कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहाTravel vlog-1

  Рет қаралды 1,017,795

Sanchit Thakur Vlogs

Sanchit Thakur Vlogs

3 жыл бұрын

कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहा Travel vlog-1
मी वाचलेल्या एका कथेवर हा वलॉग आहे ,एक कथा जी खूप social media वर trending मध्ये होती.मी कोकणातील अनेक कथांवर विडिओ बनवले आहेत म्हणून खूप लोकांनी मला ही कथा forward केली आणि कथा पण जरा वेगळी होती . तसं या कथेचा पाठलाग करणं तसं खूप कठीण ही जी गुहा आहे तिकडे जाण्यासाठी त्या गुहेतील लेणी पाहण्यासाठी खूप खतरनाक प्रवास करावा लागतो .
ही एक कथा आहे त्यामुळे त्याच उद्देशाने हा वलॉग बनवला गेला आहे , मनोरंजन आणि त्या वास्तू चे जतन कारण अजूनही कोणी लक्ष नाही दिले तर ही गुहा आणि ते अवशेष आठवणीत राहतील त्यामुळे त्या गुहेचे त्या लेण्यांचे संवर्धन आणि संरक्षण हाच उद्देश आहे
ही गोष्ट आहे एक कथा आहे आणि त्याच कथेचा पाठलाग मी केला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर आणलं आहे
...
वलोग मध्ये काय आहे ...
1) सह्याद्रीचा कडा
2) 80° चढण
3) गुहा आणि गुहेतील लेणी
4)एक कथा
5) विहीर
6) एका वेगळ्या वनस्पती ओळख(काळोखात चमकणारी)
7)जंगलात बांधलेलं धरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे. या गुहेच्या परिसरात काही वैशिष्टय़पूर्ण खोदकाम करण्यात आले आहे. याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे. हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे. या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश.. येथे ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग लोककथांमध्ये सांगितला जातो. आज तेथे कोणतेही अवशेष नाहीत मात्र दोघांमध्ये झालेल्या भयंकर झटापटीत त्यांनी एकमेकांवर अजस्त्र वृक्ष फेकले. ते वृक्ष ज्या परिसरातून काढले गेले त्या परिसरात म्हणे आजतागायत मोठे वृक्ष पुन्हा उभे राहिले नाहीत.. पिढय़ान् पिढय़ा येथे बकासुराची आठवण जपली जाते. याला पुरावे नाहीत. मात्र परंपरा आहेत.
बकासुराला गाडीभर अन्नधान्य लागायचे. एक माणूस खायला हवा असायचा. एके दिवशी या भागातील ब्राह्मणाच्या घराची पाळी आली. त्याच्या घरातील मंडळी रडू लागली. आज घरातील एका माणसाला पाठवावे लागणार याचा त्यांना शोक होता. त्यांचा मोठमोठय़ाने आक्रोश सुरू झाला. या भागात अज्ञातवासाच्या भ्रमंतीत असणा-या पांडवांना हा आक्रोश ऐकू आला. भीमाने आवाजाचा शोध घेतला तेव्हा तो एका झोपडीसमोर पोहोचला. त्याने आक्रोशाचे कारण विचारले आणि बकासुराची हकिगत कळली. आपला एकुलता एक मुलगा आता त्याच्याकडे पाठविण्याची पाळी आहे. त्यामुळे शोक करण्यापलीकडे आमच्या हातात काही नाही असे त्या गरीब बिचा-या ब्राह्मणाने सांगितले. ग्रामस्थांवर कोसळलेले संकट भीमाला समजले, त्याने बकासुरापासून कायमची मुक्ती दिली जाईल, असे सर्वाना अभिवचन दिले. भीमाने ब्राह्मणाला शांत करत तुमच्या मुलाऐवजी आज मी गाडाभर धान्य घेऊन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जातो असे सांगितले. बकासुराच्या भेटीला तो गाडी घेऊन गेला. त्याचे अन्न स्वत:च खाऊन टाकले. यामुळे क्रोधीत झालेल्या बकासुराने भीमाला मारहाण केली. यावेळी झालेल्या जंगी कुस्तीत भीमाने बकासुराला ठार मारले. हे ज्या भागात युद्ध झाले तो भाग आजही कुस्ती पठार म्हणून चर्चेत आहे. या दोघांच्या युद्धात हे पठार झाले असावे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भीमाने बकासुराचे शव त्याच गाडीत भरून त्याने वेशीवर आणून टाकले. गाववासीयांना बकासुराचे संकट दूर झाल्याची माहिती मिळताच गावाने भीमाचा जयघोष केला, ही कथा तुम्हाला माहीत आहे. या कथेच्या काही पाऊलखुणा आजही ऐनारीत दाखविल्या जातात. बकासुराच्या वाडय़ाचा चौथरा आजही दाखविला जातो. ज्या भागात