Рет қаралды 271,367
आम्ही लावलेल्या झाडांना आला मोहोर 😍 | आईसोबत रानात केले गोठणीवर जेवण - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही आमच्या रानात आंबा आणि काजूची झाडे पावसाळ्यात लावली होती. झाडे लावून झाल्यावर आम्ही एकदा झाडे बघायला गेलो होतो. आता आम्ही बऱ्याच महिन्यांनी ही आमची झाडे बघायला रानात गेलो. यावेळेस आई सोबत आली होती. आईला आम्ही लावलेली झाडे कशी झाली आहेत हे बघायचे होते. आमच्या गावातून आमच्या रानात जायला एक तास लागतो. आईसोबत जंगलातला प्रवास केला. आम्ही निसर्गाचा आनंद घेत प्रवास केला. आम्ही झाडे लावली आहेत त्या रानाला खेतुरपाल असे बोलतात. आम्ही आमच्या शेतावर पोचल्यावर झाडे पहिली. आम्ही लावलेल्या काही झाडांना मोहोर आला होता. झाडांना एवढ्या कमी काळात मोहोर आलेला पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही झाडांच्या बाजूला असलेले गवत साफ केले. झाडांना सुरक्षित घरटे केले. झाडांना आता पाण्याची गरज आहे. झाडांना पाणी घातला. झाडे मस्त जगली आहेत. परतीच्या प्रवासात आम्ही गोठणीवर जेवण केले. आईने घरून भाकरी भात आणि भाजी आणली होती. चिकन आणि बांगडा जेवणात होता. आम्ही जेवण करून घरी आलो. आमच्या झाडांची वाढ कशी होतेय आणि आमचा जंगलातला प्रवास तुम्हाला दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.#AamhiLavlelyaZadannaAalaMohor #AaisobatRanatKeleJevan #RanatleJevan #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar