Рет қаралды 28,292
#अंडी #खरपुस #भाजलेला #रूचकर #तवा #egg #spices #rosted #tawa #viral #andacurry बहूतेक घरी breakfast ला अंड खालल जातं, कारण ते पटकन होतं ,पौष्टीक आहे. आणि ते चवदार लागतं. आज आपण अंडयाची एक मस्त रेसीपी करणार आहोत.
साहीत्य:
४ उकडलेली अंडी
२ मध्यम कांदे ऊभे चिरलेले
२. मध्यम टोमॅटो चिरलेले
१/४ वाटी सुकया खोबरयाचा कीस
१चमचा. आलं लसूण पेस्ट
१ चमचा. मसाला
१/२चमचा. लाल तिखट
१/२चमचा. धणा पावडर
१टोमटो. मोठया फोडी
१/४ चमचा हींग
१/२ चमचा गरम मसाला
४चमचे. तेल
१/२ चमचा मीठ
१/२ वाटी कोथिंबीर
कृती:
प्रथम अंडयाचे दोन तुकडे करा. सुकं खोबरं खमंग भाजून घ्या.कांदे , टोमॅटो थोडं तेल घालून तव्यावर खरपूस भाजून घ्या आणि त्याची मिक्सरमधून पेस्ट करा .
आता मध्यम गॅसवर तव्यावर ४. चमचे तेल घालून त्यात हिंग, आलं लसूण पेस्ट, आणि वाटण घाला .परता. झाकण ठेवून मसाला शिजवा. झाकण काढून त्यात हळद, मसाला, लाल तिखट, गरम मसाला ,मीठ, सुकं खोबरं घालून ढवळा आणि त्यांत थोडं पाणी घाला. ३,४ मिनिटं झाकून शिजवा. झाकण काढून त्यात टोमॅटोच्या फोडणी घाला परता. परतून परतून मसाला खमंग भाजून घ्या . आता त्यात अंडी पसरून पसरून लावा . झाकून २ मिनिटं शिजवा. झाकण काढून मिस्रण ढवळा.
वरुन कोथिंबीर घालून तव्यावरचं अंडयाचं सूकं सर्व्ह करा.
------------------------------
chill. by sakura Hz / sakurahertz
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/chill-sakuraHz
Music promoted by Audio Library
• Chill - sakura Hz...
------------------------------