No video

आजी (कविता) मृणाल जैन, पुणे | 'अमलताश' प्रकाशन समरंभ | वल्लरी प्रकाशन

  Рет қаралды 100

शब्द वल्लरी - Shabd Vallari

शब्द वल्लरी - Shabd Vallari

Күн бұрын

वल्लरी प्रकाशनाचा ‘अमलताश’ हा पंधरा कवींच्या कवितांचा समावेश असलेला नववा प्रातिनिधिक काव्यसंग्रह सोमवार, दि. 17 जून 2024 रोजी काव्यप्रेमींच्या ओंजळीत रिता करण्यासाठी समारंभपूर्वक खुला केला. अर्थात पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‘अमलताश’ अगदी चैतन्यदायी वातावरणात प्रकाशित झाला. याच समारंभात ‘वल्लरी’च्या ‘मधुमालती’ या काव्यसंग्रहात सहभागी असलेल्या कवयित्री शुभांगी रेवतकर यांच्या ‘मुक्त मी व्यक्त मी’ या वैयक्तिक काव्यसंग्रहाचेही प्रकाशन झाले.
‘अमलताश’च्या प्रकाशनाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ आणि लोकप्रिय कवी मा. म.भा.चव्हाण सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून होते लोकप्रिय कवी भूषण कटककर सर, कवयित्री प्रभा सोनावणे मॅडम, ‘वल्लरी’च्या सल्लागार डॉ. वैशाली मोहिते आणि मानसी चिटणीस मॅडम. सरस्वती पूजन, इशवंदना, पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत, वल्लरी प्रकाशनाबद्दलची माहिती (ज्योती इनामदार), ‘अमलताश’करिता लिहिलेल्या पाठराखणचे (ब्लर्ब) वाचन (अनुष्का चिटणीस), संपादकीय मनोगत, सहभागी कवींचा काव्यमहोत्सव, त्यानंतर ‘मुक्त मी व्यक्त मी’चे प्रकाशन, कवयित्री रेवतकर यांचे मनोगत आणि प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, वल्लरीच्या नव्या उपक्रमाची घोषणा (किरण इनामदार), अध्यक्षीय समारोप, आभार प्रदर्शन (स्वाती कुलकर्णी) आणि पसायदान (कीर्ती देसाई) असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.
‘अमलताश’मध्ये मुकुंद आठवले (ठाणे), अमेय बाळ (ठाणे), कल्याणी भाले (छ. संभाजीनगर), मृणाल देशपांडे (छ. संभाजीनगर), रजनी दुवेदी (पुणे), मृणाल जैन (पुणे), श्रद्धा कांदळगांवकर (मुंबई), माणिक कौलगुड (पुणे), सविता क्षीरसागर (माढा-सोलापूर), क्षमता प्रकाश (मुंबई), राजश्री महाजन (मुंबई), शुभांगी उदगांवकर-पाठक (पुणे), श्रीहरी पवळे (नवी मुंबई), साधना शेळके (पुणे), जयदीप वैद्य (नवी मुंबई) अशा 15 कवी-कवयित्रींचा समावेश आहे. यातील मुकुंद आठवले हे हयात नाहीत, मात्र त्यांच्या पत्नीच्या पुढाकाराने त्यांच्या कविता ‘अमलताश’मध्ये प्रकाशित झाल्या आहेत. कवी कधीही निधन पावत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या नावापुढे काव्यसंग्रहात कुठेही ‘स्वर्गीय’ असा उल्लेख केलेला नाही. कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच आमच्या सर्व कवी कवयित्रींच्या डोळ्यात एकप्रकारच्या अमृतानुभवाची अनुभूती घेत असल्याचे दृश्य आम्हाला दिसत होते. हेच तर आमच्या जगण्याचे सार्थक असल्याचे आम्हास वाटते.
या कार्यक्रमासाठी ‘वल्लरी’चे ‘अबोली’मधील कवी हरिष देशमुख, ‘बकुळ’मधील कवयित्री वीणा कडू, ‘अमलताश’च्या मुखपृष्ठावरील छायाचित्र कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या मीनाक्षी शीलवंत आणि ज्योती मनोहर अशा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वल्लरी प्रकाशनाच्या वतीने अवघ्या 15 महिन्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील दहाहून अधिक कवींना एकत्र करून ‘मोगरा’, ‘पारिजात’, ‘चाफा’, ‘बकुळ’, ‘मधुमालती’, ‘जाईजुई’, ‘निशिगंध’, ‘अबोली’ अशा काव्यपुष्पांचं प्रकाशन झालं. आज मागे वळून बघितलं तर एवढ्या कमी कालावधीत आम्ही एवढं काम कसं उभं करू शकलो, याचं आम्हालाच आश्चर्य वाटतं. पण जबरदस्त सकारात्मक ऊर्जा, शुद्ध हेतू, प्रामाणिक प्रयत्न आणि आपणा सर्वांचे पाठबळ याशिवाय ते शक्य होऊ शकलं नसतं.
#shabdvallari
#marathipoem
#marathikavi
#मराठी
#premkavitamarathi
#bestmarathipoem

Пікірлер
Indian Solo Traveller | Aabha Chaubal - Interview | Swayam Talks
22:35
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Ek Mulakhat
38:20
DD Goa
Рет қаралды 333 М.
Can South Indians Understand Each Other?
40:12
Bahador Alast
Рет қаралды 2,1 МЛН
mod06lec25 - Gender and Disability: Interviews with Prof. Anita Ghai
43:50
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН