No video

Sting | Energy Drink | Youth | Future Generation | Satyajeet Tambe | Budget Session | Maharashtra |

  Рет қаралды 297,059

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe

Күн бұрын

एनर्जी ड्रिंक हा प्रकार सध्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात बराच प्रसिद्ध झाला आहे. शाळा कॉलेजेस च्या आसपास हे कॅफेनचे धोकादायक प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक सर्रासपणे उपलब्ध असल्याने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे एनर्जी ड्रिंक घेण्याचा प्रमाण खूप जास्त आहे, हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असता माननीय मंत्री महोदयांनी हे एनर्जी ड्रिंक शाळा, कॉलेजच्या परिसरात उपलब्ध नाही असं सांगितलं.
हे उत्तर देण्यापूर्वी शासनाने कोणत्या प्रकारची तपासणी केली, किती ठिकाणी छापे टाकले ? असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री महोदयांची तयारी असेल तर मी स्वतः त्यांना शाळा, कॉलेजच्या परिसरात हे एनर्जी ड्रिंक दाखवू शकतो असं ठामपणे सांगितलं.
५० रुपयांत नशेच्या गोळ्या बाजारात सर्रासपणे उपलब्ध होत आहेत. या नशेला आपली भावी पिढी बळी पडत आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात "नॉन अल्कोहोलिक" पेयांचे १६२ नमुने तपासले व त्यातील एकच नमुना अयोग्य आढळला अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली. एका वर्षात झालेली ती किरकोळ कारवाई संशयास्पद आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्रातील भावी पिढ्यांच्या भाविष्यासोबत खेळत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दुधापैकी २५% दूध भेसळयुक्त आहे. लोकांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना नाही.
या बाबी गांभीर्याने घेऊन मागील एका वर्षात किती ठिकाणी कारवाई केली, काय कारवाई केली याची माहिती द्यावी. तसेच, माननीय सभापती महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे पुढील १५ दिवसांच्या आत सर्व प्रशासकीय विभागांतील अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घ्यावी अशी विनंती सभागृहात केली.
यावर उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी लवकरच प्रशासनाला सूचना देऊन शाळा कॉलेजच्या ५०० मीटर अंतरात एनर्जी ड्रिंक विक्रीस प्रतिबंध करू, तसेच लवकरच बैठक आयोजित करून यावर शाश्वत उपाय करू असे आश्वासन दिले.
एनर्जी ड्रिंक्सच्या आक्षेपार्ह जाहिरातींवर बंदी आणावी अशीही मागणी मी सभागृहात केली. यावर सक्षम अधिकारी नेमून आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करावी अशा सूचना सभापती महोदयांनी दिल्या.
Follow Us On Twitter
sa....
Follow Us On Instagram
/ satyajeetta. .
Follow Us On Facebook
/ satyajeet.tambepatil
Also Read Wikipedia
mr.wikipedia.o...%...

Пікірлер: 629
@user-pr2ov6tt9m
@user-pr2ov6tt9m Ай бұрын
हा एक माणूस आहे कधीच जातीवर बोलत नाही आणि जनतेचे प्रश्न मांडतो तुम्ही मंत्री म्हणून खूप चांगलं काम कराल
@kalpanaaher3007
@kalpanaaher3007 Ай бұрын
तांबे साहेब बाळासाहेब थोरात यांचे अभ्यासू असे वारसदार आहे
@shindesarkar466
@shindesarkar466 Ай бұрын
25%नाही 90%दुध भेसळ युक्त आहे. 💯
@gkarpe2010
@gkarpe2010 Ай бұрын
असा मुख्यमंत्री पहिजे नव्हे तर पंतप्रधान पाहिजे अतिशय अभ्यासू तांबे साहेब
@PriyaKavate
@PriyaKavate Ай бұрын
Ase mukhya mantri Ani pantapradhan have asel tar Tya sathi janta dekhil tevdhi ch abhayasu havi 🙏🙏
@rohitsamant9604
@rohitsamant9604 Ай бұрын
😂😂😂😂😂
@viraltap6725
@viraltap6725 Ай бұрын
Ky abhyas kela aahe 😂
@narayangarud298
@narayangarud298 Ай бұрын
​@@PriyaKavateसत्तेत गेल्यावर आणि पदावर गेल्यावर सगळे पक्षातील राजकारणी एकाच माळेचे मणी.
@praveenmane7329
@praveenmane7329 Ай бұрын
Asle knowledgeable well educated nete magech rahtat..phkt uneducated kutniti tadnya nete pudhe jatat😂
@user-MaheshBhandare
@user-MaheshBhandare Ай бұрын
दादा माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्या साठी असचं काम चालू राहु द्या. Always God bless you
@BabasahebGhadge-g5n
@BabasahebGhadge-g5n Ай бұрын
🎉
@dipakkhasbage7918
@dipakkhasbage7918 Ай бұрын
🎉🎉🎉mast
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तांबे साहेब, अभिनंदन.अन्न व औषध प्रशासन विभाग नसल्यातं जमा आहे.पुरेशे मनुष्य बळ, पुरेसे प्रामाणिक अधिकारी जर तालुका पातळीवर जर उपलब्ध करून दिले तर या प्रकाराला आळा बसेल.एनर्जीडिंग्स बरोबरच सध्या रासायनिक पद्धतीने पिकलेली केळी,आंबे,चिकु हे फळांचे व्यापारी बिनदिक्कतपणे विकतात.त्यांच्यावर देखील कारवाई करणे जरुरीचे आहे.
@omprakashuike2580
@omprakashuike2580 Ай бұрын
Ase prabhavi abyaspurna mudde farach Kami lok mandatat.sir you are great.Aslya netachi garaz aahe.
@navnathsul307
@navnathsul307 Ай бұрын
You are great leader Tambe Saheb
@nitinchikane4707
@nitinchikane4707 Ай бұрын
कोणाचे ही सरकार आले तरी हे धंदे काही बंद होत नाहीत. प्रत्येकजण विरोधी पक्षाला बोलतो.
@petloversam7894
@petloversam7894 Ай бұрын
हे सगळे राजकारणी नेते एका गोडाऊनमध्ये डांबून बॉम्ब टाकून उडवले पाहिजे म्हणजे भारत वाचेल नाहीतर देशाचे भविष्य खूप भयानक आसेल 😡
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
100%barobar ,lokana compulsory pesticides khavi lagtat
@gajananbapudeshmukh1853
@gajananbapudeshmukh1853 Ай бұрын
स्टिंग फक्त 20 रुपयाला मिळते. व ते कुठेही सर्वच दुकानावर मिळते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. वास्तव तुम्ही मांडले.
@moyemoye-os8ez
@moyemoye-os8ez Ай бұрын
आमचा मित्र अगदी हेल्दी, स्ट्राँग होता.त्याला कोणताही आजार नव्हता. त्याने एक दिवशी 7/8 स्टिंग चे बॉटल पिला.आणि नंतर त्याचे लघवी तटली,किडन्या फेल गेल्या आणि लगेचच तो वारला. विनंती आहे स्टिंग घातक आहे ,कोणीही घेऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Yyyssggr
@Yyyssggr Ай бұрын
आमच्या ईथे पण एक जण गेला... 8 वी तला पोरगा अभ्यासात लक्ष लागेल म्हणून दोन बाटल्या पिला...आणि त्याला attack आला
@mithilnalawade2781
@mithilnalawade2781 Ай бұрын
Aree dada tyachvar lihila aahe diwsala 2 bottle peksha jast pyaychi nahi.😢
@Yyyssggr
@Yyyssggr Ай бұрын
@@mithilnalawade2781 तेवढी आता लोक शहाणी आहेत होय...
@anildalvi4633
@anildalvi4633 Ай бұрын
​@@mithilnalawade2781 Aaj paryant pitana kadhi kuni vachal aahe ka
@Mayuresh6001
@Mayuresh6001 Ай бұрын
त्या bottle वर लिहिलं आहे की दिवसातून २ बॉटल च्या वर पिऊ नका.. लहान मुले व गरोदर मातानी पिऊ नका तरी ७-८ bottle पितात आणि जीव गमावतात एक तर बंदी आना किंवा त्यातलं caffene लेव्हल कमी करा किंवा देताना age बघून च द्या..
@nagarsangharsh6031
@nagarsangharsh6031 Ай бұрын
अभ्यासू आमदार अश्या लोकप्रतिनिधीची गरज आहे
@shahajiwaghmare7150
@shahajiwaghmare7150 Ай бұрын
माननीय तांबे साहेब खरा राज्यात मोटा प्रश्न उपस्थित केला आमदार साहेब तुमीच राज्याचे मुख्यमंत्री व्हावं 👌
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
नगर ची शान आमदार सत्यजीत तांबे ❤
@vaibhavvengurlekar4313
@vaibhavvengurlekar4313 Ай бұрын
तुमच्यासारखा नेता महाराष्ट्राला मिळणे हे भाग्यच... दादा असच कामं करा.. भावी मुख्यमंत्री ❤️
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k Ай бұрын
बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीवर misleading ads मुळे कारवाई होते, प्रॉडक्ट्स बंद करायला सांगतात पण हाच न्याय या मल्टिनेशनल कंपन्यांना का लावत नाहीत?
@swapnilnagtilak1861
@swapnilnagtilak1861 Ай бұрын
बाबा चि घमेंड वाढली होती खूप.
@AniketR777
@AniketR777 Ай бұрын
तो बाबा आहेच भंगार
@gjvlogs3579
@gjvlogs3579 Ай бұрын
मग माफी का मागीतली मग
@user-ci8bc9yk5f
@user-ci8bc9yk5f Ай бұрын
त्या भोंदू बाबा हराम देव ची पतंजली कंपनी बोगस आहे. सर्व प्रॉडक्ट बोगस आणि फालतू आहेत. मी पतंजली कंपनी च्या मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे पतंजली कंपनी विष विकत आहेत
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py Ай бұрын
​@@swapnilnagtilak1861kay boktay
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 Ай бұрын
भारतामध्ये तरुणांना गांजा अफू चरस दोन शुगर ड्रग्स मोबाईल मधील व्हिडिओ गेम मोबाईल मधील पॉर्न ऑनलाइन पैसे कमावणे सगळ्या प्रकारचे नशा करणे मोबाईलच्या हाताने अशा वेगवेगळ्या प्रकारात गुंतवून ठेवला आहे तरुणांनो सावध व्हा तुम्हाला तुमचाच वेळ खात आहे प्रत्येक वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवून खूप वेगळ्या पद्धतीने लावलं जात आहे तरी सावध व्हा जागे व्हा नको त्या व्यसनांना आहारी जाऊन आपलं जीवन एकच आहे हा प्रश्न तांबे साहेबांनी उचलला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार
@paypageorge8516
@paypageorge8516 Ай бұрын
अन्न व प्रशासन हे खाते कधीच सुधारणार नाही, ही सत्य परिस्थिती ज्या प्रकारे तुम्ही समोर घेवून आलात,त्या बद्दल तुमचे आभार...🙏 तुमच्या सारखे दूरदृष्टीचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र ला लाभले आहे,ही खूपच चांगली गोष्ट आहे.
@Ishwarsapreofficial
@Ishwarsapreofficial Ай бұрын
तांबे साहेब....I am from Beed (Patoda) खरं तर आपल्या सारखे सुशिक्षित लोक विधान भवनात का पाहिजेत या गोष्टीला तुम्ही सतत Underline आणि Highlight करत आलाय. त्यामुळेच मी तुमचा जबरा फॅन आहे. एक KZfaqr म्हणून लवकरच भेटू
@ashokkhot7112
@ashokkhot7112 Ай бұрын
विश्वजीतजी दूध डेअरी तर आता सर्व राजकीय पक्षांची आहे आपण योग्य प्रश्न मांडलात याचा पाठपुरावा करत रहा तरच कुठे तर हा प्रश्न सुटेल अशी आशा आहे
@vinayaknikalje8125
@vinayaknikalje8125 Ай бұрын
साहेब मस्त स्पष्टीकरण देऊन सांगितलं आता तरी जागे होतील मंत्री महोदय 🙏आभारी आहे तुमचा असेच पाठ पुरावे घेत जावा सरकार कोणाच पण असो 🙏
@BHARATSENA.
