Рет қаралды 112,576
#BolBhidu #DhuleLoksabha #LoksabhaElection
धुळ्यात कसं कसं ? तर नाही नाही म्हणता रेसमध्ये आलेली महाराष्ट्रातली काँग्रेसची जागा म्हणजे धुळे लोकसभा. इथे भाजपनं पहिल्या यादीतच विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यांची उमेदवारी जाहीर होऊन महिना झाला तरी इथून काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नव्हता. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर अशा दोन नेत्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. पण काँग्रेसनं कुठेही चर्चेत नसलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांना धुळ्यातून उमेदवारी दिली. त्या मूळच्या नाशिकच्या असून त्यांना धुळ्यातून उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. धुळ्यातून लढण्यासाठी त्या कमकुवत कॅन्डीडेट असल्याची चर्चा झाली. पण मागच्या महिनाभरात अशी काही समीकरणं जुळून आलीत, ज्यामुळे ही जागा रेसमध्ये आल्याचं म्हटलं जातंय. सुरुवातीला सुभाष भामरे सहज विजयी होतील, असं बोललं जात होतं, पण आता हा सामना कट टू कट झाल्याचं सांगण्यात येतंय. काँग्रेसनं ही जागा रेसमध्ये कशी आणली ? आणि कितपत रेसमध्ये आणली ? थोडक्यात धुळ्यात कसं कसं? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/