Рет қаралды 93,995
#दालखिचडी #खिचडी #पोटभरीचापदार्थ #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
दाल खिचडी
तांदूळ आणि डाळी दोन्ही समप्रमाणात घ्या. इथे मी तूरडाळ, चणाडाळ, मूगडाळ आणि मसूरडाळ घेतली आहे. डाळी कमीत कमी २ तास भिजवून ठेवा आणि तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवा. नंतर दोन्हीतले पाणी काढून टाका.
कुकरमध्ये डाळ तांदूळ घेऊन त्याच्या तिप्पट पाणी घाला. म्हणजे डाळ तांदूळ दोन्ही मिळून एक वाटी असेल तर तीन वाट्या पाणी घाला. त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घाला व झाकण लावून चार शिट्या घ्या.
आता दुसऱ्या पातेल्यात एक टेबलस्पून तूप घालून ते गरम झाले की जिरे , २ हिरव्या मिरच्या आणि हिंग घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात चिरलेले टॉमेटो घालून त्यावर हळद, तिखट, गरम मसाला, आणि थोडेसे मीठ टाकून परतून घ्या. टोमॅटो शिजले की त्यात शिजलेले डाळ तांदूळ घालून नीट मिक्स करून घ्या. गरज असेल तर थोडेसे गरम पाणी घाला. याला वरुन फोडणी देण्यासाठी एका भांड्यात तूप गरम करून घ्या. त्यात राई, जिरे, हिंग, बारीक चिरलेला लसूण, आल्याचे बारीक उभे काप (ज्युलियन), सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी करावी. गॅस बंद करून त्यात एक चमचा काश्मिरी तिखट रंगासाठी घालावे. आता ही फोडणी खिचडीवर घालावी.
ही खिचडी मस्त तूप घालून गरमागरम सर्व्ह करावी.
माझी मनपसंत खरेदी:
• My shopping | माझी मनप...
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040