Рет қаралды 1,316,584
चिडून काम करता तेव्हा सगळं काम सोपं होतं, असं म्हणणाऱ्या धनंजय दातार यांची आजपर्यंत कधीही न उजेडात आलेली बाजू ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी त्यांच्या मुलाखतीद्वारे लोकांसमोर आणली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेला, अमरावतीतील एका गावातील तरुण दुबईला जातो; तिथे मसालाकिंग म्हणून लौकीक मिळेपर्यंत झेप घेतो. धनंजय दातार यांचा हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे. दातार यांची ही मुलाखत उद्योग करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरणारी अशी आहे.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.