Рет қаралды 6,957
१७ वर्षांचा युवक निर्यात करू शकतो का? निर्यात लायसन्स मिळेल का ?
अनेकदा आपल्याला काय बिझनेस करावा हे समजत नाही आणि आपण त्या विचारात खूप वेळ घालवतो आणि घालवतो... कारण जेवढा आपण विचार आणि अभ्यास करतो, ६ महिने, १- २ वर्षे घेतो तेवढ्या वेळात तर मार्केट कुठच्या कुठे निघून जाते अनेक बदल होतात, पॉलीसी बदलते, लोक बदलतात आणि कस्टमर सुद्धा बदलतात त्यामुळे फार काही हाती लागत नाही.
म्हणूनच जेवढी लवकर सुरुवात करू तेवढे चांगले, लवकर अनुभव येतील, त्यातूनच खरे शिकणे हॊईल, आणि त्यातूनच व्यवसाय उभा राहील... नुसत्याच अभ्यासाने नाही...
अनेक तरुण ३० वर्षांपर्यंत काहीच निर्णय घेत नाहीत, त्यांना अजून आपल्याकडे खूप वेळ आहे... आणि मग ३० नंतर अनेकदा व्यवसायाचा निर्णय घेणे कठीण जाते...
म्हणून तरुणांनी ग्रॅजुएशन च्या आधीच कोणत्या क्षेत्रामध्ये काम, व्यवसाय करायचंय त्यात आधीपासूनच लक्ष घालावे, माहिती घ्यावी, छोटीसी सुरुवात करावी... कारण बिजनेस हा बिझनेस करूनच शिकवा लागतो क्लासरूम मध्ये नाही... तिथे फक्त मार्ग समजतात...
या तरुणाचे विचार या व्हिडिओ मध्ये आपल्याला ऐकायला मिळतील आणि तुमच्या मनातल्या काही प्रश्नांना उत्तरे सुद्धा नक्कीच मिळतील...
धन्यवाद
इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन
पुणे, महाराष्ट्र
#learnexport #startexport #importexport #exporttodubai