Рет қаралды 2,142
हिरव्या माठाची भाजी I Mathachi Bhaji I पारंपारिक माठाची भाजी I पारंपारिक पदार्थ
साहित्य
एक मोठी माठाची जुडी साफ करून भाजी दोन पाण्यात
धुवून मग बारीक चिरून घ्यावी
दोन कांदे बारीक चिरून घ्यावे
चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्या
पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घ्या
कढईत तेलाची फोडणी घालून त्यात मोहरी घाला
कांदा व लसूण आणि मिरची घालून चांगले परता
कांदा शिजल्यावर हळद घाला व नंतर भाजी घाला
भाजी चांगली परतून घ्या नंतर मीठ घालून शिजवून घ्या
शेवटी अर्धा चमचा गरम मसाला व ओल्या नारळाचा चव घाला
हिरव्या माठाची भाजी तयार होईल
#Green Leaves Resipi
#हिरवी पालेभाजी
#आजीने शिकवलेली भाजी
#viral