घाट चढून आल्यावर पावसाने केली दैना, पावसातच बाणाईने बनवले मस्तपैकी जेवण | anda curry | BanaisRecipe

  Рет қаралды 444,888

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Ай бұрын

घाट चढून आल्यावर पावसाने केली दैना, पावसातच बाणाईने बनवले मस्तपैकी जेवण | anda curry | BanaisRecipe
#andacurry
#banaisrecipe #dhangarijivan
#अंडाकरी #recipe #cooking #siduhake

Пікірлер: 409
@lilachavan6133
@lilachavan6133 Ай бұрын
अगं बाईआम्ही घरात असून एखाद् एक्स्ट्राकाम केलं तर संध्याकाळी नुसता मसाला भात करतो. आणि तुम्ही एवढे दिवसभर घाट चढून सुद्धा वाटण वाटून अंड्याचे कालवण केले . खरंच तुम्ही सगळे खूप मेहनती आहात
@aaishwaryasangle2793
@aaishwaryasangle2793 Ай бұрын
बानाई ताई सकाळी तीनला उठून, सगळ्यांना स्वयंपाक करून, ५ घोडी घेऊन व्हिडिओ काढत घाट पार केला, एवढं दमुन पडत्या पाऊसात स्वयंपाक केला तो पण हसत, सलाम आहे बानाई ताई तुला 🙏🙏🙏
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 Ай бұрын
स्त्रियांच्या कामाची कदर करणे त्यांचा आदर करणे हेच खूप महत्त्वाचं असतं.... दिवसभराचा थकवा दूर होतो दोन शब्दाच्या कौतुकाने😊
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Ай бұрын
आम्ही थकलो घाट पाहून पण तुम्ही येऊन चुलीवर जेवण करता आणि तरी किती हसतमुख आहात सलाम तुम्हाला देव तुम्हाला असेच बळ देवो.
@NG-hj7zt
@NG-hj7zt Ай бұрын
सासरे बघा सूनांसाठी अंडी मागे राहतात का याची काळजी घेतात..खूप चांगले कुटुंब.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@prachikhirade6369
@prachikhirade6369 Ай бұрын
टिव्ही मधले scripted बिग बॉस, खतरों के खिलाडी बघण्यापेक्षा यांची खरोखरच वाटचाल बघा.. आपलं जीवन किती सुखाच आहे ते समजल..
@sandiplavate3413
@sandiplavate3413 Ай бұрын
पाऊसापाण्यात दिवसभर चालून देखील सुद्धा चेहऱ्यावर किती आनंद ओसंडून वाहत आहे....
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
पावसापाण्याचे जपा सारीजण...बाणाई तुझी कमाल गं बाई.... ऊन पाऊस थंडी सार्याला तोंड देतीस.. हसतमुखाने.💐💐💐👌👌👌
@mandakinishinde5171
@mandakinishinde5171 Ай бұрын
बानाई कुठल्या मातीची बनवली देवानं साक्षात लक्ष्मी आहेस सर्व जण किती आनंदी आहात देव तुम्हाला असच हसतखेळत ठेवो
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y Ай бұрын
खूपच खडतर जीवन पण कोणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नाही. सर्वांची काळजी घ्या दादा. सर्वजण हसतमुखाने संकटाशी मुकाबला करीत आहेत. सलाम सर्वांना.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
पावसात 🌧️🌧️🌧️खूप धावपळ होते. आम्हाला बघूनच कीती टेन्शन होते पण तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आम्हाला घरात बसून टेन्शन होत🙏🙏 वहिनी चा एवढ्या पावसात पाट्यावर वाटून जेवण हसत मुख बनवतात. ग्रेट वहिनी 🙏🙏 बाळू मामाचां आशीर्वाद 🙏तुमच्या पाठीशी आहे.🙏🙏 त्यामुळे तुमच्यावर कुटलच संकट येणारं नाही 🙏🙏
@lilawalunj2685
@lilawalunj2685 Ай бұрын
हया वर्षी खूप पाऊस होवो आणि तुम्हाला मेंढया घेऊन थोडे दिवस का होईना गावी जाता येवो, हिच देवाकडे मागणी 🙏🙏
@nandakeni2291
@nandakeni2291 18 күн бұрын
आज वाडा गोकुळासारखे एकत्र जेवायला बसलाय नशीब लागत सर्व एकत्र जेवायला ❤
@smitagolande2058
@smitagolande2058 25 күн бұрын
धन्य आहेस बाणाई तू. कुठलही इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताशी नाही तरीही न वैतागता ,पावसा पाण्याचा एवढा स्वयंपाक केला,त्याची कुठेही प्रौढी नाही,चिडचिड नाही.खूपच शांत आणि छान आहे बाणाई ❤
@Manoj_3033
@Manoj_3033 Ай бұрын
कष्टाची भाकर किती गोड लागते ..वरतुन इतका भयानक पाऊस चालु त्यात चुलीवरची गावरान कोंबड्याच्या अंड्याची भाजी आणि चुलीवरच्या भाकरी काय मजा येत असेल खायला..आमच्या शेतात पण मेंढपाळ विसाव्याला राहतात त्यांच्या चुलीवरच्या भाकरीचा खरबुस वास माणसाच पोट भरलेल राहिलना तरी परत कडक भुक लागणार.. तुम्हाला सलाम आहे ...
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 Ай бұрын
Banai चहा पीत नाही विशेष तुमचे आई दादा पण खूपच कष्टाळू आहेत तुमच्या बरोबरीने काम करतात खरंच तुमच्या धनगरी जीवनाला सलाम
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
बापरे खोपोली ते कार्ला फाटा एवढी मजल मारली तूमच्या कष्टाला सलाम कालच्या कमेटचे उत्तर मिळाले पावसात लय परवड होते तरी संभाळून रहा धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा
@notoriousbella1875
@notoriousbella1875 Ай бұрын
तुम्हाला आलेल्या सर्व कमेंट लोक वाचतात सगळे छान बोलतात एवढ भारी वाटत ना लोक खूप व्हीडीओ युटुबला टाकतात पण एवढे भारी कुणाचेही नसतात एकदम मस्त
@dhangarijivan
@dhangarijivan Ай бұрын
🙏🏻
@manishapatil9813
@manishapatil9813 Ай бұрын
येवढ्या भारतात तुमच्या सारखे तुम्हीच. कोणालाही नाव ठेवण्या सारखे नाही. अतिशय प्रेमळ आणि मन मिळवू. अशी माणसे शोधून सापडणार नाहीत. मानलं तुम्हा सर्वांना ग्रेट पेक्षा ही ग्रेट. 🙏तुम्हाला साष्टांग नमस्कार.
@rajendrapawar291
@rajendrapawar291 Ай бұрын
गेल्या वर्षी गावी जाताना नाही दादा यावर्षी तुमच्या भागामध्ये खूप पाऊस झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला गावी जाता येईल पंढरीच्या पांडुरंग कडे माझे मागणे आहे तुमच्या गावी खूप पाऊस व्हावा❤❤❤
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 Ай бұрын
खरे Nomadic tribe पण फायदा घेतात बंगल्यात राहणारे लाजा वाटू द्या बाबा साहेबाना खरे अभिप्रेत यांचे कल्याण होते पण फायदा दुसरेच घेतात. सिद्धू भाऊ मला एक दिवस तुम्हाला भेटायला खूप आवडेल सुख म्हणजे काय असेच आनंदी राहा लेकरणान चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा
@arunapawar5796
@arunapawar5796 Ай бұрын
आमच्या दारात सुद्धा दरवर्षी धनगर दोन महिने राह्याला यायचे त्यावेळी मोकळा माळ होता आता घर बंगले झालेत.. त्यामुळे आता येत नाहीत.. वाशीचे धनगर येत होते😊 मोठा डालग्या खाली लहान पिली झाकून दिवसभर मेंढ्या फिरवायला जायचेत.. रात्री येऊन चूल पेटवून दूध गरम करायचे जेवण गरम करायचे आणि जेवायचे सकाळी त्यांच्या गावावरून जेवण येत होत.. कधी पाऊस पडला तर चूल पेटायची नाही त्यावेळी मी त्यांना भात करून द्यायची चहा करून द्यायची .. त्यांचं जीवन आम्ही जवळून बघितला आहे.. खूप कष्ट असतं..
@MomsMagic.
