Жыл бұрын
बियांणे विक्रेत्यांकडे मिळेल...धन्यवाद...
@user-sr6sc8od2b
@user-sr6sc8od2b 7 ай бұрын
सर बिज भेटत नाही औरंगाबाद
@mr.akashdabhade123
@mr.akashdabhade123 2 ай бұрын
2 tone required
@wikipatil2688
@wikipatil2688 4 ай бұрын
कीती दीवसांच पिक आहे यांच दादा
@rukmajikawale8370
@rukmajikawale8370 9 ай бұрын
नोव्हेंबर मध्ये पेरणी केली तर चालेल का?
@adhuniksheticagodva
@adhuniksheticagodva 9 ай бұрын
हो
@user-sr6sc8od2b
@user-sr6sc8od2b 7 ай бұрын
बियाणे मिळेल का तुमच्याकडे मो.नंबर
@kishorranmode6565
@kishorranmode6565 7 ай бұрын
साहेब लोखंडी डम फिरवा
@suhasghogare1465
@suhasghogare1465 9 ай бұрын
Sir aamhala khodvyamdhe lavaycha hota tr tumcha contact number sangta ka plz
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 61 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 39 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 9 МЛН
हिरवळीचे खत | Green Manuring @BTGore
11:57