Рет қаралды 38,557
आज एक मोत्यासारखी पाहुणी आपल्या सोबत आहे. ती मोत्यांची शेती करणारी उद्योजिका आहे. बुलढाण्याची मयुरी खैरे-आंबटकर. एका मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी. उच्चशिक्षण घेऊन एखादी नोकरी करण्याचं तिचं स्वप्नं. पण नोकरीच्या ऐवजी मयुरीने मार्ग निवडला शेतकरी बनण्याचा आणि साधीसुधी नाही तर मोत्यांची शेती करण्याचा. आणि आता ती स्वतः पर्ल फार्मिंगचे धडेही देते.
आज मयुरी एक यशस्वी उद्योजिका आहे आणि लाखोंचा नफा कमावतेय पण काही वर्षांपूर्वी तिला किडनीच्या आजारांन ग्रासलं. तिला स्वतःला आपण दुसऱ्या दिवशी जिवंत असु की नाही याची शाश्वती नसे.
मयुरीच्या उपचारासाठी कुटुंबियांना बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. मोठा खर्च खूप झाला. आपल्या कुटुंबियांमागचा त्रास दूर होईल असा विचार करून मयुरीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला.
दरमयानच्या काळात मयुरीला मोत्यांच्या शेतीची माहिती मिळाली. काहीतरी वेगळं करण्याच्या ध्येयानं तिनं हा मार्ग निवडला. पण या मार्गावरचा प्रवासही तसा सोपा नव्हता. जेव्हा मयुरीनं शिंपल्यांचा पहिला लॉट तयार केला तेव्हा मात्र त्यातील सारे शिंपले मरण पावले.पण हार न मानता मयुरी या क्षेत्रात पाय रोऊन उभी आहे.
मयुरीची कहाणी, तिचा प्रवास तुम्हा-आम्हा अनेकांना प्रेरणा देणारा आहेत तिची सकारात्मकता आपल्यालाही बरंच काही शिकवून जाते. मयूरी आज स्वतः आपल्यासोबत आहे आणि आपण तिच्याशी बातचित करुया