Рет қаралды 126,736
नमस्कार !
आपण कोल्हापूरच्या जुन्या आणि प्रसिद्ध भागांपैकी एक 'मंगळवार पेठ', या भागाच्या मुख्य रस्त्याचा फेरफटका मारत आहोत.
आणि हा फेरफटका मारत असताना ,आपण या भागातील माझ्याआवडीच्या तसेच कोल्हापूरच्या प्रसिद्ध आणि वैशिष्टपूर्ण अशा खाद्यठिकाणांची तोंड ओळख करून घेत आहोत.
हा या खाद्यभ्रमंतीचा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांमध्ये आपण मिरजकर तिकटी पासून शाहू बँक चौकापर्यंतची ठिकाणं पाहिली.
आता या भागात आपण यापुढील ठिकाणं पाहणार आहोत.
पहिले दोन भाग बघितले नसतील तर नक्की बघा.
व्हिडिओमधील हॉटेलांच्या कामकाजाच्या वेळा पुढिल प्रमाणे :
हॉटेल रवितेज : सायंकाळी 7 ते 11. दर गुरुवारी बंद.
हॉटेल शालिनी : सायंकाळी 7:30 ते 11: 30. दर सोमवारी बंद.
हॉटेल कृष्णा : दुपारी 12 ते 3, सायंकाळी 7 ते 11. साप्ताहिक सुट्टी नाही.
हॉटेल न्यू सुदिन : सकाळी 11 ते 3 अर्चित कॉम्प्लेक्स मिरजकर तिकटी.
आणि सायंकाळी 7 ते 11. बजापराव माने तालमी शेजारी. ( या व्हिडिओमध्ये दाखवल्या ठिकाणी ). दर गुरुवारी बंद.