@BHARATSENA. Ай бұрын
सत्यजित तांबे सर तुमचा राहणीमान खूप सुंदर आहे तुमच्या सारखा सुंदर दिसायचा आम्ही स्वतः तुमचं अनुकरण करत आहोत❤
@pravimayekar
@pravimayekar Ай бұрын
माननीय सत्यजित तांबे साहेब खूप खूप आभार अशा गोष्टीवर न घाबरता प्रश्न विचारल्याबाबत. 🙏 साहेब, आपल्या नावात सत्य आहे आणि आपण याचा पाठपुरावा करून जनतेसमोर सत्य मांडाल अशी आपणाकडून अपेक्षा आहे. जयहिंद🇮🇳जय महाराष्ट्र 🚩
@T.powerman07
@T.powerman07 Ай бұрын
सर्व आमदार खासदार यांनी तांबे साहेबा सारखे विचार मांडले पाहिजे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे नविन पिढी च आयुष्याचं वाटोळं होतं आहे. हे स्टिंग
@dattadeokar8827
@dattadeokar8827 Ай бұрын
अत्यंत चांगला विषय मांडला मांडला तांबे साहेबांचे हार्दिक अभिनंदन, महाराष्ट्राला अशा प्रकारच्या नेत्यांची गरज आहे.🙏
@rajendrajejurkar2769
@rajendrajejurkar2769 Ай бұрын
अतिशय मोठ्या विषयाला हात घातला तांबे साहेब सेल्युट यासाठी
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 Ай бұрын
तांबे साहेब हा मुद्दा लावून धरला काय महाराष्ट्रात चालले लहान मुले ते रूधा पर्यंत हया लोकांच्या पिठ्या बरबाद होत चालले तरी सर्वात जास्त पैसा वाल्यांची मुलं सर्वात जास्त कारणीभूत आहे धन्यवाद माऊली
@VitthalShermale-wi7bo
@VitthalShermale-wi7bo Ай бұрын
मा तांबे साहेब यांनी भावी पिढी मध्ये सुधारणा करणे बाबत अतिशय सुंदर भूमिका मांडली धन्यवाद सर असच नेतृत्व तरुणांसाठी यापुढेही करताल याची अपेक्षा करतो 🙏🙏🙏🙏
@kcreation1719
@kcreation1719 Ай бұрын
साहेब,चांगला मुद्दा घेतला आहे त्याबद्दल अभिनंदन💐.मात्र त्याच बरोबर आरोग्य आणि आहार यांचं योग्य ते मार्गदर्शनही शाळेपासून/तसेच आरोग्य व अन्नपअन्नपुरवठा खात्याकडून व्हायला पाहिजे.कारण आरोग्य आणि आहार या विषयी संपुर्ण जनतेत निरक्षरता आहे आणि याचाच फायदा बिझनसमॅन घेत आहेत,पुढे हि साखळी आजार,गरीबी अशी continue होत आहे.
@mrgautam1993
@mrgautam1993 Ай бұрын
❤ असे आमदार सर्व असेल तर महाराष्ट्र भारतील एक नंबर राज्य होईल ❤
@salimsayyad3172
@salimsayyad3172 Ай бұрын
Whaa kya baat hae ek dam sahi sawal uthaya sir aap nae,,💯👏
@sagarkhatu304
@sagarkhatu304 Ай бұрын
सर आप बहुत अच्छे काम करते है. देश को आप जैसे मंत्री चाहीये ❤
@creditafinancials2676
@creditafinancials2676 Ай бұрын
हा गंभीर मुद्दा आपण उठवला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तांबे साहेब 🙏
@vishalvarpe1445
@vishalvarpe1445 Ай бұрын
एकदम बरोबर आणि वास्तव मुद्दा आहे. परंतू यावर उपाययोजना झाल्या पाहिजे.
@dnyaneshwarsurtekar5466
@dnyaneshwarsurtekar5466 Ай бұрын
सर यावर्षी माझ्यासह हजारो शिक्षणसेवक शाळेत रूजू झाले आहेत .. पण अतिशय लाजिरवाणी आणि शिक्षकांच्या हक्कांची गळचेपी करणारी ही शिक्षणसेवक पद्धत आहे .. कारण सर्व निकष , पात्रता पूर्ण करून मेरीटनुसार निवड होऊन सुध्दा 3 वर्ष शिक्षकाने कमी वेतनावर शिक्षणसेवक म्हणून का राबायचं.... त्यामुळे शिक्षणसेवक पद्धत रद्द झालीच पाहिजे... यासाठी आपण प्रयत्न करावा आणि हजारो शिक्षण सेवकांचा आवाज सरकार पर्यंत पोहचवावा.. ही विनंती 🙏🙏😢
@nitinwadkar2942
@nitinwadkar2942 Ай бұрын
खूप सविस्तर मांडल्याबद्दल धन्यवाद तांबे साहेब येणाऱ्या पिढीचे भविष्य खूप आहे
@anantnikam3103
@anantnikam3103 Ай бұрын
अतिशय महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे आपण साहेब आपण नेहमीच वेगळे प्रश्न उपस्थित करता आपल अनुकरण आपलं काम खुप कौतुकास्पद आहे आणि कोणताही प्रश्न मांडताना आकांड तांडव नसतो खुप सभ्य शब्दात मांडता आपल्या सारखे काही तरुण तर काही जुने लोकनेते आहेत ते खरंच जबाबदारीने जाणीव ठेवून काम करत असतात आपल्या अशा काही नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करावा नक्कीच स्वछंदी कारभार सांभाळणारे आहेत काही नेते
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Ай бұрын
या अशा सुशिक्षित,अभ्यासू लोकप्रतनिधींची महाराष्ट्राला खूप गरज आहे....जय महाराष्ट्र 🙏🙏
@tukaramgunte5904
@tukaramgunte5904 Ай бұрын
खूप छान बाजू मांडता प्रत्येक विषयांवर
@rahulghugare9637
@rahulghugare9637 Ай бұрын
Right. आरोग्य चे खूप महत्वाचे प्रश्न विचारले. अभिनंदन आमदार साहेब
@ramdasgaikwad3725
@ramdasgaikwad3725 Ай бұрын
साहेब महत्त्वाचा मुद्दा बोलले साहेबांचे खूप खूप आभार
@vikaschoudhari2955
@vikaschoudhari2955 Ай бұрын
ग्रामीण भागात स्टिंग घेण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे व हा फार गंभीर विषय आहे, तूम्ही हा प्रश्न मांडला खुप खुप धन्यवाद, हा प्रश्न खरचं मार्गी लावा हि विनंती
@MayurMishra-vm5je
@MayurMishra-vm5je Ай бұрын
Next CM of Maharashtra , I request youth of Maharashtra please support such politicians , I support Tambe sir ✌️✌️
@bharatjadhav7034
@bharatjadhav7034 Ай бұрын
खूप छान विश्लेषण आणि गंभीर विषयावर विधानपरिषद मधे चर्चा असा नेता हवा जनतेला खूप छान 👌👌
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 Ай бұрын
अभ्यासू नेता व आजच्या काळात जनतेची काळजी करणारा जाणता राजा ❤❤❤
@jyotisamant5563
@jyotisamant5563 Ай бұрын
आज पर्यंत कोणालाच दूधाची भेसळ , रासायनिक खते वापरून पिकवलेले अन्नधान्य, भाज्या, फळे हया मुद्द्यावर बोलावेसे वाटले नाही . पण तुम्ही जात धर्म हे विषय सोडून हया महत्वपूर्ण मुद्द्यावर भाषण केलेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
@SagarWalunj-rx3ll
@SagarWalunj-rx3ll Ай бұрын
अभ्यासू वेक्तिमत्व 💯... बोलण्याची भाषा खूपच सुंदर.... महाराष्ट्र ला तुमची खूपच गरज आहे... विचार खूप सुंदर आहे... 🌹
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
उत्कृष्ट प्रश्न ज्याच्या मुळे आरोग्य सुरक्षा नाहीशी होते 🙏🚩सत्यजित दादा चं अभिनंदन 🙏🚩
@arunpawar3173
@arunpawar3173 Ай бұрын
एकदम महत्त्वाचे प्रश्न विचारला सत्यजित दादा 👍👍
@MMURKHE-dk1vq
@MMURKHE-dk1vq 16 күн бұрын
दादा आपल्या महारास्ट्रातच नाही तर पुर्ण भारत देशतुन, ह्या विकल्या जाणाऱ्या String नावाचा जहेरला, बंदी करावी व जिथे कुठे ही Drink विकली जात असेल तिथे छापे टाकून त्या दुकानदारांवर करव्हाई करण्यात यावि, आणि असे होणारे जीव घेनी गोस्टिला थांबवता येईल दादा, छान दादा ह्यावर आवाज उठवल्या बद्दल...! ✌🙌👏👏
@nikhilsuryawanshi4553
@nikhilsuryawanshi4553 Ай бұрын
सर खरंय तुमचं... दूधपण खूप घातक झालाय... दूधपावडर पासून दूध बनवतायत आणि पुन्हा तेच डेरीला घालतात.. याचा वर कारवाई झाली पाहिजेल
@GovindKokate-hl7hf
@GovindKokate-hl7hf Ай бұрын
अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे ज्यावर प्रत्येक जण दुर्लक्ष करतो आहे
@vivekteke9509
@vivekteke9509 Ай бұрын
सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी अतिशय विस्तृत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणारे आमदार साहेब 🙏🙏
@vijaymergewar3792
@vijaymergewar3792 Ай бұрын
अगदी बरोबर साहेब, आपले प्रश्न खरोखर भावी पिढी साठी महत्वाचे आहे
@vijayghode106
@vijayghode106 Ай бұрын
तांबे साहेब अभिनंदन,तसेच अर्धांगवायू ची खूप मोठी समस्या वाढत चाललेली आहे ,यावर कोणी बोलताना दिसत नाही,कृपया या गोष्टीला वाचा फोडावी..........##############
@vinayakpatil993
@vinayakpatil993 Ай бұрын
Sir तुम्ही खूप चांगले विषय मांडता....तुम्ही आशेच रहा....श्री स्वामी समर्थ
@SangharshMaza143
@SangharshMaza143 Ай бұрын
अतिशय चांगला प्रश्न, प्रशासन तडजोडीत व्यस्त... सगळीकडे सरास सापडते...
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Ай бұрын
🎉🎉🎉 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢😢😢😢😢😭😭😡😡😡😡😭😭😭😭
@nitinrajahire
@nitinrajahire Ай бұрын
असा आमदार सर्वंच मतदारांना लाभावा🙏🌹
@nitinpol7930
@nitinpol7930 Ай бұрын
साहेब आतिषय उत्कृषट विचार मांडला तुम्ही❤
@MarathiShala
@MarathiShala Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 👍 दादा आपण खूप छान विचार मांडले आहेत👍 आम्ही देखील लहान मुलांच्या हातात या स्टिंग च्या बाटल्या बघतो तर खूप खूप वाईट वाटते😢 मुलांना शाळेत आम्ही परावृत्त करतो... पण समाजाचे काय😢
@pravinpawar9049
@pravinpawar9049 Ай бұрын
असेच आमदारांची गरज आहे महाराष्ट्राला
@sandeshdongare4417
@sandeshdongare4417 Ай бұрын
खुप छान तुमच्या सारखी सुशिक्षित लोकाची गरज या देशातील राजकारणात पाहिजे
@amolandhale4038
@amolandhale4038 Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व...👍
@user-tg8sb6jf7q
@user-tg8sb6jf7q Ай бұрын
अभिनंदन,तांबेसाहेब फक्त पैसै कोना कोनाला कंपनीने दिलेत चौकशी करा
@Yoshree19
@Yoshree19 Ай бұрын
आपण उठलेल्या आवाजाला आज यश आले यासाठी आपले हार्दिक अभिनंदन. GR प्रमाणे शाळा आणि कॉलेज च्या 500 मीटर परिसरात असले पेय विकण्यास बंदी.
@mahadulashkare3802
@mahadulashkare3802 Ай бұрын
GR फक्त कागदावरच असतात प्रत्येक्षा अमलात नाही येत,,, पोलीस/औषध प्रशासन/ सरकारी हॉस्पिटलच्या मागेच असतो सर्व कारभार,, असे किती शाळा कॉलेज आहे तिथे असे घडत नाही ते सांगा.
@prathameshsumthankar8185
@prathameshsumthankar8185 Ай бұрын
हे सभागृह अशा बुद्धिवान लोकांसाठी असते. ना की दानवे सारखे. भैया तुम्ही लवकर आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी दिसाल. अशी आशा आहे.
@shaileshkohak-nx3bs
@shaileshkohak-nx3bs Ай бұрын
Tumche mudde khup changle astat sir ashich changli kaame karat raha Dhanyawad sir
@sachinchaudhari4105
@sachinchaudhari4105 Ай бұрын
अति महत्वाचे आणि युवापिढी च भविष्या चे प्रश्न मांडले. असा नेता होणे नाही. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अशा विचारवंत अशा नेत्याची गरज आहे
@VijayWakchaure-xy3gl
@VijayWakchaure-xy3gl Ай бұрын
फार छान विषय मांडला तांबे साहेबांनी मुख्यमंत्री दखल घेतली पाहिजे
@prafullbanthiya7924
@prafullbanthiya7924 Ай бұрын
मां म आमदार तांबे साहेब मनाच्या अंतःकरण पासून सॅल्यूट करतो महाराष्ट्र च्या सर्व पक्षांच्या आमदारांनी सुध्दा तांबे साहेबा चे मनापासून आभार मानले पाहिजेत आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी नंतर कोणाचं ही पक्षाचे सरकार येवो गृहमंत्री व आरोग्य मंत्री झाले पाहिजे असे मत व्यक्त करतो,👏🙏
@sonalikanchan68
@sonalikanchan68 Ай бұрын
Asha rajkarnyachi kharach garaj ahe aj aplyala adarsha neta pramanik khup stuti karavi tevdhi kami❤❤❤
@VinayakPatil-uk6it
@VinayakPatil-uk6it Ай бұрын
महत्वाचा मुद्दा मांडला तांबे साहेब 👌
@amitjadhav3554
@amitjadhav3554 Ай бұрын
धन्यवाद तांबे साहेब अतिशय महत्वाचा मुद्दा घेतला तुम्ही 👍🏻
@kishorchuttar6975
@kishorchuttar6975 Ай бұрын
Sting var bandi aali pahije.khup bhayan paristhiti aahe.Thanks tambe saheb ha vishay tumhi ghetala👌👍🙏
@user-dn9bn1cn8z
@user-dn9bn1cn8z Ай бұрын
असा तरूण तडफदार व खरा अरसा दाखवनारा नेता पाहिजे सत्य जित तांबे साहेब ऑल द बेस्ट❤
@sushantjadhav7366
@sushantjadhav7366 Ай бұрын
Agadi yogya prashn vcharla saheb thank you....
@VishalJadhav-gl9mk
@VishalJadhav-gl9mk Ай бұрын
अतिशय म्हत्वाचा विषय सत्यजीत भाऊ
@shreepatil25197
@shreepatil25197 Ай бұрын
तांबे साहेब प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल आपले अभिनंदन 🎉🎉🎉.आज नवीन पिढी नशेच्या हारी जात आहे.राजकारणी फक्त राजकारण सत्ताकारण करीत आहेत..यांना अशा नशेच्या पदार्थावर बंदी आणायला वेळ ही नाही..व घेणदेण पण नाही.‌फक्त भ्रष्टाचार करणे हाच धंदा आहे....
@rg220
@rg220 Ай бұрын
खूप छान मुद्दा मांडला 🙏 सगळ काही खरे आहे पण सरकार चे हेच तर अच्छे दिन आहेत.
@AnilAlwal
@AnilAlwal Ай бұрын
Thank you sir..,tumhi ha mudda vidhansabet mandala😊😊.....me tumche khup khup dhanyawaad
@dipalikhot5861
@dipalikhot5861 Ай бұрын
🙏🙏🙏 सर तुमचे मनापासून आभार.. असेच नेते या महाराष्ट्राला हवेत....
@parshuramparihar2684
@parshuramparihar2684 Ай бұрын
खूप छान विषय घेतला आणि अतिशय व्यवस्थित मांडला सुद्धा.
@sachinpanade6105
@sachinpanade6105 Ай бұрын
हे खरं आहे.टीव्हीवर जाहिरातींचा इतका भडिमार केला जातो की लहान तर सोडा मोठी लोकही याला बळी पडत आहेत,खेडे असूनही माझा मुलगा आणि त्याचे मित्र त्याकडे आकर्षित झाले आहेत
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 Ай бұрын
खरा राजकारणी शोभतो,हा तर पुढच्या पिढीला विचार करतो,बाकीचे सध्याच्या पिढीचाही विचार करत नाही.सर्व पक्षात असे किमान 10 लोक असे असावेत.
@MamtaPattebahadur
@MamtaPattebahadur Ай бұрын
खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले तांबे साहेब तुम्ही
@Suhaas_umate
@Suhaas_umate Ай бұрын
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अभिनंदन
@pratibhapise5552
@pratibhapise5552 Ай бұрын
सत्यजित तांबे सारख्या लोकप्रतिनीधींची गरज आहे
@gsj733
@gsj733 Ай бұрын
स्टिंग आणि चार्जड हे दोन पेय शाळेची आणि काॅलेजची मुले गटागट पितात...
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Ай бұрын
खूपच महत्वाचा मुद्दा मांडला, सरकारने यावर लवकरात लवकर ऍक्शन घेणे गरजेचे आहे
@swatiwarule1259
@swatiwarule1259 Ай бұрын
वास्तव सांगितले साहेब!🙏🙏🙏
@manojpawar9936
@manojpawar9936 Ай бұрын
आमच्या मनातला विचार तुम्ही मांडला खूप आभार
@sagarbodake1995
@sagarbodake1995 Ай бұрын
अतिशय योग्य मुद्दा मांडला 💯✌️
@dipakmastud8662
@dipakmastud8662 Ай бұрын
कामाचा माणूस ❤ मुध्याला हात
@dhananjaydeshmukh3158
@dhananjaydeshmukh3158 Ай бұрын
तांबे साहेब फार छान या घातक व्यसनाबद्दल सभागृहात मांडणी केली. यासाठी सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोणतीही कारवाई केली जात नाही. उघडपणे स्टींग विकली जात आहे
@user-en2xe2qy5b
@user-en2xe2qy5b Ай бұрын
Sundar kam hy ❤
@rahulahire9755
@rahulahire9755 Ай бұрын
अतिशय महत्वाचा प्रश्न केलात साहेब 👌👌👌असेच महत्वाचे प्रश्न जर प्रत्येक राजकारण्यानी केलेत तरच सकारात्मक बदल लवकर होईल ❤
@kirandhotre3844
@kirandhotre3844 Ай бұрын
खूप छान सर, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
@rajendralamkane1867
@rajendralamkane1867 Ай бұрын
तांबे साहेब आपले अभिनंदन या विषयावर व्यापक व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे
@navnathdokhe6046
@navnathdokhe6046 Ай бұрын
तांबे साहेब अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण विचारले आहे, आपण लवकर मुख्यमंत्री व्हावे ही अपेक्षा.
@user-fb6cz7wk4f
@user-fb6cz7wk4f Ай бұрын
अतिश महत्वाचा विषय मांडला साहेब
@hbk5302
@hbk5302 Ай бұрын
1 no mudda mandlaay 👌👌👌
@Ad___9824
@Ad___9824 Ай бұрын
महाराष्ट्रात आसे 10-12 तरी मंत्री पाहीजे जनतेची बाजु माडंतील आसे❤
@MangeshMhatre-uw7do
@MangeshMhatre-uw7do Ай бұрын
Excellent Observation. Government must act immediately to save generation
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 10 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,6 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Adv Vimal | Sasu Sunbai case | Vinayak Mali Comedy
20:54
Vinayak Mali
Рет қаралды 998 М.
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 10 МЛН