@MomsMagic. Ай бұрын
बनाई ताई नशीबवान आहेस तू अशे सासरे आणि सासू मिळाली तुमचं कुठुंब जस की गोकुळ वृंदावन
@girishthakare3484
@girishthakare3484 Ай бұрын
❤🌹 सगळे जण इतके करुन आले आहेत तरी सुद्धा बाणाईने एवढं वाटुन घाटुन अगदी आनंदाने स्वयंपाक करून सर्वांना पोटभर जेवण देऊन तृप्त केले धन्य ती बाणांनी बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🎉🎉
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Ай бұрын
खरे कष्ट ... मेहनत जास्त आणि मोबदला कमी.. पण हा जो आनंद आहे ना तो पृथ्वीतलावर कुठेच सापडणार नाही. भाऊ प्रथम तुमच्या जिद्दीला कडकडीत सलाम.. इच्छा शक्ती असेल तर माणूस कश्यातच मागे वळून बघत नाही. कल्पनाच करवत नाही. की, एवढा व्याप सांभाळून युट्यूब चालवणे हे धाडस कौतुकास्पद आहे...
@Navnath_madane
@Navnath_madane Ай бұрын
देवा पांडुरंगा पुरंदर तालुक्यात खुप पाऊस पडुदे आणि तेथील सर्व सुखी समृद्ध ठेव आणि मेंढी माउलीची सेवा करणारे सर्व कुटुंब सुखी समृद्ध होऊदे 🚶🐏🐏🐏 स्थलांतरित कुटुंबातील ५ व्या पिढीतील सुखी समृद्ध शेतकरी पंढरपूरकर❤
@shekhardhaigude6965
@shekhardhaigude6965 19 күн бұрын
बाणाईल माझा सलाम…मी पण धनगर आहे ..पुण्यात बिज़नेस आहे…आमच्या बायका भाजी आणायला गेले की कंटातलात आणि काहीतरी नाष्ठआ करा म्हणताय बाहेर आणि डाळ भात बनवतात…गावाला अजून चुलते बकरी सांभाळतात…नीरा जवळ राहतो
@sachinmeshram3912
@sachinmeshram3912 28 күн бұрын
Sir tumchay video mala kupp aavadtat lay bhari
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 Ай бұрын
किती कष्ट करतात, येवढं चालून पण वेळेवर स्वयंपाक
@shubhamdimblay3986
@shubhamdimblay3986 Ай бұрын
ह्या कुटुंबाचा सर्वांनी आदर्श घ्यावा खूप छान कुटुंब आहे खरच ❤
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Ай бұрын
तुमचे विडिओ कितीही वेळा पाहिले तरी मन भरतच नाही. एकच नंबर कुटुंब आहे.
@abidakazi2562
@abidakazi2562 Ай бұрын
कालच आमच्या घराच्या मागे तुम्हच्या सारखे कुटुंब होते त्यांना चिकन चे कालवण दिले व त्यांच्या हाताची शेवग्याची भाजी खाल्ली खुप वर्षांपासून आमच्या गावी येतात खुप प्रेमळ असतात तुम्हची लोक
@govindsupekar5020
@govindsupekar5020 Ай бұрын
इसी को जीवन बोलते हैं इतना तकलीफ में आने के बाद में भी बनाई हंस के जवाब दे रही है सलाम है ऐसे परिवार को काश इनके साथ में साक्षात भगवान रहता है
@deeparangole435
@deeparangole435 Ай бұрын
काहीतरी घेण्यासारखे व्हिडिओ नाहीतरी एकेकाना सर्व सुख सोयी असून सुद्धा त्यांना कमीच पडतेम मस्त व्हिडिओ
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 Ай бұрын
एवढं चालून पण किती उत्साही बानाई.सगळे जण दादा आई या वयात देखील किती कामे करतात.
@govindsupekar5020
@govindsupekar5020 25 күн бұрын
आनंदी आनंद बनाई
@kishoryadav4916
@kishoryadav4916 Ай бұрын
पहिली goshta aamhi evadh चालु shakat nahi ani chalalo asto tar पार्सल मागवुन घेतल असत बनाई ताई स्वयंपाक banvatiye न राग राग करता सलाम ahe सगल्याना tumche video pahun khup kahi बदल स्वतामधे anale ahe kitihi kashta asale tari चीड़ चीड़ hou द्यायची nahi
@anitashinde3375
@anitashinde3375 Ай бұрын
तुमच्या कष्टाला खरच सलाम आहे सर्व कुटुंबाला साष्टांग दंडवत घातले अहमदनगर निमगाव वाघा
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
खूप पाऊस चालू आहे मुले गावाकडे पाठवा खर तर एवढा खडतर प्रवास केला तरी बानाईने मस्त स्वयंपाक करून सर्वांना जेवू घातले ❤❤🎉🎉
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 Ай бұрын
मला एक प्रश्न पडलाय एवढा पाऊस आहे इकडे लोक सरपण झाकून वैगैरे ठेवतात तरी ते सादळते तुमची चुल लगेच कशी पेटते किती भारी ना खरच जादुची आहे म्हणायचं मस्त व्हिडिओ असतात दादा खूप आवडतात मस्त बानाई ताई
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Ай бұрын
कमाल आहे बाणाई तुझी एव्हढे थकून सुद्धा जेवणाचा बेत मस्तपैकी केला अंड्याचे कालवण एकदम भारी
@neetajagdale7411
@neetajagdale7411 Ай бұрын
खरंच तुमचे video बघून मची आम्हालाच लाज वाटते... आम्ही गाडीतून आलो तरी दमतो बाहेरून order करतो. तुमच्या सर्व कुटुंबियांना दंडवत 🙏🙏🙏🙏🙏 महिलांना तर 🙏🙏🙏
@devidasgaikwad801
@devidasgaikwad801 Ай бұрын
आम्ही तुमचे व्हिडिओ मराठवाडा संभाजीनगर मधून रोज बघतो खूप छान व्हिडिओ असतात तुमचे किती छान जीवन जगता तुम्ही❤❤
@user-yc6hy3du1d
@user-yc6hy3du1d Ай бұрын
आई बाबा यांच्या कष्टाला सलाम सागर गोड आहे
@nilamhujband6059
@nilamhujband6059 Ай бұрын
बाणाई तुला सलाम तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू असते कधीच थकलेली दिसत नाही
@piyusalve5800
@piyusalve5800 Ай бұрын
सगळं वातावरण खुप छान आहे तुम्ही समाधानी व प्रसन्न आनंदी दिसत आहात छान वाटले पाल चांगले टाकले आई वडीलांनी आमची बाणाई मस्त बेत करतेय व्हिडिओ खुप छान शुभेच्छा
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Ай бұрын
तुम्हा सर्वांच्या त जो शक्ति रुपी परमेश्वर आहे त्याला नमस्कार आम्हाला तुमच्या सर्वच गोष्टी विशेष वाटतात
@lalasahebgorad384
@lalasahebgorad384 22 күн бұрын
बाणाई जेवण खूप छान बनवते ते पण हसत एकदम
@ranjnawadkar5220
@ranjnawadkar5220 Ай бұрын
खूप छान सुखी कुटुंब आहे... आहे त्यातच समाधानी आहात बाणाई ताई आई दादा सगळेच खूप छान प्रणाम तुम्हाला.. इक सांगू तर आमचे शेतात पण मेंड्या काही दिवस असायच्या तर माझी आई त्यांना रोज जेवण देत होती आणि त्यांनच्याच आशीर्वादाने खूप छान झालं आहे. तेव्हा पासून मेंढ्याची आवड गावाकडंच राहणीमान खूप साधी माणसं खूप आवडतात आणि तुमचे व्हिडीओ ज्या दिवसापासून पाहते तर रोज वाट पाहत असते ड्युटी मध्ये वेळ काडून पाहिले व्हिडीओ पाहत असते.मला तुमच्या फॅमिली ला एकदा तर नकीच भेटायचं आहे.
@user-gr2cv5ig9r
@user-gr2cv5ig9r Ай бұрын
बाणाई माझी फेवरेट नेहमीच हसतमुख चेहरा ❤ देव तुम्हा सर्वांना खूप सुखात ठेवो.
