वसईची सुप्रसिद्ध वाल वांग्याची भाजी | Vasai's famous Vaal bhaji [With English Subtitles]

  Рет қаралды 122,713

Sunil D'Mello

Sunil D'Mello

3 жыл бұрын

वसईची सुप्रसिद्ध वाल वांग्याची भाजी | Vasai's famous Vaal bhaji
वसई शेतीप्रधान प्रदेश आहे आणि भाताची कापणी झाल्यानंतर शेतात जो ओलावा असतो त्यावर वाल व वांग्यांची लागवड केली जाते. वालापासून बनवलेले विविध पदार्थ वसईकर बनवतात मात्र कोवळे वालाचे दाणे व काळी रवईची वांगी वापरून केलेली भाजी वसईकरांना विशेष आवडते.
कामानिमित्त वसईकर जगभर पसरलेले आहेत व त्यांनी हे वाल जगभरात आपल्या परसदारी उगवलेदेखील आहेत. तर अशी ही वाल वांग्याची पारंपरिक व सुप्रसिद्ध भाजी आज गजानन तात्या व दमयंती काकू आपल्याला बनवून दाखवणार आहेत.
ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
गजानन तात्या व दमयंती काकू, ब्राम्हण पडई
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
झटपट बनणारे पानगे
• गुड फ्रायडेला नक्की का...
कोवळ्या फणसाची भाजी
• कोवळ्या फणसाची भाजी, च...
पारंपरिक शेंगदाणा आमटी
• सामवेदी ब्राह्मण समाजा...
पारंपरिक आगरी खापोळे
• पारंपरिक आगरी खापोळे |...
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
• पारंपरिक कुपारी खाद्यप...
कुपारी स्वीट डिश सामट्यो
• पारंपरिक कुपारी स्वीट ...
तांदळाची भाकरी
• मातीच्या तव्यावरील तां...
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
• वसईची पारंपरिक पोपटी अ...
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Rec...
#limabeans #vagobha #vaalvaanga #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai

Пікірлер: 750
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वसईची सुप्रसिद्ध वाल वांग्याची भाजी | Vasai's famous Vaal bhaji वसई शेतीप्रधान प्रदेश आहे आणि भाताची कापणी झाल्यानंतर शेतात जो ओलावा असतो त्यावर वाल व वांग्यांची लागवड केली जाते. वालापासून बनवलेले विविध पदार्थ वसईकर बनवतात मात्र कोवळे वालाचे दाणे व काळी रवईची वांगी वापरून केलेली भाजी वसईकरांना विशेष आवडते. कामानिमित्त वसईकर जगभर पसरलेले आहेत व त्यांनी हे वाल जगभरात आपल्या परसदारी उगवलेदेखील आहेत. तर अशी ही वाल वांग्याची पारंपरिक व सुप्रसिद्ध भाजी आज गजानन तात्या व दमयंती काकू आपल्याला बनवून दाखवणार आहेत. ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. विशेष आभार, गजानन तात्या व दमयंती काकू, ब्राम्हण पडई छायाचित्रण व संकलन, अनिशा डि'मेलो आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज झटपट बनणारे पानगे kzfaq.info/get/bejne/atKRfNSAr7q8qKM.html कोवळ्या फणसाची भाजी kzfaq.info/get/bejne/fMWIqLWhnJjSoWg.html पारंपरिक शेंगदाणा आमटी kzfaq.info/get/bejne/a8pim7WHzq-9p58.html पारंपरिक आगरी खापोळे kzfaq.info/get/bejne/psx5dZVosbneo2w.html कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का kzfaq.info/get/bejne/Z5mTkrB6tr-uXZ8.html कुपारी स्वीट डिश सामट्यो kzfaq.info/get/bejne/qZd8lJuAnci0iqM.html तांदळाची भाकरी kzfaq.info/get/bejne/pt2TdpSAm9HRhKM.html वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी kzfaq.info/get/bejne/fa6Yq7h30L3DiWw.html इतर सर्व रेसिपीज kzfaq.info/sun/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #limabeans #vagobha #vaalvaanga #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
@maryfalcao8822
@maryfalcao8822 3 жыл бұрын
Thanks Mr.sunil
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@maryfalcao8822 Ji, thank you
@maryfalcao8822
@maryfalcao8822 3 жыл бұрын
@@sunildmello wel come, sunilji u r great.
