Рет қаралды 481,986
Chicken Sukka | Homemade Chicken Sukka | चिकन सुक्का | Suka Chicken | सुकं चिकन | Recipe By Gharcha Swaad
साहित्य - १ किलो चिकन, २ कांदे बारीक चिरलेले, २ लहान टोमॅटो बारीक चिरलेले, २/३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, २½ tbl spn ठेचलेले आले लसूण, अख्खा गरम मसाला ( १ tea spn जीरे, ५/६ लवंग, ८/९ काळीमीरी, ½" दालचीनी, ३ तेजपत्ता, २ हिरव्या वेलच्या आणि २ मसाला वेलची आणि एक चक्रीफूल ) ¼ कप ओले खोबरे, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, ½ tbl spn धणे पावडर, १ tea spn हळद, ४ tbl spn घरगुती लाल मसाला, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ५ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.
Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट असा आगरी कोळी मसाला - • Agri Koli Homemade Mas...
कृती - एका भांड्यात तेल गरम करून त्यात खडा गरम मसाला परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यानंतर त्यात मिरची आणि आले लसूण घालावे. सर्व मिश्रण परतून घ्यावे. आता यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि कांदा मऊसर परतावा. कांदा परतून झाल्यानंतर यात टोमॅटो घालावी. आता कांदा आणि टोमाटो गळेपर्यंत छान परतून घ्यावीत. एका बाजूला दोन्ही खोबरे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत. कांदा आणि टोमॅटो चांगली तेलात गळल्यावर यात घरगुती लाल मसाला आणि हळद घालावी. मसाला आणि हळद परतून घ्यावी. आता यात धणे पावडर घालावी आणि परतून घ्यावी. संपूर्ण मिश्रण छान परतून झाल्यानंतर यात वाटलेल्या खोबऱ्याची पेस्ट घालावी आणि मसाल्यात एकजीव करावी. एकजीव करून झाल्यावर यात स्वच्छ केलेले चिकनचे तुकडे घालावेत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि चवीनुसार मीठ. चिकन चांगले मिश्रणात एकजीव करून घ्यावे. यात पाण्याचा वापर करायचा नाही म्हणून वर झाकण न ठेवता १० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावे. १० मिनिटानंतर परतून घ्यावे आणि १५ मिनिटे आता वर झाकण ठेवून शिजवून घ्यावे. १५ मिनिटानंतर चिकन परतून घ्यावं आणि गॅस बंद करावा. तयार चिकन सुक्का गरमागरम वर कोथिंबीर शिंपडून सर्व्ह करावं.
टीप - चिकन शिजताना सुरुवातीलाच जर वर झाकण ठेवलं तर चिकन मधून पाणी सुटते. त्यामुळे जर सुक्कं चिकन हवं असेल तर सुरुवातीस १० मिनिटे झाकण उघडे ठेवून आणि नंतर वर झाकण ठेवून अशा पद्धतीत चिकन शिजवल्यास चिकन सुक्का अप्रतिम तयार होतो.
#chickensukkarecipe #indianchickenrecipe #sukachicken
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com