बकासुराचे भ्रमण असायचे तो भाग आज राकसवाडा म्हणून प्रचलित आहे. या जंगल परिसराला हे नाव कसे पडले, कोणी ठेवले याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. या राकसवाडय़ात बकासुराची भीती आजही शेतक-यांना आहे. या जंगल परिसरात दाट झाडीत गुरांना घेऊन कुणी गेले अथवा या परिसरात कुणी फिरायला गेले तरीही सूर्यास्त होण्यापूर्वी घरी मागे फिरावे असा अलिखित नियम ग्रामस्थांनी आजही जपला आहे. या भागात पिढय़ान् पिढय़ा मांडवकर, भोसले, काळके, साईल ही ऐनारी गावातील मंडळी नाचणी-वरीची शेती करतात. सध्या या डोंगरातील बराच भाग अभयारण्यासाठी वनविभागाने आपल्या ताब्यात घेतला असला तरी या लगत असणा-या खासगी जमिनी राकसवाडय़ाच्या काही क्षेत्रात येतात. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतिकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात. त्यावर छोटय़ा छोटय़ा भाताच्या गोण्या आणि शिजवलेला भात ठेवतात. ही बैलगाडी या भागात घेऊन जात हा?भात राकसवाडय़ात फेकला जातो. शेतीला सुरुवात करण्यापूर्वी?ही परंपरा पूर्ण केली जाते. काही वर्षापर्यंत पिठाचे बाहुले करून बकासुराच्या नावाने ते तोडले जायचे आज ही परंपरा नव्या पिढीने बाजूला केली आहे. या धान्याच्या रूपाने का होईना जंगली पशू-पक्षांना अन्न मिळते हेही विशेष..
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#bakasur #बकासुर

Пікірлер: 935
@gurunathgangnaik192
@gurunathgangnaik192 2 жыл бұрын
सम्राट अशोका ची लेणी,असो नाहीतर बकासुराची गुहा,ते इतिहास अभ्यासक ठरवतील,आपण कशाला वाद घालायचा पण, संचित ने मेहनत करून ती गुहा किंवा लेणी आपल्याला ला दाखवली त्या बद्दल त्याचे मनापासून कौतुक करावेसे वाटते,
@vip-rv3ey
@vip-rv3ey 11 ай бұрын
Mg dada 384 lenya pn pandavacha aahe kaa 🤣
@rajugrote2247
@rajugrote2247 3 жыл бұрын
महाराष्ट्रात गुहा गुंफा बुध्द लेणी आहेत या दृष्टिकोनातून अभ्यास करता सत्य बाहेर येईल.कारण या सा-या गुंफा अजिंठा सारख्याच दिसतात.
@hiralalborse8855
@hiralalborse8855 3 жыл бұрын
बकासुर आणि भीम ही कथा खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर व एरंडोल या दोन गावामध्ये घडलेली कथा महा भारतीय उल्लेख आहे. तेथे आजही खुणा आहेत. बकासुर कोंकणात नव्हता.
@pradipbhosale9950
@pradipbhosale9950 2 жыл бұрын
पांडव विंध्य पर्वत ओलांडून खाली आलेच नवाते पुरांकथानुसर,,, kokanat pn nhi ani vidharbhat pn nhi
@naturebeauty-et4ji
@naturebeauty-et4ji 3 жыл бұрын
भावा तुझ काम चांगल हाय पण ति गुफा नाय हाय ति बुद्ध लेणि हाय जय शिवराय जय भिम
@malaragyeto7360
@malaragyeto7360 3 жыл бұрын
Murkha
@vighneshjadhav5164
@vighneshjadhav5164 Жыл бұрын
Had
@vishalffyt771
@vishalffyt771 3 жыл бұрын
अशा प्रकारच्या गुहा की ज्या कोरीव आहेत त्या सर्वच्या -सर्व बौद्धकालीन लेण्या आहेत अगदी १००% दाखवल्या बद्दल धन्यवाद मित्रा .
@sushantk28
@sushantk28 3 жыл бұрын
.....sooon it will be converted to Hindu deities temple
@sandeshyadav2326
@sandeshyadav2326 3 жыл бұрын
Bahudha Lenya ahet
@yuvrajtikone8221
@yuvrajtikone8221 3 жыл бұрын
मित्रा व्हिडीओ खूप छान आहे ..ही बुद्ध लेणी आहे ...ते राहण्याचे विहार आहेत , त्या लेणी अभ्यास,खगोलशास्त्र चा अभ्यास ,ध्यान करण्यासाठी उपयोगी असायच्या आणि प्राचीन भारतीय लोक खूप प्रगत होते,शैक्षणिक प्रगत होते ते विज्ञान वादी होते त्यांना स्थापत्य शास्त्राची उत्कृष्ट जाण होती.. भारतातील सर्व प्राचीन लेण्या बुद्ध कालीन आहेत ....बकासुरची दंत कथा आहे आणि आपण सर्व भारतीयांनी आपल्या प्राचीन पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून, अंधश्रद्धा सोडून विज्ञानवादी होऊन भारताची प्रगती साठी प्रयत्न केले पाहिजेत.....
