Рет қаралды 1,441,842
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी केलेल्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांनी " गौरव भारतीय लोककलेचा " हा कार्यक्रम दि.१४ जानेवारी २०१८ रोजी विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल,अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर ( महाराष्ट्र राज्य ) येथे आयोजित केलेला होता.
श्री.संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील व कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली २१५० विद्यार्थी कलाकारांच्या सहभागाने सादर झालेल्या " गौरव भारतीय लोककलेचा " या कार्यक्रमात, सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज ता. माळशिरस या विद्यालयाच्या कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लावणीला शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज (Shikshan Prasarak Mandal, Akluj) या युट्युब चॅनलवर आजअखेर ७०,६६,६३० रसिकांनी पाहण्याचा आनंद घेतलेला आहे.सर्व सहभागी कलाकार व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन !! या सर्वांचा संस्थेस सार्थ अभिमान आहे.
दि.२ जून २०२१
आपला,
जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील
अध्यक्ष,शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज (Shikshan Prasarak Mandal, Akluj) या युट्युब चॅनलची लिंक : / @shikshanprasarakmanda...
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज या युट्युब चॅनल वरील सदर लावणीची लिंक : • Lawani
70,66,630 views