बाणाईचे पहाटेच जेवण तयार | शिंग्रोबा घाट उतरण्या अगोदरची धनगरवड्यावरची तयारी | Shingroba | khandala

  Рет қаралды 664,178

धनगरी जीवन

धनगरी जीवन

9 ай бұрын

बाणाईचे पहाटेच जेवण तयार | शिंग्रोबा घाट उतरण्या अगोदरची धनगरवड्यावरची तयारी | Shingroba | khandala sidu hake
banai hake #dhangarijivan #siduhake #banai #dhangar #shingrobaghat #shingroba #शिंग्रोबा
#shingrobadhangar #शिंग्रोबाधनगर

Пікірлер: 413
@hiteshpachkude668
@hiteshpachkude668 9 ай бұрын
पहाटे 3 वाजता उठून, स्वतःची तयारी करून, स्वयंपाकाला लागणे, ते पण नेहमीसारखं प्रसन्न मुखाने वा बानाई ताई!!!! अर्चना ताई बाणाई ताई सलाम तुम्हाला 🙏🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 8 ай бұрын
सुसज्ज किचन मध्ये मेकप करुन, आधुनिक भांड्यात स्वयंपाक करत, नाटकी बोलत ऐकण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ बघणं भारी वाटतं कारण तो सच्चा आहे. तुटपुंज्या सोयीतही आनंदात राहणे हे तुमच्या कडून शिकायला मिळतं. खूप छान!!! बाणाई सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokkamble6735
@ashokkamble6735 5 ай бұрын
सौ.बनाबाई अतिशय महनती बाई पहाटे ४वा ऊठुन हसत मुखाने आपल्या सकाळीची न्याहारीची व्यवस्था,दुपाचे जेवण कपडालत्ता व्यवस्थित ठेवुन दिवसभर .मेढरे चारून परत संध्याकाळी ठरलेल्या जागी येऊन रानमाळावर मेंढरे एका जागी ऊभी करून न थकता बनाबाई रात्रीचे जेवण मोकळया आभाळाच्या छता खाली आन॔दाने संसार मांडते..तिच्या कष्टाला सलाम..
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 9 ай бұрын
बायकांची जास्तच कसोटी लागते. तरी पण किती समंजसपणा आम्हाला आमचीच लाज वाटते .तुमचे कष्ट पाहून सलाम तुम्हाला.
@STM96557
@STM96557 9 ай бұрын
KZfaq चे पैसे मिळायला लागल्यावर बऱ्याच लोकांनी जॉब सोडले &फक्त विडिओ काढत बसले पण तुम्ही तुमचा प्रांत &खरेपणा सोडला नाही. वर्ष झालं घर सोडून. किती कस्ट करता
@sanchita16
@sanchita16 9 ай бұрын
एकदम बरोबर
@radhikamasale6014
@radhikamasale6014 9 ай бұрын
Khr ahe
@chikankarikurti9
@chikankarikurti9 9 ай бұрын
अगदी खरं आहे
@siddharthtelang5976
@siddharthtelang5976 9 ай бұрын
एकदम बरोबर बोललात
@kishoribodke6456
@kishoribodke6456 9 ай бұрын
Ho n aani video pn agdi real astat
@dipteemestry568
@dipteemestry568 2 ай бұрын
एवढे कष्ट करून पण नेहमी आनंदी राहाणे चेहऱ्यावर, नेहमी हसु असतं . कीती कौतुक करावे तितके कमीच आहे 😍 बाणाई तूझा अभिमान वाटतो.एक आदर्श आहेस तू.🙂
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 8 ай бұрын
किती कष्टमय जीवन आणि तरी कोठे तक्रार नाही, परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो 🙏
@aashlatawaman3063
@aashlatawaman3063 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ,तुम्हांला स्वामी भरपूर उत्तम आरोग्य देवो , ऐश्वर्य देवो हीच प्रार्थना ‌श्री, स्वामी समर्थ
@user-bd6bi1fq7x
@user-bd6bi1fq7x 9 ай бұрын
किती अवजड जीवन तरी किती प्रसन्न मनाने जेवण करता आम्हांला थोडा वेळ लाईट गेली तरी जमत नाही सलाम दादा ताई❤❤
@latagaikwad2717
@latagaikwad2717 9 ай бұрын
किती उरक बाणाई तुझ्या सारख्या नळदुर्गेला सलाम स्त्रीशक्ती ल सलाम
@piyusalve5800
@piyusalve5800 9 ай бұрын
किती समाधानी आनंदी साधी भोळी भाबडी माणस उत्साह संचारला आहे वीडीओ खुप छान
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 4 ай бұрын
खरच कीती समाधानी आयुष्य तुमचं. कुणाचं एक नको कुणाच़ दोन नको. आपण भले आपले कष्ट भले. " हे जीवन सुंदर आहे. "~~~~~~~~~🎉🎉🎉🎉👍🙏🙏🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐
@sharadgoykar5012
@sharadgoykar5012 9 ай бұрын
घाटा पलिकडे जाऊन तुम्ही एकदम सुखरूप रहावे हीच देवाकडे प्रार्थना करतो सिद्धु दादा
@jyotinere4454
@jyotinere4454 9 ай бұрын
नारीशक्तीचा सन्मान तिची मेहनत बाहेर पहाटे उठून करण ही हिम्मतीने करतात खरोखर सन्माला पाञ आहेत तुमच्या स्ञियांना सलाम
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 9 ай бұрын
आम्हाला इथं एक दिवस लाईट गेली थोडा वेळ तर चिडचिड होते खूप तुम्ही कसं करता काम एवढया अंधाराचं,, खरचं कौतुकास्पद आहे
@nayak07
@nayak07 9 ай бұрын
Barobar Te hee smiling face. Love banaai.
@narayankelkar4512
@narayankelkar4512 9 ай бұрын
खूप प्रेरणा देतात जगायला तुमचे vedio, बनाई ताई v अर्चना ताई कष्टाळू v हसत मुख खूप छान , तुमचे बंधू पण चांगली साथ देतात , सागर ची काळजी घ्या असेच एकत्र रहा मस्त 🙏🙏 कधी योग आला तर नक्की भेटू
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 9 ай бұрын
दादा बाणाई सलाम तुमच्या कष्टाला. पण पुरेशी विश्रांती व झोप घेत जा. मस्तपैकी.
@vishwaspawar9883
@vishwaspawar9883 9 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचे जीवन खूप कष्टमय आहे तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला खूप एनर्जी येते
@urmilaingale1718
@urmilaingale1718 3 ай бұрын
पहाटे तीन वाजता उठून बाणाईने अंघोळ करून स्वयंपाक करायला लगली.धनगरांच्या बायकांना खूप काळजीपूर्वक काम करावी लागतात.मेंढर घोडी कोंबड्या शेरडं माणसं सगळ्यांना घेऊन प्रवास करावा लागतो.खायलचीप्यायची तयारी करून.खूप कष्ट घेता हसतमुखाने तुम्ही सर्वजण.सलाम तुमच्या कष्टाला.
@sushantrajebhosale1834
@sushantrajebhosale1834 4 ай бұрын
हा समाज खूप शांतप्रिय आहे. हे लोक मला खूप आवडतात. यांच्या भाज्या तर अप्रतिम असतात, खूप चविष्ट.. आमच्या लातूर जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये येतं असतात. भाषा इतकी प्रेमळ आणि जीव लावणारी. यांच्या राहणीमान सुद्धा खूप साधी. यांना बघितलं की आपले पणा जाणवतो. पण काही लोकांना यांची किंमत नसते आपल्या क्षेत्रात आले की हुडतुड करत असतात. यांच्या मुळे कसलेच नुकसान होत तर नाहीच पण उलट शेती साठी उपयुक्त असा खत मेंढ्या पासून मिळतो. पण आताच्या रासायनिक युगात याची किंमत लोकांना कळत नाही. यांच्या कार्याला सलाम.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 9 ай бұрын
बाळूमामा,खूप कष्टप्रद आयुष्य आहे या लोकांचं.यांना सुखी ठेव.
@NG-hj7zt
@NG-hj7zt 9 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 9 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप कष्टमय जीवन आहे दादा तुम्हचे ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो.🙏🙏
@sadhanabandhane296
@sadhanabandhane296 9 ай бұрын
बापरे एवढे कष्ट करूण सुद्धा किती आनंदी aahat मी तुमचा video chi वाट पहात असते sidu dada banai किसन अर्चना ani sagar❤❤❤
@prashantpuranik2556
@prashantpuranik2556 4 ай бұрын
माणसाची सहनशीलता आजकाल कमी होत चालली आहे. अगदी लहान सहान गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की माणूस लगेच डिप्रेशन मध्ये जातो किंवा त्याचा इगो hert होतो. ही बाणाई रोज सकाळी आनंदाने उठून आपल्या नातेवाईकांसाठी राबते. चेहर्‍यावर निरागस हास्य, बोलण्यात कोणताही ढोंगीपणा नाही. खरेच तुम्ही लहान लहान कामांमध्ये आनंद घेता ना, तो खरेच पहाण्यासारखा आहे. बाणाई तुम्हाला खूप शुभेच्छा.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
वहिनी, दादा 🙏🙏तुम्ही सगळेच किती लवकर उठून जेवण बनवुन सगळ कराव लागत खूप धावपळीचं जिवण आहे. 🙏वहिनी कितीही संघर्ष करावा लागला तरी चेहऱ्यावर कायम हसू असत हीच तर तुमची ताकत आहे. सागर बाळ पण किती लवकर उठला आहे. 🙏बाळू मामां तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. तुमच्यावर बाळू मामांची कृपा कायम रहाणार 🙏🙏 तुम्हाला सर्वांना सलाम 🙏🙏👍
@user-sl3ob2fm1o
@user-sl3ob2fm1o 9 ай бұрын
जेवढभी कौतुक कराव तेवढं कमीच आहे तुमचं किती खुश आणि आनंदी राहता तुम्ही.. 🙏🙏
@sulochanabutte-pq3oy
@sulochanabutte-pq3oy 5 ай бұрын
सिद्धू बाणाई तुमच्या बरोबर आम्हाला पण रानोमाळ भटकण्याचा आनंद आणि अनुभव मिळतो
@surekhakamble320
@surekhakamble320 9 ай бұрын
बानाई तुझी धन्य ग किती वेळा पसारा मांडायचा आणि किती वेळा आवरायचा...
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 9 ай бұрын
दादा यालाच म्हणता बाई पण भारी देवा बाणाई सलाम आहे तुम्हाला👌👌🙏🏻🥰❤❤
@rohineematange2446
@rohineematange2446 9 ай бұрын
भाऊ वाटेत फळ काकडी टोमाटो घेऊन भाकरी खात जा रस्त्यात कोठेतरी आमटी मिळाली तर घ्याकोरडे जेवण जेवू नकव दूध घ्या टॉर्च सगळयाच्या हातात असू द्या रस्त्यात आईदादा भेटतात का तुमच्या बहिणी कोठे असतात मुलीची भेट होते का म्हण की बाणाई व अर्चना गाणी
@medhajoshi2367
@medhajoshi2367 9 ай бұрын
तुमच्या आनंदी व बिनातक्रार काम करायच्या वृतीला सलाम. तुम्ही निसर्गाची लेकरं आहात. तुमचे व्हिडिओ बघताना उत्सुकता वाढते. आणि तुमच्या कष्टाची दखल घेतली जावी. असं मनापासून वाटतं दादा.तुम्हां सगळ्यांना खूप शुभेच्छा.
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 9 ай бұрын
दादा मेढकं ओळखू कसे येतात एकत्र असतील तर बानाईने स्वयंपाक खूप छान केला का खूप कष्टाळू जीवन आहे पाहून वाईट वाटलं सलाम धनगर समाजाला
@prakashpable2134
@prakashpable2134 6 ай бұрын
धन्य आहे बानाई किती मेहनत करते खूपच कष्टाचे काम आहे तू आहे म्हणून वाडा आहे प्रणाम तुला
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 7 ай бұрын
दादा,बानाई...तुम्ही इकडून तिकडे म्हणजे बिर्हाड हलवताना ,एवढा सगळा संसार कसा हलवता... तुम्ही चौघेही एका जीवाने राहाता...असेच राहा प्रेमाने...
@girishthakare3484
@girishthakare3484 9 ай бұрын
❤🇳🇪🙏👌🌹 तुमच्या सर्वांच्या मध्येच देव आहे खूप अभिमान वाटतो धन्यवाद व आशीर्वाद 🎉❤
@user-lp8re3np5i
@user-lp8re3np5i 9 ай бұрын
दादा गाणं खूप छान म्हणता येते तुमला ❤❤❤❤❤
@KondibaRudre-js7ou
@KondibaRudre-js7ou 6 ай бұрын
बानाईताई तुम्हाला कंटाळा येतोका नाही तुम्ही खरोखर बानुबाई आहेत आमचा भाऊला खरोखर बानाई भेटली
@majhiaaji276
@majhiaaji276 8 ай бұрын
खरंच खूप खडतर असतो हा प्रवास उन वारा पाऊस झेलत स्वतःची मुलाबाळांची परवा न करता दूर पोटासाठी दूर जाऊन राहणे खूप अवघड असत. माझे आजी आजोबा पण पूर्वी जायचे मेंढ्या घेऊन 😊😊❤❤
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 9 ай бұрын
श्रम मे हैं श्रीराम हमारे..... अगदी अस्सच आपले जीवन. सिदुभाऊ कष्टातून निर्माण होतो घाम आणि त्यातून मिळणारा दाम, तोच देतो खरा आराम. अतिशय सुंदर व्हिडिओ केला आहे. असा व्हिडिओ आणि यू टुयबर आजपर्यंत पहिला नाही. दीपावली पर्यंत 300000 subscribers पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर्वांनी यासाठी नक्की प्रयत्न करावेत. धन्यवाद
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@jayatirmare3071
@jayatirmare3071 9 ай бұрын
खरच खूप कौतुक आहे तुमचे तुम्ही खर म्हणजे सकारात्मक विचारांचे भांडार आहात परमेश्वराकडे हेच मागणे असेच आनंदी ठेव
@sunandadrode6978
@sunandadrode6978 9 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान या कष्टाला काही सिमाच नाही तुमच्या कडे शिकावे जीवन असे जगावे 👍🙏🙏❤️
@Navnath_madane
@Navnath_madane 9 ай бұрын
सर्व प्रथम विर हुतात्मा शिंग्रोबा देवाला अभिवादन तुमच्या कष्टमय जीवन पाहिल्यावर जीवनात प्रेरणा मिळते पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पंढरपूरकर
@AshviniKadam-dv7gy
@AshviniKadam-dv7gy 2 ай бұрын
खुप छान ताई मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात, श्री स्वामी समर्थ माहाराज तुम्हाला भरपूर आरोग्य दिवस ही स्वामी समर्थ चरनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 9 ай бұрын
खुप छान वीडियो सगल savsar बाई च्या जीवावर चालतो घरतली बाई चांगली तरच तो प्रपंच , है त्रिवार सत्य ,
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 9 ай бұрын
कोबंड्यान बांग दिली मला ग बाई जाग आली सुपात जोंधळ घोळिते जात्यावर दळण दळीते अस म्हणताना बानाईचे लाजण खूप छान वाटले कारण ते अक्शन न म्हणता ओरिजनल होते हाकेभाऊ खूप विनोद करता म्हणून बानाईचा थकवा दूर होण्यास मदत होते सागरची लूडबूड भारी वाटलं
@varshabhosale3017
@varshabhosale3017 8 ай бұрын
ही आहे हिंदु संस्कृति बाणाई ने एवढ्या पहाटे उठून सर्व प्रथम आंघोळ केली व नंतर सर्व कामांना सुरुवात केली.🚩🚩🙏🙏
@meghashewade8174
@meghashewade8174 9 ай бұрын
तुमच्या मुळे आम्हा विदर्भातल्या लोकांना इतक सखोल दर्शन घडत आहे कोकण पश्चिम महाराष्ट्राच आणी तुमच्या जिवनाच्या संघर्षाच पण! धन्यवाद सिद्धू भाऊ
@surekhapandit1274
@surekhapandit1274 5 ай бұрын
किती कष्ट घेऊन जगतात हे लोकं. सुविधा नाही कुटकात सगळं पाट्यावर. तरी प्रतिकूल परिस्थितीत कमी सामानात किती पदार्थ बनवीत असते बानाई आणि कायम हसतमुख असते. आणि फटाफट बनवते आणि व्यवस्थित ,चांगलं बनवते.खरच कौतुक करावे तेवढे कमीच आहे बनाईचे.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 8 ай бұрын
बानाईची प्रसन्नता ऐशोआरामात जगणारया श्री पेक्षा ही खूप भारी आहे.
@gokulsonavane
@gokulsonavane 5 ай бұрын
मीरची चा ठेचा मस्त तोंडाला पानीच आल बघुन ताई असा ठेचा आता मीही करुन बघेल तरी पन तुमच्या हातची चव नाही येनार चुली वरच आनी बनवन्याची पंधत ताईच्या हातची भंनाटच आहे खुपच छान
@shobhasakorkar4750
@shobhasakorkar4750 Ай бұрын
बानाई तुला प्रणाम! तुम्हांसर्वांचे खूप कौतुक वाटते. आम्हांला थोडा वेळ वीज गेली, पाणी उशीरा येणार,कामवाली बाई आज येणार नाही हे समजल्यावर आम्ही किती त्रागा करतो.तुम्ही लोक एवढे कष्ट हसतमुखाने सहजतेने करतात.सर्वांना सलाम!
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 9 ай бұрын
मस्त पैकी भाऊ तुम्ही भावाला किती प्रेमाने उठवता
@mangeshghag8916
@mangeshghag8916 9 ай бұрын
किति आनंददायी जिवन...वरती आकाशाच छप्पर,खाली धरणीमाता,नको एसी,पंखा,गार गार निसर्गाची डोंगराची हवा, मनमुराद आनंद
@jyotikakade9143
@jyotikakade9143 9 ай бұрын
बिराजी दादा टीचर आहेत असे वाटते किसन दादा पावडर वगैरे लावून व्यवस्थित राहतात आणि दादा तूम्ही मोठे भाऊ ची जबाबदारी तुमच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरून दिसुन येते
@meeramhaske6900
@meeramhaske6900 9 ай бұрын
कोंबड्याने बाग दिली बाई ग मला जाग आली सुपत जोधळ घोळीते जा जात्यावर वर दळण दळीते पाण्याची राहीली एक खेप दिवसांनी घेतली वरच झेप चुलीवर भाकरी भाजी ते आस आहे ते गाणं दादा वहिनी मला येतंय ते
@kiranthombare9122
@kiranthombare9122 9 ай бұрын
आपल्या लोकांच जिण असच राव ताईंची तुम्हाला छान साथ आहे
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 9 ай бұрын
जीवन कसे जगावे दादा बाणाई अर्चना किसन सागर यांच्याकडुन शिकावे सर्व सुखसोई असून काहींना जगता येत नाही आदर्श घेण्यासारखा आहे 🙏🙏🙏🙏🙏
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 9 ай бұрын
दादा सकाळी, सकाळी लवकर काम उरकतात बाणाई वहीनी, खुप चपळ आहे अर्चना ही खूप काम करत असते बाळुमामाच्या नावानं चांगभल 🚩🔥🙏🙏
@rohiniangane3260
@rohiniangane3260 3 ай бұрын
किती कष्टाचे जीवन आहे तुमचे पण किती हसत जगता. सलाम तुम्हाला.
@kumudinisapkale3840
@kumudinisapkale3840 8 ай бұрын
किती छान नैसर्गिक पद्धतीने जीवन जगता
@VidaansWorld
@VidaansWorld 9 ай бұрын
खरं कौतुक आहे, Banaila कसे andharat पीठ, मीठ, मिरच्या, बाजरीचे पीठ सापडते .....ग्रेट
@jagtapsandipp4272
@jagtapsandipp4272 9 ай бұрын
ह्या असल्या कार्यकर्त्यांमध्ये १५:१५ आमदारांनी उपलब्ध राहील पाहिजे आणि अनुभव काय असतो लोकांना सांगितले पाहिजे 🙏🙏🙏
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 9 ай бұрын
तिघे भाऊ। खुप। मेहनत। करतात। खुप। छान। आहेत। चागले रहा😊
@ashakhachane2734
@ashakhachane2734 9 ай бұрын
दादा जरा आरामात च घाट उतरून घ्या. बाणाई व अर्चना दोघींनी तर चांगलीच मजल मारली आहे. खुपच थकत असतील पण पर्याय नाही. बाणाई सल्युट बाई. सागर ची काळजी घ्यावी❤❤❤❤❤❤
@hemlatashahane6135
@hemlatashahane6135 9 ай бұрын
बाणाई 3:00 वाजता उठून हसतमुखाने स्वयंपाक करते खरंच बाणाईला मानायला पाहिजे आज कालच्या बायका हसणं तर दूर स्वयंपाक करून कधी खाऊ घालतील आजकालच्या बायका फार आळशी झालेल्या आहेत बाणाईच्या चेहऱ्यावर पहाटे तीन वाजता हसत मुखाने स्वयंपाक करते सलाम
@dancelover4698
@dancelover4698 4 ай бұрын
बाळूमामा तुमच्या सदैव पाठीशी आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सुखी ठेव
@PopatShelke-ly7kc
@PopatShelke-ly7kc 9 ай бұрын
या गाण्याने जुनी आठवण करून दिली
@priyankabhome2846
@priyankabhome2846 6 ай бұрын
खुप छान... बाणाई खुप उत्साही आणि सांसारिक आहे...खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी..
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 9 ай бұрын
खर्डा पिठलं भाकर छान बेत .मस्त खा चुस्त रहा . चहा चपाती मस्तच.
@vatsalazende8256
@vatsalazende8256 9 ай бұрын
एवडे कस्टाचे जीवन असते हे तुमच्या मुळे समजले देव तुम्हाला शक्ती देवो
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 9 ай бұрын
आम्हाला एक दिवस लाईट गेली तर खूप घालमेल होते पण तुम्ही यवढ्या मोकळ्या रानात अधरात कुंधरात किती आनंदाने जीवन जगता खूपच कमाल आहे तुमचे व्हिडिओ पाहून खूपच एनर्जी मिळते
@ankitaubale2491
@ankitaubale2491 9 ай бұрын
काका गाणं पण एक नंबर खूप छान व्हिडिओ 😊
@pravinbhujade2837
@pravinbhujade2837 8 ай бұрын
माझे तर शब्दच समले ... HATS OFF
@vandanabande1018
@vandanabande1018 9 ай бұрын
दादा एक खलबत्ता घ्या ना म्हणाजे म्हणजे बानाई वहीनी आणि अर्चनाला काहीपण पटकन कुटता येईल आणि काम पण लवकर होईल त्यांचे
@rkr5501
@rkr5501 9 ай бұрын
Vanjamule ghet nahit te
@Manumama3
@Manumama3 2 ай бұрын
आपले एकच मागणे आहे दाजी ताई ला योग्य ते साहित्य घेऊन द्या भांडे आणि इतर वस्तू 🙏
@anitapatkar6590
@anitapatkar6590 3 ай бұрын
किती आनंदात करते सगळे धन्य आहे न❤
@savitasvariations6173
@savitasvariations6173 8 ай бұрын
मुख्य म्हणजे आंघोळ करून स्वयंपाक करते बाणाईताई, सुंदर ❤
@user-vo7pd1kr9f
@user-vo7pd1kr9f 8 ай бұрын
मी दररोज व्हिडिओ बगत असतो खूप मन प्रसन्न होत तस मि पुणे t राहतो मेडिकल वरून आलं की पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ बगतो
@pramodbidkar5231
@pramodbidkar5231 6 ай бұрын
KZfaq च्या माध्यमातून खुपचं छान धनगरी जीवन जय मल्हार जय अहिल्या शासन सोयरे हो
@atulshingare9366
@atulshingare9366 9 ай бұрын
शिंग्रोबाच्या घाटात आता बाणाई नारळ फोडणार. 🙏 मागच्या वर्षी पहिला व्हिडिओ शिंग्रोबच्या घाटातून जाताना.
@sulochanabutte-pq3oy
@sulochanabutte-pq3oy 5 ай бұрын
खरंच बाणाईच खूप कौतुक वाटतय
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपल्या कष्टाला आणि कामाला मानाचा नमस्कार आपल्या पाठीशी सदैव बाळूमामाचे आशिर्वाद रावो हीच बाळु मामाच्या चरणी प्रार्थना बाळु मामाच्या नावानं चांगभलं
@ramags4583
@ramags4583 5 ай бұрын
मी हा व्हिडिओ पान आहे वहिनी आतापर्यंत पाच ते दहा वेळा खूपच कष्ट आहेत तुमचे एकदा मी वाड्यावर नक्की भेटायला मला हाके दादा म्हणल्याप्रमाणे एक कोंबडा आरवल्याचं गाणं मनात मनात जोंधळा दळून दाखवा ना पहाटेच्या ट्यमाला...plz बानाई वहिनी
@eknathdeore743
@eknathdeore743 9 ай бұрын
भंडारा समजून अंधारात मसालाच कपाळी लावला.भाऊ मी खूप हसलो.
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 9 ай бұрын
ताई मी काल वाघजाईच दशॅन केल व शिगग्रोंबा पाया पडले मी लय शोध घेतला कुठे च भेटले नाही खास करून तुमची गाठ घ्यायची होती पण नाही झाली नाही सुखरुप जावा देव शिग्रोंबा आहे तुमच्या पाठीशी 😊👍🙏🙏👌
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@sangitapagare5874
@sangitapagare5874 9 ай бұрын
Kay bhari petle banvle Vahini ne..mouth is watering 🤤🤤…sarva soyepak chanch zala..👌👌 ..sarve family chan ahe tumche dada..sarve Bhau tumi melun rahtt..😇
@user-zz4gr9yc9s
@user-zz4gr9yc9s 8 ай бұрын
खूपच कष्टाचे जीवन, तरी सर्व आनंदी, तुमचे जीवन कळले,बाळूमामा तुमचे सर्वांचे रक्षण करो.
@radhajadhav6327
@radhajadhav6327 9 ай бұрын
दादा तुम्ही भाऊ भाऊ खुप खुप छान राहाता आसेच राहा देव तुमच्या पाठीशी आहे सागर ची काळजी घ्या
@rutiknarawade4647
@rutiknarawade4647 4 ай бұрын
Dada tula bayko khup chhan bhetli akdam annpurna....🎉❤
@user-gg1nb9mc6s
@user-gg1nb9mc6s 9 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडता
@bhartibaste2487
@bhartibaste2487 9 ай бұрын
खुप कष्ट करतात तुम्ही दादा. व्हिडिओ खुप छान राहातात तुमचे अप्रतिम 👌🙏🙏
@atulshingare9366
@atulshingare9366 9 ай бұрын
बानाईच्या हाताला काय थारा न्हाई, किती काम वडत्या. 🙏
@shobhapatil5853
@shobhapatil5853 4 ай бұрын
दादाखुप छान गाण महणतात आवाज छान आहे अशी नविन गाणे महणत जा
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 9 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दादा सासवड
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 9 ай бұрын
All are very loving people. You always enjoy your time and your life by doing work with each other. God bless all of you. What a wonderful time management all of you are having.Go ahead. Always keep love with all. Supreme power is with you.
@bradx1852
@bradx1852 9 ай бұрын
धनगरी जीवन किती खडतर आहे,पण तुम्ही हसून आनंद जगणं, नमस्कार मेहनतीला.
@jayasawant8681
@jayasawant8681 4 ай бұрын
खरच बआनआई ताई तुम्ही मला खुप आवडतात
@shashikantrupanawar1519
@shashikantrupanawar1519 3 ай бұрын
तुमचं जीवन पाहुन जगण्याची उमेद मिळेल
@user-xs7nd7sp1v
@user-xs7nd7sp1v 9 ай бұрын
तुम्ही सर्वजण फार कष्टाळू आहात तुम्ही सर्वजण एकत्र काम करतात आणि हसत मुखाने बोलतेय
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 353 М.
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 353 М.