इतुकेच मला जाताना | स्मशानात पेश केलेल्या मैफिलीची हकीकत ... | Gazal Nawaz Bhimrao Panchale

  Рет қаралды 77,637

Gazal Nawaz Bhimrao Panchale

Gazal Nawaz Bhimrao Panchale

3 жыл бұрын

ती यादगार मैफिल , स्मशानातली ...
प्रिय मित्रांनो ... अपार स्नेह !
मागे मी तुम्हाला बोललो होतो ना ,
माझ्या गज़लेच्या आयुष्यातील दोन विशेष यादगार मैफिलींबद्दल !
त्यापैकी पुण्याच्या येरवडा कारागृहातील बंदी बांधवांसाठी सादर केलेल्या मैफिलीबद्दल मी लिहिले होते .
आज सांगणार आहे , स्मशानात पेश केलेल्या मैफिलीची हकीकत ...
आपले जानदार गज़ल रसिक ऐकायला असतील तिथे पेश होणे हा आनंदाचा भाग असल्यामुळे कुठेही मैफिल करण्यात कधीच दिक्कत वाटली नाही .
अं.नि.स. वर्धा यांनी आयोजित केलेल्या ' लोकजगर ' हॉलिकोत्सवाचे ( मार्च , २०१६ ) निमंत्रण आले .
मैफिलीचा मंच होता - स्मशानभूमी .
मी खुशी खुशी हो म्हटले ...
मनात राजनिशांचे शब्द रुंजी घालत होते - " जीवन अगर उत्सव है , मृत्यू भी उत्सव होना चाहिये ."
तेव्हापासूनच जीवनाच्या 'मृत्यू' या अटळ सत्याचं आणि 'स्मशान' या शाश्वत विसाव्याचं भान मनात रुजायला लागलं होतं ...
पूर्वसूचना मृत्युने कोणा दिली
वेळ झाली की , निघावे लागते ...
मित्रांनो , जेंव्हा-केंव्हा निघायची वेळ येईल तेंव्हा ' त्या ' अपूर्व घटनेला समाधानाने सामोरं जाण्यासाठी रियाज तर हवाच ना !
शिवाय या शांत आणि अपरिहार्य जागेबद्दलची आपल्या सर्वांच्या मनातली भीती सुद्धा जायला हवी .
लोकजागर चे निमंत्रण म्हणजे ,
त्या रियाजाचाच एक भाग वाटला मला ...
काय यादगार क्षण .., काय नजारा होता तो ..!
छोटंसं स्टेज , रसिकांची तुडुंब गर्दी , मुलं-स्त्रिया-माणसं असे सगळेच जमलेले...
दोन चिता जळत होत्या , वारा वाहता असल्यामुळे मधेच झुळुक यायची व प्रेतांच्या जळण्याचा तीव्र वास नाकातोंडात जायाचा . तरी पण
मलाच काय , कुणालाच काही वाटलं नाही त्याचं ...
मनसोक्त गायलो , ... उचंबळून दाद दिली रसिकांनी ...
अखेरची गज़ल पेश केली ती अशा एका बुलंद शायराची - सुरेश भटांची , ज्याने जिवंतपणीच साक्षात मृत्यूची अनुभूती कथन केलेली आहे ...
मी एकटाच त्या रात्री , आशेने तेवत होतो
मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते
इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका , जगण्याने छळले होते ...
त्या ' ऐतिहासिक ' मैफिलीतली
ही रचना तुम्हीही जरूर ऐका -
मित्रांनो !
आपला ,
गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
Gazal Nawaz #BhimraoPanchale​​
For More Updates Follow Me At -
______________________________________________________________
★ Facebook bit.ly/BhimraoPanchaleFB​​
★ Twitter bit.ly/BhimraoPanchaleTweet​​
★ Instagram bit.ly/BhimraoPanchaleInsta​​...
Subscribe To My KZfaq Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬
marathi gazal , Marathi Ghazal , Gazal Nawaz Bhimrao Panchale , Bhimrao Panchale Gazal , Bhimrao Panchale Live , Ghazal Nawaz Bhimrao Panchale , Suresh Bhat

Пікірлер: 81
@sitakantpalaskar
@sitakantpalaskar 3 жыл бұрын
"दुर्गुण गळून पडले माझे, मी सद्गुणांचा पुतळा आहे.! नव्याने ओळख झाली माझीच माझ्याशी, आज माझ्या मरणाचा सोहळा आहे"
@musicallaroundpravinpm462
@musicallaroundpravinpm462 3 жыл бұрын
Waaahhh
@arunhire1095
@arunhire1095 Жыл бұрын
Sunder
@prashu2685
@prashu2685 Ай бұрын
Wah
@dhanajijadhav6322
@dhanajijadhav6322 Жыл бұрын
शब्दप्रभू सुरेश भटसाहेबांची ही गझल तन्मयतेने गाणारा 'गझलनवाज' कोण हे पहाण्यासाठी जळणारी प्रेतेही सरणावर उठून बसतील, एवढी कलात्मकता 'भीम'रावच्या सादरीकरणात आहे. बहोत खूब.
@sitakantpalaskar
@sitakantpalaskar 3 жыл бұрын
दादा....क्या बात...आणि भट साहेब... "शब्द आणि स्वरसाज" एकत्र आल्यावर स्मशानातील वातावरण देखील "स्वर्गीय" झालं...दादा🙏🙏🙏
@creativeartstudio7518
@creativeartstudio7518 3 жыл бұрын
दादा, काळजाचा कान करून तुम्हाला ऐकण्यासाठी रसिक जमले होते स्मशानात... "होलिकोत्सव" च्या निमित्ताने... या मैफिलीचा मला साक्षीदार होता आलं आणि चित्रीकरणही करता आलं. त्या यादगार क्षणांची आठवण या निमित्ताने ताजी झाली... आयोजन होतं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा यांचे.
@utkarshadambhare7687
@utkarshadambhare7687 3 жыл бұрын
सर आम्हाला गझल चा कार्यक्रम वधेंचा तो ऐकायचा कधीतरी कस माहिती पडेल त्याबद्दल माहिती असेल तर कळवाल 🙏🙏आम्ही वधेंकर🙏🙏
@sanjaybarve2410
@sanjaybarve2410 Жыл бұрын
मरण सरणावर असते ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा?
@vinayakkamble2436
@vinayakkamble2436 6 ай бұрын
अप्रतिम कलाकृती, काळजाला भिडणारा आवाज, खूपच छान ऐकताना डोळे भरून आले..नुसते ऐकत राहावे....
@prafullabhujade
@prafullabhujade 3 жыл бұрын
याचेच रडू आले की... अथांग कल्पना... भटांच्या काळजाचा ठाव घेण्यासाठी दादांच्या सुरांची होडी आणि आलापांची गोताखोरी हवीच.... मग हाती माणिक मोती लागलेच म्हणुन समजा.... शुक्रिया..दादा 🙏🙏
@musicallaroundpravinpm462
@musicallaroundpravinpm462 3 жыл бұрын
तुमचे शब्द देखील मला खूप आवडले
@dharmeshpalve342
@dharmeshpalve342 5 ай бұрын
स्वरांचा जादूगार.... भिमराव पांचाळ मन हेलावणरी गझल.. छान अप्रतिम
@vikrampositive9879
@vikrampositive9879 2 жыл бұрын
एक उत्कृष्ट कलाकृती, काळजाचा ठाव घेणारा जबरदस्त आवाज, शब्द व्यक्त होतात अशी ही भावना ... फक्त एकच लाजवाब
@rameshwarshinde4878
@rameshwarshinde4878 Жыл бұрын
ग्रेट सलाम भट सर व भीमराव पांचाळे सर
@tanvidhurve8783
@tanvidhurve8783 3 жыл бұрын
स्वर्गाचा मार्ग सुकर करण्याचा मार्ग म्हणजे ही गझल आपण पण काय गायलात खरंच खूप हृदयस्पर्शी
@milindwagh3962
@milindwagh3962 3 жыл бұрын
सर, नावाप्रमानेच ग़ज़ल गायनात "भिम" आहात।🙏
@vijaykotnake9979
@vijaykotnake9979 2 жыл бұрын
खूप छान संकल्पना, अप्रतिम गझल, धन्यवाद पांचाळे सर व यामागे मेहनत घेणारी पूर्ण टीम
@atulwankhade1045
@atulwankhade1045 3 жыл бұрын
अप्रतिम संकल्पना , अप्रतिम " होलिकोत्सव " चितेच्या अग्नित जीवनांचे वास्तववादी दर्शन, तेवढेच गझलप्रिय दर्शक , यात आपला सुरमय आवाज, सर्वच छान.
@sharvariwagh4262
@sharvariwagh4262 Жыл бұрын
सर जेव्हा जेव्हा आपल्या गझल आयकते तेव्हा तेव्हा तुमचे चरण स्पर्श करण्याची इच्छा होते🙏🙏एकदातरी तुम्हाला भेटायचे आहे
@shajarsantosh2384
@shajarsantosh2384 3 жыл бұрын
ही गजल , अंगावर शेहारे आणते , तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे गायली की , सुरेश भट्ट साहेब जिथे भी असतील तिथे त्यांना ऐकून आनंद झाला असेल , खूप छान , अति उत्तम ,
@aakashthorve6428
@aakashthorve6428 Жыл бұрын
Tumhi vidarbhache aahat ka? Tumchya bhi* varun samajle
@rameshkaswate7754
@rameshkaswate7754 Жыл бұрын
😊😊
@rahulwaghmare5182
@rahulwaghmare5182 2 ай бұрын
दादा अप्रतिम 🌹🌹🌹
@dinkarpingulkar501
@dinkarpingulkar501 2 жыл бұрын
काय बोलावे समजत नाही खरच खुप सुंदर
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 Жыл бұрын
*जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली* व्वा, गजल नवाज!
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 Жыл бұрын
*जिवंतपणे छळायचे, मरणानंतर रडायचे*
@abijitthamke1135
@abijitthamke1135 2 жыл бұрын
खुप छान , अप्रतिम गझल.. स्मशानात ही शब्दांचे सोने झाले..
@sanjaybarve2410
@sanjaybarve2410 Жыл бұрын
स्मशानात कोणाच्या ग्रेवयार्डमध्ये की दफनभूमीत
@pradeepsakpal7156
@pradeepsakpal7156 3 жыл бұрын
शब्द प्रभू सुरेश भट यांच्या या गजलेचे सादरीकरण फक्त गजल नवाज यांनीच करावे.
@nishantchitrao6225
@nishantchitrao6225 3 ай бұрын
अगदी खर आहे
@amolpatil3293
@amolpatil3293 3 жыл бұрын
सर, नेहमी प्रमाणे अप्रतिम 💚
@SURESHPATIL-ig4oo
@SURESHPATIL-ig4oo 3 ай бұрын
Wah wah sir
@chandrakantkakde2532
@chandrakantkakde2532 2 жыл бұрын
Great👍👍👍👍 voice नमो budhay
@aakashthorve6428
@aakashthorve6428 Жыл бұрын
मि हिंदू आहे पण मि गौतम बुद्ध चे विचार follow करतो नमो बुध्दाय
@ajaymahajan8342
@ajaymahajan8342 11 ай бұрын
याचेच रडू आले की रडणे न मला जमले खूपच सुंदर जीवनदर्शन
@ajaymahajan8342
@ajaymahajan8342 11 ай бұрын
याचेच रडू आले की रडणे न मला जमले खूपच सुंदर जीवनदर्शन
@arjunpanchale
@arjunpanchale Ай бұрын
The best one
@nikitajadhav7461
@nikitajadhav7461 Жыл бұрын
Khup khup sundar gazal aani ti tumchya aawajat, sonepe suhaga👍👍👌🙏🙏
@gsthakur1210
@gsthakur1210 3 жыл бұрын
वा वा अप्रतिम!!
@sangitakavle3870
@sangitakavle3870 11 ай бұрын
अप्रतिम
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 Жыл бұрын
अप्रतिम गझल
@shubhangigorile3945
@shubhangigorile3945 Жыл бұрын
Apratim ❤
@surendrachavan8074
@surendrachavan8074 Жыл бұрын
REALLY GREAT
@yashwantchavan1835
@yashwantchavan1835 11 ай бұрын
Agab Lajabap sur
@govardhanbhasme7662
@govardhanbhasme7662 Жыл бұрын
अती सुंदर गायकी शतशः नमन
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी खूप छान
@rajukedar6673
@rajukedar6673 Жыл бұрын
अप्रतिम दादा..... ह्रदयस्पर्शी....👌
@gazalakshare700
@gazalakshare700 3 жыл бұрын
अतिशय स्तुत्य मैफल दादा.. अप्रतिम अप्रतिम 🌷🌺
@sagartamboli5368
@sagartamboli5368 Жыл бұрын
याचेच रडू आले की जमले ना मला रडणे ही. .👌👌
@sadashivhade4179
@sadashivhade4179 2 жыл бұрын
नि शब्द भीमराव जी निशब्द मी
@sanjaybarve2410
@sanjaybarve2410 Жыл бұрын
वाह खूप सुंदर 👌👌👌👌
@bhagojiranvir7908
@bhagojiranvir7908 3 жыл бұрын
मस्त दादा👌👌👌
@harshad24
@harshad24 3 жыл бұрын
सरजी छान❤️👍
@sakharammandavgade7426
@sakharammandavgade7426 2 жыл бұрын
Lovely flute
@navnathdhage7609
@navnathdhage7609 2 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे
@musicallaroundpravinpm462
@musicallaroundpravinpm462 3 жыл бұрын
क्या बात है सर
@satwajihole4531
@satwajihole4531 3 жыл бұрын
क्या बात है सर! स्मशानात मैफिल!
@suryawanshidnyandev8430
@suryawanshidnyandev8430 Жыл бұрын
अप्रतिम 👌
@bramhadassukhdeve4332
@bramhadassukhdeve4332 2 жыл бұрын
Apratim DADA... GREAT... GAZALLKAR..
@latabayaskar7296
@latabayaskar7296 Жыл бұрын
आवडते गझल गायक
@prafulzadekar2426
@prafulzadekar2426 2 жыл бұрын
Khup sundar sir
@shantaramjagadale8599
@shantaramjagadale8599 Жыл бұрын
Good gazal
@ummedraut3274
@ummedraut3274 2 жыл бұрын
Farcha sunder vichar
@rameshpotdar8382
@rameshpotdar8382 Жыл бұрын
छान 👌
@Shantabaimusic
@Shantabaimusic 3 жыл бұрын
ग्रेट दादा
@kishorbali4521
@kishorbali4521 3 жыл бұрын
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते ... मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते ... जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते ... असे एकाहून एक सरस शेर आणि मुळात अत्यंत प्रभावी मतला. अशा काव्याला दादांचा स्वर लाभावा आणि तो रसिकांचे काळीज चिरत आरपार जावा, असंच काहीसं झालं आहे. मनापासून ऐकत गेलात तर दादांच्या काही प्रसिद्ध रचनांपुरते दादा नसून त्यांच्या गायकीचं सामर्थ्य अशा वेगळ्याच रचनांमध्ये अधिक विखूरलेलं आहे, हे आपल्याला जाणवतं. एकेक गझल नव्हे तर एकेक अजरामर कलाकृतीच.
@ravindrataiwade5440
@ravindrataiwade5440 2 жыл бұрын
अप्रतीम दादा
@rahultadas2491
@rahultadas2491 3 жыл бұрын
खूप छान दादा....👍
@vinayakpawar6287
@vinayakpawar6287 Жыл бұрын
खुप छान साहेब
@madhukarnakat5490
@madhukarnakat5490 3 жыл бұрын
एक नंबर गझला
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 2 жыл бұрын
kya kahu dada koi lafj nahi bhatt sahab ko koti koti naman
@thoughtsharingmedia8578
@thoughtsharingmedia8578 2 жыл бұрын
❤️❤️❤️
@Bapukalesir
@Bapukalesir 3 жыл бұрын
कितीही ऐका.....कान निवत नाहीत
@pradeepsohoni9503
@pradeepsohoni9503 2 жыл бұрын
Aprateem gaykee
@naturetalk-rc4gd
@naturetalk-rc4gd 3 жыл бұрын
खूपच छान गजल आहे पण रेकॉर्डींग आणखी व्यस्थित आ असायला हवी होती
@musicallaroundpravinpm462
@musicallaroundpravinpm462 3 жыл бұрын
आयुष्य संपल्यावर आयुष्यावर बोलतात ती ही योग्य जागा कमीतकमी कमी इथे तरी ऐकणाऱ्यांनी जीवन काय आहे हे समजून घ्यावं माझ्या मते भ्रष्टाचाऱ्यांना इथे आणून बसवाव . सर , ते वेशीवर तयांना टांगायला हवे हे का कुणी फुलांना सांगायला हवे हे त्यांना ऐकवावे
@clayworldstudios7164
@clayworldstudios7164 2 жыл бұрын
रूदय सपरशी आवज
@sagartamboli5368
@sagartamboli5368 Жыл бұрын
❤❤❤
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,7 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 66 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН
Bhimrao Panchale ( Ghazal Navaj) Performance in Buddha Festival 2015
57:24
Etukech Mala Jatana
9:45
Bhimrao Panchale - Topic
Рет қаралды 65 М.
Bhimraoji Panchale Gazal
8:54
MaiyyaRani sound , Akola
Рет қаралды 29 М.
JAMAL & GANJA, ИРИНА КАЙРАТОВНА & КАЙРАТ НУРТАС - TUN (LYRIC VIDEO)
3:41
ИРИНА КАЙРАТОВНА
Рет қаралды 1,3 МЛН
Ulug'bek Yulchiyev & Aziza Qobilova - Esim ko'p (Premyera Klip)
3:32
ULUG’BEK YULCHIYEV
Рет қаралды 2 МЛН
KeshYou x Snoop Dogg - Forever Sunday (Official Music Video)
3:06
BM PRODUCTION
Рет қаралды 235 М.
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18
Munisa Rizayeva
Рет қаралды 15 МЛН
R-ONE - SENSIZ / СЕНСІЗ (Official Audio)
2:51
R-ONE MUSIC
Рет қаралды 83 М.
Alisher Konysbaev - Suie ala ma? | Official Music Video
2:24
Alisher Konysbaev
Рет қаралды 1,4 МЛН