Рет қаралды 839,643
माझा कट्ट्यावरच्या बाऊन्सर्समध्ये एक होता तो अर्थातच सुशीलकुमार शिंदेंच्या आमदार कन्या प्रणिती यांच्या लग्नाबद्दलचा. यावर शिंदे म्हणाले की, “लग्न व्हायचं तेव्हा होतं, दबाव टाकून होत नाही. मी खुल्या विचारांचा माणूस आहे. जोडीदार निवडण्याचा अधिकार तिला असायला हवा या मताचा मी आहे. तू कुठल्याही जातीचा नवरा कर, पण तो कमावता असला पाहिजे. जो तुला कायम साथ देईल, असा जोडीदार निवड.”