कोणताही कृत्रिम रंग, स्वाद न वापरता पारंपरिक पद्धतीने गुलाबजाम | Khava Gulabjam | Vaishali Deshpande

  Рет қаралды 58,512

Vaishali Deshpande

Vaishali Deshpande

2 жыл бұрын

कोणताही कृत्रिम रंग, स्वाद न वापरता पारंपरिक पद्धतीने || Khava Gulabjam || Vaishali Deshpande ||
#vaishalideshpande #खवागुलाबजाम #mavagulabjam #gulabjam #गुलाबजाम
खवा गुलाबजाम साहित्य :
पाव किलो खवा
३ टेबलस्पून बारीक रवा
२ टेबलस्पून दूध
३/४ + १/२ कप साखर
२ कपपाणी
२ टेबलस्पून मैदा (गरजेनुसार)
१५ ते २० केशर काड्या
१/२ टेबलस्पून वेलची पावडर
गुलाबजाम तळायला तेल
आपल्या भारतात विविध सण आपण साजरे करतो. सण म्हटलं की जेवणात गोडधोड आलंच. जिलबी, पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी असे अनेक पारंपरिक पदार्थ आपण सणांसाठी करतो.
पण हे सर्व पदार्थ म्हणजे पक्वान्न बनवताना काळानुरूप अनेक बदल होत गेले. आज बाजारात आपल्याला प्रिमिक्सच्या स्वरुपात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. चक्क पक्वान्नांची प्रिमिक्स मिळायला लागली.
आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत. पण हे गुलाबजाम आपण पारंपरिक पद्धतीने खवा वापरून करणार आहोत. थोडीशी काळजी घेतली तर हे गुलाबजाम खूप साध्या सोप्या पद्धतीने करता येतात. तेही कोणताही कृत्रिम रंग किंवा स्वाद न वापरता.
चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने खवा वापरून गुलाबजाम कसे करायचे ते.
Khawa Gulabjam Ingredients :
1/4 kilo khoya (mava)
3 tablespoons fine semolina
2 tablespoons milk
3/4 + 1/2 cup sugar
2 cups of water
2 tablespoons flour (as needed)
15 to 20 saffron sticks
1/2 tablespoon cardamom powder
Refind oil for frying
We celebrate various festivals in our India. San said that the meal was sweet. We make many traditional dishes like Jilbi, Puranpoli, Shrikhand, Basundi for festivals.
But over time, that is likely to change. There are many things available in the market today in the form of premix. I started getting premix of chucky dishes.
Today we are going to make gulabjam. But we are going to make this gulabjam using khawa in the traditional way. With a little care, these gulabjam can be made in a very simple way. Pretty much without using any artificial colors or flavors. So let's see how to make gulabjam using khawa in the traditional way.
Topics Covered :
How to make gulabjam
gulabjam
gulabjam recipe
gulabjam recipe in marathi
mava gulabjam
khoya gulabjam
khava gulabjam
गुलाबजाम
खवा गुलाबजाम
मावा गुलाबजाम

Пікірлер: 104
@madhurigore3609
@madhurigore3609 2 жыл бұрын
मला फक्त खव्याचेच गुलाबजाम आवडतात.इन्संट नाही.तुमची पद्धत आवडली.मी पाकात गुलकंद घालते.खूप छान स्वाद येतो.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद. कधीतरी मी खव्यात गुलकंद भरते. गुलकंद गुलाबजाम. ते पण छान लागतात. आता पाकात गुलकंद वापरून बघेन.
@ravisatpute42
@ravisatpute42 2 жыл бұрын
खवा आणि गुलाब जामुन मस्त आहे ताई👍👍😋👍👍
@jyotikulkarni8138
@jyotikulkarni8138 2 жыл бұрын
खुप ऊपयुक्त, छान,खरोखर धन्यवाद
@rutujanasikkar3955
@rutujanasikkar3955 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी आणि tips
@pranatideshpande
@pranatideshpande 2 жыл бұрын
झक्कास
@sujatakamire2345
@sujatakamire2345 2 жыл бұрын
Khup chhan mahiti .aani kriti
@ashwinideshpande3811
@ashwinideshpande3811 2 жыл бұрын
Khup chan
@mrs.shubhangee5586
@mrs.shubhangee5586 2 жыл бұрын
खुपच छान
@prajaktapalsule8765
@prajaktapalsule8765 2 жыл бұрын
खुप छान आहे काकु
@KiranPatil-py3pt
@KiranPatil-py3pt 2 жыл бұрын
Will try this type
@Nandasrecipesandvlogs
@Nandasrecipesandvlogs 2 жыл бұрын
Khupach Chan 😋👌😋
@madhavideo778
@madhavideo778 2 жыл бұрын
Vijaya Dashmichya khup khup shubhecchya
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पण शुभेच्छा !
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Gulaab jam khup chaan zaley kaki thanks
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@pushpagadre9345
@pushpagadre9345 Жыл бұрын
छान
@varshabhosale7327
@varshabhosale7327 2 жыл бұрын
Mast
@bharatigote4028
@bharatigote4028 2 жыл бұрын
Wow chan 👌👌👌👌👌👌❤
@rekhapawar4
@rekhapawar4 2 жыл бұрын
Khup chan gulabjamun receipe dakhvilit te hi khup sarya chotya mothya tips sahit jenekarun banvitana bighadnar nahit thanku very much. 😍😍
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@sachinjabade696
@sachinjabade696 2 жыл бұрын
Mala avadtat gulab jamun
@dasharathkhengale7612
@dasharathkhengale7612 2 жыл бұрын
मला तुमच्या रेसिपीज खुप आवडतात
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद.
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 жыл бұрын
खूप सुंदर गुलाबजाम बनवले आहे वैशाली मॅडम तुम्ही, छोट्या छोट्या टिप्स दिल्या धन्यवाद 👌👌 माझे पप्पा पण असे खव्याचे गुलाबजाम बनवायचे त्यांची आठवण आली.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
हे गुलाबजाम छान असले तरी तुमच्या बाबांच्या हाताची चव त्यात नाही. त्यामुळे ते गुलाबजाम चवीला जास्त छान असणार.
@kanchantole6114
@kanchantole6114 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande ❤️ ❤️
@meghanajoglekar2606
@meghanajoglekar2606 2 жыл бұрын
Thank you vaishalitai..Mazi request purn kelit
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@shekharbhuskute1754
@shekharbhuskute1754 2 жыл бұрын
Chan recipe, avadli, please thalipith bhajani recipe next......
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
माझी आजी कोकणातील. ती वेगळ्या पद्धतीने थालीपीठ भाजणी करायची. तिच्या पद्धतीने मी करते. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
@naliniganguly649
@naliniganguly649 Жыл бұрын
Can I use homemade khawa from milk powder ?
@hemangipednekar7547
@hemangipednekar7547 2 жыл бұрын
Rawa ani khawa gulabjaam ekdam mast phulalaa ahe 🥰 Jyanche gulabjaam aatun kachche rahataat tyanchya sathi ek Tip: Gulabjaam cha gol aakar det asatana tya madhye ek sakhar phutana ghaalun mag tyala gol shape dyaycha . Nit talalaa jaato ani aat madhye kaccha rahaat nahi
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद. नवीन माहिती दिल्याबद्दल. नक्की करून बघेन.
@madhavideo778
@madhavideo778 2 жыл бұрын
Kaku tumhi kiti detailed madhe explain kela ahe sagala thank you and hats off
@KiranPatil-py3pt
@KiranPatil-py3pt 2 жыл бұрын
Aloo paratha method I love too much
@leenabhave6575
@leenabhave6575 2 жыл бұрын
केवळ आरारूट खव्यात घालून मी वर्षानुवर्षे उत्तम गुलाबजाम करते ,हि कुठली रवा गरज पडली तर मैदा घाला ची काय पारंपारिक पद्धती आहे काय उगाच काहीतरी सांगता
@rekhajoshi7467
@rekhajoshi7467 2 жыл бұрын
Dhany n dhuta hi bhajani keli tar.....
