Рет қаралды 7,031
महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. नागपूर ते नाशिकपर्यंतचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. देशातील सर्वात मोठा प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना पर्यटन केल्याची अनुभूती मिळते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग परदेशी महामार्गांपेक्षाही अतिशय भव्यदिव्य दिसू लागलेला आहे.
समृद्धी महामार्गाचे अंतर
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे अंतर सातशे पाच किलोमीटर आहे. काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग अपघातांच्या कारणामुळे जास्त चर्चेत आहे. अतिवेग, वाहनांची स्थिती चांगली नसणे, वाहतुकीचे नियम न पाळता ड्रायव्हिंग करणे, टायर फुटणे अशा कारणांमुळे समृद्धी महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहतुकीचे सर्व नियम पाळून आणि चांगले वाहन असेल तर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे हे एक पर्यटनच ठरवू लागले आहे. महाराष्ट्रातील जेवढे काही महामार्ग आहेत, त्या महामार्गाच्या तुलनेमध्ये समृद्धी महामार्ग हा अतिशय वेगवान, भव्य दिव्य असा आहे.
समृद्धी महामार्गाचे नामकरण
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग लवकरच मुंबईपर्यंत खुला होणार आहे. नागपूरपासून मुंबईपर्यंत हा महामार्ग खुला झाल्यास येथून वाहतूक अधिक वाढेल. समृद्धी महामार्गाचे नामकरण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे करण्यात आलेले आहे. या महामार्गावरून प्रवास करताना कसा नजारा दिसतो, याविषयीचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केलेला आहे
Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg
The work of Nagpur to Mumbai Samruddhi Highway, which plays an important role in the development of Maharashtra, is now in its final stage. Samruddhi Highway from Nagpur to Nashik has been opened for traffic. Traveling through Samriddhi Highway, which is the largest project in the country, gives the feeling of tourism. The Nagpur-Mumbai Samruddhi Highway is looking more magnificent than the foreign highways.
National Highway In Maharashtra
The distance of Nagpur to Mumbai Samruddhi Highway is seven hundred and five kilometers. Samruddhi has been in the news for a few months due to highway accidents. Accidents are happening on Samruddhi Highway due to over speeding, poor condition of vehicles, driving without following traffic rules, tire bursts. If you follow all the traffic rules and have a good vehicle, traveling on the Samruddhi Highway is starting to define itself as a tourism. Compared to the highways in Maharashtra, the Samruddhi Highway is very fast, magnificent and light.
Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Samriddhi Highway
The Nagpur-Mumbai Samruddhi Highway, conceived by the then Chief Minister Devendra Fadnavis, will soon be opened up to Mumbai. If this highway is opened from Nagpur to Mumbai, the traffic will increase from here. The Samriddhi Highway has been renamed as Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Samriddhi Highway. This video presents to you what the view looks like while traveling on this highway
#samruddhimahamarg
#nationalhighway
#Nlnitingadkari
#nagpurmumbaisamruddhihighway
#समृद्धीमहामार्ग
#नागपूरमुंबईसमृद्धीमहामार्ग