No video

आंबा लागवड किती अंतराने करावी ? भाग - १ (पारंपारिक लागवड - अंतर- फायदे व तोटे )

  Рет қаралды 13,021

Rahul Khairmode Vlogs

Rahul Khairmode Vlogs

4 жыл бұрын

श्री.सचिन सावंत साहेबांची आदर्श पारंपारिक लागवड .
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
आंबा लागवड समस्या व उपाय
🥭 संपूर्ण माहीती लेख : ९ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
Rahul Khairmode Vlogs
KZfaq channel ची लिंक
/ @rahulkhairmodevlogs2604
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
आपल्या लोकप्रिय
चॅनेलला Subscribe करा
आजचा विषय
आंबा लागवड नेमकी
किती अंतराने करावी ?
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
आंबा लागवड प्रकार
🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहा.🔹
🔸🔸🔹🔹🥭🔸🔸🔹🔹
आंबा लागवड करत असताना प्रत्येक आंबा उत्पादक बांधवाच्या मनामध्ये आपण किती अंतराने लागवड करावी ? हा प्रश्न नक्की असतोच .
यासाठी आंबा लागवडीचे प्रकार समजून घेणे खुप गरजेचे आहे .
आंबा लागवडीचे प्रमुख प्रकार
१) पारंपरिक लागवड :
कृषी विद्यापीठानी शिफारस केलेली ही जुनी पध्दती आहे. यामध्ये
१० मी × १० मी म्हणजेच
33 × 33 फुट अंतराने लागवड केली जाते . या पद्धतीला वर्गीय पध्दत या नावाने देखील ओळखले जाते. दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर मुख्यत्वे ३३ फुट इतके असते .या प्रकारच्या लागवडी प्रामुख्याने कोकण विभागात केलेल्या पहावयास मिळतात म्हणून याला कोकणी पध्दतीची लागवड असेही संबोधले जाते . आंबा हा वृक्ष प्रकारा मध्ये मोडत असल्याने त्यांची उंची, वय व विस्तार याचा विचार करुन डोंगरमाळ, चढ उताराची जमीन , मुरमाड किंवा जांभ्याच्या कातळाच्या पडीक जमीनीत अशा लागवडी केल्या जातात .
*फायदे -* क्षेत्र जरी तुलनेने जास्त लागत असले तरी पूर्ण वाढ झालेल्या झाडांपासून उत्पादन देखील जास्त येते .
*तोटे -* अती उंच झाडावरील फळे काढणे व इतर व्यवस्थापन करणे यात खुप अडचणी येतात .
पारंपरिक लागवडी बाबत अधिक सखोल माहीतीसाठी खालील video नक्की पहा .
लिंक :
आंबा लागवड किती अंतराने करावी ?
पारंपरिक लागवड - ओळख
• आंबा लागवड किती अंतरान...
(भाग क्रमांक ३३)
२) अती सघन लागवड :
🔹 काय असते अती सघन
आंबा लागवड? 🔹
पारंपारिक (३३ फुट × ३३ फुट )
वर्गीय पध्दतीमध्ये आंबा लागवड करण्यासाठी आवश्यक असणारी जास्त जागा व सदर लागवड केल्याने येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी जागेचा अपव्यय न करता कमीत कमी जागेत देखील जास्तीत जास्त आंबा रोपांची लागवड करुन सुनियोजित पध्दतीने उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न घेण्यासाठी केलेली आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन केलेली आंबा रोपांची लागवड म्हणजे सघन लागवड होय .
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
लागवडीतील अंतर :
अती सघन लागवडी मध्ये नेमक्या किती अंतराने रोपे लावावीत? यात विविध मतप्रवाह आढळतात.
जसे की ..
यामध्ये ३ × १० फुट
४ × १० फुट
५ × १२ फुट
६ × १४ फुट
४ × १२ फुट
या व अशा विविध लागवड अंतर पद्धतीचा वापर केला जातो .अंतराबाबत खुप लवचिक आढळते .
प्रजाती निवड :
कमी उंच वाढणाऱ्या व अधिक व नियमित उत्पादन देणाऱ्या आंबा प्रजातींची(वाणांची) लागवड केली जाते .
व्यवस्थापन:
छाटणी , खत , पाणी , फवारणी ,परागीभवन या व इतर महत्वाच्या बाबींवर अधिक लक्ष दिले जाते व हेक्टरी उत्पादन वाढवण्यावर अधिक भर दिला जातो .
फायदे:
सिमांत व कमी क्षेत्र असणाऱ्या बांधवानाही लागवड करता येते .
तोटे:
बागेचे आयुष्यमान व अधिक उत्पादन घेण्यासाठी काही अती रासायनिक व विषयुक्त द्रव्यांचा वापराकडे कल आढळतो .
असे जरी असले तरी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी कालावधीत अधिक नफा मिळवुन व सेंद्रिय शेती पध्दतीचा अवलंब करुन यशस्वी पध्दतीने आंबा शेती केल्याची खुप उदाहरणे आपणास पहावयास मिळतात.
अती सघन लागवडी बाबत अधिक सखोल माहीतीसाठी खालील video नक्की पहा .*
लिंक :
आंबा लागवड किती अंतराने करावी ?
अती सघन लागवड - ओळख
• आंबा लागवड किती अंतरान...
(भाग क्रमांक: ३५ )
• आंबा लागवड किती अंतरान...
(भाग क्रमांक : ३६ )
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
३) सघन लागवड:
पारंपरिक व अती सघन पध्दतीमधील तोटे लक्षात घेता दोन्ही पध्दतीना बगल देत मधील मार्ग म्हणून अलीकडे सघन लागवडी ही होवू लागल्या आहेत .
अंतर निवड
१५ × २० फुट
१५ × १५ फुट
१२ × १५ फुट
या व अशा थोड्या अधिक अंतराना प्राधान्य दिले जाते .
फायदे :
बागेचे आयुष्यमान व उत्पादन वाढवता येते .
तोटे :
फारसे नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील video नक्की पहा .
लिंक :
• आंबा लागवड किती अंतरान...
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
४) ग्रीन हाऊस किंवा पौली हाऊस मधील लागवड
शेती क्षेत्रातील काही अती प्रगत देशात याही प्रकारच्या लागवडी केल्या जातात . अधिक सुनियोजित पध्दतीचा अवलंब या प्रकारच्या लागवडीत केला जातो .
लिंक :
• Video
शक्य असल्यास आपले मित्र, नातेवाईक व नवीन आंबा उत्पादक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
🙏🙏🙏🙏🙏🙏
मार्गदर्शक आणि
आपला शेतकरी बांधव
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री.राहुल खैरमोडे सर
पाटण(सातारा)
Contact No.
8855900300
8888782253(whatsapp)
Email Id:
mrkhairmodesirji@gmail.com
अत्यंत महत्वाचे :
ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
एक Like तो बनती है
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
Plz Like the video
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
/ @rahulkhairmodevlogs2604

Пікірлер: 69
@dgkaulavkar2704
@dgkaulavkar2704 Ай бұрын
Very good
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Ай бұрын
धन्यवाद दादा
@bandubabar8773
@bandubabar8773 3 жыл бұрын
ज्ञानवर्धक माहीती बद्दल आभार.
@user-yz3ju3tu5y
@user-yz3ju3tu5y 4 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 ай бұрын
धन्यवाद दादा
@harshdalvi1234
@harshdalvi1234 2 ай бұрын
सर १५x१५ सुरवातीला रोपांची लागवड करून नंतर झाडांची वाढ झाल्यावर (काही वर्षांनी) त्यातील एक झाड कमी केल तर चालेल का?? म्हणजे सुरवातीला सघन पद्धत आणि नंतर पारंपरिक पद्धत..
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 ай бұрын
मधील झाड तोडु नका . कमी उंचीवर कट करुन त्याचीही फळे घेता येतील .
@harshdalvi1234
@harshdalvi1234 2 ай бұрын
@@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद..🙏🏻
@user-yz3ju3tu5y
@user-yz3ju3tu5y 4 ай бұрын
सर पहिल्या वर्षी किती उत्पन्न निघेल अंदाजे
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 ай бұрын
फोन करा सविस्तर बोलु . 8855900300
@makarandmane2630
@makarandmane2630 Жыл бұрын
खूप छान माहीती दिली
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@vijaykhankal9998
@vijaykhankal9998 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
Thanks Dada
@sayajikulkarni8367
@sayajikulkarni8367 4 жыл бұрын
काही मंडळी रोपे विकूण पैशे मिळवून शेतकरास १०*३ ७*३चेअंतर एवढी रोपे ऐवढी आंबे ईतके टन ईतके पैसे आमिष दाखवून शेतकरी फसवणूक होत असून तुमचा विडिओ शेतकर्‍यांना विचार करायला भाग पाडेल
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
सर्व शेतकरी बांधवानी अभ्यासपूर्ण लागवडी करायला हव्यात ..
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
हो खर आहे .. याबाबत नवीन आंबा उत्पादक बांधवानी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा .
@ganeshkale7698
@ganeshkale7698 Жыл бұрын
सर तुमचे मार्गदशन खुप छान आहे सर
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
धन्यवाद दादा ...
@bajrangchavan2822
@bajrangchavan2822 4 жыл бұрын
फार सुंदर माहिती सर
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
प्राध्यापक साहेब .. खुप खुप धन्यवाद.. आपल्या शुभेच्छा खुप प्रेरणा देतात
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 жыл бұрын
कृपया माहिती देताना फापटपसारा न लावता मुद्देसूद द्यावी.
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
हो दादा .. नक्की प्रयत्न करेन
@prernapawar7778
@prernapawar7778 4 жыл бұрын
very nice sirji super
@hemantnagrale8936
@hemantnagrale8936 2 жыл бұрын
Very nice information
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
Thanks Dada
@user-lv2fo8jr2o
@user-lv2fo8jr2o Жыл бұрын
माझ्यामते पारंपरिक पद्धतीने लागवड योग्य आहे
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
जागा उपलब्ध असेल तर लागवडीची हीच पध्दत उत्तम
@user-lv2fo8jr2o
@user-lv2fo8jr2o Жыл бұрын
अगदी बरोबर
@user-lv2fo8jr2o
@user-lv2fo8jr2o Жыл бұрын
बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की कलमी झाडे जास्त वाढत नाहीत
@user-lv2fo8jr2o
@user-lv2fo8jr2o Жыл бұрын
एका ठिकाणी मी हापूस झाडामधील आंतर मोजले ते पन्नास फुटांपेक्षा जास्त होते,तरीसुध्दा झाडे एकमेकांमध्ये घुसली होती
@eknathtarmale998
@eknathtarmale998 4 жыл бұрын
Very nice information sir 🌹🌹
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
धन्यवाद दादा
@ashoksonwane6679
@ashoksonwane6679 3 жыл бұрын
Bandavar kiti by kiti size lavavi
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
१० किंवा १२ फुट अंतराने
@surekhavanjari8486
@surekhavanjari8486 4 жыл бұрын
Very Nice Rahul from patan
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
Thanks आत्या
@bajiraonikam8216
@bajiraonikam8216 4 жыл бұрын
खैरमोडे. साहेब आपण कोणत्याही. विषयावर जी माहिती सांगतात ती अत्यंत परिणाम. कारक.आसते.साहेब.जर आपण. आपल्या. घरा समोर लावण्या साठी. घरीच.कलमे.आता.आगष्ट महिन्यात. तयार. केली. आहेत. ती.कधी. कायमच्य. जागी लावावीत. ते.. कुरपा करून सांगावे
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
धन्यवाद दादा ... कलमाला फुटवे आले असतील तर आता लावायला हरकत नाही .
@sandeshdhuri6905
@sandeshdhuri6905 3 жыл бұрын
Sir Sindhu sidless amba var video banava
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
नक्की !!!!
@TechWithSaiesh
@TechWithSaiesh 4 жыл бұрын
Very Nice sir
@TechWithSaiesh
@TechWithSaiesh 4 жыл бұрын
Sir pramotion kara majhe
@nitind4402
@nitind4402 2 жыл бұрын
आंब्याचे रोप लावल्यानंतर कीती दिवसात व कोणते खत द्यावे सर, कृपया सांगावे
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
88 55 900 300 send Hi
@nitind4402
@nitind4402 2 жыл бұрын
Ok sir
@vishalahire2251
@vishalahire2251 3 жыл бұрын
सर मी १० बाय १० वर केशर आंबा लागवड केली आहे योग्य आहे का नाही ते सांगा
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
खुप छान
@asmamomin2846
@asmamomin2846 4 жыл бұрын
या व्हीडीओ मध्ये पारंपरिक पद्धतीने केलेले अंबा झाड छाटणी केलेले दिसत आहे संपूर्ण झाडाची छाटणी केल्यानंतर फांदा कीती दीवसानी येतात
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
पालवी वर्षांतुन दोनदा येते oct व mar मध्ये येते
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
छाटणी केलेले झाड पेरु चे आहे . पेरु च्या झाडाची छाटणी पावसाळ्यापूर्वी अशा पध्दतीने केली जाते ..
@jayeshakhade6734
@jayeshakhade6734 3 жыл бұрын
5 Acer made kiti aamba zade lagu shaktil
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
आपण झाडाची लागवड किती अंतराने करणार यावर ही संख्या अवलंबून आहे . पारंपरिक लागवडीत 33×33 कमी बसतात . अती सघन आंबा झाडासाठी खुप चांगला पर्याय नाही . सघन लागवड 15×15 किंवा १२×१५ फुट केल्यास छान व्यवस्थापन करता येते व बागेचे आयुष्य ही चांगले राहते .
@prasadsawant9988
@prasadsawant9988 3 жыл бұрын
@@rahulkhairmodevlogs2604 sir 12× 15 lagwad kelyas kiti zade bstat eka ekar la
@rajeshchotalia5872
@rajeshchotalia5872 4 жыл бұрын
Podhe se podha ki duri kitni rakhni chahiye or bich ki jaga kitna rakhna chahiye
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 4 жыл бұрын
आम कि सघन बागबानी मे दो पौधो के बिच की दुरी कमसे कम १२ फीट और दो लाइन के बीच मे १५ फीट हो तो यह अंतर अच्छा माना जाता है ! High Density mango plantation मे १० साल बाद बहोत परेशानीयोका सामना करना पडता है
@rajeshchotalia5872
@rajeshchotalia5872 4 жыл бұрын
@@rahulkhairmodevlogs2604 👍
@anitachavan5393
@anitachavan5393 Жыл бұрын
सर मी 4बाय 4 अंतर आहे लागवड होईल का
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 Жыл бұрын
सघन अती सघन लागवड करावयाची असल्यास किमान ८ फुट × १२ फुट किंवा ८ फुट × १५ गुट अंतर असावे . दोन ओळीत १२ / १५ फुट अंतर सोडावे . .... आंबा वृक्ष प्रकारात येणारे झाड आहे . खुप अती सघन लागवड टाळावी . ओळीतील रोपात दोन झाडामध्ये ८ फुट सोडा .
@sachinsalunke7536
@sachinsalunke7536 3 жыл бұрын
थोडक्यात पारंपारिक पद्धत की सघन- अतिसघन पध्दत फायदेशीर ठरते
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
सघन लागवड
@sachinsalunke7536
@sachinsalunke7536 3 жыл бұрын
पारंपारिक पद्धतीने आंबा लागवडीत उत्पादन किती वर्षांनी होते
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 3 жыл бұрын
पारंपरिक आंबा लागवडीत झाडातील अंतर ३३×३३ फुट असे असते . असे असले तरी आंबा प्रजातीची लागवड करताना कलम केलेलीच रोपे लावली जातात .त्यामुळे ४ वर्षांपासून फलधारणा सुरु होते . फक्त लागवड अंतरा मध्ये फरक असतो
@dineshkolte5259
@dineshkolte5259 3 жыл бұрын
Very important
@dhegawatrahul
@dhegawatrahul 2 жыл бұрын
भाऊ नंबर दया तुमचा 🙏
@rahulkhairmodevlogs2604
@rahulkhairmodevlogs2604 2 жыл бұрын
8855900300/8888782263
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 65 МЛН