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
चालेल. पण धान्य पुसून घ्या.
@moreshwarkothmire4677
@moreshwarkothmire4677 2 жыл бұрын
Description box madhe ingredients post kara na please
@theawesomeone7639
@theawesomeone7639 Жыл бұрын
मी मनाल👌👌
@rekhagaonkar7316
@rekhagaonkar7316 Жыл бұрын
रवा किती वेळ भिजून ठेवणार ते प्लीज सांगा
@rohinijoshi8974
@rohinijoshi8974 2 жыл бұрын
खवा गुलाबजाम मस्त आहेत. तुम्ही tips पण चांगल्या सांगितल्यात. मी gits किंवा चितळे ची instant गुलाबजाम करते. खव्याचे करताना जमतील कि नाही असे वाटायचे. पण आता तुमच्या पद्धतीने करून बघेन.. धन्यवाद... 🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@KiranPatil-py3pt
@KiranPatil-py3pt 2 жыл бұрын
How to prepare Chana Masala
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
मी यावर व्हिडिओ नक्की करते
@gshsn7074
@gshsn7074 2 жыл бұрын
Taie sukke aakhri gulab jam chi receipe pathava
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करते.
@anjalitamhane2267
@anjalitamhane2267 2 жыл бұрын
Dilli la gulab jam sathi vegala khava milato . Tyala dhap cha khava manhatat.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
अरे व्वा ! धन्यवाद. मला हे माहित नव्हतं.
@vijayapatil4487
@vijayapatil4487 8 ай бұрын
Kiti khava kiti rVa praman sanga tai
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 8 ай бұрын
Description मध्ये सर्व साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
@ushadevijadhav382
@ushadevijadhav382 2 жыл бұрын
Methi bi chi usal dakhawa please. Madumehi rugnnasathi far changale asate.miekada khlleli aahe.ajibat kadu lagali nahiulat khamang lagali hoti.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
कधी केली नाही पण नक्की प्रयत्न करूयात.
@sujatakamire2345
@sujatakamire2345 2 жыл бұрын
Upvasache gulab jaam kase banvayache.Ravya aaovaji kaay baapatta yeil
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
खवा मळताना तुम्ही त्यात आरारोट वापरू शकता.
@mysteriousworldofplants
@mysteriousworldofplants 2 жыл бұрын
Ghari khava kasa tyar karaycha .
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
आपण यावर व्हिडिओ बनवूया.
@mysteriousworldofplants
@mysteriousworldofplants 2 жыл бұрын
Chalel
@ramolakale4954
@ramolakale4954 2 жыл бұрын
Gulab jam cha mawa vegala asto ka?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
गुलाबजाम साठी वेगळा खवा नसतो. पण खवा घेताना खात्रीच्या दुकानातून घ्यावा.
@ramolakale4954
@ramolakale4954 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande ok thankyou
@milindnaigaonkar1828
@milindnaigaonkar1828 11 ай бұрын
गुलाबजाम पाकात टाकल्यावर त्याचे आवरण पाकात उतरून पाक घट्ट झाला आणि गुलाबजाम पांढरे पडले काय चुकले ते सांगा ?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 11 ай бұрын
गुलाबजाम कमी वेळ तळले तर मऊ पडून पाकात फुटतात. गॅसची ज्योत मोठी असेल तर खव्याचा वरचा रंग लवकर बदलतो पण गुलाबजाम आतून कच्चे राहतात. पाक पण खूप जास्त वेळ गॅसवर राहिला तर पाक घट्ट होतो. पण तुम्ही पदार्थ बनवायचा प्रयत्न करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या वेळेस नक्की जमतील. आता पाकात जे गुलाबजाम आहेत त्याचे मिश्रण वाया जाऊ नये म्हणून एक गोष्ट करू शकता. कडक झालेला जो पाक आहे त्यात थोडे पाणी घालून तो ५ मिनिटांसाठी गॅसवर गरम करा. पाक आपोआप पातळ होईल. नंतर गव्हाचे पीठ घ्या. त्यात तळून घेतलेले गुलाबजाम आणि आवडीनुसार पाक घाला. पोळ्या करताना कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्या. थोडे जाडसर पराठे लाटून साजूक तूप घालून भाजून घ्या. छान पराठे तयार होतील आणि पदार्थ वाया जाणार नाहीत. पाक उरला तर गोडाचा शिरा करून त्यात वापरू शकता.
@suprabhasurse6604
@suprabhasurse6604 2 жыл бұрын
मस्त , खव्याचे चांगले लागतात .
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
हो. मस्त होतात.
@pratibhakarpe9582
@pratibhakarpe9582 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande खवाकितीरवाकितिवजनीसागा़
@poonamkappe1581
@poonamkappe1581 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे.. मी अगोदर खव्याचे गुलाबजाम बनविले होते पण काही आतुन कडक गोली सारखे लागत होते.. माझे काय चुकले?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
रवा, मैदा, कॉर्नफ्लोअर यापैकी जे काही तुम्ही वापरले असेल त्याचे प्रमाण जास्त झाले असावे.
@poonamkappe1581
@poonamkappe1581 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande धन्यवाद 🙏
@vasantidadkar2183
@vasantidadkar2183 2 жыл бұрын
Maida ani araroot chya ivaji hyala paryaya kay
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
मैदा किंवा आरारोट खवा थोडा पातळ असेल तरच लागतात. नाहीतर गरज पडत नाही. मी दुसरे काही वापरून नाही बनवले कधी. त्यामुळे खरंच मी सांगू शकत नाही.
@suvarnakarve5146
@suvarnakarve5146 2 жыл бұрын
Khava kiti ahe
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे पाव किलो
@sonakshisonawane1009
@sonakshisonawane1009 2 жыл бұрын
Khava kiti garm ahie
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
सॉरी, Description मध्ये मी साहित्य आणि प्रमाण लिहायला विसरले आहे. मी आत्ता बाहेर आहे. नंतर लिहून सांगते.
@narharkorde
@narharkorde Жыл бұрын
केशर कोणते वापरावे ? कंपनी ?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
वेगळी अशी कोणतीच कंपनी नाही. किराणा मालाच्या दुकानात मिळते ते वापरते.
@mahavirupadhye3928
@mahavirupadhye3928 2 жыл бұрын
गुलाब जामुनसाठी केशरचा वापर हे प्रथमतः अनुभवत आहे. साखर ही आरोग्यासाठी पूर्णतः घातक आहे, हे लक्षात घेऊन चांगल्या प्रतीचा गूळ किंवा ऊसाच्या रसाचा वापर करून गुलाब जाणुन बनविणे शक्य आहे काय? रेसिपी चांगल्या प्रकारे सांगीतली आहे, याबद्दल धन्यवाद, आभार.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
अशा प्रकारे मी कधी गुलाबजाम बनवले नाही. पण तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे मी एकदा गुळाचा पाक करून गुलाबजाम बनवून बघते.
@prachiponkshe5298
@prachiponkshe5298 2 жыл бұрын
Majhe gulabjamun aatun kacche rahtat tar aadhi tel kiti tapvaycha
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
खूप गरम तेल असेल तर गुलाबजाम तेलात घातले की त्यांचा रंग लगेच बदलतो. मग ते बाहेर काढावे लागतात आणि आतून कच्चे राहतात. तेल तापवताना गॅसची आच मंद ठेवा. गुलाबजाम तेलात सोडले की एक मिनिटांनी गॅस मध्यम आचेवर करा. तरीही तो कच्चा राहील अशी भिती वाटत असेल तर मंद आचेवर तळले तरी चालेल.
@prachiponkshe5298
@prachiponkshe5298 2 жыл бұрын
Thank you
@dasharathkhengale7612
@dasharathkhengale7612 2 жыл бұрын
नमस्कार, वैशाली ताई तुम्ही खवा कुठल्या दुकानात घेतला ते सांगितले तर बरे होईल.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
नमस्कार. मी कोणत्याही ब्रँडचा खवा नाही वापरला. माझ्या घराच्या जवळ एक डेअरी आहे तिथून घेते.
@dasharathkhengale7612
@dasharathkhengale7612 2 жыл бұрын
Thank you
@ashwinishinde970
@ashwinishinde970 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande khava kiti divas tikto.freez madhye
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
अश्विनी ताई, खरं म्हणजे दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ जास्तीत जास्त १ ते २ दिवस ठेवावा असं मला वाटतं. मी गरजेपुरता खवा आणते. तो शक्यतो लगेच संपवते.
@ashwinishinde970
@ashwinishinde970 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande tq.mi tumhi dakhavle tase gulab jamun banvun sampven.kal aanla aahe ek kg khava.udya karte...tumhi khup chaan shikvle gulabjamun.tq
@ashwinishinde970
@ashwinishinde970 2 жыл бұрын
Majhyakadil khva khup ghatt aahe ky krave
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
खवा फ्रिझर मध्ये ठेवला असेल तर बाहेर काढल्यावर सुरुवातीला तो घट्ट वाटतो. पण नंतर आपोआप मऊ होतो. पण मुळातच खवा घट्ट असेल तर तुम्ही आधी रवा मिसळून बघा. कदाचित खवा मऊ होईल. तसे नाही झाले तर खवा किसून घ्या. मऊ होतो.
@ashwinishinde970
@ashwinishinde970 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande ho.tq so much
@vrushalibhat9699
@vrushalibhat9699 2 жыл бұрын
Tumhi khavyat suruvatila Kay ghatale? soda na?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
नाही. मी कधीच सोडा वापरत नाही.
@shwetasawant6277
@shwetasawant6277 2 жыл бұрын
रवा मैदा घालून कधी गुलाब जाम होतात का? खव्याची टेस्ट गुलाबजाम ला येणार नाही रवा मैदया मुळे कडक दगड गुलाबजाम होतील
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
श्वेता ताई, या प्रकारे केलेले गुलाबजाम अजिबात कडक होत नाहीत. व्हिडिओच्या शेवटी मी चमच्याने गुलाबजाम उघडून दाखवला आहे. चमचा सहज आत गेलेला दिसतो आहे. तुम्ही म्हणत आहात तसा दगडा सारखा कडक झाला असता तर चमचा आता गेला नसता.
@seemajoshi1763
@seemajoshi1763 2 жыл бұрын
आम्हीही रवा घालूनच गुलाबजाम करतो. अजिबात कडक दगड होत नाही .
@dod0sworld341
@dod0sworld341 2 жыл бұрын
Try something new recipes
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
आपल्या चॅनेलवर वेगवेगळे नवीन पदार्थ अपलोड केले आहेत.
@rekhajoshi7467
@rekhajoshi7467 2 жыл бұрын
Tai mala bhajani ch praman perfect sanga ni ch praman taka
@rekhajoshi7467
@rekhajoshi7467 2 жыл бұрын
Dhany n dhuta bhajani hote ka
@pradnyachavan4702
@pradnyachavan4702 2 жыл бұрын
@@rekhajoshi7467 nahi madam... धान्य धुवून घ्यावे.कारण धान्य टिकवून ठेवण्याची प्रक्रिया मध्ये त्याला अनेक प्रकारची कीटकनाशके असतात....त्यामुळे शक्यतो धान्य धुवून सावलीत वाळवावे... व मगच मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
थालीपीठ भाजणी, चकली भाजणी यांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. त्यांच्या Description मध्ये साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
थालीपीठ भाजणी साठी धान्य आणले की मी टॉवेलने पुसून घेते. धुवून घेत नाही.
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Sico Silk Sarees | Chandrakor paithani | Kasturi Paithani live
Kasturi Paithani Yeola
Рет қаралды 690
Some muslims mistakes #muslimfemale #hijab
0:11
Asel Mustafaeva
Рет қаралды 18 МЛН
Не уступила место беременной и начались роды 😮
0:49
Фильмы I Сериалы
Рет қаралды 1,3 МЛН
I lost my kitten on the street😭 #cat #cats
0:32
Prince Tom
Рет қаралды 156 МЛН