Рет қаралды 64,908
नमस्कार,
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना नेहमी एक प्रश्न असतो कि आज काय बनवायचं? स्वयंपाक करायला जितका वेळ लागत नाही तितका वेळ आज जेवण काय बनवायचं हयात जातो.म्हूणनच आम्ही तुम्हाला साधे सोप्पे जेवणाच्या विविध थाळ्या बनवून दाखवणार आहोत,ज्यात कमी वेळात घरगुती साहित्यात मस्त चमचमीत पदार्थ आहेत. आज मी तुम्हाला साधं सोप्प घरगुती जेवणाचे ताट ज्यात झटपट मसूरदाळ, बटाटे न शिजवता सुकी भाजी आणि रवा वांग फ्राय हे पदार्थ आहेत.
नक्की सर्वांनी ही घरगुती जेवणाची सिरीज पहा🤩सर्वांना आवडेलच ❤️
व्हिडीओ दाखवलेले जेवण हे 3 माणसांना सहज पुरेल एवढे पुरेल
झटपट मसूरडाळ
पाऊण कप मसूरडाळ
फोडणीसाठी साहित्य:3 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी,4/5 लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग,10/13 कढीपत्ता पाने,2 माध्यम आकाराचे कांदे, पाव कप ओल खोबरं,कोथिंबीर,अर्ध टोमॅटो,1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद,चविपुरता मीठ, पाणी.
बटाट्याची सुकी भाजी:
3 मध्यम आकाराचे बटाटे, फोडणीसाथ 3 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी,4/5 लसूण पाकळ्या,10/13 कढीपत्ता पाने,2 माध्यम आकाराचे कांदे, पाव कप ओल खोबरं,कोथिंबीर,अर्ध टोमॅटो,1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद,चविपुरता मीठ.
वांग रवा फ्राय:
2 मोठी वांगी,चविपुरता मीठ, मिरची पावडर, हळद, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा कप रवा, तेल.
#krushnaigazane #vegthali #घरगुतीजेवण
#kokanirecipe #lunchrecipes