@reshmagurav6073
@reshmagurav6073 Ай бұрын
काम करायचं दणकून आणि खायचं कणकून भारी वाटलं दादा एकदमच 😊👌👍🙏🏻🙏🏻
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
छान जीवन आहे तुमचं---कष्ट आहेत तरी त्यात सुख आहे
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे
@sagardarange1531
@sagardarange1531 Ай бұрын
तुमच्या जीवनातील संघर्ष बघुन थकलेल्या मनाला नवचैतन्य मिळते 👏♥️👍
@dr.nileshmore....3321
@dr.nileshmore....3321 Ай бұрын
आयुष्य कसं जगावं हे तुमच्याकडून शिकावं ❤❤
@SantoshPAldar
@SantoshPAldar Ай бұрын
उन असो, पाऊस असो अखंड प्रवास. थांबने नाही. छान व्हिडीओ.
@dhirajtayde2090
@dhirajtayde2090 Ай бұрын
तुमी कीती येकमेकाना समजुण घेता गणपती तुमचा पाठीशी राहो🙏🌹🙏
@gameplays5536
@gameplays5536 Ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम देव तुम्हाला सुखी समाधानी ठेवो मुलांची आणि सर्वांची काळजी घ्यावी
@SanikaKawade-on9th
@SanikaKawade-on9th Ай бұрын
Mi tumche videos khup Awdine pahtey Bana mavshi tr great ha
@deeparangole435
@deeparangole435 Ай бұрын
बापरे किती संघर्षमय जीवन खरेच तुम्हाला सलाम सिद्दू दादा प्रेम पण किती मस्त व्हिडिओ
@sunandadeshmukh8892
@sunandadeshmukh8892 Ай бұрын
रस्त्यानं जाताना शिस्तीचं शिक्षण तुमच्या मेंढ्या व तुमच्या कडून शिकावं दादा किती सुंदर दृश्य घाटातून प्रवास करत असताना खूप छान काळजी घ्या सुखरूप पोहचा
@kusumsatav1088
@kusumsatav1088 Ай бұрын
बाणाई खूप आनंदी आणि हसमुख आहे. किती उत्साहाने अंड्याचा कालवण बनवलं 👌👌
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Ай бұрын
खूपच कष्टमय जीवन आहे दादा तुमचं दादांनी बरे झाले नवीन कागद आणला
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 12 күн бұрын
दादा तुमचे आई दादा पण खूपच कष्टाळू आहेत तुमच्या बरोबरीने काम करतात खरंच
@mayathorat2150
@mayathorat2150 14 күн бұрын
बानाई, ताई खुप भारी कष्टाळू बाई किती आनंदी आहेस.धनयवाद
@madhuriwakshe7929
@madhuriwakshe7929 Ай бұрын
KZfaq vril sglyat mast video tumchech astat khup chan
@chintamankanitkar6787
@chintamankanitkar6787 Ай бұрын
जगातील सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv Ай бұрын
तुम्ही खरे जगातील श्रीमंत अतिशय कष्टाळू जिवन असूनही तुमचे चेहरे आनंदाने फुललेले असतात सदैव निसर्गाच्या सान्निध्यात राहून कष्ट करता म्हणून निरोगी राहता.
@poojalanjekar9077
@poojalanjekar9077 Ай бұрын
बानाई ताई तुमच्या कष्टाला मोल नाही .देव तुम्हाला खूप शक्ती देऊ दे. ❤❤
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
तूमच्या व्हिडिओ ची आज वाटच पहात होते व्हिडिओ पाहिल्यावर समाधान वाटते धन्यवाद
@ashadalvi4339
@ashadalvi4339 Ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते
@user-lb7su7rd7g
@user-lb7su7rd7g Ай бұрын
खूप कष्टमय जीवन.येवढं चालून प्रवास.जेवण खूप छान
@Ulka-rt5vi
@Ulka-rt5vi Ай бұрын
🎉मी आंड खात नाही। पण कलर खूप छान दिसत आहे व तर्री पण मस्त आलीय
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d Ай бұрын
बाणाई ताई तुमची मुल आणि इतर मुल कोणाकोणाची आहेत ते सांगा . खूप छान व्हिडिओ असतात. खूप सगळे कष्ट करता. सुखी भव बाळूमामा तुमच्या पाठीशी आहेत
@nanatapale4381
@nanatapale4381 Ай бұрын
सिदु दादा, तुम्ही ज्या गावात जाल त्या गावाच नाव तालुका जिल्हा आणि त्या गावाचे वैशिष्ट सांगत चला, म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर भ्रमंती केल्याचं समाधान होईल .
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 Ай бұрын
प्रत्येक गोष्टीत खूप समाधान मानता!🌹🌹🌹
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Ай бұрын
काम करायचं दणकून आणि खायचं कणकून हे खरय मस्त बोलला
@sayyedrj2464
@sayyedrj2464 Ай бұрын
भाऊ गाव बघून मुकाम करा तुम्हाला पावसात पाहून खूप वाईट वाटले❤❤❤
@rohidaswalunj814
@rohidaswalunj814 Ай бұрын
दादा आजचा टप्पा खूप खडतर होता तूमच्या प्रवासाला सलाम धन्यवाद दादा
@vickyraut9494
@vickyraut9494 Ай бұрын
खरंच खूप छान दादा खूप संघर्षाचं जीवन जगता तुम्ही आणि ते पण खूप आनंदाने
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Ай бұрын
एवढी मोठी मजल केली किती थकला असाल तरी पण किती आनंदानी आहात तुम्ही🎉🎉
@jyotipatil324
@jyotipatil324 Ай бұрын
चुलीवरच्या मोठ्या मोठ्या भाकरी बघून मला माझ्या आईची आठवण झाली😊
@ashadalvi4339
@ashadalvi4339 Ай бұрын
मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते पिंपरी-चिंचवड वरना
@amrutabandgar6524
@amrutabandgar6524 Ай бұрын
Aamhi pppn dhangrc aahot. Jay balumama
@sujataawale9645
@sujataawale9645 Ай бұрын
दादा तुम्हाला मुले किती भाऊ किती कुटुंबची माहिती दया
@dhangarijivan
@dhangarijivan Ай бұрын
३ -सीमा, दीपा, मयूर
@rajendrapawar291
@rajendrapawar291 Ай бұрын
खूप छान परिवार आहे यांचा तीन भाऊ आहेत आई वडील लहान्याला एक मुलगा बाकी दोघांना दोन दोन मुलं खूप संघर्ष करून जीवन जगतात खूप कष्ट तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 15 күн бұрын
खुप कष्टाचे जीवन आहे खूप संघर्ष करावा लागतो धनगर बांधवांना
@surajchipade5966
@surajchipade5966 25 күн бұрын
फायू स्टार हॉटेल पेक्षा चौदर जवान आहे
@sanjaykagane5190
@sanjaykagane5190 11 күн бұрын
दमून भागून आल्यावर सुद्धा कामं करतांना कुठेही त्रागा , चिडचिड नाही.❤
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p Ай бұрын
खरच खूप छान आहे दादा
@seemasawant923
@seemasawant923 Ай бұрын
खूप छान भाकरी आणि andyache कालवण❤
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 Ай бұрын
एकदम मस्त व्हिडिओ खुप पाऊस पडतो आहे
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Ай бұрын
पहिली comment माझीच मी तिसऱ्या व्हिडिओ ची वाट पाहत होते 😂😂😂
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Ай бұрын
छान बनवली अंडा करी
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Ай бұрын
पावसाच्या दिवसात पण उसंत नाही कश्याला किती त्रास असतो ना परिदेखी हसत असतात त्यातून देखील व्हिडिओ बनवता खूपच भारी वाटते
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 Ай бұрын
1 ch no j 1 aahe..... manus asha vatavarnat ardhi bhakar jast khato.....👌👌👌👌👌
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Ай бұрын
Mst paiki anda kari 1 no. Tondat rata rata pani sutlay. Nice video
@lataadhangle7481
@lataadhangle7481 2 күн бұрын
एकदा मुलांसाठी पावभाजी बनवा मस्त गरम गरम
@AshaYadav-bg6xx
@AshaYadav-bg6xx Ай бұрын
सिद्धेश्वर किसनराव बाणा ई अर्चना यांना देवबाप्पा सुखी ठेव
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 20 күн бұрын
खरच खूप कौतुक करावं तेवढं कमी बाणाई ताई आणि इतर सदस्य चे हसत हसत कसे जगावे हे शिकण्यासारखे कितीही अडचणी असल्या तरी
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 38 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 72 МЛН
आज अंकिताची मुहूर्त मेढ झाली
17:49