नमस्कार मित्र मैत्रिणींनो 🙏
मी सुहानी सचिन देशपांडे, आपल्या "Suhani's Kitchen" या मराठमोळ्या you tube चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. माझ्या सासरी आणि माहेरी सगळ्याच सुगरणी. आज्जी, आई, आत्या, काकू, मामी, मावशी, सासूबाई, आजे सासूबाई, जाऊबाई अगदी सगळ्याच. या सगळ्यांच्या तालमीत मी तयार झाले आहे. प्रत्येकीकडून काही ना काही शिकायचा प्रयत्न केलेला आहे.
आपल्या चॅनेलवर पारंपारिक, फ्युजन, देशी, विदेशी, व्हेज, नॉन व्हेज, व्हिगन सगळया प्रकारचे पदार्थ सोप्पे करून दाखवायचा माझा प्रयत्न असतो. लहान मुलांसाठी पोषणमूल्य जपणाऱ्या चविष्ट पाककृती करायला मला विशेष आवडतात. तेव्हा साध्या सोप्या प्रमाणबध्द आणि "Absolutely No Fail" रेसिपीज पहायच्या असतील तर "suhani's kitchen" च्या रेसिपीज नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्या तर चॅनेलला अवश्य subscribe करा.
सरतेशेवटी तुम्हा सगळ्यांसाठी एक छोटीशी कविता......
कुठलाही असो प्रकार व्यंजनाचा
मन ओतून केला तर होतो सोपा...
तुमचं चित्त ही नक्की आणा सोबत
या आणि बघा हा सुगरणीचा खोपा..!!!
धन्यवाद 🌹
For business promotion & sponsorships, Plz mail me @
[email protected]