Food &Recipes | Health & Fitness | Travel & Vlogs
नमस्कार फ्रेंड्स, खास मेजवानी मध्ये मी रोहिणी तुमचं मनापासून स्वागत करते.मी एक सामान्य गृहिणी आहे. खरं तर सामान्य असं या जगात कुणीच नसतं, घराला स्वर्ग बनवायचं काम या गृहिणी करत असतात. माझं हे चॅनल अशा लाखो गृहिणिंसाठी आहे ज्या रोजच्या जीवनात आपल्या छोट्या छोट्या पदार्थांनी घरातल्या माणसांना खास मेजवानी देत असतात.तसेच त्यांच्यासाठीही आहे ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे.तसेच खाण्याची आवड असणाऱ्या खवय्यांसाठी सुद्धा आहे.
माझ्या चॅनल वर तुम्हाला खास मराठी स्पेशल डिशेस पाहायला मिळतील. अगदी चहा नाश्त्याच्या प्रकारांपासून ते पुरणपोळी उन्हाळकामापर्यंत भरपूर पदार्थ इथे आपल्याला पाहायला मिळतील.
तसेच आमच्या आयुष्यातील काही गमतीजमती म्हणजेच Vlogs आणि काही productचे review,माहिती व्हिडिओच्या मार्फत सांगितली जाईल. इथे क्रिएटिव्ह गोष्टीसुद्धा तुम्हाला पहायला मिळतील.
तेव्हा plz Subscribe करा रेसिपी पाहत रहा, खात रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा.जीवनाचा आणि जेवणाचा स्वाद घेत आयुष्य जगूया.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 😊
[email protected]