Рет қаралды 61,110
#BBCMarathi #UKElections #RishiSunak
दक्षिण आशियाई वंशाचे सुमारे 25 ते 30 लाख लोक ब्रिटनमध्ये राहतात. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी आहेत, ज्यापैकी बरेच मतदार देखील आहेत.
असे मानलं जातं की ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्सच्या एकूण 650 जागांपैकी सुमारे 50 जागांवर दक्षिण आशियाई लोकांचं वर्चस्व आहे, आणि ते या जागांच्या निकालांवर प्रभाव टाकू शकतात.
अनेक दशकांपासून मजूर पक्षाच्या बाजूने मतदान करणारा भारतीय वंशाचा व्यापारी समुदाय गेल्या काही वर्षांत कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडे झुकला आहे.
यावेळी मजूर पक्ष सत्तेवर येण्याच्या शक्यतेने समाज चिंतेत आहे. या निवडणुकांमध्ये दक्षिण आशियाई लोकांसाठी मोठे मुद्दे कोणते आहेत?
पुढचे सरकार आल्यानंतर या लोकांच्या आयुष्यात काही बदल होईल का?
पाहा राघवेंद्र राव यांचा रिपोर्ट
व्हीडिओ - देवाशिष कुमार
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi