रोजच्या नाष्ट्याकरता मऊ मऊ आणि सरसरीत असा रवा टोमॅटो उपमा | Breakfast Recipe | Upma Recipe |

  Рет қаралды 588

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

3 ай бұрын

How to make Sooji upma at home | how to make upma at home | restaurant Style upma recipe | upma recipe by Swarupa's kitchen |
रवा टोमॅटो उपमा -
साहित्य -
१. रवा - दीड वाटी
२. लसूण - १ चमचा
३. कांदा - १ मोठा
४. टोमॅटो - १ मध्यम
५. हिरवी मिरची - ३ ते ४
६. कढीपत्ता - १ काडी
७. जिरे - १ चमचा
८. हळद पावडर - अर्धा चमचा
९. बटाटा - १ छोटा
१०. मीठ - चवीनुसार
११. पाणी - २ कप
१२. कोथिंबीर - बारीक चिरलेली ⅛ कप
पूर्वतयारी -
बटाटा शिलून बारीक तुकडे करून घ्या. पाणी गरम करून घ्या.
कृती -
सर्वप्रथम पॅन मध्ये रवा टाकून थोडा भाजून काढून घ्या. मग त्याच पॅन मध्ये थोड तेल टाकून, तेल गरम झालं की त्यात जिरे, कढीपत्ता, लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि बटाटा घालून छान परतवून घ्या. मग त्यात भाजलेला रवा घालून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या. नंतर त्यात पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून ३ ते ४ मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्या. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमा गरम उपमा सर्व्ह करा.
टिप -
सर्व्ह करताना त्यावर थोड ओल खोबर सुधा खिसून टाकू शकता.

Пікірлер: 2
@varshanimbkar605
@varshanimbkar605 3 ай бұрын
Rava nahi .....sanza or tikhat sheera ase nav ahe
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank you 😊 pan amchyakde hech boltat 😊
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 7 МЛН