राजमाता अहिल्याराणी होळकर जयंती दिवशी (31) मे शासकीय सुट्टी जाहीर करा - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

  Рет қаралды 80

Santosh Shinde Vlogs

Santosh Shinde Vlogs

Ай бұрын

राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी (31) मे शासकीय सुट्टी जाहीर करा... - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
सध्याच्या राज्यकर्त्यांनी राजमाता अहिल्या राणी होळकरांच्या राज्य कारभाराचा अभ्यास करावा. होळकरांच्या कर्तुत्वाचा इतिहास महाराष्ट्रासह देशाला प्रेरणादायी आहे. सध्या राज्यात चुकीचं, सुडाच किंवा फसवं राजकारण करण्यापेक्षा आदर्श राज्यकारभार कसा असावा हे 32 वर्ष राज्य कारभार केलेल्या अहिल्या राणी होळकरांच्या कर्तुत्वान इतिहासातून समजून घ्यावे. शिंदे-फडणवीस सरकारला चांगल्या विचारांची गरज आहे... असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
संतोष शिंदे म्हणाले, शिंदे होळकरांचा इतिहास लढवय्या आहे. आजही इतिहास हा होळकरांचे कर्तुत्व सांगतो. परंतु आजही मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्याराणी होळकर यांचा खरा इतिहास समाजासमोर आलेला नाही. होळकरांच्या इतिहासाचे पुनर्लेखन झालं पाहिजे आणि सत्य इतिहास जगासमोर आला पाहिजे अशी भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. कारण तोच खरा इतिहास सोनेरी हस्ताक्षराने लिहिला जाईल. म्हणून होळकरांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करावे. तसेच राजमाता अहिल्या राणी होळकर यांची 31 मे रोजी 299 जयंती आहे. त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावे अशी संभाजी ब्रिगेड ची राज्य सरकारकडे मागणी आहे.
पुणे | स्वारगेट | येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल कोकरे, व्यंकट मानपिढी, वैभव तनपुरे, कल्पना गिड्डे, संविधान सोनवणे, दीपक शेलार आधी उपस्थित होते.
कृपया प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती...
संभाजी ब्रिगेड पुणे महाराष्ट्र

Пікірлер
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 46 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 43 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 15 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 46 МЛН