No video

प्रश्न स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्तर यजुर्वेंद्र मास्तरांचे || Yajurvendra Mahajan

  Рет қаралды 3,340

Deepstambh UPSC-MPSC Lectures

Deepstambh UPSC-MPSC Lectures

Күн бұрын

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील संभाव्य पाच प्रश्न...
आणि उत्तरे यजुर्वेंद्र मास्तरांचे !
१) माझा अभ्यास होईल का ?
हो, योग्य मार्गदर्शन घेतले, सूक्ष्म नियोजन व अंमलबजावणी केली तर नक्की होईल. इतर गोष्टी व अडथळ्यांना न जुमानता अभ्यासाला प्राधान्य द्या. स्वतःवर विश्वास ठेवा, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड कष्टाची तयारी ठेवा.
२) परीक्षेत कसे प्रश्न येतील, अवघड प्रश्न येतील का?
हो, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. आव्हानात्मक प्रश्नांमधूनच आपल्या ज्ञानाची व व्यक्तिमत्त्वाची परीक्षा घेतली जाते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत आपल्या नियंत्रणात नाहीत त्याचा खूप विचार करू नका. चिंता नाही चिंतन करो, कृती करो !
३) आव्हानात्मक प्रश्न मला जमतील का?
हो, तुम्ही जर मूलभूत तसेच सर्वांगीण वाचन केले, संकल्पना समजावून घेतल्या, चर्चा व सराव केला तर जमतील. परीक्षेत ताणतणाव, भीती न ठेवता, विश्लेषण करून निर्णय घेतले तर हे प्रश्न सोडविता येतात, आणि हो... सर्वच प्रश्न आपल्याला सोडवायचे नाहीत हेही लक्षात ठेवा !
४) मी पास होईल का ?
पास होण्यासाठी आवश्यक असलेली वृत्ती आणि अभ्यास पद्धत विकसित केल्यास पास होण्याची शक्यता आहे. कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अभ्यासाकडे संपूर्ण लक्ष द्या.
५) अपयश येत असेल तर माझे भवितव्य... ?
व्यापक स्पर्धा असल्याने अनिश्चितता असतेच. त्यामुळे अपयश येऊ शकते. निराश न होता, स्वयं विश्लेषण करा. मार्गदर्शन घ्या. तयारीमधील चुका व कमतरता शोधा. त्यात बदल करा व पुन्हा जिद्दीने प्रयत्न करा. २-३ प्रयत्नानंतरही यश न मिळाल्यास तुमचे या क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य अनुभव व आवड या आधारे नवीन करिअर निवडा. जगात हजारो संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षा हा जीवनातला एक भाग आहे... ते संपूर्ण जीवन नाही ! शासकीय नोकरी मिळणे ही एक संधी आहे... ती शेवटची संधी नाही !
यशस्वी भव !
प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, संवेदनशील व धाडसी माणूस बनण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

Пікірлер: 13
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Жыл бұрын
छान मार्गदर्शन सर 👍
@aartithakur7436
@aartithakur7436 Жыл бұрын
Tumchya ya lecture mule barach tan kami zala sir thank u so much
@vaibhavkumarnimkar8564
@vaibhavkumarnimkar8564 Жыл бұрын
Thank you sir
@rakshachavhan971
@rakshachavhan971 Жыл бұрын
मनात खुप भीती होती पण सर Thank you तुमच्या या मार्गदर्शनामुळे Negativity , Self doubt होते ‌अक्षरशा ते सर्व कमी झाले आणि सर नेहमी असेच मार्गदर्शन‌ करत राहा ज्याने करून आम्ही स्वतःला सिद्ध करू आणि तुमच्या सारखे होण्याचा प्रयत्न करू‌... Thank you very much Sir 😊
@sainathdeshmukh_96K
@sainathdeshmukh_96K Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शनासाठी धन्यवाद मास्तर 🙏🏻
@sapnajadhav5473
@sapnajadhav5473 Жыл бұрын
Thank you so much👌👍
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
@usersuhaspatil2006
@usersuhaspatil2006 11 ай бұрын
सांगोला विद्यामंदिर 😊
@ashwaghoshgaykwad1966
@ashwaghoshgaykwad1966 Жыл бұрын
Thank you Sir...Ha video pahun manvarcha tan gela
@surekhakhaire2458
@surekhakhaire2458 Жыл бұрын
Thank you so much sir for your guidance.... I believe in you and myself... this video is not only for competitive exams preparation but it is useful for redular academic studies also .
@shivrajpatil1703
@shivrajpatil1703 Жыл бұрын
Ekdm must master ji ♥️👍🙏 pn 2025 pasun exam description nusar honar manlet kay karaych sir plz guide kara sir ..😇😇♥️
@krushnamohite5021
@krushnamohite5021 Жыл бұрын
Thank you sir
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 48 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 2,6 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 45 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 48 МЛН