@adv.vinaykumarbodake622
@adv.vinaykumarbodake622 3 жыл бұрын
Q
@roopaliwalwaikar2818
@roopaliwalwaikar2818 2 жыл бұрын
कांदा अजेबाद वापरलेला नाही. करून पाहुया.
@aartiutpat6626
@aartiutpat6626 3 жыл бұрын
सुनिलजी तुमच्या प्रत्येक रेसिपी मध्ये एक वेगळेपणा असतो काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि स्थानिक लोकांशी असलेले तुमचे जिव्हाळ्याचे संबंध जपलेली नाती कुठेही कृत्रिमता नाटकीपणा नाही मराठी भाषा हल्ली मराठी भाषिकही एवढी चांगली बोलत नसतील एवढे आपले मराठीवर प्रभुत्व आहे खूप सुंदर रेसिपी नक्की करून पाहणार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आरती जी. भाजी नक्की बनवून पहा व आपला अनुभव आम्हालाही कळवा.
@chetanchoudhari2227
@chetanchoudhari2227 2 жыл бұрын
मॅडम आपण ,बहुदा वसईत राहत नसेल किंव्हा वसईत आलेल्या नसाल,कारण वसईतील ख्रिस्ती समान समाज हा पूर्णपणे मराठी आहे व त्यांची मातृभाषा ही मराठीवर आधारित असलेली स्थानिक भाषा आहे व. हा स्थानिक समाजआहे आणि ख्रिस्ती समाज यांचे वसईतील इतर पूर्वंपार समजाशी खूप जिव्हाळ्याचे व घरोब्याचे नाते असते तसदीबद्दल माफी असावी
@varshamantri2000
@varshamantri2000 2 жыл бұрын
Asyach padhtine vala golachi bhaji Alibaug patta t keli jata.
@sunilkotasthane4748
@sunilkotasthane4748 2 жыл бұрын
खरंच अगदी अस्खलित मराठी बोलतात सुनील जी. अगदी प्रभावी.
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 3 жыл бұрын
भाजी अप्रतिम झालीच असेल पण त्याहूनही अधिक लज्जतदार पणा तात्या व काकुंच्या अनुभवी टिप्पणी मुळे येतो. अशी प्रेमळ माणसं मिळणं हे भाग्य आहे.🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद
@tushar1618
@tushar1618 3 жыл бұрын
बनवून पाहिली. अप्रतिम झाली होती भाजी. धन्यवाद सुनील भाऊ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, खूप छान. धन्यवाद, डॉक्टर जी
@rajshreesonar3166
@rajshreesonar3166 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम Video पूर्ण होई पर्यंत तोंडाला पाणी सुटले मी लवकरात लवकर ही भाजी बनवण्याचा प्रयत्न करेन आभारी आहोत
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा, राजश्री जी. धन्यवाद
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
खुप छान रेसीपी अश्याच पारंपारिक रेसीपी पाठवत जा खुप,शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, प्रविणा जी
@minalvartak8095
@minalvartak8095 5 ай бұрын
खूप छान , अप्रतीम सुनील भाऊ धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, मीनल जी
@rekhasawant4322
@rekhasawant4322 Жыл бұрын
Waaaaah 👌 Bachpan me friends ke ghar khai hai ye bhaji Bahot testy lagta hai I'm Gujrati
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
बहुत बहुत बहुत, रेखा जी
@dhanashreejoshi3365
@dhanashreejoshi3365 3 жыл бұрын
खूपच छान रेसिपीज आणि माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, धनश्री जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 3 жыл бұрын
Vaah mastch parnparik recipe. Khup chan lagte hi bhaji ruchkar
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 жыл бұрын
Wow .. my favourite bhaji thanks for sharing recipe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Blossy Ji
@virendravaidya7714
@virendravaidya7714 3 жыл бұрын
तात्यांची कमाल आहे ,त्यांच्या हातात अन्नपूर्णा आहे,जे काही करतील ते चविष्ट आणि रूच्करच असते तात्यांना नमस्कार, आणि सूनीलना आम्हाला व्हिडिओ दाखवला त्या बद्दल आभार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
तात्यांनी बनवलेले सर्व पदार्थ खरोखरच खूप चविष्ट असतात. धन्यवाद, वीरेंद्र जी
@PritamKhedekar
@PritamKhedekar 10 ай бұрын
mast, khup chaan.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
धन्यवाद, प्रीतम जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
खुप छान पारंपारिक रेसिपी, बघुनच तोंडाला पाणी सुटले. काका काकूंचेही आभार. सुनिल नेहमीप्रमाणेच आणखी एक चांगला विडिओ होता. खुप खुप.....धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@janhavideshpande1
