Рет қаралды 204
नमस्कार आज आपण ओल्या वाटाण्याची कचोरी कशी बनवायची हे दाखवलं आहे एकदम टम्म अशी फुगलेली खूप सोपी रेसिपी आहे छोट्या टिप्स पण मी सांगितलेले आहेत तर ही रेसिपी करताना काय साहित्य लागते साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
एक मोठी वाटी वाटाण्याची सोललेले दाणे
चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट
दोन चमचे बेसन
एक चमचा धना पावडर
एक चमचा आमचूर पावडर
अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर
एक चमचा लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
पाव चमचा हळद
एक मोठा चमचा बडीशेप ची भरड
पाव चमचा काळ मीठ
अर्धा चमचा साखर
चवीनुसार मीठ
आवरण :
दोन कप मैदा
चवीनुसार मीठ
चार चमचे तेल
#matarkachorirecipe #कचोरी #ओल्या वाटाण्याची कचोरी