@prakashjadhav4884
@prakashjadhav4884 3 жыл бұрын
भाऊ,हा देश बुध्दाचा आहे.आणि या बौध्द भंतेंणी कोरलेल्या बुध्द लेण्याआहेत.आत मध्ये ज्या खोल्या आहेत,त्या प्रत्येक बौध्द लेण्यांमध्ये आढळतात.
@RK-nh6nr
@RK-nh6nr 3 жыл бұрын
पूर्वी मालशिरस तालुक्यातील वेलापूरला चित्र नगरी समजत तिथे च भिम व बकासूर याचे युध्द झाले
@sangameshwariamar6553
@sangameshwariamar6553 3 жыл бұрын
Yeess
@sangameshwariamar6553
@sangameshwariamar6553 3 жыл бұрын
Khri ghost aahe he
@special1218
@special1218 3 жыл бұрын
Barobar aahe
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 3 жыл бұрын
संचित..मी तुझे काही vlog पाहिले,खुप कौतुक वाटले.खुप मेहनतीने तू vlog बनवतोस,तुझे खुप खुप अभिनंदन 💐 बर्याचश्या गुहा रहस्यमही वाटतात,संशोधन खुप गर जेचे,त्या विभागातील अधिकारी भरपूर पगार घेवुनही अश्या एतिहासिक ठेव्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात,दुर्दैव महाराष्ट्राचे,प्रयत्नाची दृष्टीच नाही.एक जन्म कमी पडेल महाराष्ट्र पहायला.. कोकणापुरते का होईना तुझे काम अप्रतिम 👍👌👌👌 सादरीकरण,चित्रीकरण खुप मस्त.. .
@user-vu8kg5kk1o
@user-vu8kg5kk1o 3 жыл бұрын
या लेण्या आहेत. भंतेजींना राहन्यासाठी कोरल्या जायच्या.
@tentativeentertainment8849
@tentativeentertainment8849 3 жыл бұрын
भनतेजी म्हणजे
@mayurshkatte6958
@mayurshkatte6958 3 жыл бұрын
boudh bhiku
@shravanbhimate2005
@shravanbhimate2005 3 жыл бұрын
Khar ahe bhau
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 3 жыл бұрын
🌟भारतातील सर्व प्राचीन स्थळे बुध्दस्थळे आहेत कारण भारत बुध्दमय होता ! काल्पनिक कथा भारताचा ईतिहास नाही ! जयभिम ! जयशिवराय !! 🇮🇳✊
@PyaarBaato
@PyaarBaato 3 жыл бұрын
@@sanjayjadhav3981 haa pan tey ambedkar buddha naahi aahet tey ashok buddha aahet..
@nikhilmore6305
@nikhilmore6305 3 жыл бұрын
कृपया विनंती, ही गुहा कुठल्या काळातील आहे किंवा कोणाची आहे याला जास्त महत्व देऊ नका कारण यावर विचार, संशोधन आणि शोध हे इतिहासकार घेतील. पण आपला इतिहास जर अशी माणसं सांगत असतील तर, त्यात जातीवाद आणू नये. उलट त्या स्थळांचा विकास आणि त्या सोबत त्या गावांचा पर्यटन विकास होणं गरजेचं आहे.
@sachincoll9000
@sachincoll9000 3 жыл бұрын
Yes Right
@dramaqueenyuktapatilyuks549
@dramaqueenyuktapatilyuks549 3 жыл бұрын
Titalya lokana mahit ahe. Ya sagltachi mahiti
@jayvantkamble4432
@jayvantkamble4432 3 жыл бұрын
मित्रा ते तर आहेच! पण यात जातीवाद असा काहीही नाही ! या बौद्ध काळीन गुहा आहेत,ज्या की सम्राट अशोक यांच्या काळात भंतेनी meditition साठी बांधल्या होत्या! आणि संशोधन झालच तर नक्कीच या बुद्धकालीन गुहा आहेत निष्पन्न होईल!
@nikhilmore6305
@nikhilmore6305 3 жыл бұрын
@@jayvantkamble4432 मित्रा तुझा मताप्रमाणे खरंही असेल, पण माझा मुद्दा तर हाच आहे कि बरेच कंमेंट या वादाच्या आहेत. म्हणून मी माझं प्रांजळ मत व्यक्त करतोय. या वादापेक्षा अशा वास्तूचा उपयोग हा तेथील गावांच्या पर्यटन आणि त्यायोगे होणाऱ्या तेथील ग्रामीण विकासासाठी व्हावा.
@jayvantkamble4432
@jayvantkamble4432 3 жыл бұрын
@@nikhilmore6305 हो बरोबर मित्रा! सहमत! पण या लेण्यांचा खरा इतिहास पण लोकांना समजला पाहिजे ना! खोटा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल नको व्हायला एवढच वाटत👍
@babulaltayade6130
@babulaltayade6130 3 жыл бұрын
भिमबकासुर कथा ही एकचक्रा नगरी म्हणजे आताचे एरंडोल तालुक्यात जि.जळगाव आहे असे म्हटले जाते . अशा खूणा अनेक ठिकाणी सापडतात.अशा गुहा भीम बकासुर यांच्याशी जोडल्या जातात. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो.
@rang1743
@rang1743 3 жыл бұрын
बकासुरा ची गुफा नाही ,,,,,लेणी आहे ही ,,,,,पाली भाषेतील शिलालेख असतील ,,,, आणि या उपासनेच्या खोल्या आहेत त्या ,,,
@jiteshjadhavvlog1541
@jiteshjadhavvlog1541 3 жыл бұрын
दादा ही एक बुध्द लेणी आहे बाकी लेनीला एक्सपोज केल्याबद्दल आभार
@shriosh
@shriosh 3 жыл бұрын
मला कळत च नाही...विदर्भात केलझर ठिकाणं आहे . तिथले लोक म्हणतात इथे बकासुर चा वध झाला..ओडिशातील लोक म्हणतात त्यांच्या राज्यात एक ठिकाण आहे तिथे वध झाला..आता हे तिसरे....किती बकासुर होते ..😄😄😄
@prakashbaikar1402
@prakashbaikar1402 3 жыл бұрын
संचित भाऊ आपल्या खूप व्हिडिओ पहिल्या आहेत खूपच छान सुंदर अशी माहिती देता आपण आपले मःपूर्वक आभार मानतो आपण आम्हाला असे जिते जाता येत नाही असे हि स्पॉट माहिती देता 🙏👍❤️
@shaileshpawar732
@shaileshpawar732 3 жыл бұрын
लहान बालकांना मनोरंजन म्हणून अशा गोष्टी सांगा पण व्यवहारात किंवा ईतर ठिकाणी ईतिहास म्हणून या गोष्टी बोलू नका..
@kapillamture8584
@kapillamture8584 3 жыл бұрын
बुद्ध लेणीच आहे, हे सर्व चेताग्रह आहेत
@swapnilvj
@swapnilvj 3 жыл бұрын
चैत्यगृह पण आहे
@sandipmalekar3265
@sandipmalekar3265 3 жыл бұрын
पांडवकालीन लेणी आहेत ही!👍👌
@pramodshetye8065
@pramodshetye8065 3 жыл бұрын
कोकणातील रहस्य मय गोष्टीचु छान माहिती देता.धन्यवाद
@1215mohan
@1215mohan 3 жыл бұрын
This is Buddhist cave were carved during great Ashoka era for Buddhist Monks to meditate under leadership of Satvahan king in maharaahtra. Our Entire country was Buddhist country once time.
@milindgaikwad961
@milindgaikwad961 2 жыл бұрын
बुद्धाच्या अगोदर कुठली संस्कृती नव्हती काय बौद्ध संस्कृती आकाशातून टपकली ? सगळ्याची उत्पत्ती ही अनादी अश्या सनातन संस्कृतीतुनच झालेली आहे सगळ्या भूतलावर आजही मूर्तिपूजा केली जात असल्याचे अवशेष आजही मिळतात काय कुठलं प्राचीन सापडलं की लगेच बुद्धाशी सबंध जोडून मोकळं व्हायचं जणू काही बुद्धाच्या अगोदर मानवजात नव्हतीच सिद्धार्थ हा 1सनातनी वैदिक राजाच्या पोटी जन्मलेला 1 सनातनी राजपुत्र होता व त्याने ऐहिक सुखाचा त्याग करून ज्ञानप्राप्ती करून बुद्धत्व मिळवले
@mr.mechanicgaurav6601
@mr.mechanicgaurav6601 2 жыл бұрын
@@milindgaikwad961 , khari history sangaychi re,,,,, tya kalpanik murkha varti visvas karun andharat nako jau
@madmaxxxx228
@madmaxxxx228 2 жыл бұрын
@@mr.mechanicgaurav6601 bhai ashoka ni lenya kdhich nahi bandhlya tya leneya satavhan yayi bamdhlayat
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 3 жыл бұрын
खरच बकासूराची ही गुहा एक विशाल गुहा असली पाहिजे।ही गुहा बरीच लांब व आजून जमिनीत खोलवर असली पाहिजे।तिच्या आत अनेक कमरे-भूयार,गुप्त मार्ग,रहश्यमय बस्तु,मूर्त्या व जुन्या वस्तु असाव्या. या वास्तुचे खोदकाम झाले पाहिजे।
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
☺️☺️💐
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 3 жыл бұрын
मित्रा खुपच छान आणि खूप मेहनत घेतली तु माहिती दिलेली संदिग्ध असली तरी तुझ्या मेहनती ला सलाम
@AprantVlogs
@AprantVlogs 3 жыл бұрын
विहीर नाही पाण्याचे टाके आहेत त्या टाक्यात शिलालेख असतात
@vishalhajare5305
@vishalhajare5305 2 жыл бұрын
बौद्ध कालीन लेणी आहे भावा....इतिहास नीट बगुन महीती सांगा
@mr.mechanicgaurav6601
@mr.mechanicgaurav6601 2 жыл бұрын
Correct
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 жыл бұрын
खुप छान दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ,, मस्तच मज्जा आली व्हिडीओ पहायला ..............👌👌👍👍
@somdattsable5540
@somdattsable5540 3 жыл бұрын
सह्याद्री पर्वतरांग नाव जरी ऐकले तरी आदिलशाही, औरंगजेब आणि मुघलांच्या मनात धडकी भरुन येते त्यानां दडाडून घाम फुटतो महाराज आणि मराठा मावळ्यां बरोबर ह्या सह्याद्रीचे ही हिंदवी स्वराज्यास्थापने मध्ये मोठे योगदान आहे 🚩🚩🚩🚩🚩
@AprantVlogs
@AprantVlogs 3 жыл бұрын
दादा ही एक बौद्ध लेणी आहे...... त्यात माती भरलेली आहे तिथे भिक्षुंसाठी शयनासन आहेत तुम्ही जे फिरत होता ते एक विहार आहे
@udaysawant9413
@udaysawant9413 3 жыл бұрын
right sir
@pavanambhore
@pavanambhore 3 жыл бұрын
Right 👍
@m1s350
@m1s350 3 жыл бұрын
Right
@sushmitadabholkar1187
@sushmitadabholkar1187 3 жыл бұрын
एवढ्या वर तू एवढ्या मेहनतीने जाऊन आमका बकासुरा ची गुफा दाखवलं याबद्दल आम्ही तुझा खूप खूप मनापासून धन्यवाद करतब
@ashrubasalve2046
@ashrubasalve2046 3 жыл бұрын
हि फक्त बुध्द लेणी आहे 🙏यावर संशोधन केले जावे.
@narendra3671
@narendra3671 3 жыл бұрын
फारच छान अभिनंदन असेच महाराष्ट्रातील गड किल्ले, प्राचीन ठेवा आहे तो प्रत्यक्ष पहाण्यासाठी प्रेरणा मिळाली
@panchkrishnabhakti3156
@panchkrishnabhakti3156 3 жыл бұрын
बकासुराचा वध श्री कृष्ण प्रभूंनी केला होता जर आजुन एखादा बकासुर असेल तर माहित नाही पण एकच बकासुर असेल तर बकासुराचा वध श्री कृष्ण प्रभूंनी केला होता 🙏 जय श्री कृष्णा 🌷🌸🌹🌺🌼
@namitasonde1789
@namitasonde1789 3 жыл бұрын
बुद्धकालीन लेण्या आहेत ह्या मित्रा 🙏
@enjoylifeashuman7383
@enjoylifeashuman7383 3 жыл бұрын
अरे 1 नंबर, तु मेहनत घेवून ते आम्हाला दाखवलेस, thanks त्यासाठी. दुर्लक्षित प्रदेशा वर विडीओ बनवलास. फार छान. Keep it up
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
Thank you☺️
@vidyapadave3774
@vidyapadave3774 2 жыл бұрын
संचित तुझे धाडस बघून खरंच तुझा अभिमान वाटतो व्हिडीओ अत्यंत छान आहे
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 жыл бұрын
Nic video... different n Suspense things बघायला मिळाले..
@vasantraojogekar4215
@vasantraojogekar4215 3 жыл бұрын
ये बुद्ध कालीन हो सकता है । पहाड़पर खोद काम बुद्ध काल में ज्यादा हुआ है ।
@hemantthakur3234
@hemantthakur3234 3 жыл бұрын
खूपच महेनेत घेतलीस भावा. तुला सलाम. फारच सुंदर माहिती दिलीस. 🙏🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
Thank you☺️💐
@dipakraut1588
@dipakraut1588 3 жыл бұрын
@@SanchitThakurVlogs pn te tumhala rastyat kay bhetla hot ki jyamule tumcha game zala asta as bolla
@dineshredkar6311
@dineshredkar6311 3 жыл бұрын
खूप सुंदर दाखवलं मजा आली 👌👌👍👍🙏🙏
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 жыл бұрын
खूप छान माहिती या गोष्टी जतन करणं गरजेचं आहे
@ganpatade2921
@ganpatade2921 3 жыл бұрын
भारत हा इतीहासचा अमूल्य ठेवा आहे जयाचे वर्णन करणेही कठिन आहे मला वाटत खरा निसरग भारतच आहे
@ganpatade2921
@ganpatade2921 3 жыл бұрын
निसरग महणजेच स्वर्ग
@tusharkadam1592
@tusharkadam1592 3 жыл бұрын
Buddhist cave
@shripad1111
@shripad1111 3 жыл бұрын
Khup chan Video ... Kokanatil rahasymay jaga..
@nitinmore5891
@nitinmore5891 3 жыл бұрын
इतिहास कोणाचा ही असो परंतु हा परिसर पर्यटन दुष्ट्या विकसित झाला पाहिजे हाच ध्यास. याची प्रसिद्धी आणि संशोधन 1999 साली तरीही दुर्लक्षित आहे ही खंत
@user-vq2cs1vv8g
@user-vq2cs1vv8g 3 жыл бұрын
वस्तुतःही बकासुराची गुहा नसून ही एक बौद्ध लेणी आहे,,कारण त्या बांधकामावरुन कळते की ही एक हीनयान पंथातील भिक्खु संघाने कोरलेली बौद्ध लेणी आहे,,वादविवादाचा प्रश्न नाही पण वास्तु तशी साक्ष देते आहे
@reshut1508
@reshut1508 3 жыл бұрын
बौद्ध स्तळे यांना पांडव लेणी मंदिर बनवले जाते कृपया करून चुकीचा इतिहास पसरू नका जो योग्य आणि खरा इतिहास आहे तो दाखवा कोणत्याही धर्माचा अभ्यास न करता विडिओ बनवले जातात त्या बद्दल पूर्ण अभ्यास करून विडिओ बनवा तुमच्या मुळे इतिहास बदलू शकतो अभ्यास करून विडिओ बनवा अशी अपेक्षा तुमच्या कडून करतो चुकीच्या माहिती मुळे पुडच्या पीडिला लेणी बघायला मिळणार नाही आणि ही एक निंदनीय बाब आहे🙏
@omkarbordavekar4098
@omkarbordavekar4098 3 жыл бұрын
Leni ahet he tar nakkich. Fakt kahi itihas clear hoil asha prakarchi mahiti asel tar please share kara
@malaragyeto7360
@malaragyeto7360 3 жыл бұрын
Murkha
@PyaarBaato
@PyaarBaato 3 жыл бұрын
Thanks for the info
@nikhilubale4171
@nikhilubale4171 3 жыл бұрын
@@malaragyeto7360 तुमच्या घरातली शब्द इथे वासरू नका
@pralhadpawar7090
@pralhadpawar7090 3 жыл бұрын
👍👌फारच सुंदर माहिती दिली,धन्यवाद💐💐💐
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
संचित... छान व्हिडीओ... लय भारी..👌 Take care.... धन्यवाद....
@incometaxscstwelfareassoci1164
@incometaxscstwelfareassoci1164 3 жыл бұрын
This is Buddhist Monastery of 2000years earlier
@manojmali8991
@manojmali8991 3 жыл бұрын
बकासूर व भीम यांची लढाई जळगाव जिल्हातील एरंडोल तालुका मध्ये पदमालय येथे झाली आहे व पाडव वाडा सुद्धा आहे व भीमाचे पायाचे ठसे व भीमाने जेवण करून पाणीसाठी एक खुमसी मारून पाणी काढले आज ही भीमकुनड म्हणून प्रसिद्धआहे एक वेळ भेट द्या
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 3 жыл бұрын
किचकाला भीमाने मारून हाथ ज्या कुंडात धुतले ते भीम कुंड अमरावती (चिखलदरा) येथे आहे त्याचे सुद्धा नाव भीम कुंड असे नाव आहे
@kailas7921
@kailas7921 3 жыл бұрын
सह्याद्री पर्वताच्या रांगा आपल गाव आपली माती 👌🚩
@dnyaneshwarlokhande2992
@dnyaneshwarlokhande2992 3 жыл бұрын
हिनयान बुध्द लेणी आहे. आभार.
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 3 жыл бұрын
Buddhist cave ahe
@mayabarathe4458
@mayabarathe4458 3 жыл бұрын
Sundar ahe budhleni namobudhay
@ganeshgiri1837
@ganeshgiri1837 2 жыл бұрын
खुप मस्त आहे यार हा विडीवो
@TravelwithNitin30
@TravelwithNitin30 3 жыл бұрын
खूपच छान..... मस्त.....🙏🏻👍👍
@karanthorawade9679
@karanthorawade9679 3 жыл бұрын
दादा बकासुर वगैरे ह्या दन्तकथा आहेत, नीट पाहाल तर आणि सोशधन जर झाले तर 100% हे इतिहासकालीन सम्राट अशोक राज्यातील बोध विहार समजतील, जे लोक ह्याला बकासुर गुहा समजतात
@surajsonawane4823
@surajsonawane4823 3 жыл бұрын
mast bhaava... Appreciate ur efforts....👏👍👌🙌
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 3 жыл бұрын
उत्तम माहिती आणि तुमचा व्हिडीओ. अशीच उत्तमोत्तम माहिती ध्या, आनंद वाटेल. धन्यवाद ।
@babanraokunjir2869
@babanraokunjir2869 3 жыл бұрын
निव्दन माहिती सविस्तर आणि चांगली आहे धन्यवाद
@satyawanrane1433
@satyawanrane1433 3 жыл бұрын
खूप छान विडीओ आहे👌👌
@rasikagawikward9588
@rasikagawikward9588 3 жыл бұрын
मित्रा शोध छान आहे, काही तरी नवीन पहायला भेटले, पण ही गूफा बुध्द कालीन गुफा आहे, जे बौध्द भिख्खू च वास्तव्य होत. भारता मधे खूप ठिकाणी लेण्या भेटल्या आहेत, त्या वास्तूंची रचना देखील अशीच आहे.
@bhushanmore9800
@bhushanmore9800 3 жыл бұрын
Excellent Vedi shoot by you and the Information shown by you is very nice keep it up 👍👍👍👌👌
@vitthalkalumali3410
@vitthalkalumali3410 3 жыл бұрын
Khup khup chayn very very nice 👍👍👌👌🌹🌹🙏🙏🌹
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 3 жыл бұрын
खूप मेहनत घेताय, पण खरी माहिती देणे गरजेचे आहे,एकंदर बांधकाम पाहता, ते बौध्द भिकुंचे साधना केंद्र आहे हे वास्तव आहे,
@roxybgmi4138
@roxybgmi4138 3 жыл бұрын
Gp re lavdya kutha pn chalu hotoye aai zavadya
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा छान व्हिडिओ बनवलास आणि ह्या पौराणिक वास्तू जतन करण्याचा संदेश देत जा
@user-le2fj7fc8g
@user-le2fj7fc8g 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@ramdalvi7706
@ramdalvi7706 3 жыл бұрын
लय भारी भावा एकदम झकास
@amitgadakh3935
@amitgadakh3935 3 жыл бұрын
मास्त छान खुप परिश्रम घेतले .. अद्भुत
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Khup chan..... kahi tari koknatla navin baghayla milal. Aani mahiti milali Nice voice over
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
Thank you dada☺️💐
@prashantbompilwar9696
@prashantbompilwar9696 3 жыл бұрын
its really amazing vdo
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Khup Khup Sundar👌👍 👏
@vidyapadave3774
@vidyapadave3774 2 жыл бұрын
संचित खूप छान व्हिडीओ
@vishnudhoke5591
@vishnudhoke5591 3 жыл бұрын
फारच छान!
@surekhapataskar96
@surekhapataskar96 3 жыл бұрын
Hi गूढ, गहन , रहस्यमय पण अल्हाददायक असा vlog👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
Thank you☺️
@archgurav2467
@archgurav2467 3 жыл бұрын
Great 👍Nice video👌takecare
@umeshkulkarni504
@umeshkulkarni504 10 ай бұрын
One of the best vlogs I have ever seen. Thankyou so much sanchit
@jyotipawar9143
@jyotipawar9143 3 жыл бұрын
Hiii sanchit... Great video 👌👌👌👌
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 3 жыл бұрын
मस्त adventure ब्लॉग दाखवलं भावा, कोकणी ब्लॉग मध्ये मे पहिल्यादाच असा भारी विडिओ बघितला असेच छान ब्लॉग दाखवत जा, जय शिवराय
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
हो नक्कीच☺️ जय शिवराय
@sagarambolkar8710
@sagarambolkar8710 3 жыл бұрын
bhava video chan banvla khup chan vatle, 👌👌
@ravindrakamble4912
@ravindrakamble4912 3 жыл бұрын
Puratava vibhagane yachi dakhal ghene avashak ahe.very nice video.
@varshajoshi7067
@varshajoshi7067 3 жыл бұрын
Nice video and information 👍
@vidyanandtantarpale1391
@vidyanandtantarpale1391 3 жыл бұрын
दादा खरच खोटे नका पसरवू ही बुद्ध लेणी आहे.
@malaragyeto7360
@malaragyeto7360 3 жыл бұрын
Murkha
@aparnajadhav423
@aparnajadhav423 3 жыл бұрын
Mast Aavdle 👍👍👌👌 Ho Kalji Ge Aacha T C
@meenaoke4117
@meenaoke4117 3 жыл бұрын
धन्यवाद, नवीन माहिती मिळाली!
@sandipsalve4248
@sandipsalve4248 3 жыл бұрын
नमो बुदधाय ! सम्राट आशोकांनी भारतात ८६,००० हजार लेणी बांधलेल्या आहेत त्यापैकी ऐनेरी लेणी आहे
@satishashwaratna259
@satishashwaratna259 2 жыл бұрын
सम्राट अशोक कालीन बौद्ध लेण्या आहेत मित्रा. महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचा अभ्यास करावा.
@kiranbhagywant3116
@kiranbhagywant3116 3 жыл бұрын
Khup chhan marathi boltoys Ur voice so nice
@prakanayikwithkangna2120
@prakanayikwithkangna2120 3 жыл бұрын
Khupach chan..I enjoy
@ramsuryavanshi298
@ramsuryavanshi298 3 жыл бұрын
बुध्द भंतेचे नीवास होते , खरा इतिहास पुसला जातोय , मंदिर किंवा राक्षसाचा गुफा बनलाय , 😲😲😲
@SUKUNA8329
@SUKUNA8329 3 жыл бұрын
He buddha lene ahe so buddha lene vihar💙🙏 jai bhim 🙏 vasundhara
@malaragyeto7360
@malaragyeto7360 3 жыл бұрын
Murkha
@kalpeshpaste274
@kalpeshpaste274 3 жыл бұрын
खूप छान वाटले दादा
@busywithoutwork
@busywithoutwork 3 жыл бұрын
Nice video and superb voice &presentation👌👋
@sudhakarshelar6854
@sudhakarshelar6854 3 жыл бұрын
पुरातत्व विभागाने परिक्षण करावे नंतरच माहीत होईल बकासुरची की बौद्ध कालीन
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
हो☺️💐
@ashokgaikwad2196
@ashokgaikwad2196 3 жыл бұрын
एक दम बरोबर
@mangeshwankhede1750
@mangeshwankhede1750 3 жыл бұрын
Right 👍👍
@nikhilubale4171
@nikhilubale4171 3 жыл бұрын
अगदी बरोबर आणि माझ्या मते ही बौद्ध भिक्खू यांचे विश्राम गृह आहे नाकी दुसरं काही
@2051xd
@2051xd 3 жыл бұрын
बुद्ध काळातील संत तपस्या करीत असताना या गुफा मधे राहत
@ramanparab5547
@ramanparab5547 3 жыл бұрын
Khup maza ali fakt vedio pahun, sarwana namaskar
@sachinlugade842
@sachinlugade842 3 жыл бұрын
बकासूर आपल्या कोकणातला आहे हे ऐकून आनंद झाला.😂😂😂
@satishjadhav5757
@satishjadhav5757 3 жыл бұрын
😀😀😀😀😀😅
@akshaydhar-pawarpatilbelga8839
@akshaydhar-pawarpatilbelga8839 3 жыл бұрын
हरे कृष्ण...🙏🙏🙏 छानचं मी असा व्हिडिओ या आधी कधीच पाहिला नाही...! खुप मेहनत घेतली आहेस तु त्यासाठी खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏 पन बकासुराचा प्रदेश हा पश्चिम बंगाल या ठिकानी एकचक्र नामक गाव आहे तिथे होते....! जी कथा आहे ती एकचक्र या गावची आहे भीम आणि बकासुराची त्याला त्या ठिकानी शास्त्रीय आणि ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत...!
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 жыл бұрын
Thank you☺️💐
@SNEHA-fg7mz
@SNEHA-fg7mz 3 жыл бұрын
Bhari vatla bgun😀
@dinkardimble666
@dinkardimble666 2 жыл бұрын
Nice & challenging effort , best for invention Thanks a lot
@sharadjadhav7397
@sharadjadhav7397 3 жыл бұрын
मित्रा सदर लेणी बौद्ध लेणी आहेत
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 3 жыл бұрын
🌟भारतातील सर्व प्राचीन स्थळे बुध्दस्थळे आहेत कारण भारत बुध्दमय होता ! काल्पनिक कथा भारताचा ईतिहास नाही ! जयभिम ! जयशिवराय !! 🇮🇳✊
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 24 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 21 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 24 МЛН