Рет қаралды 1,370,242
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव... असा जयघोष करणाऱ्या पालख्यांचा रिंगण सोहळा आज बेलवाडीत पार पडला...
इंदापुरात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
आणि पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं.
हे रिंगण पाहायला शेकडो वैष्णवांचा मेळा बेलवाडीत दाखल झाला होता...
यामध्ये वेगवेगळे पेहराव परिधान करून लहान मुलांनीही सहभाग घेतला होता.
तर दुसरीकडे वारीतल्या वारकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दमदार पोवाडे गायनाचंही आयोजन करण्यात आलं होतं...
या पोवाड्यांनी वारीमध्ये जान आणली...
या सगळ्या आनंदवारीचा आढावा घेतलाय अभिनेता संदिप पाठकनं...
चला तर जाऊयात बेलवाडीला...
पाहुयात माझा विठ्ठल... माझी वारी...