इंजिनिअर ते कोकण समजावणारा Konkani Ranmanus | गोष्ट असामान्यांची भाग ५७ | Prasad Gawade

  Рет қаралды 427,107

Loksatta

Loksatta

9 ай бұрын

Konkani Ranmanus: सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेने (Prasad Gawade) आज कोकणी रानमाणूस (Konkani Ranmanus) म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील पर्यटन, इथली खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहिती प्रसाद आपल्या कोकणी रानमाणूस (Konkani Ranmanus Video) या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून या इंजिनिअर तरुणाने इको टूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराची वाट धरली. कोकणाच्या शाश्वत विकासाबद्दल बोलताना प्रसाद तितक्याच परखडपणे स्थानिक प्रश्नही सर्वांसमोर मांडतो. म्हणूनच तो असामान्य ठरतो. चला, तर जाणून घेऊया त्याचा हा प्रवास...
#kokan #kokniranmanus #prasadgawde #sawantawadi #kokannature #kokanfood #kokanrecipes #kokanrailways #kokani_jivan #lifestyle #kokan_diary #maharashtranews #maharashtra #india
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 774
@SK-of8fm
@SK-of8fm 9 ай бұрын
कोकणच्या नावाखाली काहीही पांचट गोष्टी आणि स्वतःचा मोठेपणा दाखवणाऱ्या लोकांपेक्षा प्रसाद ची मुलाखत घेतलीत हे चांगलं केलं.
@netradesai1533
@netradesai1533 9 ай бұрын
हो ना खुप आहेत, त्यामध्ये काही जणी आता राजकीय लोकाचा वापर करून पैसा मिळवण्याचे काम करतात,
@sunilmalivlog
@sunilmalivlog 9 ай бұрын
barobar
@SK-of8fm
@SK-of8fm 9 ай бұрын
@@sunilmalivlog तुमच्याही व्हिडिओ चांगल्या असतात. प्रसाद, लक्ष्मीकांत आणि तुम्ही नेहमी स्थानिकांना पुढे आणण्यासाठी मदत करता.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 9 ай бұрын
@@SK-of8fm 🙏🙏🙏🙏🙏🙏
@swissgear8103
@swissgear8103 9 ай бұрын
हो ना.. नाही तर एक ती आहे चेटकीण... कोकण विनाशकारी गर्ल 😄😄
@shamikarane1957
@shamikarane1957 9 ай бұрын
हा तर कोकणच्या निसर्गाचा राजा. सलाम हया राजाला. कोकणातील लाल मातीचा विस्तृत अभ्यासक.
@arvindkolap
@arvindkolap 8 ай бұрын
रानमाणूस हा तर खरा निसर्ग राजा.* प्रसाद गावडे *
@user-wo3jy7cp5m
@user-wo3jy7cp5m Ай бұрын
संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ❤
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 9 ай бұрын
जबरदस्त माणूस, असाही वेगळा विचार करणारी माणसं ह्या देशात आहेत. म्हणून हा देश अजून टिकून आहे
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif 7 ай бұрын
Nope... Nepali कोकणी मुळे हा देश जिवंत आहे 😂😂
@varshag.8398
@varshag.8398 6 ай бұрын
असे शंभर प्रसाद जरी आपल्यातून तयार झाले तर कोकणचा निसर्ग आणि माणसं हे कुठलाही नतद्रष्ट राजकीय पक्ष नष्ट करण्याची हिंमत करू शकणार नाही.प्रसादजी, तुमचे आईवडील खरोखरच पुण्यवान आहेत की त्यांना तुमच्यासारखा एक संवेदनाशील ,विचारी आणि कार्यशील मुलगा आहे.तुम्हाला खूप शुभेच्छा ..
@arunbirje9649
@arunbirje9649 8 ай бұрын
Prasad is an icon for nature lovers in Konkan. His vision is clear to develop the Kokan. 👍👏🙏💐🇮🇳
@udaychavan3245
@udaychavan3245 9 ай бұрын
अजून मुलाखत घ्या खूप बुद्धिमान व्यक्तिमत्व यांच्या कार्याला हातभार लावावा सर्वांनी. क्वचितच अशी माणसेनिर्माण होतात
@anilbhaimanse
@anilbhaimanse 9 ай бұрын
कोकण आणि तिथली संस्कृती वाचलीच पाहिजे 😢....कोकण शिवाय आयुष्य नाही... ❤
@dadabhagat4464
@dadabhagat4464 8 ай бұрын
Loksankhya nahi mhnun Loksankhya vadhli ki paryay nhi.. Kon bajerche nahi swatasathich soyi suvifha nisargachi hani hote.. Jashi kokan khali ktun mumbai thane pune parisarachi keli
@shridharkhaire6478
@shridharkhaire6478 8 ай бұрын
वाचाल तर वाचाल 👍👍
@swapnilkhadye5479
@swapnilkhadye5479 9 ай бұрын
लोकसत्ता चे खूप आभार प्रसाद चा इंटरव्हिव्ह घेतला म्हणून 🤘👍
@mpungaliya
@mpungaliya 9 ай бұрын
प्रसाद तुम्ही खूपच चांगले कार्य करीत आहात. तुमच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांमुळेच कोकणचे सौंदर्य टिकून आहे. तुमच्या कार्यास शुभेच्छा.
@SSZ12
@SSZ12 9 ай бұрын
लोकसत्ताचे आभार. त्यांनी एका योग्य व्यक्तीची मुलाखत घेतली. प्रसाद दादा तुझा अभ्यास खूप चांगला आहे. आणि तुझी तळमळ कळते आहे. त्यासाठी तू घेत असलेले कष्ट समजत आहेत. ह्या तुझ्या प्रवासात तुला नक्की यश मिळेल.
@kavyagandhaforyou
@kavyagandhaforyou 9 ай бұрын
प्रसाद हे कोकण विकासाचे चे रोल मॉडेल आहेत.
@netradesai1533
@netradesai1533 9 ай бұрын
हो नक्कीच
@swarajphanse33
@swarajphanse33 9 ай бұрын
100%
@vinayakvlogs4296
@vinayakvlogs4296 9 ай бұрын
अभिमानास्पद... कोकणी रानमाणूस ❤❤🎉प्रसाद गावडे... कोकणचा राजा कोकणी रानमाणूस
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 9 ай бұрын
प्रसाद कोकण संभाळणारा राजा माणूस आहे.भौतिक निसर्गात रमणारा रानमाणूस आहे.यालाच सुखी जीवनशैली म्हणतात.
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 6 ай бұрын
खूप सुंदर चिंतन, सत्य परिस्थिती विषद झाली आहे. कोकण वाचविणे प्रत्येकाच्या हातात आहे..❤
@shrinivaswarkhandkar6810
@shrinivaswarkhandkar6810 9 ай бұрын
प्रत्येक माणसाने बघायलाच हवी अशी मुलाखत . किती पोटतिडीकीने काम करतोयस प्रसाद . .. यशस्वी होशीलच.. कोकणचा california नको होऊ दे. याच सदिच्छा
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 9 ай бұрын
प्रसाद च्या या कार्याला सर्व कोकणवासीयांनी राजकारण,जातपात,पक्ष सर्वांपलीकडे जाऊन एकत्र येऊन मनापासून प्रामाणिक पाठींबा द्यावा व कोकणचा होणार विनाश थांबवावा,कोकण हा स्वर्ग आहे.भाव तुला निरोगी आयुष्य लाभो व तुझे कार्य सफल होवो .... होय महाराजा ... सागल्या कोकणी माणसांक सुबुद्धी दे महाराजा..... होय महाराजा.... विकासाच्या नावाचं आलेला भूत पलून जाऊ दे रे महाराजा .... होय महाराजा ...... प्रसाद दादाक मोठा आयुष्य दे रे महाराजा ..... होय महाराजा ....
@shekharohol
@shekharohol 9 ай бұрын
ही अशी माणसे खरतर राजकारणात आणि पर्यटन महामंडळाच्या प्रमुखपदी हवेत.
@nayanawairkar1896
@nayanawairkar1896 2 ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग आमचं कोकण असं आपण जेव्हा म्हणतो तो आपलेपणा फक्त त्या माती बद्दल आपलं असणारं प्रेम आपल्याला देत असतो आणि प्रसाद जेव्हा बोलतो तेव्हा त्याचं कोकणा बद्दल असलेलं प्रेम आणि आपलेपणा झळकत असतो त्यातूनच कोकणचं आपण काही देणं लागतो या जबाबदारीची जाणीव आहे आणि म्हणून प्रसाद पोटतिडकीने आणि वास्तवाचं भान ठेवून तसेच अभ्यासपूर्वक बोलतो , त्याचा प्रामाणिकपणा हीच त्याची संपत्ती आहे आजच्या या स्वार्थी जगात प्रसाद ज्या इमाने इतबारे त्याचं कार्य करण्यासाठी धडपडत आहे ती खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे 🙏
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 9 ай бұрын
राजकारणी लोकांना फक्त स्वतःची प्रगती करायची असते. पण कोकण आहे तसंच रहायला हवं. सुंदर निसर्ग.
@vinitvichare
@vinitvichare 9 ай бұрын
Thank you Loksatta for hosting such valuable conversations. Konkani Ranmanus is doing amazing work to conserve sustainable livelihoods and lifestyle. We should all support them by all means.
@sulochanabhave6356
@sulochanabhave6356 9 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. डोळे उघडायला लावणारी कोकणाबद्दल माहिती
@anirudhakamble6171
@anirudhakamble6171 9 ай бұрын
खूप छान मुलाखत होती, खूप अभ्यास आहे कोकणाबद्दल, एखाद्या पुढारी सुधा एवढं सविस्तर मांडू शकत नाही. अस प्रसाद दादा ने मांडल आहे. ही कोकणा बद्दल ची तळमळ बघून खूप छान वाटलं. आताच्या पिढीला कळलं पाहिजे. कोकण म्हणजे खर खुर स्वर्ग आहे. आणि ते आताच्या पिढीला जिवंत ठेवावं लागेल. असे प्रसाद कोकणात घरो घरी व्हावे. धन्यवाद लोकसत्ता खूप छान विषय घेऊन तुम्ही मुलाखत घेतली आणि सविस्तर सर्व प्रश्नांची छान उत्तरं प्रसाद दादा कधून मिळाली. पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा.
@ashitoshangre3639
@ashitoshangre3639 5 ай бұрын
कुठे तरी हे माझ्या मनात होत, पण ते स्वीकार करायची हिम्मत होत नव्हती, खुप खुप धन्यवाद दादा पुन्हा एकदा डोळे उघडण्यासाठी.
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 9 ай бұрын
प्रसादने मराठवाडाचा अभ्यास बरोबर केला प्रसाद तु एक देवदुतच आहेस विकास म्हणजे नाशाला कारणीभूत होवू नये रोकढोक बोलतोस व 100%खरे व अभ्यासु तुझ्या कामाला सलाम व तुला खुप बळ मिळो
@sandipmadye9832
@sandipmadye9832 Күн бұрын
परशुराम भूमीतील रास्त माणूस! अर्थात रान माणूस !! Hats off to you
@rupesh9004
@rupesh9004 9 ай бұрын
हा आहे खरा कोकणी माणूस. कोकणातील जैवविविधता, परंपरा, संकृति जाणणारा आणि लोकांपर्यंत पोहोचवणारा. नाहीतर so called hearted माणसं आहेत कोकणाच्या नावाखाली स्वतः ची प्रसिद्धि मिळणारी. Great wishes to Prasad Gawade
@user-ud7wc3vf9m
@user-ud7wc3vf9m 9 ай бұрын
👍✅ खरंय , कधी नव्हे ती लोकसत्ताच्याच मुलाखतीत पाहिली १ल्यांदा तिला आणि एवढी चर्चा का म्हणून सहज म्हणून नजर टाकली चॅनेलवर , तर समजेना मला कोकण हार्टेड म्हणून नक्की असं करते काय ?? रुबाब तर काय फार मोठी हिरॉईन असल्यासारखा , लोकसत्ताने म्हणून प्रसाददादांसारख्याना पोटतिडकीने काम करणाऱ्यांना पुढे आणायला हवं खरंतर !
@user-ud7wc3vf9m
@user-ud7wc3vf9m 9 ай бұрын
प्रसाददादांचा No. आहे का कोणाकडे,pl. ?
@pritampatil7471
@pritampatil7471 28 күн бұрын
तुम्ही कोकण आणि कोकणी माणूस या करीता करीत असलेले काम असामान्य आहे. कोकण चा विनाशकारी विकास होतोय तो नक्कीच थांबवल पाहिजे.नाहीतर धर्तीवर असलेल हे कोकण नावाचा स्वर्ग विनाश पावेल. मला ह्या कोकण चा विनाश थांबण्यासाठी काम करायला आवडेल. सुंदर विचार सुंदर आचार आणि ध्येय याला माझा सलाम
@jyotinaik9454
@jyotinaik9454 2 ай бұрын
किती छान बोलतो रे प्रसाद! खूप खूप माहिती त्याच्याजवळ आहे. चांगली विचारसरणी असलेला हा रानमाणूस.ज्याच्याकडे विचार व्यक्त करण्याची प्रतिभाशक्ती आहे. .मी पण गोव्यातील एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा गावात लहानाची मोठी झाले.म्हणून प्रसादचे हे गावातील विडिओ बघायला मला खूप खूप आवडतात. प्रसादच्या ह्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ❤
@manaseesarawate5991
@manaseesarawate5991 3 ай бұрын
प्रसाद तू खरा कोकणचा सुपुत्र आहेस. तुझ्या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.
@murlidharshivalkar7596
@murlidharshivalkar7596 9 ай бұрын
प्रसाद गावडे म्हणतो ते अगदी खर आहे त्याच उदाहरण द्यायच झाल तर मी देतो माझ बालपण हे 10 शिक्षण घेण्या पर्यत गेल ते पण मातिच्या भितीच्या घरात ना फॅन ना कुलर,मुख्यहणजे लाईटच नव्हती राॅकेलचा दिवा त्याच्यावर आपला अभ्यास कधीकधी तर मधेच झोप यायची डोळा लागायचा माहीती पण नाही, तो अंथरूण्याच्या अगदी बाजूला पेटतच राहायचा जाग यायची तेव्हा अरे ...बापरे दिवा पेटतच राहीला ,आईने बघीतला तर उद्या ओरडणार हि भितीपण वाटायची कारण त्यावेळी राॅकेल हे रेशनिंगवर विकत मिळायचे आणण्यासाठी रांग लाऊन मिळायचे संपले तर बाजूच्या काकुकडून घ्यावे लागायचे,म्हणून ओरडण्याची भिती,पंरतु आज त्याच मातीच्या घरावर सिंमेटच सॅबल घर बांधल ओ पंरतू पंखा नाही तर झोप नाही ओ ,आणि त्या जून्याघरात अभ्यास करता,करता झोप यायची,नापंखा,ना लाईट,तेव्हा मित्रानू जूनी मातिची घरच सूंदर व आनंद मिळणारी हे खर,आज प्रत्येक रूम, ओराडा,हाॅल,किचन मधे पंख्याची गरज वाढली व खर्च हि वाढला लाईट बील रु. 1000/1500 तो वेगळा.....तेव्हा मित्रानू कोकणची जुनी पंरपरा जपा व कोकण कोकणच राहूदे,कॅलिफोर्निया नको प्रदुशणाचा भस्मासुर नको..... येवढच सांगतो .....हा माझा स्वताचा अनुभव....येवढच ..😢
@santoshghare9171
@santoshghare9171 4 ай бұрын
Japun theva kokan
@dineshgawde2191
@dineshgawde2191 9 ай бұрын
प्रसाद तू जे समाजकार्य हाती घेतले आहेस त्याला माझा आणि सर्व कोकणी माणसांचा पूर्ण पाठींबा आहे आणि तुझया ह्या कार्याला सलाम.💐💐👍
@ravichakatta
@ravichakatta 8 ай бұрын
विचारांपलीकडचा प्रसाद.... प्रसाद मित्रा खूप मस्त काम करतोय.... निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आणि तो निसर्ग जपणारा राणमाणुस.... 👍💐
@babasahebkunjire2509
@babasahebkunjire2509 8 ай бұрын
खरंच स्वर्ग कुठे असेल तर कोकणात, कोकणी माणूस अत्यंत प्रामाणिक,जे असेल त्यात समाधान मानणारा. कोणाच्या काडीला ही हात लावणार. काटकसरी असेल परंतु कंजूस नाही. स्वतःच्या ताटातील अर्धी भाकरी देऊन मित्रांचे स्वागत मनापासून करणार. वीज मंडळातील नोकरी निमित्ताने 20 वर्षापेक्षा ज्यादा कालावधी कोकणामध्ये राहता आले हेच माझे भाग्य
@offbeatcricket7768
@offbeatcricket7768 2 ай бұрын
खूप छान प्रसाद...माझा जन्म मुंबईचा पण मूळचा मालवणचाच....Keep up your good work
@prachikapse9590
@prachikapse9590 9 ай бұрын
प्रसाद खरोखर भूमिपुत्र आहे. मी खूप पूर्वीपासून रान माणूस चे व्हिडिओ पाहते.मला खूप आवडतात प्रसादचे व्हिडिओ. तो खूप छान लिहितो ,खूप छान बोलतो आणि खूप चांगल्या प्रकारे निसर्ग सर्वांना दाखवतो. आणि त्याच्या व्हिडिओ मधून खूप knowledge मिळते. Corona च्या काळामध्ये सर्वांना ऑक्सिजनचे महत्व कळले. नैसर्गिक जगणे हेच खरे जगणे आहे. जुन्या काळात तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितले की "वृक्ष वल्ली आंम्हा सोयरी वनचरे ,पक्षी ही सुस्वरे आळविती"!
@janardanjk26
@janardanjk26 6 ай бұрын
100 तोफांची सलामी रान माणूस ला
@santoshsalunkhe6692
@santoshsalunkhe6692 4 ай бұрын
❤❤❤ सत्यम् शिवम् सुंदरम् असा कोकणी रान माणूस ❤❤❤
@anantbairagi2209
@anantbairagi2209 9 ай бұрын
प्रथम तुज वंदितो ...,, प्रसाद बरयाच दिवसांनी आज उ.टुब वर खरा हिरा दिसला...लोकसभेला धन्यवाद.... उच्च शिक्षित असुनही...धरतिशि...व... निसर्गाशि... मुळाशी... जुळलेल्या... निसर्ग मित्रा तुला या कामासाठी भरपूर आयुष्य...व...बळ मिळो ही एका म्हाताऱ्या ची सदिच्छा,......
@5D_is_Reality
@5D_is_Reality 9 ай бұрын
रिफायनरी नको, फक्त रस्ते चांगले करा. कोकणात काय शहरात सुद्धा तितका विकास पुरेसा आहे.
@seeunique.5293
@seeunique.5293 9 ай бұрын
खूप चांगले काम करत आहेस प्रसाद.अशीच चळवळ जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू झाली पाहिजे, तरच भौतिक सुखाच्या मागे धावून निसर्गाला ओरबाडणाऱ्या माणसाला आपले खरे सुख कशात आहे ते समजेल आणि निसर्गाचा समतोल साधला जाईल. खूप प्रेम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤👍👏👏
@sarojsawant7823
@sarojsawant7823 9 ай бұрын
खूप कौतुकास्पद, अभिमानास्पद काम आहे तुझं प्रसाद.... समाधानी आणि साध्या सरळ निरोगी आयुष्याच्या जीवनशैलीचे महत्त्व शहरी लोकांना अजूनही पटत नाही रे....त्याचाच खेद वाटतो....आणि ही साधी समाधानी राहणीच शाश्वत जीवन जगण्याचे मूळ आहे...
@sindhudurg11
@sindhudurg11 9 ай бұрын
कोंकणी सम्राट ❤️❤️
@kalpeshradye8139
@kalpeshradye8139 9 ай бұрын
खरा कोकणी माणूस 👍 यौग्य माणसाची मुलाखत खूप छान..💐💐💐
@user-kx1uw4yt9k
@user-kx1uw4yt9k 9 ай бұрын
कोंकण आणि कोंकणी माणूस आणि कोकणची संस्कृती या बद्दल खूप माहिती पुरवतो खूप छान तुझ्या वाटचालीत यश लाभो गाव सोडून गेलेली माणसं पून्हा आकर्षित होतील
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 9 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला 🎉, तुमच्या चळवळीला बळ, पाठिंबा, प्रोचहान मिळो हीच सदिच्ा, कौतुक आहे तुमचं, आपल्या अभ्यासाचे !
@iconghe2318
@iconghe2318 9 ай бұрын
100 % agree mitra , फक्त राजकारणी प्रवृत्तीच्या मानसिकतेला जवळ करू नका अन्यथा कोकणाची विल्हेवाट लागायला वेळ लागणार नाही .
@devidaskatkar715
@devidaskatkar715 2 ай бұрын
लोकसता चे आभार, आणि प्रसाद ला सलाम
@mukundiauti8261
@mukundiauti8261 2 ай бұрын
भाऊ आपल्या कार्याला 🎉मनापासून आभार
@Sujata-es4gu
@Sujata-es4gu 6 ай бұрын
कोकणचा खरा राखणदार म्हणाव लागेल तुम्हाला👌👌🙏
@kokan_premi_nishant
@kokan_premi_nishant 6 ай бұрын
आपली संस्कृती आणि आपलं कोकण आपणच जपून ठेवलं पाहिजे.. परप्रांतीय लोकांना जागा जमिनी विकण्या पासून लोकांना सावधान केले पाहिजे. आजूनही आपली कोकणी लोक झोपेत आहेत. त्यांना झोपेतून उठवण्याची फार गरज आहे... 🙏🙏🌳🌳🌍🌍🌴🌴❤️
@sunilpande9324
@sunilpande9324 9 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत. कोकणातील स्थानिक माणूस मोठा झाला पाहिजे
@neetanikam2336
@neetanikam2336 8 ай бұрын
तुकाराम मुंडे आणि प्रसाद गावडे ❤❤❤❤
@anilgoriwale1608
@anilgoriwale1608 6 ай бұрын
सुरेख मित्रा प्रसाद... प्रतिभावान नवनवीन कल्पनांबरोबव कोकण वाचवण्याच्या तुझ्या प्रयत्नांना खूप खुप शुभेच्छा! येवा कोकणं आपलाच आसा....
@pradippatil8475
@pradippatil8475 3 ай бұрын
मुलाखत कधीच संपू नये असे वाटते, vedio मध्ये GP किंवा Phone pay नंबर देत जावा दानशूर लोक तुमच्या कार्याला स्वच्छेने मदत देतील आणि तुमच्या सुशेगात जगण्याच्या कार्याला व पुढच्या पुढीच्या संवर्धनासाठी मदत करतील... खुप प्रेम कोल्हापूर वरून..❤
@aparnakambli1690
@aparnakambli1690 9 ай бұрын
प्रसाद खूप चांगलं काम करत आहे आम्ही सर्व तूझ्या पाठीशी आहोत
@vilasgavade8536
@vilasgavade8536 9 ай бұрын
प्रसाद गावडे खूप सुंदर काम करत आहेस. तुझ्या माध्यमातून कोकण व कोकणी संस्कृतीवर प्रेम करणारी माणसे अजूनही दिसून येतात ही खरोखरच अभिमानास्पद आहे. उच्चशिक्षित तरुण आज आपले करियर बाजूला ठेऊन कोकणावर मनापासून प्रेम करत आहे हे पाहून समाधान वाटले. तुझ्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच करारीपणा दिसून येतो तो करारीपणा कोकणच्या मातीतला असल्याने एक वेगळाच गोडवा त्यामधे आहे. महत्वाचे म्हणजे कमी वयात कोकणची एवढी सुंदर माहिती तुझ्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचते हे एक मोलाचे कार्य म्हणावे लागेल. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@surajchaure1920
@surajchaure1920 8 ай бұрын
प्रसाद दादा तुम्ही लाखात एक आहात तुमचे विचार महान आणि नैसर्गिक आहेत.... मला अभिमान वाटतो तुमचा की अशी मानस आहेत अजून
@sarangsalvi2879
@sarangsalvi2879 9 ай бұрын
छान पर्यटन कसपाहीजे याचे छान माँडे प्रसाद ने ऊभ केल आहे.
@amarhajgude8844
@amarhajgude8844 3 ай бұрын
I support Konkani Ranmanus Prasad. You are the true real Indian. The real Marathi Manus. Your thoughts must reach to each and every Marathi person znd rest of India. Maharashtra should folliw you. You are Konkani Ratna. You are not only the consciousness of Konkan, you are the Chetana of Earth's Nature. Nature has chosen you... I support every person like you.
@jyotichiplunkar2654
@jyotichiplunkar2654 Ай бұрын
खरच प्रसाद आता आनंद शांतता आणि समाधान मिळण्यासाठी अश्या नैसर्गिक ठिकाणी येऊन सात आठ दिवस रहायला आवडेल. कस आणि कुठे यायच मड हाऊस मध्ये पण रहायला मिळाले तर उत्तमच ❤❤🎉🎉
@vinodjade5268
@vinodjade5268 6 ай бұрын
Environment Is Our Breath And We Can't Pollute This. Prasad Is The Real Icon.
@rohineematange2446
@rohineematange2446 9 ай бұрын
विचार असाच आहे माझा गरजा जवळच्याच जीवनशैलीत आहे त्यात विकास म्हणजे काय याचे उत्तर मिळते ते म्हणजे जीवन आनंद देणारी संस्कृती । नकोत रिसीर्ट्स । कौलारू घर लाल माती। केलेस का तू कोठे असे घरगुती राहण्याच्या सोयी जिथे तेथील परिवारात आपले म्हणतील आम्हाला
@prathameshpanchal4071
@prathameshpanchal4071 9 ай бұрын
ही मुलाखत म्हणजे कोकण संस्कृती ,निसर्गावर प्रेम ।प्रसाद दादा ❤
@dhananjaysagavekar2525
@dhananjaysagavekar2525 9 ай бұрын
आपण जगाच्या दृष्टीने वेडी माणसेच आहोत ‌खुपछानमुलाखातवाटली‌धंन्यवाद..‌
@satishlonkar6825
@satishlonkar6825 9 ай бұрын
वाह वा रे बहादर फारच छान एकच नंबर.आणी लोकसत्ता चे सुद्धा फार आभार तरुणांना ऊध्योगी बनवणार .
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 9 ай бұрын
कोकण ची शान आमचा प्रसाद भाऊ पण एक आहे पॉलिटिक्स लोकांच्या हिट लिस्टवर नाव आहे तळ कोकणात मोठ्या प्रमाणावर मायनिंग प्रकल्प चालू आहेत अजून आणायचे आहेत त्यामुळे
@umabagulbagul1416
@umabagulbagul1416 3 ай бұрын
सलाम प्रसाद तुझ्या विचारसरणीला आणि कार्याला.👍🙏
@jyotikadam1499
@jyotikadam1499 9 ай бұрын
मुलाखत खुप छान आहे चांगले vision घेऊन काम करत आहेत असेच vision राहू दे Wish you all the best
@user-jd9ui8hl9q
@user-jd9ui8hl9q 9 ай бұрын
खरं कोकण तर तु जगत आहेस मित्रा . तुझ्यासारखी अनेक माणसे या कोकणात तयार व्हायला पाहिजेत.हि ईश्वर चरणी प्रार्थना . .तरच हे कोकण टिकून राहिल ....मोकळा श्वास घेता येईल ....
@chandrakantmungekar4263
@chandrakantmungekar4263 9 ай бұрын
प्रसादचे चनेल प्रथम पासून पाहतो. बहुतेक युट्यूबवर प्रथम प्रसादचेच हिडीयो पहायला सुरुवात केली. .प्रत्येक व्हिडीयोत कोकणप्रेम ओतप्रोत दिसून येते. निसर्गाच्या ऱ्हासाबद्दल पेटतिडकीने आणि भरभरून बोलतो.
@Siddharkolge007
@Siddharkolge007 8 ай бұрын
दादा बिनदास बोलणं हे प्रत्येकाला जमत नाही,त्याला हिंमत लागते आणि ते तू बोलतोस त्याबद्दल सलाम तुला🫡🫡...
@dilipbaraskar842
@dilipbaraskar842 9 ай бұрын
स्थानिक समस्यांचे फारच सुंदर विश्लेषण केले आहे आणि त्यावर उपयुक्त उपाय ही सुचवले आहेत
@shekharmarathe1
@shekharmarathe1 2 ай бұрын
छान मुलाखत, योग्य प्रश्नोत्तरे
@aniketkeni1477
@aniketkeni1477 3 ай бұрын
या रानमाणसाचं नेहमीच पटतं..! गेले ४ वर्षं फॉलो करतोय. ही मुलाखत सुद्धा कडकडीत झाली.. अजून अनेक मुद्दे आहेत. Mangroves, Sahyadri, Resorts, Hillside, Riverside, Ecological Intelligence हे सगळंच मस्त बोललाय प्रसाद..! 👍🏼❤️🔥
@mukesh.bhujbal121
@mukesh.bhujbal121 2 ай бұрын
माझ स्वप्न तू पूर्ण करतोय याचा खूप आनंद होत आहे. ही संपूर्ण मूळ विचारधारा माझीच आहे फक्त मी कोकणाचा नाही एका लहानशा गावातील होतो. जो City मध्ये येवून बसलो. पण माझे बालपण आणि माझ्या मनातील विचारातील एक शब्द ना शब्द तू बोललास प्रसाद thanks to representing me...!! ❤
@suchitabhogle8607
@suchitabhogle8607 9 ай бұрын
लोकसत्ता पेपर ने प्रसाद ची मुलाखत घेतली ती त्याने सुंदर पणे छान मांडली.त्याचे मनपुर्वक धन्यवाद.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 6 ай бұрын
प्रसाद खूपच तळमळीने कोकणची माहिती सांगतोस..तुझे म्हणणे पटते..खरा रानमाणूस आहे तू..मुलाखत फार छानच आहे..धन्यवाद..👌👌👏😇
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 8 ай бұрын
ह्या भावाने (कोकणी रान माणूस) ह्याने जस कोकण explore केले आहे ते एक नंबर.
@anilgurav5684
@anilgurav5684 3 сағат бұрын
Gretesttttttt bhavaaaaaa Jay Maharashtra ❤
@darshanjoshi9031
@darshanjoshi9031 6 ай бұрын
One of the best interviews taken by loksatta
@rakeshbari5404
@rakeshbari5404 2 ай бұрын
छान सूंदर तुझा खूप अभ्यास आहे... . लहान पणापासून स्वतः सगळं अनुभवलं आहे.तुझ्या कार्याला... उपक्रमाला श्री गणपती bapp😂चा आशीर्वाद सदैव राहो... हि प्रार्थना🙏 जय कोकण,जय महाराष्ट्र, जय हिंद 🚩
@ujwalakamble4371
@ujwalakamble4371 3 ай бұрын
हा मुलगा प्रचंड अभ्यासु, प्रामाणिक आणि कोकणातील विहीरीच्या पाण्यासारखे नितळ आहे, फार अभ्यास केलाय याने इको सिस्टीम आणि कोकणी जगणे याचा. कमाल आहे.
@rajaniparab2188
@rajaniparab2188 2 ай бұрын
लोकसत्ता चे आभार वेल डण प्रसाद
@sharadnarkar6514
@sharadnarkar6514 9 ай бұрын
Prasad, you are simply great!
@atulmore5166
@atulmore5166 8 ай бұрын
रानमाणूस = कामाचा माणूस,👍👍
@aniketmore9456
@aniketmore9456 8 ай бұрын
Real hero kokni ranmanus
@nitinparkar2761
@nitinparkar2761 2 ай бұрын
Great Man, We proud of him.
@rushikeshpatil6417
@rushikeshpatil6417 9 ай бұрын
Prasad You are the real gem of Kokan! 🙌 More power to you bhava!!
@chetandesale5407
@chetandesale5407 9 ай бұрын
लोकसत्ता हा मोठा ग्रुप आहे म्हणे... प्रसाद च काम किती मोठ आहे....but तुम्ही किती साधा setup उभा केला आहे, दोन खुर्च्या लाऊन कार्यक्रम सुरू केला दिसतोय.... ह्याच जागी कोण सेलिब्रिटी राहिला असता तर अख्खी टीम आणि सेटअप कसा लावला असता..... सगळ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
@rohidaskandalgaonkar7197
@rohidaskandalgaonkar7197 9 ай бұрын
खुप छान जबरदस्त मानल तुला प्रसाद
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 9 ай бұрын
आपल्या निसर्ग रम्य कोकणातील एक चांगला माणूस रानमाणूस
@kokan_premi_nishant
@kokan_premi_nishant 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललास प्रसाद दादा. माझे ही विचार अगदी तुझ्यासारखेच आहेत.. मी ही एक कोकण प्रेमी आहे.. ❤️❤️😍🌳🌳🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🌳🌳🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 9 ай бұрын
अप्रतिम, प्रसाद फार मोठे काम करतो आहे त्याला मनापासून शुभेच्छा
@seematapkir356
@seematapkir356 7 ай бұрын
प्रसाद दादा तुमचे विचार खूप छान आहेत मनाला समाधान वाटलं कोकणाबद्दल ची माया आपुलकी पाहून कोकणाबद्दल एवढं प्रेम खरे कोकणी माणूस आहात सलाम तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@Kalimaiinavlogs
@Kalimaiinavlogs 9 ай бұрын
कोकण नांव ऐकलं तरी खुप आनंद होतो खुप सुंदर आहे स्वर्ग आहे खुप आनंदी मानसं आहे सुखी मानसं आहे
@ashokkamble6735
@ashokkamble6735 2 ай бұрын
प्रसाद आपली मुलाखत घेणारी मुलगी, हि कोकणातील आहे.तिला कोकणातील गावची कती ओढ आहे. तु अतिशय सुंदर कोकणातील तु खरोखर राणमाणुस आहेस.
@user-ws1bg4np6k
@user-ws1bg4np6k 9 ай бұрын
Nice sir
@pradeepartskolhapur4017
@pradeepartskolhapur4017 9 ай бұрын
हीच खरी पत्रकारिता आहे.
@kisanburte6764
@kisanburte6764 8 ай бұрын
कोकणातील एक अनमोल व्यक्तीमत्व प्रसाद दादा ❤
@sachinwalunj2864
@sachinwalunj2864 8 ай бұрын
Thanks Loksatta for this special video of Kokani Ranmanus.❤ Everyone should understand sustainable living for the happiness of our society.Hope this day will come soon 😌
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 20 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 50 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 115 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 20 МЛН