Рет қаралды 241,836
मसूर पुलाव खाल तर बिर्याणी विसराल | Masoor Pulav | Masoor Bhat Easy Recipe मसूर पुलाव ज्याला आपल्या महाराष्ट्रात बरेच जण मसूर भात असे सुद्धा बोलतात. मसूर पुलाव आपण अशा पद्धतीने बनवाल तर नक्कीच बिर्याणी विसराल सध्या आपण हॉटेलचं बाहेरचं चमचमीत जेवण खाऊ शकत नाही परंतु आपण असे छान छान पदार्थ घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये बनवू शकतो. मसूर पुलाव बनवण्यासाठी आपण आख्खे मसूर मोड येइपर्यंत पाण्यात भिजत ठेवले होते. मसूर पुलाव साठी बासमती राईस वा तुमच्या घरी उपलब्ध असणारे तांदूळ वापरू शकता. मसूर पुलाव बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी आपण काही खडे मसाले वापरतो तसेच घरगूती कांदा आणि खोबऱ्याचे वाटण वापरून फोडणी द्यायची. तांदूळ आलं लसूण कोथिंबीर च्या पेस्टमध्ये मॅरीनेट करून ठेवायचं व ते भाजून सुध्दा घ्यायचे आहे. मसूर भात महाराष्ट्र, गोवा, गुजरात मध्ये खूप फेमस आहे. अख्खे मसूर पासून बनणारा हा चविष्ट पुलाव लहान मुले आणि वयस्कर माणसे सुद्धा अतिशय आवडीने खातात. #MasoorPulavRecipe #MasoorBhatRecipe #EasyMasoorPulav #sforsatish
मसूर पुलाव खाल तर बिर्याणी विसराल यासाठी बोलले आहे की या पद्धतीने तुम्ही मसूर पुलाव बनवाल तर तुमचा पुलाव एवढा चवदार बनेल की बिर्याणी पेक्षा मसुर पुलाव तुम्हाला जास्त आवडेल तर हा व्हिडीओ पाहून घरी नक्की साधा सोपा मसूर पुलाव नक्की बनवा आणि आम्हाला त्याची चव सुद्धा कळवा. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Follow me on Facebook and Instagram
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar