Рет қаралды 719
नमस्कार ,
तुम्हा सर्वांचे ShreyaSoumyaShri's Kitchen मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण आषाढ स्पेशल मिक्स पिठाच्या तिखट पुर्या कशा बनवायच्य नमस्कार ,
तुम्हा सर्वांचे ShreyaSoumyaShri's Kitchen मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण तिखट पुर्या कशा बनवायच्य ते पाहणार आहोत.
साहित्य :-
बेसन पीठ - अर्धी वाटी
गव्हाच पीठ - 2 वाट्या
ज्वारीच पीठ - 2 वाट्या
तीळ - 2 चमचे
ओवा - 1 चमचा
हळद - 1 चमचा
हिंग - पाव चमचा
धने, जीरे पुड - 2 चमचे
कोथिंबीर - 1 वाटी
मिरच्या - 10-12
आलं - 2 इंच
लसुण - 10- 12 पाकळ्या
मीठ - गरजेनुसार
तेल - तळण्यासाठी
कृती: -
सर्वात आधी तिन्ही पीठ एकत्र करून घेऊ. आता मिक्सरमधून मिरची, आलं व लसणाच्या पाकळ्याची बारीक पेस्ट करून घेऊ. आता मिक्स केलेल्या पिठामधे तीळ, ओवा ,हळद, हिंग,धने-जीरे पुड घालून चांगल एकत्र करून घेऊ. आता एका छोट्या पातेल्यात 2-3 चमचे तेल चांगल कडकडीत करून घेऊ व पिठावर घालून चोळून घेऊ. आता यामधे चवीनुसार मीठ, मिरची, आलं व लसणाची पेस्ट व गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घेऊ. मळलेले पीठ 5 मिनीट झाकून ठेऊ. आता पिठाचे थोडे मोठे गोळे करून घेऊ व त्याला थोड तेल लावून लाटून घेऊ. व वाटीच्या मदतीने त्याच्या पुर्या बनवून घेऊ. व तळून घेऊ. अशा प्रकारे आपल्या पुर्या तयार आहेत.
Ingredients :-
Gram flour - half a cup
Wheat flour - 2 cups
Sorghum flour - 2 cups
Sesame - 2 spoons
Carom seeds - 1 spoon
Turmeric - 1 spoon
Asafoetida - 1/4 spoon
Coriander seeds,Cumin powder - 2 spoons
Coriander - 1 spoon
Chillies - 10-12
Ginger - 2 inch
garlic - 10- 12 cloves
salt - as required
oil - for frying
Action :-
First of all let's combine all the three flours. Now make a fine paste of chillies, ginger and garlic cloves in a mixer. Now add sesame seeds, carom seeds, turmeric,Asafoetida ,coriander-cumin seeds powder to the mixed flour and mix well. Now heat 2-3 teaspoons of oil in a small pan and rub it on the batter. Now add salt, chilli, ginger and garlic paste,salt as per taste and water as needed and knead the dough. Cover the kneaded dough for 5 minutes. Now make small balls of dough and roll it with a little oil. And with the help of a bowl, let's make its portions. And fry it. Thus our snacks are ready.
#shreyasoumyashriskitchen #homemade #food #homemaderecipe #तिखट #पुरी #आषाढ #मिक्सपिठाच्यापुर्या #food
Follow Us On :
KZfaq :- / @shreyasoumyashriskitchen