Рет қаралды 182,848
How To Make Restaurants Style Egg Curry | अंडा करी | घरच्या घरी तयार करा रेस्टॉरेंट स्टाईल चमचमीत अंडा करी | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: bit.ly/2DFyOBX
[ Use Code: GS15 ] and get 15% Discount
साहित्य - ६ उकडलेली अंडी, ३ कांदे काप केलेले, २ टोमॅटो काप केलेले, ५ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, २५/३० कडीपत्त्याची पाने, २" आले, १५ काजू, १५ ग्रॅम मगज, वाटणासाठी मूठभर कोथिंबीर, ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tsp हळद, १ tblsp काश्मीरी मिरची पावडर, २ tblsp लाल तिखट, १ tblsp धणे पावडर, ३ तेजपत्ता, ५/६ लवंग, ½ दालचीनी, १० काळीमीरी, ½ tsp हिंग, ½ tsp ओवा, १ tblsp जीरे, ½ tblsp कसुरी मेथी, १ कप तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - कढईत तेल गरम करून अंडी सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यावी. मिक्सर मध्ये कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले, काजू, मगज, मूठभर कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या. अंडी तळलेल्या कढईत अख्खा गरम मसाला फोडणीला घाला. गरम मसाला परतून घ्या. परतून झाल्यावर यात तयार केलेलं वाटण घाला. वाटण मध्यम आचेवर तेल बाजूला होईपर्यंत परतून घ्या. वाटण परतून झाल्यावर यात हळद, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, धणे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मसाला एकजीव करून परतून घ्या. परतून झाल्यावर १ ते १½ ग्लास साधे पाणी घालून मिश्रण ढवळून घ्या. आता चवीनुसार मीठ घाला, तळलेली अंडी घाला आणि पुन्हा मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता एका फोडणीच्या भांड्यात २ tblsp तेल गरम करून त्यात कडीपत्ता घालून कडकडीत फोडणी तयार करा. गॅस बंद करून त्यात कसुरी मेथी घाला. परतून घ्या. तयार फोडणी अंड्याच्या ग्रेव्हीत मिक्स करून घ्या. आता संपूर्ण मिश्रण एकजीव करून वर झाकण ठेवा आणि १० मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढा. १० मिनिटांनी झाकण उघडून मिश्रण एकजीव करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम रेस्टॉरेंट स्टाईल अंडा करी भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत वाढून आस्वाद घ्या. धन्यवाद !
#RestaurantStyleEggCurry #AndaCurry #EggRecipeMarathi
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com