@janhavideshpande1 3 жыл бұрын
I made this bhaji, it came out super duper yummy! In US we don’t get tasty Vance like in India, but still bhaji came out super. This was first time I followed step of covering it with plate filled with water and not adding a drop of water inside pan. And potato, waal was cooked perfectly! Hats off to Tatya & Kaku🙏🏻 Thanks Sunilji for capturing it. Waiting for masala recipe.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Amazing...Glad that it worked well for you. Thank you, Janhavi Ji
@gtakalkar3904
@gtakalkar3904 3 жыл бұрын
सुनील जी नमस्कार! तात्या आणि काकु यांनी बनवलेली वाल वांग्याची भाजीचा सुगंध येथपर्यंत दरवळला!!! खूप सुंदर रेसिपी बघायला मिळाली. ही भाजी मात्र आंम्हाला बनवायला शक्य आहे व बनवूत. मस्त रेसिपी दाखवल्या बदल धन्यवाद डिमेलो जी💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद👌💐🌺
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद, टाकळकर परिवार
@bhavnaudwadia7186
@bhavnaudwadia7186 3 жыл бұрын
Khupch sunder family members ashey Sunder samzavt aahey
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भावना जी
@sharadbhalerao4995
@sharadbhalerao4995 3 жыл бұрын
Khup chan asech padarth dakhavat raha
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, शरद जी. धन्यवाद
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
माझी फेवरेट भाजी (वांगी बटाटा). पातळ भाजी असेल तर शेवग्याच्या शेंगा घातल्यास फारच अप्रतिम चव लागते. ही भाजी non-veg पद्धतीने (सुका कोलीम घालून) सुद्धा बनवली जाते. Nice Video.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, आपण खूपच सुंदर रेसिपी सांगितली, विलास जी. धन्यवाद
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
अप्रतिम भाजी सुनील जी तुमि नेहमी छान छान रेसिपी दाखवता तुमची मराठी भाषा खूप चांगली आहे ,
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@deepalidesai8940
@deepalidesai8940 3 жыл бұрын
खूप सुंदर भाजी आहे नक्कीच करुन बघेन
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा, दीपाली जी. धन्यवाद
@arunapatil7255
@arunapatil7255 5 ай бұрын
तुमचे किती आभार मानावेत समजत नाही माझ लहानपण अलिबागच त्यामुळे हे सर्व व्हिडिओ खूप जवळचे वाटतात
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@hemamayekar1720
@hemamayekar1720 7 ай бұрын
खूपच सुंदर
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
धन्यवाद, हेमा जी
@arativaidya4805
@arativaidya4805 3 жыл бұрын
खूप सुंदर दिसत आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, आरती जी
@pramoddhamangaonkar9077
@pramoddhamangaonkar9077 Жыл бұрын
सुनील धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, प्रमोद जी
@nileshnaik3171
@nileshnaik3171 3 жыл бұрын
आवडले. पाहताना शाकाहारी असून सुद्धा तोंडाला पाणी सुटले. व्हीडिओ पाहताना प्रत्यक्ष तिथे उपस्तिथ असल्यासारखे वाटते. सुनील दादा हल्ली वेगवेगळे विषय घेतात. शोधतात. त्याचे कौतुक वाटते. 🌹
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 3 жыл бұрын
खूपच छान भाजी केली तात्या काकी यांनी अनुभव अतिशय परफेक्ट आहे छान व्हिडीओ माझा सर्वांना मनापासून 🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मृण्मयी जी
@durgapatil5892
@durgapatil5892 3 жыл бұрын
Bouth khub mast boss
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दुर्गा जी
@minalbhole9156
@minalbhole9156 3 жыл бұрын
Vaghaoba khupch chhan .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मीनल जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
खरच खूपच छान...तोंडाला पाणी सुटले...नक्की करून पाहणार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पाहा व आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद, रश्मी जी
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अशोक जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
वाल आणि वांग्याची भाजी छानच लागते... धन्यवाद सुनीलजी......
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 3 жыл бұрын
भाजी खुप छान. गेल्या व्हिडिओ ला मी प्रमाणा संदर्भात कमेंट केली होती ते तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये लक्षात ठेउन तशी सुधारणा केली आहे याबद्दल खुप धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सागर जी
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 3 жыл бұрын
OMG. I love this bhaji. Thank you Sunil ji for sharing.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Namrata Ji
@user-pc8qy3lf8f
@user-pc8qy3lf8f 3 жыл бұрын
नवीनच भाजी बघायला मिळाली.काका-काकू पण मस्त.....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अनुजा जी
@arunbm123
@arunbm123 Ай бұрын
God bless Tatya..May he prepares his dishes for many more generations
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thank you, Arun Ji
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 3 жыл бұрын
नक्की आवडला तुमच्या वीडियो ,सुपर्ब
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@balrajshirke3078
@balrajshirke3078 3 жыл бұрын
अप्रतिम भाजी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, बलराज जी
@vinaysaynekar
@vinaysaynekar 3 жыл бұрын
मस्त. अप्रतिम. वाल आणि वांगी माझे दोन्ही आवडते. आणि खास वसईच्या या दोन्ही भाज्यांची चव घेतल्याशिवाय कळणार नाहीत आणि एकदा खाल्ली की विसरणार नाही. धन्न्यवाद, सुनिलजी.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, विनय जी. धन्यवाद
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
सुनील सर, गजानन तात्या, काकू यास विनम्र अभिवादन...!!🙏🙏🙏 ❤️ वाल वांग्याची तथा वाघोबा भाजी लज्जतदार , स्वादिष्ट,अप्रतिम अशीच ❤️सदर भाजी आणि त्या अनुषंगाने येणारी इत्यंभूत माहिती छान विषयाला साजेशी अशीच ❤️साधी राहणी उच्च विचारसरणी या वाक्याला साजेसे सुनील सरांचे चित्रफीत कार असे व्यक्तिमत्व सदर चित्रफितीस वेगळीच झळाळी आणते ❤️सुनील सरांची सुंदर थोडीशी कादोडी मिश्रित भाषा त्याचा छान लहेजा कानात निरंतर असाच गुंजत राहतो. ❤️ सब title ✌️💃✌️🎥✌️👌💃 अब आयेगा मजा ❤️👍🙏 ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास फार पूर्वी ऐंशी चे दशकात गॉर्डन ग्रिनीजे हा वेस्ट इंडिज चा सलामीचा फलंदाज असायचा तो एकदा खेळपट्टीवर टिकला की भले भले विरुद्ध संघाच्या गोलंदाजांची नक्कीच भंबेरी उडायची ..आणि इथे ही तसेच चित्र दिसतंय आज सर्वार्थाने सुनील सरांनी आपल्या चॅनेल वर सदर सब title ही सुविधा सर्व दर्शकांना देऊन एक प्रकारे अशक्यप्राय अशीच कामगिरी सहजशक्य करून तमाम दर्शक वर्गाला अमूल्य भेट देऊ केली आहे याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@aartiutpat6626
@aartiutpat6626 3 жыл бұрын
अप्रतिम प्रतिक्रिया 👌🏿👌🏿👌🏿👌🏿
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
गिरीश जी, आपल्या ह्या अप्रतिम प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, आरती जी, गिरीश जी नेहमीच सुंदर प्रतिक्रिया देतात. धन्यवाद
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
माझी फेव्हरेट भाजी वाल आणि वांगी 👌👌👌1 नंबर बनवली तात्यानी 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, छाया जी
@pallavikadam4437
@pallavikadam4437 2 жыл бұрын
Khup sunder
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पल्लवी जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 3 жыл бұрын
वाल वांग्याची भाजी खूप छान ..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, वसई किचन
@nehaphatkare7804
@nehaphatkare7804 Жыл бұрын
Wow sundar val vangi chi bhaji yummy
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
@apekshagharat8490
@apekshagharat8490 3 жыл бұрын
Khupch sundar testy vala ye gole aani vangi bhaji sunildada chanch tondala pani sutle👍👍👍👍👍👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अपेक्षा जी
@gulabcorreia6198
@gulabcorreia6198 3 жыл бұрын
Khup chan
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गुलाब जी
@vaishalibodas3646
@vaishalibodas3646 3 жыл бұрын
अप्रतिम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, वैशाली जी
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 3 жыл бұрын
खूप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, लीना जी
@prakash9782
@prakash9782 3 жыл бұрын
D'mello sir bhaji . Tatya. Kaku amazing 😊😊😊👍👍👌❤❤
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@jyotidate6204
@jyotidate6204 3 жыл бұрын
अतिशय सुरेख निवेदन आणि सादरीकरण!!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ज्योती जी
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
वाल वांगे ची भाजी मस्त तात्या काकु चांगली रेसिपी दाखवली आभारी सुनील तुमचेही मनःपुर्वक आभार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@KalashnikovCult
@KalashnikovCult 3 жыл бұрын
Ekdam chavishta👌🏽👌🏽👌🏽Tatya Kakkuna Namaskaar kalav🙏🏽 aamhi paavte hi banavta vaangya barobar
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की कळवतो, राज जी. धन्यवाद
@ManishaPatil-uk7bq
@ManishaPatil-uk7bq 3 жыл бұрын
Sunder bhaji tatya ka kunacha hatchi sunder aavedli fekt tatya aslya mule kakuchi Cheshta maskeri miss keli sanskar dislet nevryache pudyat jasti bolet nahit khup chan so sweet masalychi recipi dakhva
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अरे वाह! मानलं आपल्याला...आपण अगदी बरोबर हेरलं, मनीषा जी. धन्यवाद
@vinodtawde9839
@vinodtawde9839 3 жыл бұрын
सुनील तुझे सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात मी ते बघतोच असेच बनवत सर्व विषय घेऊन धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विनोद जी
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 3 жыл бұрын
खरंच अप्रतिम!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सर 🙏
@santoshmanjrekar965
@santoshmanjrekar965 3 жыл бұрын
Thanks Sunil tatya and kakula punha bhaji recp dakhwayala bolawale . Tatya far tasty bhaji banawali far sundar asha recp dakhwat ja
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@tejashribadrike6449
@tejashribadrike6449 3 жыл бұрын
Sunil. Khup Khup dhanyawad. God.bless Tatya and kaku
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, तेजश्री जी
@matildatuscano5625
@matildatuscano5625 3 жыл бұрын
फार छान आहे वाल वांग्याची भाजी. थोडक्यात पुरणाची भाजी.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मॅटील्डा जी
@meenatuscano4340
@meenatuscano4340 3 жыл бұрын
वालाची भाजी मागच्या कित्येक वर्षांपासून बनवून खातो, परंतु भाजी बणवणयाची अचूक पद्धत काका काकू कडून समजली, आभारी सुनिल
