Рет қаралды 665
ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स ॲन्ड फिटनेस फॉर ऑल व मोरया स्पोर्टस् क्लब, नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
🌎वर्ल्ड वाकिंग डे-2021
🏃🏻♀️एक पाऊल 2030 ऑलिम्पिक खेळाडूंन करिता! एक पाऊल शारीरिक स्वास्थ्यासाठी
🎯 चालण्याच्या कसरती बरोबर श्र्वासोश्र्वासाच्या मर्म-भेद लयबद्धतेने गंभीर आजारां पासून मुक्तता
आजच्या विज्ञान युगात मानवाने आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली डॉक्टरांच्या हाती सोपवून मनुष्य मशिन प्रमाणे कार्य करत आहे. स्वताच्या शरिरातील अवयवांनवर विविध संस्थांवर जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याने आपल्या शरीरातील हार्ट, लग्स, लिवर, स्मॉल इंटस्टाईन आणि किडणी यांच्या वाहिनींन मध्ये जेव्हा ब्लॉकेजेस निर्माण होतात तेव्हा मानवाला ब्लड प्रेशर, अस्थमा, डायबिटीस, पॅरालिसिस आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
🌎वर्ल्ड वाकिंग डे च्या माध्यमातून विश्र्वाच्या आरोग्याची काळजी व विश्र्व शांतीचा संदेश व नियमितपणे चालणे चे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न नेरुळ मधिल कबड्डी खेळाडूंनी केला
सदर कार्यक्रमासाठी कबड्डी प्रशिक्षक, शिव मल्हार क्रिडा मंडळ, सन्माननीय श्री. शंभू मोरे सर, कबड्डी प्रशिक्षक, सामजिक कार्यकर्ते श्री. अजय शर्मा सर, राष्ट्रीय शिक्षा महासचिव, महिला सुरक्षा सहायता संगठण श्री. नेमसिंग सिसोदिया साहेब, सत्यमेव जयते ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, युवा सामजिक कार्यकर्ता कु. अनिकेत आवटे, क्रिडा शिक्षक श्री धनंजय बर्गे कुमार अविनाश थोरवे व करण मोरे तसेच क्रिडा प्रेमी श्री. श्रीकांत इंगवले व नेरुळ मधिल सर्व कबड्डी संघातील खेळाडू, मोरया क्रिडा मंडळातील सभासद, खेळाडू, पालक, मार्गदर्शक, हीतचिंतक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
मोरया स्पोर्टस् क्लब, नेरुळ, नवी मुंबई कबड्डी मंडळातर्फे श्री. स्वप्निल संभाजी दौंड सर यांनी आभार प्रदर्शन केले.