Рет қаралды 117,306
सुशांत फडणीस
कोल्हापूरमध्ये लहानाचं मोठं झालेल्या सुशांत यांना लहानपणापासूनच ‘धंद्याचं’ बाळकडू मिळालं. बारावी झाल्यावर शिक्षणाला चक्क रामराम ठोकून सुशांत यांनी स्वतःचा व्यवसाय करायचा धाडसी निर्णय घेतला. सुशांत यांनी अतिशय कमी वयात भाज्या व फळांच्या निर्यातीच्या व्यवसायात उडी घेतली. धंद्यातील तोटे, फसवणूक, मालाची नासाडी इ. अनेक अडचणींवर मात करून सुशांत फडणीस यांनी आज भाज्या व फळे निर्यात बाजारात स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. सुशांत यांच्या कंपनीतर्फे निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्या व फळे आज अफगाणिस्तान, मध्य आशिया, पूर्व आशिया, युरोप तसेच कॅनडा इ. देशांतील बाजारपेठांमध्ये जात असल्यामुळे आपल्या देशातील स्थानिक शेतकरी व बागायतदारांना चांगला भाव मिळत आहे. आज कोट्यावधी रुपयांची उद्योगाची उलाढाल करणारे सुशांत महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना त्यांच्या यशाचा मंत्र देत आहेत.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#marathiinspiration #passion #स्वयंटॉक्स