Рет қаралды 110,335
#Israel #Palestine #Jerusalem
हिटलर व्यतिरिक्त युरोपातील ज्यूंना ठार करण्याचं वेड कदाचित लेफ्टनंट कर्नल अॅडोल्फ आइकमन यांनाच असावं. दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर कितीतरी वर्षांनी अर्जेंटिनामध्ये अज्ञातवासात असताना आइकमेन यांनी विलियम सॅसेन नावाच्या एका डच व्यक्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "खरं सांगायचं तर युरोपात राहणाऱ्या सर्वच्या सर्व 1 कोटी 30 लाख ज्यूंना ठार केलं असतं तर माझं काम पूर्ण झालं असतं. मात्र, हे झालं नाही आणि म्हणून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना जो त्रास सहन करावा लागणार आहे, त्यासाठी मी स्वतःला जबाबदार मानतो. आमची संख्या कमी असल्याने हे काम आम्ही पूर्ण करू शकलो नाही. मात्र, जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही नक्कीच केलं." दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आइकमन अर्जेटिंनाला पळून जाण्यात यशस्वी झाले होते. हे अॅडॉल्फ आईकमन कोण? आणि त्यांनी काय केलं होतं? हे जाणून घेऊयात.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi