Рет қаралды 348
How to make yellow potato bhaji | how to make potato bhaji | potato bhaji by Swarupa's kitchen | how to make potato bhaji |
साहित्य -
१. उकडलेले बटाटे - ३
२. लसूण - १ चमचा
३. कढीपत्ता - १ काडी
४. हिरवी मिरची - ३ ( तुमच्या चवीनुसार )
५. मोहरी - अर्धा चमचा
६. टोमॅटो - १
७. हळद - १ चमचा
८. कोथिंबीर - पाव वाटी
९. मीठ - चवीनुसार
१०. तेल - २ ते ३ चमचे
पूर्वतयारी -
बटाटे उकळवून थंड करून त्याची साल काढून मध्यम आकारात कापून घ्या.
कृती -
सर्वप्रथम कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की त्यात मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून २ ते ३ मिनिट परतवून घ्या. मग त्यात हळद, कापलेले बटाटे आणि चवूनसार मीठ घालून १ ते २ मिनिट परतवून घ्या. मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमा गरम बटाट्याची भाजी पुरी किंवा चपातीबरोबर सर्व्ह करा.
टिप -
१. भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा.