₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं| Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli

  Рет қаралды 70,317

Sunil D'Mello

Sunil D'Mello

18 күн бұрын

₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं | बहाडोली | Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजं जी या ना. धो. महानोरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला मिळालं. हा ढोल वाजत आहे बहाडोली गावचा. पालघर जिल्हा हा तसा चिकूसाठी प्रसिद्ध मात्र महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असलेली बहाडोली जांभळं हीदेखील याच पालघर जिल्ह्यातील.
पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला वैतरणा नदीकिनारी वसलेलं बहाडोली हे टुमदार गाव आज महाराष्ट्रभर जांभूळगाव म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे.
आजच्या या व्हिडीओत आपण जांभळाच्या शेती व विक्रीबाबत जाणून घेणार आहोत आणि या जांभळांना तब्बल १००० रुपये प्रतीकीलो भाव का मिळतो याची उकल करायचा प्रयत्न करणार आहोत.
विशेष आभार:
श्री. प्रकाश हरि कुडू व श्री. प्रफुल प्रकाश कुडू
बहाडोली - जांभूळ गाव
९२८४०६२४५५ / ९६३७९४२२०६ / ९७६७०६२४५५
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.gl/83xG9j2xBLdRa...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBg...
#bahadoli #bahadolipalghar #bahadolijambhul #bahadolijamun #jaambhul #jamun #blackjamun #blackjambhul #palghar #palgharfarming #farming #jamunfarming #jambhulfarming #bahadoligijambhul #bahadoligijamum #vasai #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmellofarming

Пікірлер: 241
@sunildmello
@sunildmello 17 күн бұрын
₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं | बहाडोली | Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजं जी या ना. धो. महानोरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला मिळालं. हा ढोल वाजत आहे बहाडोली गावचा. पालघर जिल्हा हा तसा चिकूसाठी प्रसिद्ध मात्र महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असलेली बहाडोली जांभळं हीदेखील याच पालघर जिल्ह्यातील. पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला वैतरणा नदीकिनारी वसलेलं बहाडोली हे टुमदार गाव आज महाराष्ट्रभर जांभूळगाव म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे. आजच्या या व्हिडीओत आपण जांभळाच्या शेती व विक्रीबाबत जाणून घेणार आहोत आणि या जांभळांना तब्बल १००० रुपये प्रतीकीलो भाव का मिळतो याची उकल करायचा प्रयत्न करणार आहोत. विशेष आभार: श्री. प्रकाश हरि कुडू व श्री. प्रफुल प्रकाश कुडू बहाडोली - जांभूळ गाव ९२८४०६२४५५ / ९६३७९४२२०६ / ९७६७०६२४५५ गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/83xG9j2xBLdRa6sn6 छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzfaq.info/sun/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p #bahadoli #bahadolipalghar #bahadolijambhul #bahadolijamun #jaambhul #jamun #blackjamun #blackjambhul #palghar #palgharfarming #farming #jamunfarming #jambhulfarming #bahadoligijambhul #bahadoligijamum #vasai #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmellofarming
@kushalcreativeworld9566
@kushalcreativeworld9566 17 күн бұрын
सुनीलजी आपण आपली पालघर जिल्ह्याची संस्कृती जपत आहात आणि जनमानसात ती पोहचवत आहात आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कुशल जी
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 15 күн бұрын
आंब्या सारखीचं आतुरतेनी वाट ज्या फळाची मी पहाते.. ते जांभूळ! जांभळं कितीही खाल्ली तरी मन भरत नाही . आजचं हे *जांभूळ आख्यान** मनभावनं!!
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@sadanandghadge941
@sadanandghadge941 12 күн бұрын
सुनील तू ग्रेट आहेस. तुम्ही दोघे मिळून आम्हाला नवनवीन जागा आणि नवीन माहिती देता बघून फार समाधान होते..एवढी सुंदर सुंदर जागी घेऊन जाता बघून मन मोहून जाते असे वाटते की आम्ही स्वतः तुमच्या बरोबर आहोत....प्रसन्न होते मन..god bless you....
@sunildmello
@sunildmello 8 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सदानंद जी
@user-jv2ud2zv2s
@user-jv2ud2zv2s 16 күн бұрын
सर्वश्री सुनिल डिमेलो ,प्रकाश कुडू प्रफुल कुडू , जांभूळ उत्पादकांना करावी लागत असलेली मेहनत , जांभूळगाव व जांभूळ फळाबाबत इत्यंभूत माहिती आपण दूरवर पसरविली आहे . अतिशय छान मुलाखत व मस्त माहिती आपण दिली आहे. आपणांस धन्यवाद!!.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मधुकर जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 17 күн бұрын
सुनील, आज तर फलाहार झाला तुम्हां दोघांचा 😄 इथे शहरात वासाला जांभूळ करवंद नाही तर खायचं राहिलं दूरचं 🤔 असंच जांभूळगाव सिंधुदुर्गात सावंतवाडीनजीक आहे तिथली जांभळं इथे वाशी मार्केटमध्ये येतात विक्रीला. पण हे तुमचं बहाडोली तर एकदम 👌 ♥️👍
@pravingawade3231
@pravingawade3231 17 күн бұрын
तिथली जांभळ गर्द काळी निळी आहेत.... हि बहाडोलीतली जांभळे तितकीशी कलरफूल दिसत नाहीत.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@sunilmane3755
@sunilmane3755 6 күн бұрын
खूप छान माहिती दिली. मी ही ऑस्ट्रेलिया भटकंती करून आलो. त्या काळात तुम्ही सुद्धा परदेश वारी करून आलात. पण आपल्या भारतीय गावात जी मजा आहे ती कुठे ही नाही. धन्यवाद❤
@sunildmello
@sunildmello 3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 17 күн бұрын
सुनिलजी आमच्या माहेरी लहान असताना ज्यांच्या कडुन जांभळ आणायचो त्या बिया आम्ही आमच्या घरच्या मागच्या जागेत लावल्या आणी जांभळाच झाड पण आल आणी नंतर काही वर्षाने ते खुप मोठ झाल आणी याच जातीच ते जांभळाच झाड होत त्याला खुप जांभळ यायची पण या झाडावर चढुन काडु नये कारण फांदी तुटते पटकन आम्ही पण लहान पणी खुप जांभळ खाल्ली आहेत ती आठवण आज झाली
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@eknathpatil4099
@eknathpatil4099 Күн бұрын
बहाडोली ची जांभूळ खूप छान इकडे नेहमी ताजी फळ भाज्या मिळतात माझी सासुरवाडी पोचाडा बहाडोली च्या बाजूला व बहाडोली मधे खूप मित्र आहेत त्यामुळे इकडे गेलो कि रानमेवा खायला भेटतो
@sunildmello
@sunildmello 15 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद, एकनाथ जी
@josephmachado3977
@josephmachado3977 17 күн бұрын
सुनीलजी जांभूळाविषयी खूप चांगली माहिती दिली आणि शेतकरी आनंदाने शेतातील फळ किंवा भाजी देत असेल तर संकोच करण्याचे कारण नाही बाकी तुमचे कार्य खूप चांगले त्या बद्दल तुमचे दोघांचे अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी
@madhavinikte2373
@madhavinikte2373 17 күн бұрын
Farmers मार्केट मस्तच. ऍग्रो टुरिझम ला फार वाव आहे. 👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, माधवी जी
@meenalpandit4204
@meenalpandit4204 17 күн бұрын
नेहमी प्रमाणेच खूप छान माहिती दिली आहेत... आणि तुम्हा दोघांमुळे व्लॉग फार मनोरंजक सुद्धा होतो.. 😊👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj 17 күн бұрын
मस्त सुनील बर वाटल बघून असेच छान छान आम्हाला दाखवत जा ❤
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
@anand3445
@anand3445 15 күн бұрын
किती नशीबवान आहात सुनीलजी आपण .इतका सुंदर अनुभव मिळतोय तुम्हाला आणि तुमच्यामुळे आम्हाला सुध्धा. चित्रण बघूनच मन भरलं तर प्रत्यक्षात काय बहारदार असेल. धन्यवाद मनापासून
@sunildmello
@sunildmello 15 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आनंद जी
@Aagri_4444
@Aagri_4444 17 күн бұрын
आम्ही दर वरशी बहाडोली ला आगरी प्रीमियर लीग आसते तेवहा जातो खुप जंभल खातो😋
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@purushottam647
@purushottam647 Күн бұрын
आज मी पांढऱ्या जांभळ्या बद्दलची माहितीवजा मुलाखत बघितली.
@sunildmello
@sunildmello 15 сағат бұрын
धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 17 күн бұрын
रानमेव्याची खूप सुंदर माहिती दिली आपण. जांभळे तर भारीच!!!
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रद्धा जी
@suyoggogate9270
@suyoggogate9270 17 күн бұрын
अतिशय सुंदर vlog झाला आहे 👍 तुम्ही असे विविध प्रकारचे videos करताय, हे खूप कौतकस्पद आहे 👏
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुयोग जी
@vilasbhagat790
@vilasbhagat790 16 күн бұрын
सुनील जी मी 2021 ला भाडोली वरून आणलेला जांभळाचे झाड लावलेला आहे. चांगला वाढलेला आहे. तुमच्या व्हिडिओमध्ये आज चांगली माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, विलास जी
@madhuriredkar8400
@madhuriredkar8400 13 күн бұрын
Sunil ji तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि आम्हला प्रत्यक्ष तिकडेच आहोत असे वाटते तुमच्या मुळे छान छान व्हिडिओ आणि माहिती मिळते थँक्यू
@sunildmello
@sunildmello 8 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 17 күн бұрын
अरे व्वा मस्त जांभळं, एकदम रसरशीत...👌👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूब आबारी मामी
@abhayjoshi507
@abhayjoshi507 17 күн бұрын
सुनीलजी अथ पासून इति पर्यंत परिपूर्ण माहिती आपण समोरील संबंधित व्यक्ति कडून मिळविता.त्यामुळे आपले video खूप इंटरेस्टिंग होतात. असेच पुढे सुरू राहू दे.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभय जी
@prasadamritsagar7934
@prasadamritsagar7934 16 күн бұрын
खूप छान व्हिडिओ दादा.. प्रफुल जींना फोन करून जांभूळ आणि पावडर मागवणार आहे 👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, प्रसाद जी
@mangeshraut2209
@mangeshraut2209 17 күн бұрын
खूप छान व्हिडीओ बनविला आहे.तुमची धर्मपत्नी *अनिशा* तुम्हाला खूप साथ देते👍. जांभूळ फळ खायला, त्याच्या बिया पासून औषध व जमिनीवर पडून खराब झालेल्या फळापासून जांभळाची दारू बनते. बहाडोली ची जांभळाची दारू मोठ-मोठ्या हस्ती मागवून घेतात. खूप दुर्मिळ व टेस्टी .👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@prafulkudu3929
@prafulkudu3929 17 күн бұрын
खुप छान सुनिल भाऊ बहाडोली गावची माहिती दिली आणि खुप खुप आभारी आहे
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
आपल्यामुळे, आपल्या कुटुंबियांमुळे व आपल्या गावकऱ्यांमुळे हे शक्य झालं. खूप खूप धन्यवाद, प्रफुल्ल जी
@chitrapandit597
@chitrapandit597 16 күн бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात.मी नेहमीच पाहते.खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
@prasanbharti
@prasanbharti 17 күн бұрын
फारच छान व्हिडिओ. सुनील, गाताना आवाजही छान आहे हे लक्षात आलं.‌ निवेदन सुद्धा खूप उत्तम करतोस. आणि शुद्ध‌ मराठी शब्द वापरण्यावर भर देतोस.‌ तुझ्या इतकंच तुझ्या पत्नीचं पण कौतुक आहे. दोघेही हौशी आहात. छान ब्लॉग करता. या ब्लॉगबद्दल मनापासून धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@darshananaik1041
@darshananaik1041 16 күн бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ असतात.. पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा!!🌹🌹🙏
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
@tropicalflowergardening8198
@tropicalflowergardening8198 14 күн бұрын
वाह, मस्त होता तुमचा vlog👌 बहाडोली जांभळाबद्दल उपयुक्त माहिती मिळाली👍
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@martinapereira1124
@martinapereira1124 17 күн бұрын
Thanks sunil sir nice inform..
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Thank you, Martina Ji
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 17 күн бұрын
पाऊस पडला की करवंद आणी जांभळा मध्ये किड पडते त्या मुळे बघुन खावी
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@madhavinikte2373
@madhavinikte2373 17 күн бұрын
छान vlog.. आपले खूप आभार.. छान वाटतात तुमचे video.... 🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@kadambarm9723
@kadambarm9723 17 күн бұрын
Wow Excellent information about Jambul fruit.n vegetables from villagers. Keep it up 👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@ajaysawant6732
@ajaysawant6732 15 күн бұрын
या वर्षीचा सर्वात सुंदर महितिशिर व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, अजय जी
@The_MixedBag
@The_MixedBag 17 күн бұрын
अप्रतिम..
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद अमित
@manoharbhovad
@manoharbhovad 17 күн бұрын
खूपच छान 👍🏻 सुंदर व्हिडीओ.. करवंद साठवण्याच्या पानाच्या डोमाला आमच्याकडे खोला म्हणतात....धन्यवाद सुनिलजी
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@vijayuttekar2108
@vijayuttekar2108 16 күн бұрын
feeling refresh
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Thank you, Vijay Ji
@BhaktiWaghdhare
@BhaktiWaghdhare 16 күн бұрын
Incredible video
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Thank you, Bhakti Ji
@vikrantdeshmukh5604
@vikrantdeshmukh5604 17 күн бұрын
Wa mast video ani jambun sudha lai bhari he jamble bhagun ambarnath chya lahan pani khallely jamblanchi athvan zali
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रांत जी
@RSPawar-cb2wj
@RSPawar-cb2wj 16 күн бұрын
I have 177 plants of two years old.. it's a new activity that we have attempted...
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
That's amazing! All the best. Thank you, Pawar Ji
@sanjyotlemos480
@sanjyotlemos480 17 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, संज्योत जी
@arunchaudhari751
@arunchaudhari751 13 күн бұрын
सुनील जी खूप छान माहितीपट मेहनतीने बनविलाय. खूप डिटेल मध्ये आहे. मस्तच
@sunildmello
@sunildmello 8 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@sanjaymanohar9624
@sanjaymanohar9624 17 күн бұрын
.....हे जांभूळ आख्यान खूपच आवडलं.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, संजय जी
@sumanmore6878
@sumanmore6878 17 күн бұрын
वाह वाह सूनीलजी खुप छान आवाज आहे मस्त व्हिडिओ शेअर केला❤❤
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@nirmalamenezes6124
@nirmalamenezes6124 16 күн бұрын
मस्त बर वाटल . छान
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, निर्मला जी
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 17 күн бұрын
खूप छान माहिती सुनील भाऊ❤
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@ravindrathakare510
@ravindrathakare510 17 күн бұрын
Sunilji ak nambar ❤❤❤🎉🎉
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 17 күн бұрын
Sunil dada , lay bhari.!
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 16 күн бұрын
खूपच छान इन्फॉर्मशन सुनील जी 🙌🏻
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 14 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ केला.
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
धन्यवाद, शोभा जी
@SardarPatil-wt5od
@SardarPatil-wt5od 17 күн бұрын
खुप खुप छान 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, सरदार जी
@joseagnelofernandes708
@joseagnelofernandes708 2 күн бұрын
Thanks
@sunildmello
@sunildmello Күн бұрын
Thank you, Jose Ji
@scaneagle5028
@scaneagle5028 15 күн бұрын
Kup chan video aahe.
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@BlossysKitchen
@BlossysKitchen 16 күн бұрын
भारीच रानमेवा👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, ब्लॉसी जी
@dostiart512
@dostiart512 17 күн бұрын
Khup chan mahiti 👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@mohannb8599
@mohannb8599 17 күн бұрын
Kharach ..khup chan vishay ..wah kiti mast jambhul ..tondala pani sutlai dada 👍..mast vlog da 👍🌹
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@mohannb8599
@mohannb8599 16 күн бұрын
@@sunildmello always wc da 👍..thumche vlog che subject khup mast astat ❤️..loved it ..n tnx da 👍
@shubhadaparab574
@shubhadaparab574 15 күн бұрын
Wau Sir majja
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
धन्यवाद, शुभदा जी
@rajushettigar1129
@rajushettigar1129 13 күн бұрын
Very good information
@sunildmello
@sunildmello 8 күн бұрын
Thank you, Raju Ji
@archanaagree303
@archanaagree303 17 күн бұрын
Sunil tumche sagle ch vlgos chan astat👍👍👍. Ani ha sudha vlgos chan hota. Ase Chan vlgos karat raha 😊
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 17 күн бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. लिची हया फळाबददल ही माहिती दयावी ,लिची ही आपल्या पालघर जिल्हात आहे असे वाचनात आले होते तर त्यावर विडीओ बनवा तुम्ही आपल्या तालुक्यातील व आपल्या जिल्हातील सर्व उद्योग धंद्याबददल माहिती देता .खुपच छान काम करत आहात. खुप आपल्या उभयताचे धन्यवाद व तुमच्या मुलीना ही खुप प्रेम आपल्या जाभुळ बाग वाल्यांना ही पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
हो, तो विषय देखील विचाराधीन आहे. खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@user-ew8pr6gw6n
@user-ew8pr6gw6n 17 күн бұрын
Sunil ji khup chhan vdo
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@pankajpawarmahendra2539
@pankajpawarmahendra2539 7 күн бұрын
Naiss ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
@sunildmello
@sunildmello 6 күн бұрын
Thank you, Pankaj Ji
@ashadbritto5259
@ashadbritto5259 17 күн бұрын
Sunil you are a great
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Thank you, Asha Ji
@varshapise1767
@varshapise1767 16 күн бұрын
khup avdtat
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, वर्षा जी
@nikitapramodmodk7411
@nikitapramodmodk7411 16 күн бұрын
नमस्कार भाऊ खुप सुंदर माहिती तुमच्या विडीओ मुळे आम्हाला समजले की जांभळाची शेती केली जाते
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, निकिता जी
@shraddhasalaskar6796
@shraddhasalaskar6796 15 күн бұрын
खूप छान 👌👌
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
धन्यवाद, श्रद्धा जी
@reshmapatil6236
@reshmapatil6236 17 күн бұрын
Sunil dada khup mast video aahe.. ❤
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, रेश्मा जी
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 17 күн бұрын
जांभळा चा सडा पडला आहे खुपच छान
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 17 күн бұрын
मस्तच 😋 मला खूप आवडतात, last Sunday la India वरुन parcel मध्ये आले होते. मनसोक्त खाल्ले.
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 17 күн бұрын
Shevalyachi भाजी healthy testy असते. प्रतेक वर्षी खायची
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 17 күн бұрын
👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, अभिषेश जी
@monikabaz8426
@monikabaz8426 17 күн бұрын
Nice 👍👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Thank you, Monika Ji
@royalart3002
@royalart3002 17 күн бұрын
👌👌👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
खूब आबारी रॉयल
@user-zz8vd9tl6t
@user-zz8vd9tl6t 16 күн бұрын
दादा शेवळ्याची भाजी एक नंबर लागते दादा एकदा बनवा आपल्या कडे काकडे असतात ते ठेचून बि काढायची व भाजी बनवायची मला खूप आवडते ही भाजी सगळे कसे आहात तुम्ही पाऊस आहे का आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
अगदी बरोबर बोललात, जयश्री जी. खूप खूप धन्यवाद
@vijaymore1091
@vijaymore1091 16 күн бұрын
Sunil ji tumhi palghar la alat . Chhan mahiti आपल्या महाराष्ट्राला दिली. पुढे उन्हाळ्यात भोपळी मिरची चां व्हिडिओ बनवा स्थळ Vangav Dahanu
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
भोपळी मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक मिळाल्यास मदत होईल. खूप खूप धन्यवाद, विजय जी
@indumatishirsat
@indumatishirsat 17 күн бұрын
👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, इंदुमती जी
@thomasdias8979
@thomasdias8979 17 күн бұрын
👌👍💐
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, थॉमस जी
@priyankaamburle2257
@priyankaamburle2257 16 күн бұрын
जायला पाहिजे इथे❤
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
नक्की जा, आवडेल आपल्याला. धन्यवाद, प्रियांका जी
@rajukadam3629
@rajukadam3629 16 күн бұрын
👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, राजू जी
@ktsn2179
@ktsn2179 17 күн бұрын
Sunil Sir, Market madye Jambul chi ek navin Variety aali ahe... Name is Thiland Kg 10 . 10 nos Jambhul fruit = 1 kg weight... Means each fruit is weighing @100 gm +... Mi 2 nos grafted plants order kele ahet... West Bengal chya Nursery madhun...
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@khanna302
@khanna302 16 күн бұрын
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, खन्ना जी
@rajaramborgave3201
@rajaramborgave3201 17 күн бұрын
🎉🌱👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, राजाराम जी
@miltonambrose4990
@miltonambrose4990 17 күн бұрын
Sunil Beautiful Vlog 👌👌
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Thanks a lot, Milton Ji
@kanchanrao675
@kanchanrao675 17 күн бұрын
Sunil I called him immediately but was very disappointed tht they can't send it across by courier if we want anything.They should certainly have this facility just like mangoes they supply anywhere to anywhere you require.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
It's a remote area and the facility may not be easily available. Thank you, Kanchan Ji
@hemantavhad2101
@hemantavhad2101 16 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, हेमंत जी
@NavnathWagh21
@NavnathWagh21 16 күн бұрын
सुनील सर ❤
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, नवनाथ जी
@oneworld4968
@oneworld4968 17 күн бұрын
Anisha Your Voice 😊.. I had Commented Couple of Videos ago regarding the same!!! Sunil I think You Should Go Behind the Camera for Couple of Videos for a Change 👍
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
Absolutely, I told her many times. Will try to implement it soon. Thanks a lot
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 17 күн бұрын
आमची माती आमची माणसं. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, फारुख जी
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 14 күн бұрын
AATTACHYA SAGLYAT MOTHYA ROGACHE HE UTTAM AUSHAD AAHE. MADHUMEHA SATHI.
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, उपेंद्र जी
@kailasudar5433
@kailasudar5433 16 күн бұрын
सुनील जी तुमचे हिडियो छान असतात . जिथे जाता तिथे खुप छान संभाषण करता . मला एक माहिती हवी आहे ती अशी की, तुम्ही Job काय करता ? कैलास उदार . मु.पो शिक्रापूर . ताःशिरूर ' जिः पुणे
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
मी मुंबईला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो. धन्यवाद, कैलास जी
@nathcreation9327
@nathcreation9327 13 күн бұрын
सेवली ची भाजी चिकन मटन पेक्षा जाम भारी लागते. बनवता आली पाहीजे.
@sunildmello
@sunildmello 8 күн бұрын
या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, नाथ जी
@avikam18
@avikam18 16 күн бұрын
Chan पण आम्हाला अनिशा ताईच्या केसांच रहस्य जाणायच
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
हो, सुंदर आहेत न...धन्यवाद
@khanna302
@khanna302 16 күн бұрын
🇮🇳💕🌹🙏
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, खन्ना जी
@bobettelewis5343
@bobettelewis5343 14 күн бұрын
How many Jamuls will I get for a kg.I mean nos. In my state each Jamul cost Rs 4. So Rs 400 for 100
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
The GI tag information says these Jamuns weigh around 18 grams. Thank you, Bobette Ji
@bhartipayer4262
@bhartipayer4262 11 күн бұрын
Khup chan vasai la kachra kand yete te kuthe milte aani kadhi
@sunildmello
@sunildmello 8 күн бұрын
माफ करा पण मला याविषयी माहिती नाही. धन्यवाद, भारती जी
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 15 күн бұрын
दादा वाईन ची आणी जांभूळ पावडर ची व्हिडीओ कर पिल्ज 🙏
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
नक्की प्रयत्न करू, अभिशेष जी. धन्यवाद
@nayanasrecipes1705
@nayanasrecipes1705 Күн бұрын
ईथे मुंबईत पहायला मिळत नाही. दादरला काही जण विकतात. पण खराब झालेली जांभूळ देतात. ते आपल्याला हात लावू देत नाहीत. निवडून घेऊ शकत नाही. Pls यांना सांगा. online दया.
@sunildmello
@sunildmello 15 сағат бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास प्रफुल्ल जी आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, नयना जी
@ajaysawant6732
@ajaysawant6732 15 күн бұрын
सुनील sir कोकणात कधी येणार आहात
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
बघूया कधी जमतं ते. धन्यवाद, अजय जी
@riteshind7547
@riteshind7547 3 сағат бұрын
💕👋🌿👌💚💚✔️
@SupriyaGhude
@SupriyaGhude 17 күн бұрын
सुनिल दादा, एखाद्या चिकू बागायतीची माहिती द्या please ...
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
चिकूबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा. धन्यवाद, सुप्रिया जी kzfaq.info/get/bejne/pJ9leZyWzLGzZZs.htmlfeature=shared
@SupriyaGhude
@SupriyaGhude 16 күн бұрын
@@sunildmello खूप खूप खूप धन्यवाद दादा 😻
@rupeshpatil7697
@rupeshpatil7697 16 күн бұрын
khup mahag ahet
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, रुपेश जी
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН