Рет қаралды 950,637
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ९ दिवस उलटल्यानंतरही राज्यात अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीला सत्तास्थापनेत अपयश आल्यास, आघाडीकडून शरद पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतील. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेना आणि काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याने शिवसेना पाठिंबा देण्याबाबत त्यांच्यावरही टीका होणार नाही. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावर याबाबत चर्चा झाल्याची झी २४ तासकडे खात्रीलायक माहिती आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार आणि त्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
याआधीही विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. मग कोणी राज्यसभेचा सदस्य असेल, कुणी लोकसभेचा, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची आज भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार हे दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुढची भूमिका स्पष्ट होईल.
#शरदपवार #मुख्यमंत्रीपदीशरदपवार #सर्वातमोठीबातमी
Mumbai Sharad Pawar CM
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह