Рет қаралды 134,301
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत कराळे मास्तरांचं खणखणीत भाषण झालं. कराळे मास्तरांनी यावेळी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सणसणीत टीका केली. मोदी सरकारच्या कारभारावर व धोरणांवर कराळे मास्तरांनी आकेडवारीसह हल्ला चढवला. कोणीतरी व्यवस्थेच्या विरोधात बोलावं लागेलच नाही. थिजून मरण्यापेक्षा बंड करून मरणं चांगलं, असंही कराळे मास्तर यावेळी म्हणाले. गद्दारांना मतं देणार की निष्ठावंतांना, असा प्रश्नही कराळे मास्तरांनी जाहीर सभेत केला. नरेंद्र मोदींवर मी चार पुस्तकं लिहू शकतो, इतका त्यांनी देशाचा सत्यानाश केला आहे, असा आरोप कराळे मास्तरांनी केला.
#Karalemaster #Dindori #LoksabhaElection2024 #NarendraModi #BhaskarBhagare #HTMarathi #Shorts
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our KZfaq Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindustantimes.com