Рет қаралды 58,706
मार्केटिंगच्या कॉपोरेट जगात वावरणाऱ्या आणि वार्षिक २० मिलियन डॉलर्ससारख्या टार्गेटला भिडणाऱ्या सुधीर महाबळांनी आधी लाख्खोंच्या वारीचं ऐश्वर्य अनुभवलं आणि नंतर जेमतेम पाचसहाशे जणांच्या "परतवारी"मधलं वैराग्यसुद्धा! पण नंतर त्यांना त्या वैराग्यातही एका अलौकिक ऐश्वर्याची अनुभूती मिळाली ते त्यांच्याच शब्दांत ऐकण्यासारखं !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZfaq channel वर उपलब्ध असतात.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks