नंदूरबारचे शिल्पकार

  Рет қаралды 8,246

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

3 ай бұрын

लोकांच्या रोजगाराचा हिशोब घराणेशाही चालवणाऱ्या नेत्यांना द्यावाच लागेल. तुम्ही स्वतच्या तुंबड्या भरण्याचे राजकारण केले, जनतेसाठी काय केले ते सांगा आणि मग आपल्या मुलीसाठी, मुलांसाठी मते मागावी. लोकं स्थलांतर करून मरत आहेत, युवकांना नोकऱ्या नाही, रोजगार नाही मग आदिवासींनी जगायचे कसे, याचे उत्तर द्यावेच लागेल...! लाईक, शेअर आणि सबसक्राईब करा व युवक, समाजापर्यंत सत्य पोहचवा.. मतदारांनो, लक्षात घ्या.. बोलावच लागेल. #लोकसभा2024 #नंदुरबार.
Dr Kailas Vasave, Indigenous-Adivasi Law Corner.

Пікірлер: 98
@avinashvalvi507
@avinashvalvi507 3 ай бұрын
गावित आणि पाडवी परिवार सोडून नवीन उमेदवार ला support करा
@patleindrasing9790
@patleindrasing9790 3 ай бұрын
यावेळेला तरी अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना सोपोर्ट करणार❤❤❤❤
@mahendravalvi8010
@mahendravalvi8010 3 ай бұрын
सुशीलकुमार पावरा हा याला बी नीवडु दिल तर हा बी विकला जानार भावा.
@hiralal933
@hiralal933 3 ай бұрын
Mag konala nivdaych aata???
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 3 ай бұрын
Ha kon laykicha
@jalindarpawara2150
@jalindarpawara2150 3 ай бұрын
सुशिलकुमार पावरा सर यांना निवडून द्या नंदुरबार लोकसभाचा नक्कीच विकास होईल..
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 3 ай бұрын
Nahi re yala koni olkhat nahi
@easylife7108
@easylife7108 3 ай бұрын
बरोबर आहे सर योग्य मुद्दे आहेत आपल्या लोकांनीं ह्या गोष्टी नक्किच मनावर घ्यावे.
@nileshbarela7275
@nileshbarela7275 3 ай бұрын
आता फक्त अपक्ष उमेदवार ला चान्स द्या.... जेय बिरसाफायटर जिंदाबाद
@saysingparadke1182
@saysingparadke1182 3 ай бұрын
सर तुम्ही जि माहिती सांगितली ति खुप विचार करण्या सारखि आहे .खासदार 10 वर्षे दिली तरि स्थलांतर थांबत नसेल तर काय फायदा यांना निवडून. के सिं पाडवि 7 वेडा निवडून आले काय दिवे लावलेत लोकपतिनि ना सागितले पाहिजेत .हे दोघे काय कामाचे नाहीत.
@santoshpawarabhanolikar2064
@santoshpawarabhanolikar2064 3 ай бұрын
या दोन्ही उमेदवारांना बघतांना असं वाटतं की... त्यांचे स्वतःचे विकास व कार्यकर्त्यांच्या विकास करायचा उभे आहे असे दिसते... आत्तापर्यंत नंदुरबार जिल्हा विकासापासून दूर राहण्याचे कारण...या दोन्ही उमेदवारांचे घराणेशाही जिम्मेदार आहे...
@vanrajpawara4484
@vanrajpawara4484 3 ай бұрын
बरोबर bole bhai he तंत तंत khar आहे 100/ khar आहे
@indrasingvalvi101
@indrasingvalvi101 3 ай бұрын
Jai johar, Jai Adivasi,Jai Bhilisthan.
@kisanvasave6452
@kisanvasave6452 3 ай бұрын
सर तुम्हीं No.1 बोलात सर
@hariomphotos4018
@hariomphotos4018 3 ай бұрын
अगदी योग्य मुद्दे घेतले आहेत वकील सो.परंतु आपल्या आदिवासी लोकांनी हे आजच समजून घेतले तरच बरं आहे नाही तर मग वांदेच...जागे व्हा आता...घडी थांबत नाही...वेळ निघून चालली आहे...जय आदिवासी...आप की जय हो!...
@krushnapawara7736
@krushnapawara7736 3 ай бұрын
जय आदिवासी🌾 जोहार जिंदाबाद, ( वास्तविक सत्यता)
@dattatech8250
@dattatech8250 3 ай бұрын
खरं वास्तव सत्य आहे... Dr. वसावे साहेब.❤❤
@suniltadvi620
@suniltadvi620 3 ай бұрын
भाजप आणि काँग्रेस, यांच्या सर्व कार्य करते, कितीही भ्रष्टाचार केला तरी, त्यांच्या वर कोणीच कारवाई करत नाही, कोणी कारवाई करण्याच अर्ज दिला तर तहसीलदार किंवा कलेक्टर असो अर्ज अक्सेप्ट करत नाही.
@IshwarValvi
@IshwarValvi 3 ай бұрын
दुर्दैव, नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण आपले नेते आदिवासी मुद्यावर बोलायलाच तयार नाहीत!! यंदा मतधारकांनी विकास, आदिवासी मुद्दा तसेच रोजगार या मुद्द्यावरून मतदान करणे अपेक्षित आहे, या सोबतच आपल्या आदिवासी समाजासाठी कोणता पक्ष किंवा कोणता नेता हे बघणे देखील महत्वाचे आहे!👍👍
@sunilvalavi8381
@sunilvalavi8381 3 ай бұрын
यांना जोपर्यंत लोकं निवडून आणतील तोपर्यंत आदिवासी लोकांचा लिलाव काय थांबत नाही..... माणसांचा लिलाव केला जातोय......... रोजीरोटी साठी... अतिशय विदारक वास्तव समोर आहे नंदुरबार जिल्ह्याचे.....
@panditlalsingpawara5098
@panditlalsingpawara5098 3 ай бұрын
खुप वाईट परिस्थिती आहे साहेब
@abhitanpawara4609
@abhitanpawara4609 3 ай бұрын
जबरदस्त छान पोलखोल आहे.. सर धन्यवाद
@abhitanpawara4609
@abhitanpawara4609 3 ай бұрын
कुटुंबम विकास बाकी आदिवासी मरो का सडो यांना काही घेणे देणे नाही
@Gk.VolgoOfficel
@Gk.VolgoOfficel 3 ай бұрын
100%1 % बरोबर बोलले सर 👉विकास फक्त त्यांचे कार्यकरत्यांच आणि त्यांच स्वतःच करून घेतल आहेत....बाकी आम जंनतेला वार्यावर सोडून दिल आहे ❤ वेळात वेळ काडुन विडिओ तयार केल्या बद्दल खुब खुब धन्यवाद सर
@manishapadvi5819
@manishapadvi5819 3 ай бұрын
अगदी मानातलि समस्या मांडली सर वास्तविक तर आता सर्व लोकांची म्हणजे जागरूक नागरिक असणे फार गरजेचे आहेत तर फक्त आजचा विचार न करता कुठंतरी पैसे घेऊन मतदान ना करता पूर्ण विचार करून योग्य ते प्रतिनिधी निवडून देणे, व महत्वाचे म्हणजे युवक मतदार यांनी विचार करून मतदान व तात्पुऱ्या गोष्टी ( पैसे व दारूचा आहारी ) न जाता योग्य त्या प्रतिनिधीला सोपर्ट करणे काळाची गरज आहे. ............
@lalsingvalvi1711
@lalsingvalvi1711 3 ай бұрын
डॉ साहेब अगदीं बरोबर आहे
@IndiraVasave-bd9ml
@IndiraVasave-bd9ml 3 ай бұрын
Ekdun right sir😊
@rajeshkharde9015
@rajeshkharde9015 3 ай бұрын
वास्तविक परिस्थिती मांडली. ही लोक फक्त स्वत: ची तुंबडी भरत आहे...
@learnlawwithprofsuwarta
@learnlawwithprofsuwarta 3 ай бұрын
Yes sir u are right.
@sportmh1890
@sportmh1890 3 ай бұрын
खूप छान सर ❤
@ganeshvasave7021
@ganeshvasave7021 3 ай бұрын
बरोबर आहे सर
@niteshvasave6696
@niteshvasave6696 3 ай бұрын
Sir, Thanks...
@allinonetime1258
@allinonetime1258 3 ай бұрын
Very good explain sir
@user-ih9jp8ou6v
@user-ih9jp8ou6v 3 ай бұрын
Chaan lecture doctor saheb.
@ishwartadvi90
@ishwartadvi90 3 ай бұрын
भाऊ हा लेक्चर नाही.सद्यपरिस्थिती आहे नंदुरबार जिल्ह्याची
@dr.rajendradbaisane3942
@dr.rajendradbaisane3942 3 ай бұрын
आदिवासी बंधु जागा हो समाज परिवर्तनाचा धाग हो
@absolanki5352
@absolanki5352 3 ай бұрын
Kailas dada jindabad💪
@vilaspawara1859
@vilaspawara1859 3 ай бұрын
समाजावर खुप वाईट दिवस आले आहे. आता निर्णय पक्का घ्या दोन्ही परिवार ला मतदान करणार नाही आणि चुकुन मतदान केले तर समाजाला न्याय कधीच मिळणार आहे. साहेब तुम्ही प्रमाणिक या आपल्या समाजाला एक विचार देण्याचे काम चालू केले हे लोकांना बदल करण्यासाठी मदत होईल....
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 3 ай бұрын
अजय गावित ला निवडून द्या ❤❤👌
@ramsingpadvi6993
@ramsingpadvi6993 3 ай бұрын
Sir tumhi je mudde mandtay te right ahet. 👌
@user-qj7zi7yt1p
@user-qj7zi7yt1p 3 ай бұрын
बोरबर आहे
@vinodnaik6755
@vinodnaik6755 3 ай бұрын
हे सगळे स्वतः चे विकास करत आहे
@gulabsingvasave4090
@gulabsingvasave4090 3 ай бұрын
वसावे सर, तुम्ही सुद्धा विधानसभा चुनाव ला उमेदवारी केली होती .पण तुम्ही का सोडुन दिलं हा देखील आदिवासी समाजांपुढे फार मोठा प्रश्नं आहे.तुम्ही सांगले सुशिक्षित आहे पण तुम्ही कुठुन व कोणत्या माध्मातुन समाजासाठी लढणार आहे कधी हे सुद्धा समाजाला सांगावे का तुम्ही सुद्धा नुसते बोलुन दाखवणार असे बोलणारे भरपुर आहेत पण लढणारा कोणीच नाही जो कोणी शिकलेलं आहेत ते सर्व स्व:त साठी बोलतात असे दिसून येते
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 3 ай бұрын
नवीन स्वप्ने व उमेद घेऊन गावाकडे परतलो होतो. कायद्याचे LLM पर्यंत शिक्षण संपवून गावाकडच्या परिस्थितीत आपल्या मुळे काहीतरी बदल करता येईल, अशी आशा होती. सोबतीला टीम होती. नवा दम-खम असलेली बऱ्यापैकी युवकांची फळी बांधली होती. सुरवात केली, लोकांनी वेड्यात काढले, बरेच मित्र-नातेवाईक सोडून गेले, तरीही खचलो नाही. आपल्या बरोबर पिढ्यान पिढ्या कष्ट उपसून उपाशी झोपणारी गरीब, असहाय् व अजान लोक आहेत, ती आपल्या बरोबर आहेत, आपल्याला साथ देतील, त्यांचे प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यांना दिशा देऊ शकतो, बदल करायचा असेल तर आपण सुरवात करावी, लोकांना जागृत करावं असं वाटायचं. मग माझ्या मित्रांसह सर्वांचे मत झाले कि आपल्या पैकी तु चांगलं नेतृत्व करू शकशील म्हणून मला पुढे केलं. मी विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलो. राजकारणीही बऱ्यापैकी जाणत होतो. लोकांना बदल हवा होता अशी अनेक कारणे होती जी मला राजकारणात यायला भाग पाडत होती. अभ्यास व वास्तव याची सांगळ घालण्यासाठी मी मुरलेल्या राजकारण्याना तोंड द्यायला पुढे झालो. सुरवात करावी म्हणून विधानसभा निवडणुक लढलो.. अपेक्षित व माहित असलेला दारुण पराभव झाला. पण निवडणूक जिंकायच्या कशा ते माहित झाले. मत मिळवणे तसें फार अवघड. कोणाला दारू न् पाजता, पैसे न् वाटता फक्त युवकांची फळी घेऊन उभा होतो. प्रचार बऱ्यापैकी जमला पण शेवटचे कत्तल वाले दिवस हरलो. पार्टी इमानदार, तसे मीपण तत्वे पाडायचो. त्यामुळे आचारसंहितेचा वेळ संपल्यावर पैसे घ्यायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना काय सांगू काय नको होत होतं. संयम ठेवून मतदान पर्यंत कोणत्याही अनुचित प्रकार केला नाही. ना पैसा, ना दारू, ना पार्ट्या... हिमतीवर निवडणूक लढलो.. हरणार माहित असूनही उभा होतो त्यामुळे निवडणुकीत पडल्यावर फारस वाईट वाटलं नाही. पण निवडणुकीचं संपल्यावर मात्र पार एकटा पडलो. महिनाभर काय कराव तेच सुचत नव्हतं. मग वेळ गेला आणि आता ग्राऊंडवर काम कराव म्हणून पुन्हा जोमाने कामाला लागलो. पण माझ्याबरोबर शिकणारी पोरं होती, रोजगार नसलेली पण प्रचंड इच्छाशक्ती असलेली. मग ती स्वतःच्या शिक्षण व रोजगराच्या शोधात गेली. मग तर माझ्या विचाराचे कार्यकर्ते भेटणं लय अवघड झालं. माझ्यावर विश्वास ठेवून जे मित्र व कार्यकर्ते होते ते स्वतःच्या कामात बिझी झाले. मग मला जुन्या व पक्षात मुरलेल्या पुढाऱ्यांबरोबर काही विचारधारा वा तत्वे नसताना काम कराव लागलं. राजकारणात रोज काम मिळत नसे.
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 3 ай бұрын
आधी समाजसेवा, विद्यार्थी चळवळ व राजकारण असं सर्व करत होतो. पण निवडणूक लढवल्यानन्तर मला सर्व लोक जुन्या पुढाऱ्यांप्रमाने वागणूक द्यायला लागले. पुढारी म्हणून मान मिळे, लबाड लोक भीत सुद्धा.. पण मला सामाजिक चळवळीतील लोकांनी वाळीत टाकायला सुरवात केली. पुढारी म्हणून काही लोक खूप जवळ आली पण चांगल्या व जाणकार लोकांनी चार हात लांब राहायला सुरवात केली. एवढ शिकून लोकांच्या पाया पडत फिरतोय असेही वाटे. पण मी दोन वर्ष वाट पाहत थांबलो. येथील मुरलेल्या राजकारणी पुढारी यांना मी सुरवातीपासून नको होतो पण सामान्य लोकांनीही माझ्याबाबतीत फुकट गप्पा मारायला सुरवात केली. दिवसा तहसील, गटविकास वा प्रांत-प्रकल्प, कलेक्टर ऑफिस ला जाऊन ठेके घ्यायचे, कागदे रंगवली की पैसा काढून मज्जा करायची हे मला जमत नव्हतं वा ते करायला मी राजकारणात गेलो नव्हतो. मला लोकांचं आशर्य वाटे. जिथे जाईन तिथे एकच सल्ला दिला जायचा, "तु हुशार आहे. बोलतो चांगला, प्रश्नासाठी लढतो देखील. पण पैसे कमव मग राजकारण कर." एक प्रकारे लबाड्या करायला लोकं प्रवृत्त करायची. राजकारणाबद्दल कोणी चांगल बोलतही नसे. मला राजकारणात राहुन समाजकारण करायचं होतं, सातपुडा बदलायचा वैगरे च्या स्वप्नावर पुनश्च विचार करण्याची वेळ आली. लोकांना तुर्तास अडाणी व कार्यकर्ते सांभाळणा-या पैशेवाल्या राजकारण्याची गरज आहे, आपली नाही हे पदोपदी जाणवायला लागलं. मित्र, नातेवाईक, समाजात मी चेष्टेचा विषय झालो. लोकं तोंडावर छान बोलायची, मागुन शिव्या द्यायची. समोर बसुन तो शिकला नाही तरी किती चांगली कामं करतो? त्याच्या कार्यकर्त्यांनी कसे बंगले-गाड्या केल्या वैगरे ची उदाहरणं देऊन एक प्रकारे तु काय करतोस यापैकी म्हणुन हिणवलं जायचं. समोर एखादा शिपाई झाला तर कलेक्टर झाल्याचा आव आणुन तुझा एवढा शिकुन काय फायदा? म्हणुन प्रश्न व्हायचा. माझी लोकांना पैसे वाटुन, लबाड्या करुन ग्रामपंचायत निवडुन आलेल्या बेवड्या कार्यकर्त्या बरोबर तुलना व्हायची. आधी मोठ्यामोठ्या बाता करत होता आता पाया पडत फिरतोय म्हणुन लोकं फिदीफिदी हसायची. मला 'तु चांगल करतोय, लढ...!" म्हणणारी फारच कमी माणसं उरली. मग जो तो बिनकामी सल्ले द्यायचा. काहीही ऐकवुन जायचा. मित्रांमधे आदर कमी व्हायला लागला. जे मित्र मला सुरवातीला सांगायचे की, "आम्ही डाॅक्टर, इंजिनिअर, वकिल, शिक्षक, व्यावसायिक वा नोकरदार झालो तर आपल्यात तुझ्यासारखा कोणतरी पुढारी लागेल, जो समाजाचे नेतृत्व करेल" असं सांगणा-या सर्वांना मी रिकामा वाटायला लागलो. खुप वाईट वाटायचं, एकांतात असलो की फार भयंकर वाटायचं, रडायला यायचं. खायला, पेट्रोल व कपडे खरेदीला पैसे नसायचे. निवडणुक कर्ज घेतलेलं अजुन फिटत नव्हतं. मन बैचेन राहायचं. लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लायकी काढायला सुरवात केली होती. ग्राऊन्ड काम करत असल्याने मोजके मित्र होते त्यांच्याशीही बोलणे होईना. मग एकटेपण यायचं.
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 3 ай бұрын
म्हणुन मी पुन्हा नव्याने विचार करायला सुरवात केली. आता मताची असो वा राजकारणाची पण भीक मागायची नाही. तत्वे, विचारधारा विकुन, समाजाशी गद्दारी करुन राजकारण तुर्तास करायचं नाही. राजकारणापासुन थोडं अलिप्त राहायचं. लोकांना हक्काप्रती सजग करायचं, लोकांना जागृत करुन अधिकाराप्रती जागृत करायचं, संघर्ष करायचा. लढायचं. पण लाचारीने जगायचं नाही म्हणुन मी काही दिवस पुन्हा अजुन गावापासुन दुर जायचं ठरवलंय. तेव्हाही लोकांनी वेड्यात काढलं होतं आताही काढतील. पळुन गेला मैदान सोडुन सांगतील, मुर्ख म्हणतील, तुझा पिंड नाही, तुला जमणार नाही म्हणतील पण संयम ठेवायचा, सहन करायचं ठरवतोय. संघर्ष करायचा म्हणतोय. पण आधी मानसिक संघर्षाला विराम देणे गरजेचे आहे. स्वत:चा आर्थिक सोर्स तयार करुन मग पुन्हा जोमाने, नव्या ताकदीने सामोरे जायचंय. मार्ग बदलतोय, ध्येय नाही. म्हणुन तुर्तास एक पाऊल मागे. माझ्या खास मित्रांची माफी मागुन सर्वांना चुकभुल व तसदीसाठी क्षमस्व....!! 🙏🙏🙏 शेवटी एवढंच सांगेन..., छोड़ आये हम वो गलियां......!! डॉ. कैलास वसावे, नागपूर. मी हे सर्व सातपुडा सोडून येताना लिहलेले शब्द आहे. कदाचित तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल. मी आता संशोधन आणि आदिवासी प्रश्नावर अभ्यास करतोय. समाजाला किंवा समाजाच्या प्रश्नाला सोडले नाही अजून.. धन्यवाद...!!
@adimkala
@adimkala 3 ай бұрын
खूप छान सर... आपलेच आपल्या मागे भूकतात... म्हणुन स्वतःचा प्रपंच बघण्याची गरज वाटते...
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 3 ай бұрын
Khar aahe
@vaishalikhandare6692
@vaishalikhandare6692 3 ай бұрын
सर अगदीं बरोबर आहे हे लोक कधी कोणी भेटायचे सांगीतले तर कधी याना वेळ मिळत नाही कधी सर्व सामान्य लोकांना कधी त्याची कामे करत नाहीत
@bhimsingvalvi7783
@bhimsingvalvi7783 3 ай бұрын
❤❤ अगदी बरोबर. डॉ साहेब.❤❤❤❤
@pintumore3317
@pintumore3317 3 ай бұрын
K.c.padvi.sodun.dusara.umedvarala.matdan.kele.aste
@MithunPadvi-vd7jb
@MithunPadvi-vd7jb 3 ай бұрын
❤❤
@gulabsingpadvi2637
@gulabsingpadvi2637 3 ай бұрын
कडू सत्य आहे काय विकास झाला
@vilaspawara1859
@vilaspawara1859 3 ай бұрын
आपल्या तरूण वर्ग यांचे विचार हेच विकास करणार दुसरे नाही. समाजाला लुटून यांचे आधीच घर भरले आहे
@abhitanpawara4609
@abhitanpawara4609 3 ай бұрын
✅✅
@padviratan7094
@padviratan7094 3 ай бұрын
आता फक्त सुशिलकुमार पावरा सर
@khemsingvalvi36
@khemsingvalvi36 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर जी ❤
@ManojTadvi-tv3hv
@ManojTadvi-tv3hv 3 ай бұрын
अगदी बरोबर सर
@hiii3061
@hiii3061 3 ай бұрын
Aamdar hoaychi tyari chalu zali bhauchi😅😅😅
@kashinathchaudhari2029
@kashinathchaudhari2029 3 ай бұрын
गावित ने स्वतःची रेकोर्डब्रेक विकास केला हे सर्वविदित आहे कि नाही ?नाहीतर पक्ष बदलण्याची गरज च काय होती ?
@saysingvalvi6747
@saysingvalvi6747 3 ай бұрын
Nice ❤
@niwalyavasave2953
@niwalyavasave2953 3 ай бұрын
Kharo ahe dada
@ravidasgavit4927
@ravidasgavit4927 3 ай бұрын
💯 % बरोबर आहे
@pintumore3317
@pintumore3317 3 ай бұрын
Gay.mahshi.dr.gavitani.vale.sedi.mendi.kc.padvi
@PurushottamvalviValvi
@PurushottamvalviValvi 3 ай бұрын
Gavit aani padvi parivar sodun Navin candidate la chance Milava
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 3 ай бұрын
Naveen pan vikle jatat re bhava
@user-tz6cu3kq9i
@user-tz6cu3kq9i 3 ай бұрын
उस नेता को इस नेता को जीता के या निर्दलीय नेता को जीता के कोई नेता आदिवासियों विकास नही करेगा या संसदमें आवाज उठाने वाला नही है भया अब देश के सभी आदिवासी इक्कठा हो के अनुसूची पांच के लिए आवाज उठाए या तो पूरे आदिवासी क्षेत्र में ग्राम सभाए बनाए समाज को प्रशिक्षित बनाए फिर रहेगा चुनाव जोहार जिंदाबाद
@saysingvalvi6747
@saysingvalvi6747 3 ай бұрын
दुसऱ्याला संधी दिली पाहिजे ❤
@kantilalkokani8331
@kantilalkokani8331 3 ай бұрын
अँड के. सी. पाडवींना आम्ही अजून पाहिलं सुद्धा नाही. सध्या फॅशन झाली आहे कोणालाही विकास पुरुष, लोकनेता, 😂😂😂😢😢😢म्हणायची.
@user-anilkumar501
@user-anilkumar501 3 ай бұрын
समाजाचे नावावर मज्या मारता आणि राजकीय पक्षांची चाटूगिरी करतात तेवढेच काय ते सत्य आहे......
@pratapvasave2200
@pratapvasave2200 3 ай бұрын
प्रबळ पक्षाचे दोन्ही उमेदवार काहीही कामाचे नाही.आतापर्यंत त्यांनी जिल्ह्यासाठी काय दिले.प्रत्येक वेळेस चांदसैली रस्त्याचे उदाहरण दिले जाते. एक म्हणतो गॅस सिलिंडर दिले.
@user-yv4dx4gk6r
@user-yv4dx4gk6r 3 ай бұрын
Fakta Rajendra Gavit mp palghar he mandtat
@user-ih9jp8ou6v
@user-ih9jp8ou6v 3 ай бұрын
He majuranna dabun thevanar lok he dusare anus bjp congress chech pudhari asatat.
@SchoolLife6991
@SchoolLife6991 3 ай бұрын
You have to come in politics...
@laxmanvalvi5693
@laxmanvalvi5693 3 ай бұрын
Konihi kahi kamacha nahit jo to aple swartha sathto aahet
@user-yv4dx4gk6r
@user-yv4dx4gk6r 3 ай бұрын
Voting karnar nahi apalya netyanarcha vishvas udala 75varshat adivasinchi dimachdar fasavnuk zali
@vilaspawara1859
@vilaspawara1859 3 ай бұрын
सुशीकुमार पावरा यांना संधी ध्या नाहीतर घराणे शाही तडल्या शिवाय विकास कधीच शक्य नाही.
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 3 ай бұрын
Shushi pavrache kam nahi.
@AnilGavitVlog-ci2oh
@AnilGavitVlog-ci2oh 3 ай бұрын
सर तुम्हाला संपर्क कसा करायचा ? आपल्या आदिवासी समाजावर एक ब्लॉग साठी माहिती हवी होती.
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 3 ай бұрын
Contact me on 8080136606/9405372708
@natwarsingvalvi1575
@natwarsingvalvi1575 3 ай бұрын
या वेळेस भाजप काँग्रेस सोडुन भारत आदिवासी पार्टी मत दया कोनीही उमेदवार असो
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 3 ай бұрын
Kahi pan..
@pintumore3317
@pintumore3317 3 ай бұрын
Vikas.kame.pahile.tar.dr.hina.gavit.vijayi.honar.k.c.padvi.matdanpurta.aala.aahe
@niteshvasave6696
@niteshvasave6696 3 ай бұрын
Gavit chi tarf karu noka vinakarn tya padvichi pan noko....Tumhi mage pepar vachala nahi ki ky ?ajun bhi satpudyatil janta hi kityek gostinpasun vanchit thevat ahe ..
@j.d.pawara...2630
@j.d.pawara...2630 3 ай бұрын
विजयकुमार गावित चार वेळा आदिवासी विकास मंत्री राहिले आता प्रयंत काय रोजगार दिला नंदूरबार जिल्ह्यातील काय योगदान आहे या नेत्याचे
@user-le2op6js8n
@user-le2op6js8n 3 ай бұрын
दोन वेळा सर
@abhimanthakare8314
@abhimanthakare8314 3 ай бұрын
K c दादांनी 35 वर्ष सत्ता भोगली आहे ,यात त्यांनी स्वतः च्या मतदार संघात काहीच विकास केला
@manishapadvi5819
@manishapadvi5819 3 ай бұрын
अगदी मानातलि समस्या मांडली सर वास्तविक तर आता सर्व लोकांची म्हणजे जागरूक नागरिक असणे फार गरजेचे आहेत तर फक्त आजचा विचार न करता कुठंतरी पैसे घेऊन मतदान ना करता पूर्ण विचार करून योग्य ते प्रतिनिधी निवडून देणे, व महत्वाचे म्हणजे युवक मतदार यांनी विचार करून मतदान व तात्पुऱ्या गोष्टी ( पैसे व दारूचा आहारी ) न जाता योग्य त्या प्रतिनिधीला सोपर्ट करणे काळाची गरज आहे. ............
@manishapadvi5819
@manishapadvi5819 3 ай бұрын
अगदी मानातलि समस्या मांडली सर वास्तविक तर आता सर्व लोकांची म्हणजे जागरूक नागरिक असणे फार गरजेचे आहेत तर फक्त आजचा विचार न करता कुठंतरी पैसे घेऊन मतदान ना करता पूर्ण विचार करून योग्य ते प्रतिनिधी निवडून देणे, व महत्वाचे म्हणजे युवक मतदार यांनी विचार करून मतदान व तात्पुऱ्या गोष्टी ( पैसे व दारूचा आहारी ) न जाता योग्य त्या प्रतिनिधीला सोपर्ट करणे काळाची गरज आहे. ............
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 93 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 57 МЛН
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 93 МЛН