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, मीना बाय
@bharatikorgaokar3102
@bharatikorgaokar3102 2 жыл бұрын
Sunder. Mouth watering.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, भारती जी
@SapnaThakur-gx5rz
@SapnaThakur-gx5rz 3 жыл бұрын
Mastch 1 veglich receipy
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सपना जी
@alexmachado6966
@alexmachado6966 3 жыл бұрын
मस्त चविष्ट...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आबारी मामा
@archanaraut8878
@archanaraut8878 3 жыл бұрын
Khup.chn तात्या व काकुणा नमस्कार दादा तुलाधन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@vaijayantilimaye6424
@vaijayantilimaye6424 3 жыл бұрын
फारच चविष्ट दिसत्ये भाजी 👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, खूपच चवदार असते ही वाल वांग्याची भाजी. धन्यवाद, वैजयंती जी
@janhavideshpande1
@janhavideshpande1 3 жыл бұрын
Wow!! Thank you so much for capturing this expert chef’s skillful recipe and sharing it with us. ! Can’t wait to try it.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Janhavi Ji
@kabrakabra
@kabrakabra 3 жыл бұрын
Such variety of preparations.. thanks for this wonderful recipe...must be super tasty👌👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, it was very tasty. Thank you
@NehaThakur-wj8us
@NehaThakur-wj8us 3 жыл бұрын
👌वसईच्या स्थानिक लोकांची अत्यंत आवडणारी वाल वांग्याची भाजी,वालाच्या शेंगांचा सिझन असला की घरात कितीतरी वेळा शिजवली जाते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, नेहा जी. धन्यवाद
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 жыл бұрын
वघोबा भाजी सुंदर चमचमीत दिसते आहे!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, खूपच चमचमीत असते. धन्यवाद, शिवप्रसाद जी
@ruchirdighe1961
@ruchirdighe1961 3 жыл бұрын
chaya sarvach recipe khoop khoop chan 👌👌👌🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रुचिर जी
@avanipatil2861
@avanipatil2861 3 жыл бұрын
Tumche video khup chhan astat 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अवनी जी
@harshdesai6854
@harshdesai6854 3 жыл бұрын
Saravat soppi aani chavisht bhaji majhi aavdati❤️😘
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, खूपच चविष्ट. धन्यवाद, हर्ष
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 3 жыл бұрын
Khoop chan
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वतीका जी
@aforaaru2903
@aforaaru2903 3 жыл бұрын
I want to taste this vegetable made by lovely Tatya n kaki.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Aarti Ji
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 жыл бұрын
वसईची लाल वांग्याची भाजी, गोळा भाजी खुप प्रसिद्ध आहे. हे मला आपल्या युट्यूब चैनल द्वारे पहातां आले. खूपचं रेसिपी आहे भाऊ आपलं युट्यूब चैनल वरचं छान एपिसोड असतात. काका व काकूंनी खुपचं छान वाल वांग्याची भाजी करुन दाखवली गेली त्या बद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद, असेच नवनवीन एपिसोड आपल्या युट्यूब चैनल वर दाखवत जावे. भाऊ, आपलं मनःपुर्वक धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र, वसई - शहर
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विमल जी जय हिंद! जय महाराष्ट्र!!
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
Very fresh Wal n VANGI BHAJI, I am loving it so mouthwatering Superb ☺️👌☺️👌☺️👌😜😛🥰🥰🥰🥰
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@prabhuo7281
@prabhuo7281 3 жыл бұрын
You are best host thanks a lot sir
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Prabhu Ji
@arunnaik5592
@arunnaik5592 2 жыл бұрын
Bhari receipe, mala avadala tumche kam, aikdam mast.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@chetanchoudhari2227
@chetanchoudhari2227 2 жыл бұрын
एकदम मस्त, तोंडाला पाणी सुटले,मी शोधला होता हा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पण सापडला नव्हता,धन्यवाद सूनीलजी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, चेतन जी
@VirShri
@VirShri 3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@vijaypawar3173
@vijaypawar3173 3 жыл бұрын
Aprateem Vaghoba!!🙏 Sunil ji, Tumhi agdi natural,modest, down to earth aahaat. U r the Best KZfaqr. Good Wishes. 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Vijay Ji
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
खूपच छान वाल वांग्याची भाजी.बघून तोंडाला पाणी सुटलं.👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मीनाक्षी जी
@OV_kitchen_marathi
@OV_kitchen_marathi 3 жыл бұрын
Bhaji ekdum mast👌👌👌ek number zali ahe😃
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@preranakulkarni9751
@preranakulkarni9751 3 жыл бұрын
Wow thank u आवडीची भाजी दाखवल्या बद्ल
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रेरणा जी
@chandrakalav4118
@chandrakalav4118 3 жыл бұрын
Tatya ,kaku nchi vishesh tippani lajjatdar.bhaji chavdar .vidio chhandar.premal vasai.👍👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रकला जी
@prajakta3010
@prajakta3010 3 жыл бұрын
wawww... bhaji baghun ch tondala pani sutla... khup chhan ... ani tatya ani kaku yanni kiti sadhepanane ti share keli...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्राजक्ता
@johnrodrigues2026
@johnrodrigues2026 Жыл бұрын
Recipe is great.... 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, John Ji
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
Khupach chhan bhaji keli tatyanni 👌👌👌😋😋😋
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सरिता जी. धन्यवाद
@jyotsnashah4923
@jyotsnashah4923 2 күн бұрын
Wow
@sunildmello
@sunildmello Күн бұрын
Thank you, Jyotsna Ji
@roshanfurtado943
@roshanfurtado943 3 жыл бұрын
wow.. so nice bro..mazi aawadtee bhaji
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रोशन जी
@linusfernandes6100
@linusfernandes6100 3 жыл бұрын
वाह क्या बात.....!!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, लिनस जी।
@arvindlakhmapurkar69
@arvindlakhmapurkar69 3 жыл бұрын
Sunilbhau, You are luckiest person for Tatya & Kaku are with you for traditional regional food recipe and taste enjoyed & shared by you. Thank you.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
You are absolutely right, Arvind Ji. Thank you
@sanjayraut1729
@sanjayraut1729 3 жыл бұрын
वाल वांग ही पारंपारिक पद्धतीने दाखवलेली रेसिपी खूपच सुंदर आहे गजानन तात्या आणी काकूंना नमस्कार व सुनील तुमचे मनापासून आभार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@kripadeshpande9246
@kripadeshpande9246 3 жыл бұрын
अप्रतिम.. लकी आहात तुम्ही! टेस्टी भाजी तात्या काकूंची साधी छान रेसीपी! तोंडाला पाणी सुटले 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण, कृपा जी. धन्यवाद
@smitachandane107
@smitachandane107 3 жыл бұрын
Thanks D'melo sir, माझी फर्माईश पुर्ण केलीत.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@megharai6558
@megharai6558 3 жыл бұрын
Awesome, will def try at home, thnku for such mouthwatering receipe vlogs, luv to c more,keep it up❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, please do try and let us know about your experience here. Thank you, Megha Ji
@ruchirdighe1961
@ruchirdighe1961 3 жыл бұрын
TatyA chaya sarvach recipe khoop khoop chan 👌👌👌🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रुचिर जी
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 3 жыл бұрын
Vasaikars are lucky to get fresh vegetables and flowers at reasonable prices. Fresh vegetables taste awesome.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, you are right, Sharmila Ji. Thank you
@Nana-Kunwar
@Nana-Kunwar 3 жыл бұрын
Mix masalla shikwa laukar. Wonderfully banawlela Waghoba.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, लवकरच व्हिडीओ अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद, नाना जी
@artiraut8970
@artiraut8970 3 жыл бұрын
Thank you Tatya, Kaku and Sunil for sharing my favorite bhajis recipe came to know many new tips and will definitely try it with the new tips next time. 🙏🏽
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, please try it out and let us know about your experience. Thank you, Arti Ji
@neerajpatil6653
@neerajpatil6653 3 жыл бұрын
सूंदर
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नीरज जी
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 59 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН